" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

अंधार..

अंधार..

2 mins
76


गेल्या सहा,सात महिन्यांपूर्वी घडलेली ही एक सत्य घटना आहे.. एक सत्य, दुःखद, रहस्य कथा, घटना म्हणावी लागेल.जीचा अजून ही उलगडा झाला नाही.मुळात प्रश्न आहे की असे घडले कसे....

    ही घटना जवळपास सर्वच प्रसार माध्यमांनी आपल्या माध्यमातून प्रसारित केली.वर्तमानपत्र, टिव्ही नी रेडिओ सर्वच माध्यमांनी ती प्रसारित केली.नी शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली... शहरातील सर्वात मोठ्ठे मोठ्ठे बिल्डर, गुत्तेदार... सर्व परीचीत सर्वांना माहीत असलेलं एक प्रतिष्ठित, मोठं व्यक्तीमत्व, शुन्यातून विश्व घडवावे तसे कमी कालावधीत नावारूपाला आलेले नी तरुण, धडाडीचे, असे ते व्यक्तीमत्व.त्याची हत्या झाल्याची बातमी शहरात, जिल्ह्यात, राज्यात वाऱ्यासारखी पसरली नी टिव्ही, रेडिओ, वर्तमान पत्रात लगेच प्रसारित झाली.सिसीटिव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण टिपल्या गेले तो व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध ही झाला...पण..

प्रश्न.. प्रश्नच आहे.. अजून ही तपासाला यश आले नाही... मारेकरी कोण अशी चर्चा,ही आता कोणी करताना दिसत नाही खरंच किती मोठं,गुढ रहस्य म्हणावे लागेल.... मला तर कमालच वाटतें.. जिल्ह्याचे ठिकाण, सर्वांत वर्दळीचा भाग . जिथे सर्वांत मोठे शिकवणी वर्ग चालतात नी उच्चभ्रू लोकवस्ती,दुकाने,वहाने, माणसं यांची खूप गर्दी असते अशा परिसरात, घरासमोर ही घटना घडते नी मारेकरी कोण त्याचा अजिबात उलगडा न होणे याला काय म्हणावे....

      ते बिल्डर महागड्या स्वतःच्या कारमधून गाडीचे दार उघडून घरामध्ये जात असतात,घर व परिसरात सिसीटिव्ही कॅमेरे आहेत, कारच्या मागैच असलेली ती दुचाकी त्यावरचे दोघेजण ज्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असतो ते दोघेही काय थांबताच रोडवर गाडी थांबवून त्या बिल्डर वर धाडधाड गोळ्या झाडतात परिसरात गोळीबाराचा आले पसरतो, रस्त्यावर लोकांची गर्दी, वर्दळ असते आणि गोळ्या झाडून मारेकरी पसार होतात, घराच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात बिल्डर पाडलेले असतात.. किती अमानवी, पाशवी, हृदयद्रावक,ही घटना म्हणावी लागेल...का असं हे पाप घडतं..काय मिळतं असं एखाद्याचा जीव घेऊन देव जाणे... पण केवढं मोठं गुढ रहस्य आहे.. तपासयंत्रणा काय करत असेल,कोण खरा मारेकरी असेल.. आणि शोध का लागत नसेल.. एखाद्या चित्रपटात दाखवतात अशीच ही घटना... पण प्रश्न कायम आहे.... लोक चर्चाही नको म्हणतात हे असे कसे घडले.एक किती मोठं रहस्य नी गुढ आहे...

योग्य दिशेने तपास व्हावा.. मारेकरी सापडावा... आणि मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी प्रार्थना...

हे देवा असा दिवसां अंधार घडायला नको...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror