Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

मोन्या

मोन्या

1 min
154


"सर एवढे पोहे उरलेत ह्याचे काय करायचे". "नो टेन्शन, मोन्या आहे ना! अरे हो, तुम्ही नवीन आहात ना गावात तुम्हाला ठाऊक नसेल मोन्या, आता बघाच." "माधव जा मोन्याला बोलावून आण." "मास्टराणू माका बोलावलात" "हो मोन्या ये रे बाबा, पोहे उरलेत खातय"दया" "किती" मोन्याने दहा बोटे दाखवली. मी सरांकडे पाहिले. "नाईक सर दहा प्लेट भरा" "काय" "भरा तर" मी दहा प्लेट भरल्या आणि मोन्याला दिल्या. त्यांने एका दमात त्या दहा प्लेट संपवल्या. "अजून आसत" "हो" मी कपाळावरचा घाम पुसत म्हणालो, किती, त्याने पाच बोटे दाखवली. "वा! मस्त" होते तो ढेकर देत म्हणाला. मी आश्चर्याने त्या किडकिडीत सपाट पोटाच्या मोन्याकडे पहातच राहीला. "बरा येते ,बाईल घराकडे जेउक वाट बघता."काय नाईक सर डोके गरगर ले ना." अहो हा मोन्या, कुठे काही उरले तर ह्याला बोलवायचे पण मेजवानीला बोलवायचे तर मग विचार करूनच नाहीतर आपल्यावरच उपासाची वेळ येईल."

"एकदा असेच झाले आमच्याकडे पाहुणे आलेले वडापाव आणलेले तेवढ्यात हा आला. शिष्टाचार म्हणून त्याला विचारले 'वडापाव खाणार का' तो हो म्हणाला मग काय पाहुण्यांना नुसते मिरचीवर भागवावे लागले असा हा अवली नाईक सरांना अजूनही आपण जे पाहिले त्यावर विश्वास नव्हता आतापर्यंत त्यांनी बकासुरा बद्दल ऐकले होते पण खराखुरा बकासुर आज पाहिला होता. अजूनही मोन्या कधी हॉटेलला दिसला की मी गुपचूप हॉटेलच्या बाहेर पडतो.


Rate this content
Log in