चकवा (भाग २)
चकवा (भाग २)


सुमन गायब झाल्याची बातमी गाव भर पसरली.त्या नाक्यावर असणाऱ्या भुताने सुमन ला पळवले अस सगळे जण बोलू लागले. तो रस्ता म्हणजे चकवा हाये, तिथं माणूस गायब होतो मग पुन्हा जिवंत येत नसतो.अशी अफवा गावात होती.
सुमन बेपत्ता झाली ही बातमी गाव भर पसरली तिच्या आई वडिलांनी पोलिसात कंप्लेंट केली .सुमन चे काय झाले कुठे ती गायब झाली ? कोणाला काही समजत नव्हते पण त्या राजापूर नाक्या जवळ चकवा आहे,तिथे भूत पिशाच्च असते अशी धारणा लोकांची होती अमावस्येला तिथे कोणी जावू नये अस लोक बोलत होती. आठवडा झाला तरी ही सुमन चा काही तपास लागला नाही .
कोण तू,आणि मला का अस कोंडून ठेवले आहेस? सुमन एका अंधाऱ्या खोलीत कैद होती.तिचे हात पाय बांधले होते.तिच्या समोर एक मुलगा चेहर्या वर मास्क लावून उभा होता." ये जास्त बडबड नको करू,मला तुम्हा मुलींचा तिरस्कार वाटतो म्हणून मी मुलींना पळवून आणतो आणि इथे डांबून ठेवतो.
पण मी काय त्रास दिला आहे तुला.मला घरी जावू डे.सुमन रडत बोलत होती.
तसे त्या मुलाने,सुमन चे दोन्ही हात समोर ठेवले,आणि आपल्या हातातल्या सुरीने बोटां मध्ये टकटक करत फिरवत राहिला,सुमन घाबरली चुकून जर सूरी बोटावर पडली तर बोट तुटणार होते तिचे.
हे काय करतोस तू,माझा हात.सुमन बोलली,तसे त्या मुलाने सूरी तिच्या बोटात खुपसली.
आई ग ....सुमन जीवाच्या आकांताने ओरडू लागली.
ये ओरडू नकोस,ओरडली तर अजून एक बोट तुटेल.मग त्याने सुमन चे केस कात्री ने कापले.तुम्हा मुलींना तुमच्या सौंदर्या वर खूप गर्व असतो ना,तेच सौंदर्य मी नष्ट करतो..अस बोलून तो मुलगा जोर जोरात हासू लागला.
त्याने सुमन वर अत्याचार करत तिचा बलात्कार केला आणि शेवटी सुरीने शरीरावर भरपूर वार केले.
हा होता सायको किलर रुपेश. मुली ना पकडुन असच त्यांच्या वर अत्याचार करून त्यांचा खून करत असे.
पंधरा दिवसांनी सुमन चे प्रेत त्याच राजापूर रोड वर झाडीत सापडले,त्याला खूप दुर्गंधी येत होती .सगळे गाव वाले जमा झाले होते.पहिल्या खुना सारखेच सुमन च्या शरीरावर एक ही कपडा नव्हता,तिच्यावर ही अत्याचार करून सूरी ने वार केले होते.इन्स्पेक्टर अभिजित तिथे आला होता,त्याला या खुनाचे गूढ काही केल्या उकलत नव्हते.सुमन चे आई वडील धाय मोकलून रडत होते.
इन्स्पेक्टर इतके दिवस झाले तुम्हाला तो खुनी सापडत नाही याला काय म्हणायचे? कमिशनर अभिजित ला बोलत होते.
सर मला अजून थोडे दिवस द्या मी नक्की याचा छडा लावतो.
इन्स्पेक्टर अभिजित हा शेवटचा चान्स आहे,तो खुनी तरुण मुलींना टार्गेट करत आहे,तो एक सायको किलर वाटतो. लवकरात लवकर त्याला शोधून काढा.
अभिजित ने खूप विचार केला मग त्याने एक प्लॅन आखला.
त्याची असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिरा ला त्याने या कामात आपल्या सोबत घेतले.
मीरा,तुम्हाला सांगितले त्या प्रमाणे करा.काही ही करून त्या सायको किलर ला शोधायचे आहे.
ओके सर,मी लक्षात ठेवते नीट सगळ.
क्रमशः..ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,याची नोंद घ्यावी.