Revati Shinde

Inspirational

3  

Revati Shinde

Inspirational

प्रेमाचा दिवस

प्रेमाचा दिवस

2 mins
243


"सकाळपासून नुसते फोन, फोन बोलायलाही वेळ नाही. काय ही हल्लीची मुलं." "शांती काय झाले, का चिडचिड चालू आहे." "चिडू नाहीतर काय करू, काय चाललय ईशाचं काहीच कळत नाही ." "अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे त्याची तयारी सुरू असेल ." "कसला डे,!" "अग प्रेमाचा दिवस " "काय !" "हो ,अगं, कॉलेजच्या तरुण-तरुणीचाआवडता दिवस." "अहो मग तिला रोखायला नको ,आई-बाबा ऑफिसला जातात ही कुठे जाते काय करते आपण नको बघायला ,ते काही नाही, निशांत आणि सुनबाई घरी आली की मी त्यांना हे सांगणार."

"शांती, अगं शांत हो ते आधीच दोघं दमून भागून घरी येतात त्यांना अजून त्रास देऊ नकोस आणि इशा वर माझा पूर्ण विश्वास आहे ती कधीही वावगं वागणार नाही." "पण माझा नाही."

"इशा बेटी आज कॉलेज नाहीये का ." ,"नाही आजोबा आज मी घरीच अभ्यास करणार आहे." "बरबरं." "पाहिलंस आज ईशा घरीच आहे." इतक्यात बेल वाजली. "आता कोण आलं " मी बघतो." "हाय आजोबा" "अरे तुम्ही सगळे" "हो." "अगं इशा बघ कोण आलंय" "आजोबा तुम्हीच बघा कोण कोण आलेत ते" अर्जुन रावांनी दारा बाहेर पहिले आणि त्यांच्या तोंडून स्वर निघाले "तुम्ही सगळे""हो आम्ही"त्यांचा ग्रुप आला होता. "शांती अगं लवकर बाहेर ये ."कोण आलंय एवढं ओरडायला" शांतीबाई जरा चिडतच बाहेर आल्या. पण दाराबाहेर बघितल्यावर त्यांच्या तोंडूनही तेच स्वर निघाले." हॅपी व्हॅलेंटाइन डे आजी आजोबा" मुलं त्यांच्या हातात चॉकलेट आणि गुलाबाचा गुच्छ देत म्हणाले." आणि हे काय तुम्ही दोघं अजून तयार नाही झालात. ईशा बेटा काय हे त्यांना काही सांगितलं नाहीस का" "पण हे आपलं सिक्रेट होतं ना राणे आजोबा " "अरे हो विसरलोच." 

"आजी आजोबा आपण पिकनिकला चाललोय. गेल्या आठवड्यातच आम्ही ठरवलं की हा व्हॅलेंटाईन डे आपण आपल्या आजी-आजोबां सोबत साजरा करायचा त्यासाठीच आमची तयारी चालू होती. चला पटकन तयार व्हा. एक मिनिट हे कपडे घाला." पॅकेट मधून नवीन कपडे बाहेर काढत ती म्हणाली." " हे कपडे या वयात." "हो आजी हेच कपडे" "अगं पण "बघा ना सगळ्यांनी घातलेत प्लीज" "शांती घाल छान दिसेल" अहो पण "पण बिन काही नाही घाल" "ठीक आहे" दोघांनी कपडे बदलले दोघेही छान दिसत होते. "वाव आजी आजोबा काय सुंदर दिसतायेत." "थँक्स"" चला आधी केक कापू." "मुलांनो किती केलेत आमच्यासाठी." "आजी काय ग ,तुम्ही आम्हाला लहानाचे मोठे केले चांगले संस्कार दिलेत. खरंतर हल्ली आमच्या दगदगीच्या जीवनामुळे तुम्हाला वेळ देऊ शकत नव्हतो मनात खंत होती म्हणूनच हे ठरवले." इतक्यात फोन वाजला. "आजी आईचा फोन आहे बोल"" आई ड्रेस आवडला का" "हो, अगं म्हणजे तुम्हाला माहित होते" "हो आई सॉरी 'नीट जा, एन्जॉय करा." "सुनबाई ,हॅपी व्हॅलेंटाइन डे आणि हो हे बघा तुम्ही पण रात्री बाहेरच जा जेवायला आमची काळजी करू नका बाय."

शांती बाईंनी आणि अर्जुन रावांनी इशाला प्रेमाने जवळ घेतले. हॅप्पी व्हॅलेंटाइन डे बेटा अँड टू ऑल."



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational