शिक्षक व माजी विद्यार्थी स्नेह
शिक्षक व माजी विद्यार्थी स्नेह
तर ही गोष्ट सुरू होतेय २०२० च्या कोविड काळापासून, टीम अनुदत्त कट्टा म्हणजेच आमची २००७ ची बॅच.
आम्ही नेहमीच एकमेकांना काहिनाकाही बहाण्याने किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये भेटत असतो आणि त्यातही जॉब मधून वेळ काढून ट्रिप सुद्धा प्लान करत असतो. अन आमच्या प्रत्येक वेळेसच्या भेटी मध्ये एक टॉपिक नेहमीच कॉमन राहिलेला आहे, तो म्हणजे शिक्षकांसोबत गेट टू गेदर आणि ते ही फक्त आपलीच बॅच नाही, तर दहावीच्या पहिल्या बॅच पासून म्हणजे १९९५ पासून ते आतापर्यंतच्या सर्व बॅचेस, तुकड्या...!
पण अडचण एकच की एवढ्या सगळ्या बॅच च्या विद्यार्थ्यांना कस शोधायचं आणि काय सांगून एकत्र करायचं, शिवाय ते आमचं का ऐकतील ? आणि का भेटतील ? असे बरेच प्रश्न मनात उपस्थित राहिले. तरी धाडस केलं, एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणूनच मी एक मेसेज बनवून सोशल मीडियावर फिरवला, आमच्या बॅच च्या सगळ्या मित्रांना तो मेसेज शेअर करायला लावला. फेसबुकवर त्या मेसेज वर ५० पेक्षा जास्त कॉमेंट्स आले, तेव्हा थोडा कॉन्फिडन्स वाढला म्हणून पुढे काय ? त्यासाठी व्यवस्थित रूपरेषा बनवून घेतली.
" माझी शाळा " नावाने व्हाटस अँप वर ग्रुप तयार केला त्याआधी आपल्या शाळेच्या नावाने असलेला फेसबुकवरील ग्रुप आधीच " दिलीप मर्चंडे दादा " चालवत होते. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आम्ही आमची कल्पना सांगितली आणि आम्ही एकत्र त्या ग्रुपला वाढविण्यासाठी सोबत काम करू लागलो.
बोलतात ना, तुमच्या मध्ये जर तो स्पार्क असेल, तर अशक्य गोष्टी ही शक्य होतात. फक्त सोबतीला त्याच ताकदीचे हात आणि विचारांची साथ हवी आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला आपल्या ह्या " माझी शाळा " ग्रुपमधून भेटत राहिल्या. त्यामध्ये विशेषतः काही नावे आवर्जून घ्यावीशी वाटतात ती म्हणजे आमचे सगळे सिनियर माजी विद्यार्थी बंधू अभिजित पाळेकर दादा, प्रज्योत कदम दादा, दिलीप मर्चंडे दादा, विजय मर्चंडे दादा, आणि दुबई हुन नेहमीच आमच्या संपर्कात असणारे भारत गवळी दादा ह्या सगळ्यांचा सपोर्ट आणि सकारात्मक विचार योग्य वेळी आम्हाला मिळत राहिले. सुरुवातीला ह्या सिनियर दादांकडून खूप सहकार्य लाभले. बाकी आपले सहकारी मित्र साईनाथ वाघमारे आणि दीपक वाल्हे तर नेहमीच तयारीत असतात.
त्यानंतर एकमेकांच्या ओळखीने आम्ही नवीन मित्र जोडत गेलो, त्यात रवींद्र पंदारे दादा, संतोष स्वामी दादा, विजय सोमासे दादा, प्रकाश शिंदे दादा, दीपक पाडावे दादा, राजन मांजरेकर दादा, विकास झाकडे दादा, समाधान कांबळे, विकास कांबळे, विजय कांबळे दादा, आकाश म्हात्रे, प्रदीप देवळे, रत्नदीप लव्हाळे इ.
आता मुलांना सामील होताना पाहून आपल्या मुलींना पण जोश येणारच शेवटी अनुदत्त विद्यालय मधूनच तयार झालेल्या खणखणीत नाणी आहेत तर मुलींमधून मानसी सावंत ताई, सुजाता देवरूखकर ताई, रेखा माळदकर दीदी, विद्या मर्चंडे ताई, निर्मला गायकवाड ताई, मेघना सुतार ताई, शेवंता ताई, ममता महिंद्रकर दीदी, सुरेखा गायकवाड ताई, मुदिता ताई, सुरेखा ताई, मानसी गुरव ताई, राधिका महिंद्रकर, स्वाती केसरकर ( चव्हाण ), ऍड. प्रणाली पाते ताई, दिक्षिता पासलकर... बघता बघता ग्रुप वाढला.
