निःशब्द संवाद
निःशब्द संवाद
।। तिला वाटलं तमाशा होईल,
अन त्याने गप्प बसूनच खेळ पलटी केला ।।
"हा फुलांचा बुक्के कसा दिला ?" आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने मागे वळुन पाहिलं तर रंगबिरंगी फुलांच्या पलिकडे फुलणारा चेहरा ओळखीचा वाटला. एका हातात बॅग अन दुसऱ्या हाताने फुलं ती निरखून पाहत होती. पूर्वीचीच सवय प्रत्येक गोष्ट घेण्याआधी पूर्ण चेक करण्याची. साडी चा पदर एका हाताने सावरत तिने पर्स मधून पैसे काढले, दुकानदाराला दिले आणि निघाली.
क्षणभरासाठी वाटलं बोलायला जावं पण नातं जपण्यासाठी घातलेलीच बंधने मध्ये आली अन तो थांबला. एकटीच होती ती, आज बरोबर २ वर्ष झाली होती तिला जाऊन! पण काही केल्याने राहावेना, त्याला वाटलं माफ करावं अन विचारपूस करून बोलावं, बोलायला जाणारच तोपर्यंत मागून एक मुलगा आला. आता थांबण्यात काय अर्थ म्हणून त्याने तिथून निघायचं ठरवलं.
तो निघणार तितक्याच तो आलेला मुलगा ही निघून गेला कदाचित तिला सोडायला आला असेल. त्याच दरम्यान तीच त्याच्याकडे लक्ष विचलित झालं पण काही केल्या तिची नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती. तो तसाच थांबला. त्याच्या डोळ्यात अफाट राग अन हळूच पाण्याच्या थेंबाद्वारे प्रेम वाहत होत जे कोणालाच न दिसण्यासारखं होत.
रागाच्या द्वेषातच, त्याने तिचा हात धरून तिला रोडवरून खेचून साईडला घेऊन गेला. कोणी काहीच बोललं नाही. पाच मिनिटे, दहा मिनिटे, वीस मिनिटे झाली. ओकवर्ड शांतता होती.
वैतागून शेवटी तो निघाला, त्याने पुन्हा तिच्याकडे वळुन पाहिलं, यावेळेस तिने देखील पाहिलं. माहिती नाही काय झालं पण नजरेला नजरेचं नजरेनं कळलं. आता तिचं पुढाकार घेऊन पुढे आली, सॉरी म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. दोन वर्षांमध्ये मनात निर्माण झालेली असंख्य कोडी सुटली, घुसमट संपली, प्रश्नांची उत्तरे मिळाली.
तो तर निघून गेला...
पण ती बराच वेळ त्या दिशेने पाहत राहिली. भानावर आल्यावर जेव्हा हातात पाहिलं तर तिच्या बोटांमध्ये एक चिट्ठी अडकवलेली. त्यात २००८ चा मेसेज होता, त्याने, तिच्यासाठी लिहिलेला...
अमरगाथा
जिथे - जिथे हळवं नातं असेल,
जिथे दोन उतखट प्रेम करणारे असतील,
जिथे वादानंतरच एकत्र येण असेल,
जिथे एकमेकांत विरघळन असेल,
जिथे अबोला असेल, रुसवा असेल,
हा ! पण तो सगळा फसवा असेल,
जिथे एकमेकांविषयी तडजोड आणि त्याग असतो,
जिथे एकमेकांविषयी वाटणारा राग झटकन नाहीसा होतो,
जिथे प्रेम आणि प्रेम कहाणी असेल,
तिथे तिथे, आपल्या आजूबाजूला,
ती आणि तो नक्कीच असेलच.

