saru pawar

Children

3  

saru pawar

Children

बाई तुमची लय आठवण येते--

बाई तुमची लय आठवण येते--

4 mins
188


  रमा,छबू,गणू ,दिलप्या आणि पुष्पा ,आज रविवार तरी शाळेच्या आवारात झाडा खाली उदास बसले होते.

रमा,"मोना बाईंची लयच आठवण येते ,या नव्या बाई लयच खडूस आहेत नाई का??"

पुष्पा ,"व्हय,व्हय ,त्या बाई आपल्याले लय जीव लावत ,नाई का?घरी राहूचनी वाटे त्या व्हत्या त,समंदे लाड करत त्या अन समजुन बी घेत"

दिलप्या,"हाव ,खर हाये ,मया बापाले बी समजवायले आलत्या ऐकदा घरी,तवा पासन त्यो आम्हाले मारझोड नाही करत अन मायले बी कमीच मारतो तसा"

छबू रडत रडत ," बाई ,काऊन गेल्या तुमी ,या इकडच ,माया बाबा आता मले शाळेत नाही धाडणार ,माई शाळाच बंद व्हईन ,बाई यान !!"

ति मुसमुसुन रडायला लागते,रमा ,पुष्पा तिला विचारायचा प्रयत्न करतात.

रमा," काऊन ,काय झाल छबू ,तुया बाबा काऊन शाळेत नाही धाडणार तुले?"

छबू"माय लगिन लाऊन द्यायच ,म्हणतो तो ,आत्याच्या लेका संग,आता कस व्हईन काय माहित ,मले त लय शिकायच व्हत ,समंद राहुन जाईन बयना जी"

    सगळी मुल वस्ती शाळेतली ,पहिली ते पाचवी पर्यंत शाळा,दोनच शिक्षक ऐक मोना बाई ,मोहिनी देशमुख आणि ऐक पवार सर .मध्यांन भोजन गावातील बचत गटाच्या अनिता बाई आणि सुमन बाई बनवत.

मोना बाईंचा मुलांवर खुप जी

व ,गरीब घरची मुलं त्यात व्यसनी वडिल कुठे कुठे तर आई ही.मोना बाईंना या बालमनांची नेहमिच काळजी .कुठल्याही मुलाच्या घरात काही घडल तर तो लगेच बाईं जवळ येऊन मोकळा व्हायचा.कुणा जवळ दप्तर नसेल ,कुणा जवळ कपडे नसले तर कुणा कडून तरी कपडे आणत ,कधि थंडीत स्वेटर ,उन्हाळ्यात चपला ,कधि ऐखाद्या परिक्षेची फी तर कधि मुलांना ऐखादी छोटीसी सहल.      शिकवण्यातही छान गप्पा ,गाणी आणि खेळही.मुलांना बाईंचा लळा लागला होता.बाई बस मधुन उतरतानां दिसल्या की हि सगळी शाळेत येत.

   आता त्यांची बदली झाली होती त्या मुळे ही सगळी फुल ,मुल कोमेजुन गेली .

त्यात आता छबूच लग्न !! मुल यातुन मार्ग फक्त मोना बाईच काढु शकतील या विश्वासावर त्यांच्याशी कसा संपर्क करता येईल याची चर्चा करतात आणि

गणू ,"मही आई म्हणत व्हती की त्या अडगावले दिसल्या व्हत्या तिले ,तिथल्या शायेत गेल्या म्हने त्या ."

दिलप्या ,"पन तडी कस जायाचा यार ,"

 पुष्पा ,"आपल्या आडून जाते तडी बस ,सकाई माया बाबा गेला तडी कामाले ,आपुन बी जाऊ"

सगळेच ,"हा हा ,जाऊच "

छबू ,"कही जायाच ??जल्दी चाला ,नाहित माय लगीन बी उरकून जाईन ,"

रमा ,"हा चाला कालदी "(खांन्देशात काहि गावां मधल्या भाषेवर हिंदीचा प्रभाव ,मध्यप्रदेशाची सीमा म्हणून ,इथे उदया ला पण काल आणि काल ला पण काल असच म्हणतात )

गणू ,"हा ,ठिक हाये ,इतवार ची सुट्टी बी हाये ,सकाई जाऊ मंगन ,ठरल!!"

सगळ्यानां बाईंना भेटायची उत्सुकता इतकी कि मुलं रात्र भर झोपत नाहीत सारखी चुळबुळ करत असतात ,पहाटेच कोंबडा आरवताच सगळी बाहेर पडतात, घरच्यानां नदीवर जातो अस सांगून .

