Ramjan Tadavi

Abstract Horror Others

4.0  

Ramjan Tadavi

Abstract Horror Others

दयाळू भूत

दयाळू भूत

3 mins
664


     हवेच्या जोरदार लाटेने त्याचे पांघरुन पळवले.कुत्र्याचे रडण्याने त्याचे डोळे उघडले. कोरड्या पाल्यापाचोळ्यावर पदचाप उमटले. तो खाडकन उठून बसला.

  'कोन आहे तिकडे' हिम्मत करुन त्याने विचारले.

   'हु..... हु...... हु.....' असे दर्दनाक उत्तर त्याला ऐंकू आले.

   बक-या चरण्यासाठी सोडून त्याच्याजवळ येवून बसणा-यांनी त्याला भुताटकीच्या गोष्टी ऐकविल्या होत्या. दिवसाढवळ्या ज्या गोष्टींनी त्याचे मनोरंजन केले होते. त्याच गोष्टी काळासारख्या त्याच्या स्मृतीत उभ्या होत्या.

   'बोलत का नाही कोण आहे तु' 

त्याने कंठात प्राण आणून दुसरा प्रश्न विचारला.

   'घाबरु नको मी मानवी आत्मा आहे' असे अडखळते बोल त्याच्या कानात शिरले. त्याचे अंगाग शहारुन आले. वर्षानुवर्ष काळ्याकुट्ट रात्री मळ्यात एकटा पडून राहिल्याने त्याची भीती चेपली होती. तो ब-यापैकी धाडसी झाला होता. म्हणून तो फारसा न भिता उघड्या डोळ्यांनी सभोवार बघत होता.

    त्याच्या खाटेच्या पायथ्याला एक काळीपांढरी आकृती आकार घेवू लागली. समोर बसलेल्या आकृतीचे डोळे खोबणीत खोल अडकले होते. नाकावरचे मांस गायब होते. ओठांऐवजी पांढऱ्याशुभ्र दातांच्या

 लाईनी दिसत होत्या.

   'तुला काय हवे आहे' त्याने मनाचा हिय्या करुन विचारले.

   ' मला काही नको, घाबरु नकोस मी सज्जन भूत आहे म्हणून माझा चेहरा फारसा विद्रूप नाही.

    'असं आहे का' त्याच्या जिवात जीव आला.

    'मी सज्जन लोकांची साथसंगत करतो. त्यांचे दुख कमी करण्याचे प्रयत्न करतो. भूताने थोडे मोकळे होवून सांगितले.

    एव्हाना त्याच्या मनावरचे ओझे बरेचसे उतरले होते. भूत आपल्याला घोळसून घोळसून मारणार नसून उलट आपल्याला मदतच करणार आहे हे ऐंकूण त्याला हायसे वाटले. भूतांच्या जीवनाकडे तो ओढला गेला.

