akshata alias shubhada Tirodkar

Action Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Action Inspirational

अनामिका -एक शोध

अनामिका -एक शोध

28 mins
205


सकाळची वेळ सुमा ने टेबल वर चहा आणि डिश ठेवत हाक दिली "अना ब्रेकफास्ट कर उपाशी नको जाऊस काल पण उपाशीच केलीस "


आपली बॅग पकडत अना म्हणाली "आई मला उशीर होत आहे मी निघते" 


हे ऐकून आई ओरडली "काय ग हे अना कामा शिवाय तुला काहीच कसे सुचत नाही का आज पण उपाशीच जाणार आहेस आरोग्याशी हेळसांड करू नकोस "


गाडीची चावी घेत अना म्हणाली "आई येते मी"


तेव्हड्यात आईने तिला थांबवले "थांब मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे "


घड्याळात पाहत अना म्हणाली "आता नाही आई संध्याकळी पाहू" असे म्हणत अनामिका म्हणजे अना आपली गाडी स्टार्ट करून निघून गेली 


ती गेल्यावर आई स्वतःशीच बोलू लागली "काय म्हणावे ह्या पोरीला काहीच समजत नाही" 


तिचे निराशेचे सूर सुरेशरावांच्या कानावर पडले तसे त्यांनी सुमाला विचारले "काय झालं काय एकटीच बोलत आहेस "?


"काही नाही तुमच्या मुली बद्दल बोलत आहे बघा ना आजपण उपाशीच केली कामाशिवाय तिला काहीच दिसत नाही "


"वाह माझी मुलगी का अग तिचे काम तसे आहे आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे मग तिला थोडाच अराम आहे एक मिनिटात सुद्धा शोध लागू शकतो मग तिला गप्प बसून कसे चालेल "


"अहो पण आता हे चालते उद्या ती दुसऱ्याच्या घरात गेली कि मग काय आणि पहा ह्या च बाबतीत मला तिच्याशी बोलायचे होते पण गेली निघून "


"अग संध्याकाळी येईल तेव्हा बोल ना ती कुठे जाते येईलच ना घरी "


"तुम्ही आणि तिला प्रोत्साहन करा म्हणजे तिनी माझे ऐकूच नव्हे "


"अच्छा आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे हे सांगताना तुला गर्व नाही वाटत "


"वाटतो हो पण काळजी पण वाटते तिचे लग्नाचं वय आहे पण हि गुंतली दुसऱ्याच्या केस सोडवण्यात "


"काळजी करू नको संध्यकाळी आली कि आपण बोलू तिच्याशी 


अनामिका हि सुरेश आणि सुमती देशपांडे ह्याची एकुलती एक कन्या तिला लहानपणापासून शोध लावायची आवड आणि हीच आवड तिनी आपले करिअर म्हणून निवडले


तर संध्यकाळी दोघेही हॉल मध्ये अनामिकाची वाट पाहत बसले होते एवढ्यात तिच्या गाडीचा आवाज आला आणि सुरेश म्हणाले "आली आपली डिटेक्टिव्ह लेडी "


पुरे हा कौतुक करू नका माहित आहे ना आपल्याला तिच्याशी बोलायचे आहे "


"हो माहित आहे "


अनामिकाने घरात प्रवेश केला आई बाबा ना हसत हसत ती आपल्या रूम मध्ये गेली तो पर्यंत आई ने तिच्याशी चहा आणला फ्रेश होऊन अनिमका सोफ्यावर बसली आणि चहाचा कप हातात घेतला तिनी पहिले कि आई बाबांना इशारा करत होती डिटेक्टिव्ह असल्याने इशारे म्हणजे कुछ तो गडबड आहे हे ओळखायला तिला वेळ नाही लागला तिनी आईला पाहत म्हटले "आई काही झालाय का "?


"नाही मला तुझ्याशी बोलायचे आहे "


"मग बोल ना "


"हे बघ अना सुमा मावशीने तुझ्यासाठी दोन स्थळ आणली आहे "


हे ऐकून अना म्हणाली "काय स्थळ ?आई प्लिज सुमा मावशीला सांग नको ना आणत जाऊ "


"काय नको वय झालं आता लग्नाचं लोकांची केस सोडवतेस मग स्वतःची कधी सोडवणार "


"बाबा आई ला समजवा मला नाही लग्न नाही करायचं "


"मग कधी करणार तू लग्न बाळा" 


"बाबा मला एवढ्यात तरी लग्न नाही करायचं आणि आई प्लिज सुमा मावशीला सांग नको पाठवत जाऊ स्थळ "असे म्हणून अनामिक आत गेली 


"काय सांगावं ह्या पोरीला "


"अगं तिनी सांगितलं ना एवढ्यात नाही पण ती करेल "


"पण कधी ते नाही ना सांगितले देवा तुझं बघ रे बाबा "


"झालं तुझं देवाला काय कमी भार आहे कि तू अजून भार देतेस चिंता करू नको होईल सगळं ठीक" 

दुपारची वेळ होती सलवार घातलेली एक मुलगी अनामिकाच्या ऑफिस मध्ये शिरली आणि तिनी समोर बसलेल्याकडे पाहत विचारले "अनामिका मॅडम आहेत का "?


कामात व्यस्त असलेल्याने आवाज ऐकताच पहिले आणि तिला पाहत म्हटले "नाही त्या बाहेर गेल्या आहे येतील आपलं काही काम असेल तर मला सांगा मी त्याचा असिस्टंट विराज परांजपे "


"नाही मला त्यांनाच भेटायचे आहे"


"बरं बसा तुम्ही" म्हणत विराज आपल्या कामात व्यस्त झाला


थोड्याच वेळात अनामिका ऑफिस मध्ये पोहोचली अनामिकाला पाहतच ती मुलगी उठली आणि अनामिकाला म्हणाली


"मॅडम मला तुमच्याशी काही केस संबंधित बोलायचे आहे "


अनामिकाने विराज कडे पाहत विचारले "विराज पाहायचं ना काही केस आहे ती "


"नाही मॅडम मी त्याना विचारलं पण त्याच म्हणाल्या कि तुमच्याशी बोलायचे आहे "


"माझ्याशी बरं या आत "असे म्हणून अनामिका केबिन मध्ये गेली मागोमाग ती मुलगी आत गेली


"मॅडम माझं नाव सविता देशमुख "आणि तिनी केस संबंधित सारी गोष्ट अनामिकच्या कानावर घातली ते सर्व ऐकून अनामिका म्हणाली


"पण ती केस तर सुसाईड म्हणून बंद झाली आहे "


"नाही मॅडम माझे बाबा निर्दोष आहेत त्यांना यात फसवले गेले त्यांना न्याय तुम्हीच देऊ शकता प्लिज नाही म्हणू नका "


त्या मुलीच्या डोळ्यात अनामिकाला दया याचना दिसली तिनी तिला धीर देत म्हण्टले "भिऊ नकोस मी तुला न्याय देईनच "


"तुमचे उपकार होतील माझ्या बाबाचे नाव विनाकारण खराब करण्यात आले तुम्ही मला मदत केली तर खूप उपकार होतील" असे म्हणून ती मुलगी निघून गेली आणि विराजला अनामिकाने हाक मारली विराज लगेच केबिन मध्ये आला विराजला केस संबंधित माहिती देऊन आहे ह्या केस संबंधित मिळते तेवढी माहिती मला उद्यापर्यंत ती मिळायला हवी असे सांगताच विराज लगेच निघाला


आणि अनामिकां आपल्या परीने ह्या केस संबंधित विचार करू लागली त्या मुलीचा हळवा चेहेरा तिच्या समोर सारखा येत होता तिला न्याय दिलाच पाहिजे हे तिनी मनाशी पक्के गेले


संध्याकाळी ती घरी परतली चहा पिता पिता ती कधी केस बद्दल आई बाबाना सांगायची आज हि तिनी ह्या केस बद्दल आई बाबाना सांगितले हे ऐकून बाबा गर्वाने म्हणाले


"बेटा त्या मुलीला न्याय मिळालंच पाहिजे "


"हो बाबा आई तू काही नाही म्हणणार "


"तिला न्याय देच पण आम्हला हि दे "


"म्हणजे तुझी कुठली केस माझ्याकडे आहे "


"तुझ्या लग्नाची "?


"आई झालं सुरु तुझं लग्न पुराण मला नाही करायचं लग्न" असे म्हणून ती उठून गेली


"बघितलं कशी उठून गेली काय लिहिले आहे देवा तिच्या नशिबी तुलाच माहित "हे ऐकून बाबानी डोक्याला हात लावला 

दुसऱ्या दिवशी सकाळी विराज ने अनामिकाने सांगितल्या प्रमाणे सर्व माहिती मिळवली होती आणि ते दोघे ती माहिती ऑफिस मध्ये आपल्या परीने पाहत होते आणि त्याचे बोलणे हि चालू होते 


"मॅडम माहिती मिळवताना खूप जोर द्यावा लागला केस बंद झाली कशाला हवी माहिती असे खूप जण म्हणत होते पण मी एक रिपोर्टर आहे आणि मला एक लेख लिहायचा आहे असे सांगून टाळले "


"वाह मस्त उत्तर दिलेस बरं पाहू केस खरी च बंद झाली कि मुदाम हुन केली "


"मॅडम त्या सुसाईड केलेल्या माणसाबद्दल लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली माणूस स्वभावाने चांगला होता पण तो असे काही करेल ह्यावर विश्वास बसत नाही असे काहींचे म्हणे आहे "