बस येते आणि हि चढतात पण ,पैसे नाहीत म्हणून त्यांना कंडक्टर खाली उतरवतो .

आता मुलं जास्तच हिरमुसली होतात . पण बाईंना भेटायची ओढ इतकी तिव्र की ती त्या दिशेने पाई चालायला लागतात.गाव चार किलोमिटर ,पण हि चिमुकली चालत राहतात .

उन्हाळा नुकताच सुरू झालेला म्हणून जरा गारवा असतोच सकाळच्या हवेत,पिल्ल भराभर पावल टाकतात तरी अजुन गाव काही ऐत नाही.

  लेकरं थकतात आणि वाटेत ऐका झाडा खाली बसतात.

  इकडे त्यांच्या आया नदीवर धुणं धुवायला जातात तर मुलं तिथे नाहीत हे बघुन शोधाशोध होते ,तर कुणी तरी त्यांना बस मधे चढतानां पाहिल्याच सांगत.

   आता सगळ्यांची चर्चा होते ,कुठे गेली असतिल मुलं ??

गणूची आई,"त्या मोना बाईचे भेटायले गेली असतिन अस वाटत ,लेकर लय आठवन काढत व्हती त्यायची, मले आडगावले दिसल्या व्हत्या अस म्या गण्याले बोलली व्हती ,म्हणून ते तिकडे गेले असतिन ."

   अनिता बाई ,"हा कालदी लेकर काई तरी बोलत व्हती ,मी गेलती आवरायले तवा कानावर पडल .

   सुमन बाई ,"पक्क ! तडीच गेले असतिन ,छबू ते गयाची लेक लय रडत व्हती तिचा बाप तिच लगिन करायच म्हणतोय ,पोरीले लय शिकायची हौस अन हा बाबा लगिन करतुया इवलुश्या लेकराच."

      शेवटी निशकर्ष असा काढला जातो की मुलं मोना बाईंना भेटायला गेले.

अनिता बाईं कडे मोना बाईंचा फोन नंबर होता त्यांनी बाईंना फोन करून सगळ कळवल,इकडे पोरांचे बाबप ही त्यांच्या शोधात निघाले.

     पोरां बद्दल ऐकुन मोना बाई लगेचच मुलांना शोधत निघाल्या. काही अंतरावर त्यांना मुलं झाडा खाली बसलेली आढळली.मुलांच हि बाईं कडे लक्ष गेल ,मुल धावत जाऊन बाईंना चिकटली .छबू तर बाईंना पकडून मुसमुसून रडायला लागली.

     बाईंनीं लेकरांच्या पाठिवरून हात फिरवला ,छबूला तर,"माझ्या छबडीला काय बर झाल ,का रडतेय माझ हुश्शार कोकरू ?" तिचा चेहरा हातात घेत तिच्या समोर गुडघ्यावर बसत विचारल.

तशी छबू बाईंच्या गळ्यात पडून सांगू लागली,"बाई म्हय लगीन करतुया मया बाबा ,मग आता शाळा सुटणार कायमची ,बाई तुमी परत या आमच्या कड, तुमच्या शिवाय शाळेत जाऊ वाटत न्हाई."

पुष्पा ,रमा ,गणू ,दिलप्या सगळेच,"बाई तुमी तिकड या परत ,तुमच्या बिगर लई पोरांची शाळा सुटली अन अजुन सुटल,तुमी परत या तिकड बाई ,तुमची लय म्हणजे लयच आठवण येते."

     बाई पोरांना घेऊन झाडा खाली बसतात .ति परत त्यांना विचारतात ,"तुमी परत इकड या अन आमच्या शाळेतल्या नवीन बाईंनले इकड धाडा"

  मोनां बाईंनां पण लेकरांच त्यांच्या वरच प्रेम बघुन भरून येत ,त्यांचाही जीव असतोच मुलां वर पण सरकारी आदेशां पुढे कुठे काही चालत .त्या काहिच उत्तर देत नाहीत.

  थोड्या वेळात मुलांचे बाबा तिथे पोहचतात आणि मुलांना समजुत घालुन परत सोबत घेऊन जातात.मुल आणि बाईंची परत ताटातुट होते .

जाता जाता मुलं ,"बाई तुमची लय आठवण येते ,परत या बाई "

मुलांच्या प्रेमाने बाईंचेही डोळे पानावतात.

हि बातमी शिक्षण विभागातल्या अधिका-यां पर्यंत पोहचते आणि मोना बाईंनी परत त्याच शाळेवर रूजू होण्या साठीचा आदेश पोहचतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children