बर मघाशी काय बोललो मी...गेट टू गेदर ... येस... ! तर गेट टू गेदर चा प्लान करायचा, हे आमच्या काही निवडक मुलांच्या मनात आधीपासून तर होतच. फक्त त्या प्लान ची अंमलबजावणी कशी करायची, ह्यावर येऊन गाडी अडायची. आम्ही सतत २ वर्षांपासून आपल्या शाळेत हा कार्यक्रम अगदी दणक्यात करूया म्हणून धडपडत होतो आणि शेवटी मुहुर्त हा लागलाच. त्याच श्रेय मी प्रज्योत दादा आणि अभिजीत दादा ह्यांना देईल.
सगळं ठरलं ... तारीख, वेळ, ठिकाण..१ मे २०२३ रोजी सोमवारी सकाळी ९ वा. आपल्या शाळेत कार्यक्रम होईल असं ठरल. आमच्या कडे मोजून बरोबर एकच महिना शिक्कल होता, त्यात आम्हाला सगळं नियोजन करायचं होतं. मी एक इमोशनल मेसेज बनवला, त्यात सगळ्यांना भेटीसाठी आवाहन केल आणि तो मेसेज सगळ्या सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात झाली. दररोज एक आठवडा मेसेज शेअर होत होते. नंतर आम्ही त्यात गुगल फॉर्म ऍड केला. रजिस्ट्रेशन बंधनकारक केलं. त्यामुळे आम्हाला मुलांची संख्या आणि बाहेरील व्यक्ती कार्यक्रमात येऊन गोंधळ घालणार नाही, ह्याची पूर्तता भेटली.
बरं, कार्यक्रमासाठी आम्ही फक्त माजी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हाटस अँप ग्रुप तयार केला, त्यात फक्त कार्यक्रमाविषयी चर्चा करत राहिलो. ३ ते ४ वेळा मीटिंग घेतल्या, त्यात कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली, जबाबदारी वाटून दिल्या. आम्हाला कार्यक्रमासाठी फक्त दोन तास मिळाले होते म्हणून कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा मी त्याचनुसार तयार केली.
ही तयारी एका बाजूला सुरू असताना आमचे सर्वांचे एकमेकांना रोजचे रोज अपडेट होतेच, शिवाय वयक्तिक रित्या सर्व शिक्षकांना निमंत्रण मेसेज करण्याची जबाबदारी मी घेतली होती. ह्या सगळ्या मध्ये मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायला आवडेल, ते म्हणजे आमचे सर्व शिक्षक, किती ते विद्यार्थ्यांवर प्रेम ❤️ म्हणजे कार्यक्रमासाठी बऱ्याच शिक्षकांनी स्वतःहून कितीतरी वेळा आर्थिक मदतीसाठी पाठबळ देण्यास तयारी दर्शविली. बऱ्याच शिक्षकांनी वयक्तिकरित्या कॉल्स करून कार्यक्रमाच्या नियोजनाची विचारपूस केली, काहींनी प्रोत्साहन दिलं. मी मुद्दाम शिक्षकांची नावे घेणार नाही. ( काही प्रोटोकॉल्स आम्ही सुद्धा पाळू ) खरंच आमच्यासाठी असलेलं तुमचं हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत, शब्दात व्यक्त होणार नाही, इतकं तुम्ही आम्हाला दिलंय. 🙏🏾
मी नेहमीच बोलतो, कदाचित हे माझं ब्रीदवाक्य म्हणून आता पेटेंट कराच😅 " शाळा हे आमचं दुसरं घरच आहे आणि तिथे असणारे आमचे शिक्षक हे आमचे आधारस्तंभच ..."
बर ठरल्याप्रमाणे आमचं नियोजन झालं होतं, आम्ही विद्यार्थ्यांचा २०० पर्यंतचा काऊंट पडकून चाललो होतो त्यानुसार स्नॅक्स आणि पाणी अरेंज करून ठेवल होत.
आता हळू हळू भेटीचा दिवस जवळ आला. त्याआधी मीटिंग घेऊन कार्यक्रमाच्या एक दिवसाआधी शाळेत जाऊन तयारी करायची अस ठरवलं. मग त्यात साफसफाई, रांगोळी आणि डेकोरेशन हे होत. रविवारी ३० तारखेला डेकोरेशन वाला सगळं सामान घेऊन शाळेत पोहचला होता.. रवी दादा, स्वामी दादा, प्रज्योत दादा, अभि दादा, समाधान, आकाश म्हात्रे, झाकडे दादा, सोमासे दादा, प्रकाश शिंदे दादा, दीपक पाडावे दादा, प्रदीप, विकास, प्रशांत साळसकर दादा, महेश सावंत दादा ही सगळी मंडळी एक एक करून शाळेत जमू लागली.