"विराज आपल्याला जरा जपून राहायला हवे कारण हि जुनी केस री ओपन होत आहे आणि आपल्यावर कोणाला संशय येता कामा नये आणि सविताला हि धोका असू शकतो "


"हो मॅडम हे मला चौकशी करताना कळले आपल्याला जपायला हवे "


"बरं मी सांगितले तसे पुढचे काम सुरू कर तो पर्यंत मी हि माहिती परत एकदा पहाते "असे म्हणून अनामिका परत एकदा माहिती पाहू लागली


"अच्छा तर असं आहे ह्या माणसाची अशी माहिती आहे असू दे पाहू काय होत ते "असे म्हणत अनामिका विचार करू लागली 


संध्यकाळी ती घरी परतली नेहमी प्रमाणे आई ने तिच्यासाठी चहा आणला बाबा टीव्ही पाहण्यात व्यस्त होते पण आई अनामिका ला पाहून आपली नाराजगी व्यक्त करत होती हे अनामिकाला जाणवले अनामिकाने आपला मोबाईल हातात घेतला आणि लगेच फोटो गॅलरी ओपन करून बाबा समोर धरला "बाबा हा फोटो पहा कसा दिसतो आई ने हि पहिले तर फोटो एका मुलाचा होता बाबा हा मुलगा कसा दिसतो ना मला ह्याचाही लग्न करायचे आहे तुम्ही ह्याच्या घरी माझे स्थळ मागायला जा" हे ऐकून बाबा म्हणाले "काय स्थळ तुला तर लग्न करायचे नव्हते ?आणि हा मुलगा कोण आहे तुझे प्रेम वैगरे आहे का" ?


"नाही नाही बाबा मी आणि प्रेम नाही माझे प्रेम नाही पण माझ्या ओळखीच्या व्यक्ती ने सांगितले कि हा मुलगा खूप चांगला आहे म्हणून मला तो आवडला मग ठरवले माझ्या मनासारखा त्याचा स्वभाव असेल तर काय हरकत आहे आणि आईचे हि लग्न पुराण संपेल "


हे ऐकून आई ने उत्साहित होत म्हणाली "देव पावला कोणी तरी आवडला तसा मुलगा दिसायला चांगला वाटतो पण कसा काय सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवला "?


हे ऐकून अनामिकाने आईला पाहत विचारले "तू खुश आहेस ना"?


""हो आहेच पण तो मुलगा तुला ओळखतो का ? "


"नाही आई पण होईल ना ओळख "


"बाबा तुम्ही ह्याच्या घरी जा पण असे सांगा कि मला कोणी तरी तुमच्या मुलाचे स्थळ सांगितले आहे म्हणून आलो वैगरे "


हे ऐकून बाबा जरा आश्चर्यचकित होऊन अनामिका कडे पाहत म्हणाले "पण बाळा ह्या मुलाबदल तुला कोणी सांगितले आणि तू लग्नाला तयार नव्हतीस मग असे अचानक तयार झालीस "


"बाबा हा मुलगा खूप चांगला आहे "


आता आणि नकाराची घंटा नको म्हणून आई ने बाबांना मध्येच थांबवत म्हणाली "अहो तिच्या मनात जर तो आहे तर मग वेळ कशाला उद्याच जाऊ या "


आईला तर अनामिकाचा निर्णय ऐकून आकाश ठेंगणे झाले तर बाबा हि खुश होते पण अनामिका का अशी कशी लग्नाला तयार झाली आणि कोण आहे तो मुलगा हा मात्र प्रश्न बाबाच्या डोक्यात चालू झाला 

दुसऱ्या दिवशी बाबा अनामिका ने दिलेल्या पत्यावर गेले आणि गेट वरची नावाची पाटी वाचली विक्रम साठे आणि त्यांनी बेल वाजवली तसे दरवाजा उघडण्यात आला 

"नमस्कार मी सुरेश देशपांडे मला विक्रम साठे ह्यांना भेटायचे होते "

"या आता या" असे म्हणत वीणा साठे विक्रम साठे च्या पत्नी नि विक्रम साठे ना हाक दिली तसे विक्रम साठे आले आणि सगळे सोफ्यावर बसले 

ओळख करून सुरेश देशपांडे नि स्थळा विषयी सांगितले ते ऐकून विक्रम साठे म्हणाले 

"काय माझ्या मुलासाठी स्थळ पण आम्ही कोणाला स्थळांविषयी कधी बोललो नाही "

हे ऐकून वीणा म्हणाल्या "अहो पण आपला राघव लग्नाचा झाला आहे त्याला हि आता स्थळ पाहावी लागेलच कि आणि चालून आलेले स्थळ आपण नाकारू शकत नाही " 

"हो तू म्हणतेस ते बरोबर आहे बरं तुमची मुलगी काय करते म्हणजे नोकरी वैगरे "

"ती एक डिटेक्टिव्ह आहे "

"काय डिटेक्टिव्ह"?

"हो अनामिका देशपांडे नाव तिचे "

डिटेक्टिव्ह हे ऐकून विक्रम आणि वीणा जरा गप्पच राहिले हे पाहून अनामिकाचे बाबा म्हणाले 

"काय झालं तुम्ही एकदम गप्प कसे झालात "?

"नाही आमच्यासारखी माणसं पोलिसांपासून चार हात लांबच राहतात आणि त्यात सुनच जर डिटेक्टिव्ह केली तर "

"का माझी मुलगी घरात सून च असेल डिटेक्टिव्ह बाहेर आणि स्वभावाने खूप चांगली आहे एकदा तुम्ही भेटा मग कळेल "

"हे बघा आमच्या मुलाच्या पसंदी शिवाय आम्ही काही नाही सांगू शकत "

"ते हि आहे विचारा तुम्ही तुमच्या मुलाला येतो हे माझ्या मुलीचे कार्ड येतो मी" असे म्हणून सुरेश बाहेर पडले 

ते जातात विक्रम ने वीणाला पाहत म्हण्टले" काय अजब आहे ना वीणा आपल्या राघव साठी स्थळ चालून आले पण एका गुप्तहेराचे अजब कॉम्बिनेशन ना बँक वाला आणि डिटेक्टिव्ह वाली "असे म्हणून ते हसू लागले 

हे पाहून वीणा म्हणाली "तुम्हला कुठे हि गमंत सुचते पण मला असे वाटते कि हि देवाचीच कृपा असेल नाहीतर असे कोणी येऊन नाही सांगणार आणि गुप्तहेर असली तर काय झालं तो एक पेशा आहे मन मिळावु असेल कि झाले "

"हो हो थांब गुढ्याला बाशिंग एवढ्यात नको बांधू वीणा बाई तुमच्या चिरंजीवाची पसंदी आहे मग आपली हे विसरू नका "

"मला माहित आहे पण ती जर माझी सून झाली तर मी गर्वाने सांगेन कि माझी सून डिटेक्टिव्ह आहे "

सुरेश यांनी अनामिकाला घडलेला प्रकार सांगितला तसे अनामिका म्हणाली "वेल डन बाबा ग्रेट जॉब "

पण बाबा मात्र अनामिकाच्या खुश होण्या बाबत चकित झाले कारण लग्नाचा विषयी तिला आवडत नसे आणि आज चक ती लग्नसाठी आनंदित आहे ?

जेव्हा पासून अनामिकाचे वडील राघव च्या घरी गेले होते अनामिकाची आई तर खूप खुश होती ती डोळ्यात तेल घालून बाबाची वाट पाहत होती आणि बाबा आले तसे ती ची प्रश्नावली सुरु झाली ते पाहून 

"अग हो मी आताच आलो थोडावेळ बसू तरी दे आणि हो मी त्याच्या आई बाबाची भेट घेतली मुलाची नाही त्यामुळे तो काय सांगेल ते पाहायला नको का त्याच्या मनात आणखी काय असेल तर "?

"पण आपल्याला कसे कळेल "?

"मी अनामिकाचे कार्ड दिले आहे तो फोन करेल "

हे ऐकून अनामिकाच्या आईने देवाला हात जोडत म्हटले "देवा कुठे नाही ती अना तयार झाली आहे आणि आपण हुन स्थळ घेऊन आली आहे जुळू दे देवा होकार येऊ दे "

हे पाहून बाबा म्हणाले "झालं तुझं सुरु देवाचा भार वाढवण्याचा "

त्यांना रोखत आई म्हणाली "मग काय करू म्हणता कधी नाही ती तयार झाली आहे आणि आता आणखी काही विघ्न नको "

"हे बघ आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत बघू काय उत्तर येते ते कारण संसार त्या दोघाना करायचा आहे आपल्याला नाही" असे सांगून बाबांनी रूम मध्ये प्रवेश केला 

संध्यकाळी राघव बँक मधून आला फ्रेश होऊन चहा वैगरे पिऊन रूम मध्ये बसला होता एवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी हाक मारली तसा तो हॉल मध्ये आला स्थळांविषयी त्याच्या कानावर पडले तसे तो म्हणाला "काय डिटेक्टिव्ह चे स्थळ माझ्यासाठी पण मला लग्न नाही करायचे "

हे ऐकून राघवची आई म्हणाली "काय नाही करायचे मग कधी करणार ते काही नाही तू तिला भेट तरी मग पाहू आवडली तर हो म्हण नाहीतर नाही पण भेटायल्याशिवाय कसे कळणार "

हे ऐकून निराशेच्या आवाजात राघव म्हणाला "पण आई काय गरज आहे "?

