Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

बालपणीचे खेळ

बालपणीचे खेळ

3 mins
354



उपक्रम बालपणीचे खेळ


नमस्कार मैत्रिणीनो, आजचा विषय आहे बालपणीचे खेळ हा विषय आयोजकांनी देऊ प्रत्येकाला आपले बालपण आठवायला लावले आहे. खरच ते दिवस किती सुंदर होते !

उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी ,जास्त करून उन्हाळ्यात च्या सुट्टीत खेळायला, हुंदडायला अगदी भरपूर मौका मिळायचा. तेव्हा असे कोणते एक्स्ट्रा क्लास आणि पुढच्या वर्षाची तयारी आता च्या सुट्टी पासून ,वेकेशन वगैरे असलं काही नव्हतं .

सकाळी उठायचं दहा साडेदहा वाजता, दाबून जे काही घरात मिळेल ते खायचं, आणि खेळायला बाहेर पडा एवढ्या उन्हात खेळायला जाऊ नको. म्हणून घरातून बाहेर देखील पडायच, पण त्यांची नजर चुकवून जायचो. 

पळापळी, पकडापकडी, लंगडी, ठरलेले खेळ .

शिवाय "खांबाचा खेळ" कुणीतरी सांगितलं ना त्याला आम्ही "खंबा पाणी" म्हणायचो. 

विठ्ठलाच्या देवळात समोरासमोर चार खांब होते म्हणजे 4 दुणी 8 त्या खांबाला समोरासमोर  उभे राहायचे ,आणि जिच्यावर राज्य असेल तिने मधून फिरायचे, तिचा डोळा चुकवून आपण खांब बदली करायचा. जर आपल्या आधी ती पोचली तर खांब तिचा, आणि आपल्यावरती राज्य . 


दुसरा खेळ होता "टिकली मारून जावे" यामध्ये  एका भिडूला समोर बसवायचे. तिच्या समोर चार-पाच मुली(भिडू) बसवायच्या. 

जिच्यावर राज्य आहे तिचे डोळे घट्ट झाकायचे. आणि समोर बसलेल्या मुलींच्या कानांमध्ये वेगवेगळी नावे द्यायची, म्हणजे जसं की, तुझं नाव पैंजण, 

तुझं नाव अंगठी

 तुझं नाव तवा

 तुझं नाव तपेल

 असे कोड नेम द्यायचे, आणि जिच्यावर राज्य आहे तिचे डोळे झाकून, आपण जिच नाव आहे, जिला कोड नाव दिलेला आहे, ते नाव घ्यायचं .

उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं नाव "पैंजण" आहे परंतु ते समोरचीला माहीत नसते. तेव्हा आपण तिचे डोळे झाकून म्हणायचं " पैंजणांने यावे, टिकली मारून जावे " तेव्हा जिचे नाव "पैंजण" आहे .तिने हळूच पाय न वाजवता यायचं आणि तिच्या कपाळावर एक टिचकी मारायची. त्यानंतर आपण म्हणायचं "हसू नाही खुसू नाही" तांदूळ निवडा! आणि सगळ्यांनी खाली मान घालून तांदूळ निवडण्याची ॲक्शन करायची. 

आणि डोळे उघडून हिला कोण होत? म्हणून ओळख सांगायचं .त्यावेळी खाली मान घालून तांदूळ निवडणाऱ्या मुलींपैकी एखादी हसली, समजायचं हीच आहे .तिने जर ओळखलं, तर राज्य तिच्यावर. 


अजून एक खेळ होता "शेल कट मेंढरू" यामध्ये एका मजबूत असणाऱ्या मुलीला वाघोबा बनवायचे, आणि दुसरी अशीच उंच आणि मजबूत मुलगी तिच्या समोरासमोर उभी करायची. तिच्या पाठीमागे आगगाडी सारखे सगळ्यांनी एकमेकाला घट्ट धरून राहायचं ,आणि समोरच्या वाघोबाने तिकडच्या धनगराला एक मेंढरू मागायचं .

दोघांनी हात लांबरुंद करायचे ,तिने मेंढरू पकडायला जायचं आणि हिने अडवायचं, आणि हीच्या बरोबरच सगळ्यांनी ही जशा उड्या मारेल, तशा ऊड्या मारायच्या, जर का आगगाडीच्या शेपटीचे एखादं मेंढरू पकडलं, कि ते आऊट .ते बाजूला बसवायचं. 


तिसरा खेळ 

"राजाच्या राणीने, भोपळा मागितला" 

यामध्ये बसून खेळ आहे. खाली बसायचं आणि एका मागे एक रेल्वेचे डबे असल्यासारखे, एकमेकाला घट्ट पकडून बसायचे. दोघींवर ती राज्य, त्यांनी आपल्या हातात हात गुंफायचे आणि या ट्रेन वरून फिरवायचे, आणि तेव्हा गाणं म्हणायचं

" तवा तापला हिंग करपला

 राजाच्या बायकोने भोपळा मागितला"

 माळीदादा दे भोपळा, मग प्रत्येकीच्या डोक्यावर टिचक्या मारून, त्यातला पक्का भोपळा शोधायचा आणि तो त्यातून बाहेर खेचून काढायचा. 

त्यावेळी मागची पुढचीने तिला घट्ट धरून ठेवायचे. 

हा खेळ होता. 


शिवाय मग सागर गोटे, बिट्ट्या, साधे खडे ,यांचे खेळ असायचे. 


काचाकवड्या असायच्या, तेव्हा काही साधी साप सीडी वगैरे देखील उपलब्ध नसायची. कॅरम बीरम तर लांबच. आमच्या गावामध्ये एक मुका दमा चा वाडा म्हणून मोठे पन्नास-साठ माणसांचे खटल्याचे घर होते त्यांच्याकडे मोठा कॅरम होता ते सगळे आपापसात खेळायचे आणि आम्ही मजा म्हणून बघायला जायचो मग मुला-मुलींच्या खेळामध्ये भावला बाहुलीचे लग्न वगैरे ठरलेले असायचे पण तुम्हाला खरे वाटणार नाही परंतु साधी प्लास्टिकची भावली देखील लग्नात नसायची एक  काटकी घ्यायची तिला चिखलाचा किंवा शेणाचा गोळा लावून डोके करायचे एक त्याला क्रुसासारखी आडवी काठी बांधायची, ती म्हणजे त्या बाहुलीच्या हात, त्याला एक छोटा कपडा बांधायचा डोके वाळले की त्याला नाक डोळे काढायचे, अशी स्वतःची क्रिएटिव्हिटी असायची .

लग्नामधील लाडू म्हणजे एका शेंगदाण्याच्या दोन पाकळ्या मध्ये गूळ चिटकवायचा, चण्याच्या डाळीच्या दोन पाकळ्यांमध्ये गुळ ठेवायचा ,त्या पाकळ्या मुलाने चिटकवायच्या.

असे आमचे असायचे लग्नाचे लाडू. 

मग वाजत गाजत वरात देखील काढायचं पत्र्याच्या डब्यावर एखाद्या काठीने वाजवत वाजवत गेलं म्हणजे झाली वरात


बाकी झाडावर चढून सुर पारंब्या ,भूत कमका , दगड का माती, तळ्यात मळ्यात, गोट्या, मी तर अगदी मुलांबरोबर देखील गोट्या खेळलेले आहे, आणि मारामारी करून त्या घरी पण आणलेले आहेत. 


पत्त्यांचे अनेक बैठे खेळ, 5/3/2, लॅडीज, दशदश्शा कोट, म्हणजेच मेंढीकोट झब्बू, बदाम सात ,पेशन्स, नोट एट होम, हे सगळे खेळ खेळलेले आहेत. 

"अटक मटक चवळी चटक" सारखे बैठे खेळ देखील खेळलेले आहेत. 

भांडणे केली आहेत, मारामाऱ्या केलेल्या आहेत, बरोबरच्या पोरांना चोपून देखील काढलेले आहे. खेळ म्हटलं की हे सगळं आलंच.


आजचा लेख लिहिताना खूप छान वाटलं कारण पुन्हा एकदा मनामध्ये त्या काळाच दर्शन झालं ..


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics