दुसरी बाजू
दुसरी बाजू
सहसा सगळ्या चांगल्या - वाईट गोष्टी पचवण्याची इच्छाशक्ती असल्याने मी फारसा दुखावत नाही. पण एक गोष्ट नेहमीच मला खटकत आली आहे, आणि पुढेही खटकत राहील. ती म्हणजे "महान" बनणं.
व्यक्ती महान बनण्याच्या नादात विसरूनच जाते, की आपण नकळत का होईना कोणाचं मन तर दुखावत नाही ना ! आणि जी व्यक्ती महान बनण्याचा आव आणते तिला त्या वेळेस जवळच्या व्यक्तीपेक्षा समोर असलेल्या परिस्थितीची जास्त काळजी असते.
मान्य सगळं मान्य पण मुळात तुम्ही ज्या व्यक्तीसाठी महान बनत आहात, त्या व्यक्तीला तुमच्या त्या महानतेबद्दल, तुमच्या त्या त्यागाबद्दल तरी कळू द्या, त्याचा उलटा परिणाम असा होतो की जवळच्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होऊन कायमचा दुरावा येतो. आणि नंतर त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या जवळची वेळही निघून गेलेली असते मग होतो...
फक्त आणि फक्त पश्चाताप..!