   भूताला त्याने त्याची कर्मकहाणी सांगायला सुरवात केली. ताजे अन्न माझ्या नशिबी नाही. रात्रीच्या उरलेल्या अन्नावर मी सकाळी भूक भागवतो. फडक्यात गुंडाळून शिळे अन्न माझा मालक आणतो. शेंगदाण्याची चटणी व चपातीचा मला उबग येतो. गोडधोड पदार्थाची चर्चा माझ्या तोंडाला पाणी सोडते. माझा जन्म फक्त सालदारकी करण्यासाठीच झालेला आहे. उप्परवाला सुख माझ्या वही खात्यात लिहायचे विसरला आहे. चूक झाल्याचे उप्परवाल्याला कुणी सांगत नाही. लिहीलेली गुलामगिरी खोडता येत नाही. माझ्या जीवनातले कित्येक उन्हाळे पावसाळे लग्नाविना निघून गेले आहेत. सांसारिक सुखाला मी पारखा झालो आहे. नाईलाजाने मला दुखाशी हातमिळवणी करावी लागली आहे. निसर्ग मात्र माझा सखासोबती झाला आहे. निसर्गाने मळ्यावर ना ना प्रकारच्या वृक्षांची घनदाट सावली केली आहे. गाई, म्हशी, बैल येथे निवांत रवंथ करत बसतात. माझ्या साठी पत्र्याचा शेड आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मात्र मी बहुतांश वेळ सावलीत असतो. मुसळधार पावसात गळक्या शेडच्या कोप-यात पाय दुमडून पडतो. थंडीत कोवळे उन अंगावर झेलतो.पिठूर चांदणे माझ्यावर फिदा आहे. थंडगार हवा माझ्या अंगाभोवती पिंगा घालते. पाळीव पशुंना चारा चारणे. पिकांना व पशुंना पाणी पाजणे. उकीरड्यावर शेण फेकणे. मळ्याला स्वच्छ राखणे या जबाबदा-या मी ईमानेईतबारे पार पाडतो. अंगमेहनतीच्या कामाने माझा देह शिणतो. शिळेपाके खावून मी खाटेवर देह टाकतो. डोळ्याला डोळा कधी लागतो माझे मलाच कळत नाही. मला झोप कुणाकडून उधार घ्यावी लागत नाही. झोपेला मी अप्रिय नाही. निद्रामाय माझ्यावर अतिप्रसंन्न आहे. मी क्षणार्धात घोरायला लागतो. रातकिड्यांचा सूर माझ्या सुरात मिळतो.  

    मळ्याच्या विहीरीला उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे. थंडगार पाण्याने माझी व पशुंची तहान भागते. माझा शेतमालक माझे शोषण करतो. माणूस माणसाचे रक्त पित आहे. आणि आरोप भूतांवर करतो आहे. रोजच्या रोज थेंबथेंब पिल्याने समजत नाही. अतिश्रम, तुटपुंजा मोबदला, छुपी वेठबिगारी ही रक्त पिण्याची भांडवलदारांची साधने आहेत. माझ्याकडे लुटण्यासारखे काही नाही. म्हणून मी चोरांना घाबरत नाही. मला लुटायला आलेले चोर उलट मलाच काहीतरी देवून जायची शक्यता अधिक आहे. मला चोरांपासून सावध राहायची गरज नाही. काळे कुत्रे माझ्या सोबत असते. माझ्या मळ्यात विजेचा एकच दिवा आहे. लाईट गेल्यावर काळे कुत्रे अंधाराशी एकरुप होते.

मी स्वतच्या घराचे स्वप्न बघितले आहे. पण मालक कवडीचुंबक आहे. तो प्लाटाचा छोटासा तुकडाही माझ्या नावावर करणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे तसे बॅकेंत माझे पैसे साचताहेत. हे पैशांचे तळे साचायला कित्तेक वर्ष लागणार आहे. माझ्याकडे पुरेसा बॅकबॅलेंस नसल्याने मला कुणी मुलगी देत नाही. माझे लग्नाचे वय कधीच उलटून गेले आहे. 

   तुझी कर्मकहाणी ऐंकूण मला अश्रू अनावर झाले आहे. माझ्याकडून तूर्तास पाचीपंवानाचं जेवन तुला मिळणार आहे.

   हवेतून एक रुंद ताट अवतरले. सालदाराने ते अलगद झेलले व तो पाचीपंकवानावर तुटून पडला.

    'भूतांशी सोयरीक करणे तुला चालेल का, माझ्या चुलत काकाच्या मुलीसाठी मी बात छेडतो' सज्जन भूताने औदार्याचे खजाने रिते करायला सुरुवात केली.

    'तुमचे उपकार मी कसे फेडू' भूक भागल्यावर आणि जीवनसंगिणी नजरेच्या टप्प्यात दिसू लागल्यावर सद्गतीत होवून सालदाराने म्हटले.

   रोज मिळणा-या पाची पकवानाच्या पदार्थांनी सालदाराचे शरीर धष्टपुष्ट झाले. चेह-यावर तजेला आला. स्वभाव हसरा झाला.

शिळेपाके खावून आपला सालदार गडी कसा च्यारी अंगाने फुलतो आहे असे कोडे मळ्याच्या मालकाला पडले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract