Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

स्पेस

स्पेस

2 mins
273


"कुश अरे काय करतोस,होमवर्क झाला का?" "हो ग आजी"."अरे मग हा पसारा कोण आवरणार ".आजी तू जा बघू,मला गेम खेळू दे ना " अरे पण"आजी आजी जा ना मला स्पेस हवीय."

देवकीताई जरा घुस्शात्च बाहेर आल्या. "अगं देवकी काय झालं" राघव राव म्हणाले."काही नाही,म्हणे स्पेस हवीय.आई बाबाही असंच बोलतात ."अच्छा कुश असं म्हणाला तर." "हो" "चल आपण दोघेही खाली जाऊन बसू".त्याला राहू देत एकट्या ला." "अहो पण यावेळी." "चल".

ते बिल्डिंगच्या आवारात येऊन बसले."अहो कसली स्पेस हवीय याना." "अगं एकांत हवाय त्यांना. ते पुढे बोलणार इतक्यात मालिनी आणि शेखर आले. "आई ,अण्णा तुम्ही यावेळी इथे काय करताय" "अरे आमच्या नातवाला स्पेस हवीय म्हणून इथे येऊन बसलोय." "काय " "शेखर आचार्यांने देवकी ताईकडे पाहत म्हणाला."अरे बरोबर बोलतेय ती." "माझे आई बाबाही असेच बोलतात" असेही म्हणाला. "काय." मनाली मोठ्याने म्हणाली. "हे खरंय ना " "अण्णा ते म्हणजे " मनाली चाचरत म्हणाली."अहो अण्णा ऑफीस.मधे कामाचा ताण असतो. घरी येऊन काही वेळ एकांत हवासा वाटतो. मग असे शब्द निघतात."शेखर म्हणाला. "बरोबर आहे तुझे. आम्ही पण त्यातून गेलोय रे. पण मुलांसमोर असे बोलाल तर ते तुमचेच अनुकरण करणार.आणि कधी कधी प्रॉब्लेम डीस्कस केले कि हलके वाटते.अरे स्पेस शोधण्यापेक्षा दुसरयाच्या   मनात आपली स्पेस निर्माण करने महत्वाचे नाही का."

"खरेच अण्णा आमचे चुकले आता नाही असे होणार. चला वर जाऊ" 

"नाही नको,तुम्ही दोघे जा आम्ही पण जरा आमची स्पेस शोधतो काय ग देवकी " "काय " शेखर आणि मालिनी त्यांच्याकडे अपराधी भावनेने पाहू लागले. "अरे ,काही नाही ,गम्मत केली, चला." राघव राव उठत म्हणाले.


Rate this content
Log in