आपण कार्यक्रमामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी शिक्षकांसाठी खुर्ची तर विद्यार्थ्यांसाठी बेंच अस कॉम्बिनेशन केलं होतं. ते बेंच ४ - ५ वर्गातून आणण्यासाठी पोरांनी खूप मेहनत घेतली. अक्षरशः पोर दमली होती. बेंचची ने - आन करून परत बेंच नीट एका रांगेत लावून सर्वांचे हात लाल झाले होते. इकडे रवी दादा व विकास झाकडे दादा छप्परावर लागलेली झळमटे काढण्यासाठी मैदानात उतरले. स्वामी दादा आणि रवी दादा ह्या जोडीने अक्खा कॅम्पस झाडून साफ करून घेतला..त्यानंतर बेंच लावायला मदत केली. बेंच लावून झाल्यावर त्यांनी प्रत्येक बेंच ओल्या कापडाने पुसून घेतले. घामाने पूर्ण ओलेचिंब झाली होती पोर... बाजूला डेकोरेशन च काम सुरूच होत तर स्वागतासाठी आपला नवीन मित्र आकाश म्हात्रे ज्याने खूप सुंदर रांगोळी काढली, तो रांगोळी काढण्यात दंग होता. पोरं शरीराने थकली होती पण मनाने बिलकुल नाही... कारण आपला कार्यक्रम अजून बाकी आहे, तो करायचा आहे आणि तोही अगदी दणक्यात 🤟
सगळं काम आटपून रात्री ११ च्या सुमारास शाळेतच शेवटची मीटिंग घेतली त्यात फक्त उजळणी केली, सोबतीला गृहपाठ होताच 😅... शाळेची आठवण जगायची आहे तर थोडं शाळकरी झाल्याची भावना पण आधल्या दिवसांपासूनच मनात रंगायला हवी ना ..!
इथे मला आवर्जून सांगायला आवडेल की कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी आपले आदरणीय शिक्षक श्री. देशमुख सरांनी फोन करून कार्यक्रमाविषयी विचारपूस करून जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी सर तुमचा खूप आभारी आहे. तुमच्यामुळे मनातील फार मोठं ओझं हलकं झालं.
त्याच बरोबर आदरणीय उपमुख्याध्यापक श्री. कासार सरांनी आदल्या रात्री येऊन कार्यक्रमाची केलेली पाहणी, आम्हाला खूपच भावली. त्यामुळेच आम्ही सगळे मुलं उत्साही झालो.
१ मे २०२३ ❤️ शेवटी तो दिवस उजाडला, इतक्या दिवसांपासून सुरू असलेली कसरत, आज रंग लायेगी 😂. सगळं ठरलं होतं, आम्ही मुख्य योद्धे सकाळी ७ वाजता शाळेत भेटायचं ठरवलं होत. रवी दादा सकाळी ५ वा उठून कांदिवली स्टेशन ला फुलं आणण्यासाठी गेले, त्यांच्या जिद्दीला सलाम 🤟 इकडे सोमासे दादा आणि स्वामी दादा ह्यांची स्नॅक्स आणि पाणी आणण्यासाठी धावपळ सुरू झाली, त्या धावपळी मध्ये पोर कपडे बदलायचे सुद्धा विसरून गेले होते. डेडीकेशन काय असत, हे खरच आम्हाला तुमच्याकडून शिकायला हवे.
मी आणि दीपक जेव्हा शाळेच्या परिसरात पोहचलो तेव्हा आपल्या शाळेत ध्वजारोहणचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे शिक्षक वर्ग आणि आमचे सहकारी विद्यार्थी मित्र तिथे हजर होते. हळू हळू सगळे येऊ लागले.
रेखा दीदी आणि मेघना ताई दोघी सोबतच आल्या. त्यांनतर लगेचच विजय कांबळे दादा आले. आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रेखा दीदी आणि विजय दादा ह्याच दोघांच्या मजबुत खांद्यावर होती आणि त्या दोघांनी हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेललं. सकाळी ९ च्या सुमारास अगदी मोजकीच मुलं दिसत होती त्यामुळे आम्ही आयोजक थोडं निराश झालो. पण आपल्या शिक्षकांनी आपली बाजू अगदी जोर लावून धरून ठेवली होती आणि आमचे शिक्षकचं जर आमच्या सोबत पूर्ण ताकदीशी उभे असतील तर आम्हाला कोणीच हरवू शकत नाही.