"हे बघ हे स्थळ तुला आपण हुन आले आहे कदाचित ह्यात देवाचाच आशीर्वाद असेल तर "?

"काहीही हा आई बाबा सांगा हो आईला "

बाबांनी समजावत राघवला म्हटले "हे बघ भेटायला काय आहे "

"पण बाबा मी त्या मुलीला ओळखत हि नाही आणि त्यात ती डिटेक्टिव्ह म्हणजे तिचा दरारा असेल "

ह्यावर आई म्हणाली "इथे बसून तुला सगळे कळले भेट तिला आवडली तर होऊन जाऊ दे आणि आज ना उद्या तुझे लग्न आम्ही करणारच आहोत "

"तुम्ही माझे लग्न केल्याशिवाय गप्प नाही बसणार पण हा मला आवडली नाही तर मी तिला सरळ नकार देणार "

"हो झालं हे घे कार्ड त्यावर तिचा नंबर आहे "

"बरं" असे म्हणून राघव आपल्या रूम मध्ये गेला त्या कार्ड ला पाहून तो म्हणाला "मला कोणा डिटेक्टिव्हचे स्थळ येईल असे स्वप्नात हि विचार केला नव्हता "आणि त्याने नंबर लावला समोरून फोन उचला ओळख करण्यात आली आणि अनामिकाने मेसेज करते तिथे भेटू असे सांगून फोन ठेवला 

गुलाबी कलरचा कुर्ता आणि मोकळे केस अशी नटून अनामिका राघव ला भेटायला गेली वेळेनुसार ती सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली तिनी राघवला फोन लावला आणि लगेच ते दोघे समोरासमोर आले आज अनामिका नेहमी पेक्षा खूप सुंदर दिसत होती राघव तिला पहातच राहिला अनामिकाला ते जाणवले तिनी त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला दोघेही कॅफे मध्ये टेबल वर बसले कॉफीची ऑर्डर करून अनामिकाने बोलण्यास सुरुवात 


"मी अनामिका डिटेक्टिव्ह आहे माझे बाबा तुझ्या घरी येऊ गेले होते "


"हो कळले मला माझे नाव राघव मी बँक मध्ये नोकरी करतो पण आपण कधी पहिली भेटलो नाही तरी माझ्याविषयी तुला कसे कळले आणि मलाच का म्हणून तू निवडले मला हे सगळे विचित्र वाटत आहे "


"काही विचित्र नाही आणि मला तुझ्याबद्दल कसे कळले ते हि महत्वाचे नाही राघव तू चांगला मुलगा आहे समजुदार आहे म्हणून मीच तुला होकार दिला आहे आणि मला विश्वास आहे कि मी जसा विचार केला आहे तसाच तू आहेस "


"थँक क्यू माझ्याबद्दल मला न ओळखता एवढे बोल्याबद्ल आणि ते हि एका डिटेक्टिव्ह ने "


"म्हणजे डिटेक्टिव्ह ना मन नसतात असे तुला म्हण्याचे आहे का "?


"नाही नाही अजिबात नाही तुला पाहून नाही वाटत कि डिटेक्टिव्ह एवढ्याही कठोर असतात म्हणून "


आणि कॉफी बरोबर दोघाच्या गप्पा गोष्टी सुरु झाल्या आणि मधेच अनामिकाने राघवला पाहत विचारले 


"मग काय ठरवलं काय आहे तुझा निर्णय"? 


हे ऐकून खिशातला रुमाल काढून त्याने चहेरा पुसला आणि अनामिका ला पाहत विचारले "थोडा वेळ दे असे म्हणून तो विचार करू लागला "


अनामिका त्याच्यासमोरच बसलेली होती त्याने तिच्याकडे पहिले आणि डोळे बंद केले आणि काही मिनिटात डोळे उघडले आणि निघते वेळी राघव ने होकार कळावला आणि हसत हसत दोघानी निरोप घेतला 


दोघाच्या घरी जेव्हा हि बातमी पोहचली तेव्हा तर दोन्ही घरचे खुश झाले दोन्ही घरही मंडळी राघव च्या घरी भेटली आणि पुढची बोलणी सुरु झाली अनामिकाची आई तर खूपच खुश होती आणि अनामिका आणि राघवाचे भेटणे सुद्धा वाढत होते   


अश्याच एका सकाळी विराज ऑफिस मध्ये फोन वर बोलण्यात व्यस्त होता आणि विराजला हाक मारल्याच्या आवाज आला विराज ने पाठी मागे वळून पहिले तर  


"सविता तू "?


"हो मी माझ्या केस चे काय झाले मी आता ऐकलं कि मॅडम चे लग्न ठरलं आहे मग माझी केस चे काय मी खूप आशेने तुमच्याकडे न्याय मिळवण्यासाठी आले होते पण १५ दिवस उलटले तरी तुमची काहीच खबर नाही "


विराज ने समजावत सांगिलते "हे बघा मॅडमचे तुमच्या केस बाबतीतले काम चालू आहे लग्न ठरलं म्हणून कामावर दुर्लक्ष मॅडम करणार नाही आणि त्या तुम्हला योग्य वेळी खबर करतील "


सविताने हात जोडत म्हटले "प्लिज खूप आशा घेऊन मी इथे आले आहे माझी निराशा करू नका "


"नाही अनामिका मॅडम असताना तुमच्यावर अन्याय कधीच होऊ शकत नाही" 


अनामिका देईल का सविताला न्याय ?

अनामिका आपल्या केबिन मध्ये काही पेपर पाहत विचार करत होती एवढ्यात विराज केबिन मध्ये आला आणि अनामिकाला पाहत म्हणाला "मॅडम हे बघा रेकॉर्डिंग तुम्ही सांगितले तसाच मी फोन लावलेला आणि नंतर हे बोलणे "


मोबाईल मध्ये पाहत अनामिकाने म्हटले "गुड जॉब विराज हेच तर आपल्याला हवे होते हा पुरावा खूप आहे सत्य बाहेर येण्यासाठी ऑडिओ आणि विडिओ पण आहे "


हे ऐकून विराज ने उत्साहित होत विचारले "पण मॅडम आपण ऍक्शन कधी घ्याची "?


हो हो तुझा उत्साह मला कळतो मला माहित आहे कॊणाला न्याय देण्यसाठी तू किती खुश असतो पण काहीन साठी ते अवघड असते विराज उद्याच उशीर नको उद्याच काम फत्ते करू 


"ओक मॅडम जशी तुमची ऑर्डर पण हो मॅडम तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे कोणासाठी हे अवघड असते पण मॅडम आपण सत्याच्या बाजूनी असताना नेहमी निर्भीड असायला हवं बरं मॅडम मी तयारीला लागतो असे म्हणून विराज केबिन बाहेर गेला 


एवढ्यात अनामिकाचा फोन वाजला तिनी पहिले तर राघव चा होता तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू आले तिनी लगेच फोन उचला 


"हॅलो राघव "


"अनामिका डिस्टर्ब नाही केलं ना "


"नाही रे अजिबात नाही सांग काय म्हणत होतास "


"तुला भेटायचे आहे "?


"काही विशेष "


"म्हणजे तुला भेटण्यासाठी काही विशेष कारण दयावे लागेल "


"तसे नव्हे म्हणजे फोन वर बोलणे होऊ शकते तर आपण बोलू असे "


"नाही अनामिका मला तुला भेटायचे आहे तुला भेटायचे नसेल तर ठीक आहे "


"नाही नाही असे काही नाही तू रागावू नकोस ओके संध्यकाळी भेटू आपण "असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला 


संध्याकळी सांगितलेल्या जागी दोघे पोहचले पण समोरासमोर असून गप्प पाहत होते अनामिकाला ते विचित्र वाटत होते म्हणून तिनी राघवला पाहत विचारले 


"काय झालं राघव भेटण्यासाठी बोलवलेस पण गप्प का आर यु ओके "?


निराशतेच्या सुरात राघव म्हणाला "माहित नाही अनामिका पण एक अजाण भीती वाटते "


"अजाण भीती कसली"?


"तुला माहित आहे "


"मी डिटेक्टिव्ह असल्याची ना "?


"सॉरी पण हा "


"हे बघ राघव मी जे करत आहे ते काम कोणाला तरी न्याय मिळवूंन देत आहे आणि मी नेहमी सत्याच्या बांजूनीच उभी आहे त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही आणि माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असे वाटत असेल तर एक लक्षात घे मी पुरावा असल्याशिवाय कोणावर आरोप नाही करत "


"ते हि आहेच तरी पण काही कळत नाही "


"राघव मला एक सांग तू तुझ्या बँक मध्ये तू घोटाळा करून पसार होऊ शकतो तू पैसे वाला होऊ शकतोस पण तू तसे करणार नाही कारण तुझी नियत तशी नाही आहे बॅंकेतली संपत्ती जपून ठेवणे हा तुझा मुख्य उद्देश असतो ना तसाच न्याय देणे हा माझा उद्देश आहे त्यामुळे रिलॅक्स माझ्यामुळे तुला कोणताच त्रास होणार नाही आणि मी होऊ देणार नाही "


अनामिका ला असे बोलताना पाहून राघव म्हणाला "ग्रेट आहेस तू अनामिका मुलगी होऊन धाडसाच्या गोष्टी करते आणि मला बघ मी तुला सांगतो कि मी भीत आहे म्हणून नाही अनामिका तुझ्या बोलण्याने मला एक नवीन ऊर्जा आली आहे तुझ्या लढाईत मी पण असेन" असे म्हणून राघव ने अनामिक चा निरोप घेतला 


