Revati Shinde

Classics

3.5  

Revati Shinde

Classics

भेट

भेट

2 mins
319


"मानिनी मला माहित आहे आज तुला शेखरची खुप आठवण येतेय, हो ना" "हो सुधाकर, आज दहा वर्षांनी मी परत या गावी आले. माझा भाऊ जवळ असूनही मी त्याला राखी बांधू शकत नाही. त्या दिवशी बाजारात त्याला पाहिले आणि मन अस्वस्थ झाले. बालपणीचे दिवस आठवले .लुटूपुटूची भांडणे त्यानंतरची मनवणी. एकमेकांसाठी प्रेमाने ठेवलेला खाऊ, सार आठवलं. पण आता हे सारं स्वप्न होऊन बसलय". मानिनी डोळे टिपत म्हणाली. "मानिनी हे सगळं माझ्यामुळेच झालं ना, माई अण्णांच्या मनाविरुद्ध तू माझ्याशी लग्न केलं नसतं तर" "नाही हो तसं काही नाही, मन क्षणभर भाऊक झालं एवढंच" ती सुधाकर कडे जात म्हणाली.

 तिथे शेखरचही तेच होतं. त्याची बायको सुनेत्रा त्याला समजावीत होती ."अहो ताई आणि तुमच्या मधला दुरावा आता सोडा. झालं गेलं  विसरून जा.आता माई अण्णा ही नाहीयेत. खरं तर शेवटच्या क्षणी त्यांनाही ताईंना भेटावसं वाटत होतं. मला माहित आहे त्या दिवशी बाजारात ताईंना अचानक समोर पाहून तुमचे डोळे भरून आले, हो ना" "सुनेत्रा" शेखरचा स्वर जड झाला.

 मानिनी देवघरात आली. गणपती बाप्पाची आरती करून तिने त्याला राखी बांधली. इतक्यात दाराची बेल वाजली." मानिनी मी उघडतो ग "सुधाकर म्हणाले. त्यानी दार उघडले आणि ते पाहतच राहिले. "मानिनी अगं बाहेर ये, बघ कोण आलंय ते." मानिनीने दाराकडे पाहिले ,तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. "शेखर "ती धावतच दारात आली." तू"" हो ताई "अग त्याना दारातच उभं करणार का" "या ना" शेखर, सुनेत्रा आणि छोटी मृणाल आत आले. सुधाकरनी त्यांना पाणी आणून दिले आणि मुलाला, रितेश ला हाक मारली." रितेश, तुझा मामा आलाय बघ ,लवकर ये." तो धावतच खाली आला आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहु लागला.

शेखर ने त्याला जवळ घेतले आणि मानिनीने मृणालला. दोघेही जुन्या आठवणींमध्ये गुंतले. माई अण्णांच्या आठवणींनी दोघांचे डोळे पानावले. माननीने शेखरला राखी बांधली. शेखर ने तिला भरपूर वस्तू भेट दिल्या. "अरे हे काय " "ताई गेल्या प्रत्येक रक्षाबंधनला मी तुझ्यासाठी या वस्तू घेत होतो." "थांब आलेच" ती धावतच आत गेली येताना तिच्या हातातही भरपूर राख्या होत्या.

दोघेही हसले. त्यांचे हे प्रेम पाहून सुधाकर आणि सुनेत्राच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. दोघांनी स्नेहभराने एकमेकांकडे पाहिले.

!!शुभं भवनतु!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics