तुला कळणार नाही ..!
तुला कळणार नाही ..!
हो..येते तिला ही आठवण,पण त्या आठवणीत झुरतो तर मीच आहे ना.
हो.. होत प्रेम तिच ही पण आयुष्याच्या खडतर वाटेवर एकटा तर मीच चालतोय ना.
हो.. आहेत डोळे तिचे पाणावलेले पण त्या डोळ्यातलं पाणी सुद्धा माझचं आहे ना.
हो...आहे जाणीव तिला ही प्रेमाची पण काळजावर घाव तर माझ्याच कोरले गेलेत ना..
पुर्वी सारख त्यांच्यात रोज रोजच ते भेटणं, बोलणं होत नाही. देवाचं दर्शन घेण्यासाठी गेल्यावर गर्दीत हळूच त्याच्या मुठीमध्ये तिने सरकवलेली करंगळी, टॉकीज मध्ये सोबत पाहिलेले पिक्चर्स, मुव्ही पाहताना तीच हसणं, खांद्यावर डोकं ठेवणं, शांत थिएटरमध्ये मध्येच मोठ्याने ओरडणं, बाईक वर मारलेली दूरवर राईड आणि जुहूच्या त्या शांत किनाऱ्यावर त्या दोघांनी सोबत अनुभवलेली संध्याकाळ हे सगळं तिच्यानंतर तो फक्त आठवणीमध्येच स्मरू शकतो
रिलेशनशिप मध्ये असताना त्यांच्यात सुद्धा प्रॉब्लेम, भांडण झालीच, जस इतर जोडप्यांची होतात अगदी तसंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ते नात पुढे घेऊन जाणं यालाच तर रिलेशनशिप म्हणतात ना. आज ते दोघे नसतील ही एकमेकांसोबत पण त्यांनी जगलेले सुखद क्षण आणि अनुभव काहीतरी चांगल्या वाईट गोष्टी त्यांना शिकवून गेले असणार हे मात्र खरं.
आपल्याला हवं तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि हवं तेव्हा निघून जाते, तो भाग आपल्या आयुष्यात किती ही सुखद, चांगला आणि महत्वाचा असला, तरीही तो एक भाग आहे, अख्ख आयुष्य नाही, आपल्याला अजून खूप चांगलं आयुष्य जगायचंय आणि त्यासाठी भाग नाही तर सहभाग असायला हवा..सोडून गेलेल्या माणसाचं दुःख कमी होत नसेल, तर हरकत नाही पण आपल्या सोबत असलेल्या माणसांचा त्रास वाढवण्यात काहीच पॉईंट नाही ना..
वर्षांभरापूर्वीच ती त्याच्या आयुष्यातुन कायमची निघून गेली होती. दिवसभराच्या गप्पा ह्या त्यांच्या चॅटिंग मध्येच व्हायच्या.म्हणजे बघानां, ती ऑफिस संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर किंवा तो ऑफिस संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर घरी आल्यावर मेसेज मध्येच चॅट करायचे कारण, दुसरा ऑपशन नसतोच ना, फोन वर बोलायला हवा तेवढा वेळ कामांमुळे भेटायचा नाही.
तसा त्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे त्यातले काही त्याला सतत विचारत असतात, "वर्ष लोटून गेलं रे, तु तुझा मेन व्हाट्स अँप वरचा डीपी अजून किती दिवस ब्लॅंक ठेवणार आहेस आणि स्टेटस ही अपडेट नाही". खरंतर आपण ठेवलेल्या स्टेटस ला तिने पहावं त्याला रिप्लाय करावा, डीपी ठेवून तिने कॉमेंट करावी तिच्यासाठीच तर हा सगळा हट्टाहास असतो, पण ती आयुष्यातुन कायमची निघून काय गेली आणि सगळं गणितच कोलमडलं. आता त्याच्या मित्रांच्या प्रश्नाला हे उत्तर आहे, की " हे व्हाट्स एप जरी इतरांसाठी फक्त सोशल मीडिया असलं तरी त्यांच्यासाठी ते एक भावना व्यक्त करण्याचं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्याचं माध्यम होत, हा तिचा मान आहे, तीने भविष्यात केव्हाही मागे जरी वळून पाहिलं तरी तिला सगळं जसच्या तसच दिसलं पाहिजे, भेटलं पाहिजे".
खरंच आठवणी ह्या अश्याच असतात, विचित्र पण एकांतात नेहमी आपली साथ देतात.मनात दुःख असतानाही चेहऱ्यावर मात्र कटू हसू देऊन जातात पण वेळेनुसार सर्व काही बदलत. माणसं, नाती, परिस्थिती आणि आपली गरज सुद्धा...
माझ्या अख्या जीवनात जरी तू सामावली असलीस तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमीचं..
आता तुझी आठवण येत नाही.