अनामिका ने त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहून म्हटले "मी नाही तू ग्रेट आहेस"

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विक्रम साठे याच्या घरची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला 

वीणा साठे नि समोर पाहत "अनामिका तू सकाळी सकाळी ये आत ये राघवला भेटायला आलीस अशील तर तो आता बँक मध्ये गेला आहे "

"नाही नाही मी त्याला नाही तुम्हाला भेटायला आली आहे काका आहेत ना घरी "

"हो आहेत बस मी त्यांना बोलवते "

" काकू हा माझा ऑफिसतला सहकारी विराज "

"नमस्ते काकू "

"बसा हा येते "म्हणून वीणा साठे आत गेल्या आणि सोबत विक्रम साठे ना घेऊन आल्या विक्रम साठे नि अनामिकाला पाहत म्हटले 

"गुड मॉर्निंग अनामिका आज सकाळी सकाळीच "

"हो काका काही केस संदर्भात बोलायचे होते "                                                                                                                                           "केस आणि माझ्याशी "?

"काका माझ्याकडे त्या जनजीवन क्रेडिट सोसायटी ची केस आली आहे आणि मला असे कळले कि तुम्ही त्या सोसाटीत काम करत होतात 

हे ऐकून थोडा गंभीर चहेरा करत विक्रम म्हणाले "हो मी त्या सोसाटीत काम करत होतो ती सोसायटी तिची केस केव्हाच बंद झाली दुर्दवाने घोटाळा केल्यानेच आत्महत्या केली आणि सोसायटी हि डबघाई मुळे बंद पडली त्यामुळे आम्हला घरी बसावे लागले मग मी हा व्यवसाय सुरु केला पण आता कोणी हि केस री ओपन केली "

"काका कोणी केली ते महत्वाचे नाही तुम्हला काही माहित असेल तर मला सांगा आणि ज्याने केले आहे त्या व्यक्तीचे असे म्हणे आहे कि त्या माणसाला यात फसवले गेले "

"काय अनामिका १५ वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला सगळे पुरावे त्या माणसाच्या विरुद्धच होते मग आता री ओपन करून काही नवीन हाती नाही लागणार "

"पण काका तेव्हा तपासात काही चूक झाली असेल तर "?

विक्रम हसत हसत म्हणाले "अनामिका दोन दिवसावर साखरपुडा आहे त्यात जरा लक्ष दे आणि मला असं वाटत कि हि केस घेऊन तू स्वतःला उगीच त्रास करत आहे "

"नाही काका मला पण असे वाटते कि तो माणूस निर्दोष होता "

"अनामिका वाटून काही होत नाही पुरावे लागतात आणि मला असे वाटते कि साखरपुडयाचे दोन दिवस जाऊ दे मग ह्या केस वर विचार कर" 

"माझ्याकडे पुरावा आहे हा पहा "असे म्हणून विक्रम साठे ना अनामिकाने मोबाईल दाखवला ..............

काय असेल तो पुरावा ?

अनामिकाने मोबाईल मधला विडिओ चालू केला आणि सर्वाना दिसेल असा पकडला आणि संभाषण कानी पडले 


"हॅलो साप्ते बोल काय म्हणतोस "


"काय रिपोर्टर माहिती मिळवत आहे कशाला ती केस तर कधीच बंद झाली मग आता कशाला चौकशी पण तू काही सांगितले नाही ना माझ्यापर्यत तरी अजून कोणी आला नाही पण आपल्याला बोलताना जरा जपून बोलायला हवे आपण जर काही चुकलो तर आपण फसू शकतो एव्हडी वर्ष स्वतःला वाचवले पण एवढ्या वर्षांनी कोणाला लेख लिहावासा वाटला मला तर वाटलं होत तो मेला म्हणजे सगळं बंद होईल आणि तसे झाले हि केस हि बंद झाली तेव्हा कुठे जिवात जीव आला पण आता हे ऐकून भीती वाटायला लागली "


अनामिकाने विक्रम साठे कडे पाहत विचारले "मिस्टर साठे हे काय आहे तुम्ही ह्या माणसाला ओळखता "?


आपला चहेरा गंभीर करत "हा काय पुरावा आहे हे फक्त बोलणे आहे आणि ह्यात असे बोलणे कुठेच नाही आणि हा विडिओ तुला कसा मिळाला हा तर आमच्या रूम मध्ये रेकॉर्ड झाला आहे आमच्या रूम पर्यत तू कशी पोहोचलीस "?


"मिस्टर साठे मी कशी पोहचली हे महत्वाचे नाही खरं सांगा खरं काय आहे "?


