डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children

भोळे चेहरे

भोळे चेहरे

4 mins
159


             स्वाती तिच्या लेकीला घेऊन प्रज्ञा च्या घरी आलेली. घरी प्रज्ञाचा मुलगा तनिष आणि प्रज्ञा दोघेच होते. येतांना स्वाती ने जवळच्याच एका दुकानातून तनिष साठी सिल्क वगैरे सारखी काही चॉकलेट्स खरेदी केली . सोबत असलेल्या लेकीसाठी पण सिल्क घ्यायची ती विसरली नाही. तिने सगळे चॉकलेट्स पर्स मध्ये ठेवले अन् त्या दोघी मायलेकी आता प्रज्ञा कडे पोचल्या होत्या.


एक तर दोघी मैत्रिणी कॉलेज नंतर बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या.अगदी गळाभेट अन् खूप दिवसांच्या पेंडिंग गप्पा करायचा दोघींचा मानस होता. परत त्याच दिवशीचं परतीचं रिझर्व्हेशन असल्याने स्वाती जवळ फारसा वेळ नव्हता .तरीही वेळात वेळ काढून ती मैत्रिणीला भेटायला आलेली!


दोघीही एकमेकींना अगदी कडकडून भेटल्या. मस्त गप्पा रंगात आलेल्या आणि स्वातीच्या पाच वर्षाच्या मुलीने काही वेळातच आई ग मला भूक लागली चा नारा सुरू केलेला.


"आताच तर जेवूनच निघालो न आपण आता अजून कशाची भूक लागली तुला?" स्वाती


"अगं असतं पोरांचं असं ,मलाही मुलं आहेतच की गप्पांच्या नादात लक्षातच नाही आलं बघ!" म्हणत प्रज्ञाने आधीच तयार असलेला नाश्ता प्लेट मध्ये काढला.मायक्रोव्हेव मधे गाजर हलवा गरम केला अन् खायला घेऊन आली.


 प्लेट्स समोर येऊन सुध्दा तिचं काही खाण्यात लक्षच नव्हतं. अन् आता प्रज्ञा च्या तनिष सोबत गट्टी होऊन ती खाणं सोडून खेळायला लागली होती.


तशीही तिला लागलेली भूक ही खाण्याची नसून पर्स मध्ये असलेल्या तिच्या सिल्क ची होती हे स्वाती ला चांगलंच कळलं होतं.


वरून प्रज्ञा "किती निरागस अन् भोळी दिसते ग ही!" म्हणत तिचे कौतुक करत होती.


स्वाती ला दोन मुलं मोठा विप्लव अन् लहान स्वानंदी. दोघेही तसे छानच! पण ही लहान बया स्वानंदी कधी काय करेल याचा काही नेमच नव्हता.


ती तीन वर्षाची असताना स्वाती ,तिचा नवरा आणि स्वानंदी तिघे जण जयपूरला गेलेले. टूर च्या शेवटच्या दिवशी तिथल्या चोखी धानी मधे सगळे गेलेले. मला उंटावर बसायचं म्हणत स्वानंदी नी त्यांना उंटाकडे आणलं एकेकाची टर्न सुरू होती. जेव्हा आता यांचा नंबर लागणार तेव्हाच हिने आता मला उंटावर नाही बसायचं मला हत्तीवर बसायचं म्हणून तिथून त्यांना ओढत हत्तीकडे यायला भाग पाडलं. तिथे अगदी नंबर लावून पायऱ्या चढून सगळे लाईन मधे लागलेले. पुन्हा यांचा नंबर आला तेव्हा हिचं मला हत्तीवर नाही बसायचं म्हणत भोकाड पसरणं सुरू...! 

त्यामुळे स्वाती चं हत्तीवर बसणं तर राहूनच गेलेलं वरून "लोकांच्या क्या बच्ची हैं ये?" अशा नजरा झेलाव्या लागल्या त्या वेगळ्याच!


स्वानंदी च्या अशा स्वभावापायी एकतर स्वाती कुठे जात नसे नाहीतर तिला घरीच आजी आजोबांकडे ठेवून जायची.


तिचे खाण्यापिण्याचे खूपसे ताल,त्यातले कांदे मिरच्या काढणं . फक्त काही विशिष्ट भाज्या खाणं, मला हे नाही आवडत ,मला ते नाही आवडत यापायी तर आपली उगीचच कुठेही शोभा नको असेच स्वातीला वाटायचे. फॉरेन टूर ला तर हिला नेणं म्हणजे हीची उपासमार अन् आपल्याला नसता मनस्ताप हा विचार करून तर ती तिला न्यायचीच नाही.