अहिरराव सर, घुले सर, पिंजारी सर, देशमुख सर, कासार सर, जाधव सर ह्यांनी फक्त एकच वाक्य म्हंटल " राहुल ...! आपला विषय शुद्ध आहे, त्यामुळे आपला कार्यक्रम छानच होणार, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, एवढं सगळं तुम्ही जीव ओतून केलंय, त्याच चीज आज झालंय, त्यामुळे काहीच काळजी करू नका "... मित्रांनो...! हे शब्द आपल्याला किती ऊर्जा देऊन जातात, ह्याची कल्पना त्या त्या प्रसंगातच अनुभवता येते.
आता इथून आपल्या खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिजित दादांनी कार्यक्रमाची सुरुवात करून आपल्या सूत्रसंचालकाकडे जबाबदारी सोपवली. रेखा दीदी आणि विजय दादांनी सूत्रसंचालनाची धुरा हातात घेतली. मराठी येत नसलेली आपली रेखा दीदी कसं का होईना तोडून मोडून शब्दांची जुळवा जुळव करत सूत्रसंचालन करत होती तर तिच्या जोडीला आपला विजय दादा एका बाजूने सगळी सूत्रे सांभाळत होता. कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे कार्यक्रमाची वाटचाल सुरू होती.
प्रथम दीपप्रज्वलन हे आपल्या उज्ज्वल शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय. श्री. रामचंद्र आदावळे सरांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर आपल्याला सोडून गेलेले शिक्षक व माजी विद्यार्थी जे आज हयात नाही, ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि शिक्षकांचे मनोगत झाल्यानंतर शेवटी आदावळे सरांचे भाषण झाले व त्यांच्याच हस्ते केक कापला.
पण मध्ये विजय मर्चंडे दादांनी मनोगत व्यक्त करत असताना एका महत्त्वाच्या व्यक्तीच नाव घेतलं. भारत गवळी जे UAE ला असतात पण जे स्वतः कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नसल्याने त्यांनी त्यांचा आवाज ऑडिओच्या रुपात आम्हाला पाठवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
त्याच बरोबर त्यांनी ठराविक रक्कम बक्षिस म्हणून मागच्या वर्षी म्हणजे २०२२ ह्या वर्षी आपल्या शाळेतून जी विद्यार्थिनी इयत्ता १० वीमध्ये प्रथम आली होती, तिला ते बक्षिस दिलं. ( तथागत गौतम बुद्धांचे अष्टांगिक मार्ग व आर्यसत्य ह्या विचारातून भारत दादांनी ही संकल्पना बक्षीसच्या रुपात मांडली ) भारत दादा तुमच्यासाठी, तुमची ऑडिओ क्लिप जेव्हा आम्ही कार्यक्रमात ऐकवली तेव्हा सगळेजण ती क्लिप मन लावून शांतपणे ऐकत होते, तुमच्या आवाजाच्या रुपात तुम्ही आज आमच्या सोबत होतात, हेच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अजून एक, तुम्हाला अजूनही शाळा विसरलेली नाहीये... लवकर या... लवकर भेटू...😊
आतापर्यंत झालेला हा प्रवास आता समारोपच्या दिशेला पोहचला होता, अभिजित दादांनी समारोपाची सूत्रं हाती घेतली. माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळेला आमची नेहमी आठवण राहावी म्हणून छोटीशी भेटवस्तू देण्यात आली त्यासाठी सगळ्या मुली पुढे आल्या. कार्यक्रम संपन्न झाल्याची घोषणा देताच सगळे विद्यार्थी आपापल्या शिक्षकांना शोधायला पळाले. आता सुरू झाला खेळ फोटोसेशन चा 😅 ... जो तो फक्त फोटोग्राफी करतोय.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत सेल्फी घेऊन स्वँग पण दाखवला आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन संस्कार पण दाखवले. ❤️ आमच्यात स्वँग आणि संस्कार दोन्ही पण आहे.
आता तर माझ्या ही लिखाणाच्या समारोपाची वेळ आली आहे, जाता जाता एवढंच सांगेन...
" जीवन हे शाळेसारखे असते आणि अनुभव मोठा शिक्षक असतो आणि आपण जन्मभर विद्यार्थी असतो. "
ह्या ओळींचा अर्थ खऱ्या अर्थाने आज आम्हाला कळत आहे...पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे व विद्यार्थी मित्रांचे आभार, तुम्ही तुमचा आमूलाग्र वेळ काढून आम्हाला दिलात आणि गुरू - शिष्य, मित्र - मैत्रिणींच्या भेटीचा सोहळा अपेक्षेपेक्षाही चांगला फुलवलात.
शाळा - कॉलेज सोडल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे ३० वर्षांमध्ये असा गेट टू गेदर पहिल्यांदाच घडला असेल, पुन्हा एकदा सगळेजण एकत्रित पणे " अनुदत्त " ह्या नावाखाली भेटलो, पुन्हा त्याच जुन्या आठवणी आपण एकत्रितपणे जगलो...पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत.
