Prashant Shinde

Children

3  

Prashant Shinde

Children

चिंटू......

चिंटू......

1 min
612


आवडते कॉमिक पात्र... चिंटू

आवडते कॉमिक पात्र म्हंटले की असा एक कल होता की चिंटू ने आमच्या मनावर अधिराज्य केले ज्या योगे आजही नुसती आठवण जरी झाली तरी त्या वेळेची सामाजिक स्थिती आठवते आणि मनास खूप बरे वाटते. हलके फुलके आनंदी चिमटे आणि प्रसंगीक विनोद याचा सुरेख संगम म्हणजे चिंटूचे अस्तित्व हे नक्की. खोड्या म्हणजे काय हे पटकन समजायचे आणि अवती भवती अनेक चिंटू नजरेस पडायचे. तो काळच आंनद जीवनाचा होता. त्या काळी समाधान मोठे मिळायचे आशा मापक होती. मलाच पाहिजे ही भावना किंव्हा अट्टाहास नव्हता. त्या मुळे घरोघरी चिंटूचे वावरणे राजरोस होते...त्या चिंटूमुळे आमचे बालपण लीलया सरले म्हंटले तर वावगे ठरणार नाही. असा हा हरहुन्नरी चिंटू सदैव मनात घर करून आहे म्हणून आंनद ही अल्लड तसाच शाबूत आहे हे नक्की...


चिंटू ची आठवण

सकाळी सकाळी व्हायची

रोज नित्य नवी खोडी

जीवनात हजेरी लावायची

चिंटूच्या येण्याने

जीवनात आनंदाची बरसात व्हायची

दिवसभर आठवण त्याची सदैव

मनात घर करून रहायची...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children