पण स्वानंदी आता शाळेत जायला लागली अन् आई मला सोडूनच टूर जाते असे तिला वाटू लागले. आता खाण्या पिण्यात सुद्धा बरीच सुधारणा झालेली म्हणून यावेळी तिला घेऊन जायचं असं ठरल.


ते तिघेही अल्माटी ला पोचले. सकाळी हॉटेल मध्ये जुजबी नाश्ता अन् मग दुपारी लंच. कशीतरी एखादी पोळी दाल फ्राय सोबत खाल्ली अन् माझे झालं म्हणतच उठलीही. स्वाती तिच्यामागे अगं हे थोडं खाऊन घे म्हणून आर्जव करू लागली. पण ऐकेल कुणाचं तर ती स्वानंदी कुठली?



रात्री साडे आठ नंतर हे डिनर साठी दुसऱ्या हॉटेल ला गेले. आता तिला तिथे गेलं की आपल्याला जेवण मिळेल असं वाटू लागलं. पण नेमकं तिथलं कल्चर बरेच वेगळे होते. गाला डिनर असल्याने आधी डान्स चे प्रोग्राम अन् पिणाऱ्यांची चंगळ असा काहीसा माहोल. वरून कडाक्याची थंडी. पाहता पाहता दहा वाजून गेले तरी डिनर लागायचा पत्ता नाही. स्वानंदी सकाळी बरोबर न जेवल्याने तिला जाम भूक लागलेली. स्वाती च्या नवऱ्याने जाऊन एकदोनदा डिनर कधी लागेल म्हणून विचारलेले पण बस थोड्याच वेळात असं त्यांचं उत्तर . आता साडे दहा वाजलेले अन् स्वानंदी ने आता मात्र चक्क रडणं सुरू केलं. आता हिला जेवायला दिलं नाही तर काही खरं नाही हे लक्षात येताच स्वाती सरळ टूर मॅनेजर कडे गेली आणि त्यालाच सूनावून आली.सगळं नाच गाणं थांबलं अन् लगेच डिनर लागलं. स्वातीला पण फारच ओशाळे वाटले पण करणार काय??


दुसऱ्या दिवशी पासून मात्र या सगळ्या सोबत आधीच डिनर लागू लागलं आणि "आपकी बेटी को खाना खीला दिजिये ,डिनर तयार है म्हणून " स्वातीला सांगितलं जाऊ लागलं.



जशी स्वानंदी तसाच तिच्या मोठ्या काकांचा लहान मुलगा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेला!


स्वानंदी अगदी छोटी असतांना तर त्याची आई त्याला स्वानंदी जवळ भटकूच नाही द्यायची कारण हा तिला खेळणं समजून काहीही करेल हीच तिला भीती असायची.


हा म्हणजे स्वानंदी पेक्षा अजून वेगळी केस. हा एकदा शेजारच्या काकू सोबत बाजारात गेलेला .तेव्हा तो बराच छोटा होता आणि त्याला केळ फार आवडायचे काकू काहीतरी घेत असताना यांनी बाजूला एक केळीचा ठेला होता त्यावरचे केळ ओढले .त्यामुळे काकूंना केळाचा पूर्ण घड घ्यावा लागला होता.


एकदा तर या पठ्ठ्याने कुणाच्या तरी घरी गेल्यावर भजे आणि काजुकतली दिली होती तर काजू कतली सॉस लावून खाल्ली होती.अन् आई बाबांना अगदी ओशाळल्या सारखं करून ठेवलं होतं.


आजोबांच्या चष्म्याचे मधातून वाकवून दोन तुकडे करून ठेवले होते.


एकदा बाबांसोबत हे महाशय केस कापायला गेलेले. बाजूलाच बेकरी आणि त्याच्याबजुला चहाची टपरी.

बेकरी मधे दिसणारे ब्रेड आणि टपरी मधे दिसणारे दूध बघून याचं तिथेच बाबा मला दूध ब्रेड खायचं आहे म्हणून भुणभुण सुरू झाली अन् बाबांनी मात्र कपाळावर हात मारून घेतला.



अशी ही स्वानंदी अन् तिचा भाऊ प्रणव ची जोडी!!!

स्वाती च्या घरची ही लहान जोडगोळी म्हणजे भारीच! दिसायला निरागस ,बोलायला लोभस पण यांचे कारनामे मात्र लै भारी


लहानपणी म्हणूनच मग सगळ्यांना सांगावं लागायचं यांच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका हं....!


तेव्हा ह्या सगळ्यासाठी मोठ्यांना ओशाळं वाटायचं पण आज त्यांच्या ह्याच बाललीला ह्यांच्या जीवाचा कायमचा विरंगुळा झाला आहे.अन् त्यांच्या संथ आयुष्यात ह्या स्मृती आनंद पेरत आहेत.


म्हणूनच मुलांचं लहानपण हवंहवंसं वाटतं सगळ्यांना.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children