"हे बघ बेटा तूला हा विडिओ पाहून गैरसमज झाला आहे अग बोलताना आपण कधी कधी काहीही बोलून जातो असेच काहीतरी माझ्याबाबतीत घडले असेल "


"नाही मिस्टर साठे तुमच्या बोलण्यावरून तुम्हला कशाची तरी भीती वाटत आहे हे स्पष्ट जाणवत आहे" 


हे बोलणे ऐकून वीणा साठे अनामिकाला रोखत म्हणाल्या" अंग अनामिका तू तुझ्या होणाऱ्या सासऱ्यावर आरोप करत आहेस ह्याचे तरी भान ठेव "


"नाही मिसेस साठे माझ्यासाठी ते आता फक्त विक्रम साठे आहेत आणि पुराव्या शिवाय मी काही बोलत नाही "


वातावरण तापणार हे लक्षात घेता विक्रम साठे नि वीणा साठे कडे पाहत म्हटले "वीणा तू आत जा "


"नाही मी नाही जाणार मला हि कळू दे हे काय चालाय ते "


विक्रम साठे नी अनामिकाला समजावत सांगितले "हे बघ अनामिका माझे बोलणे तुला संशयित वाटले कारण ती केस ओपन झाली तर उगीच चौकशीच्या नावावर आम्हला आत ओढले तर तो व्याप नको म्हणून मी असे म्हणालो आणि तू त्याचा अनर्थ केलास "


ह्यावर अनामिका हसत हसत म्हणाली "विक्रम साठे साप्ते आमच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सगळे खरे सांगितले कि कसा तुम्ही दोघांनी मिळवून घोटाळा केला आणि निष्पाप सदानंद देशमुखावर आरोप टाकलात पैशाच्या जोरावर कसा तपास फिरवला आणि केस बंद केली "


"हे तू काय बोलत आहेस साप्ते तुमच्या ताब्यात आहे "


"हो आम्हला सत्य बाहेर काढता येते साप्ते ची फॅमिली हा त्याचा विक पॉईंट आणि तो आम्ही इथे चांगल्या कामासाठी वापरला आणि पोपटाप्रमाणे त्याने सगळे ओकले 


हे ऐकून घाबरलेल्या स्वरात विक्रम साठे म्हणाले "हे बघ अनामिका जे झालं ते झालं केस पण बंद झाली आता काही फायदा नाही परत तपास करून आणि आता तू आमची सून म्हणून घरीच येणार आहेस मग हि केस पण विसरून जा कशाला उगीच नात्यांना गुरफटत आहेस "


"वाह मिस्टर साठे वाह तुम्हला काय मी वेडी वाटते मी न्याय देण्यासाठी लढत होती आणि लढत राहणार आणि आता हार मानणार नाही माझ्यासाठी न्याय नात्यापेक्षा मोठा आहे "


हे ऐकून केविलवाण्या स्वरात वीणा म्हणाल्या "अंग अनामिका दोन दिवसावर साखर पुडा आहे उगीच हसे होतील हि केस तुझ्याचकडे आहे मग बंद करून टाक ना कोणाला काहीही कळणार नाही "


"मिसेस साठे कोणाचा साखरपुडा"?


 "अग असं काय करतेस तुझा आणि राघवचा "?


"तो आता होऊ शकत नाही आणि मला तुम्ही केस बंद करण्यसाठी सांगत आहात खरे माहित असताना हि पाहिलात तुमच्या मिस्टरांचे प्रताप "


"अनामिका मला हि नाही पटले हयांनी जे केले आहे ते पण आता आपण आपल्यात सामावून घेतले तर उगीच चार चौघात हसे नको पाहिजे तर तू लग्नानंतर ह्याचा शी बोलू नको पण लग्नाला नाही म्हणू नकोस दोन दिवसावर साखरपुडा आहे "


"माफ करा मिसेस साठे मी एका गुन्हेगाराच्या घरची सून कधीच बनणार नाही "


"पण ह्याची शिक्षा तू राघवला का देतेस तो तरी किती चांगला आहे तुला माहित आहे ना त्याच्या स्वभावामुळेच तूच त्याला मागणी घातलीस असं करू नकोस तो खूप दुखावेल असं काही झाले तर खूप हळवा आहे माझा राघव" 


"मिस्टर साठे मी तुमच्या मुलाला शिक्षा देऊ नये असे वाटते मग विक्रम साठेनाच विचारा त्याच्या अश्या वागण्याने फक्त सदानंद देशमुख ह्यांनी आपला जीव गमावलाच नाही तर ह्या सगळ्या प्रकारामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उधवस्त झाले त्याचा मुलीचे ठरलेले लग्न मोडले दोन दिवसावर लग्न होते पण सासरच्यांनी घोटाळेबाजच्या मुलीला आम्ही सून करू शकत नाही असे सांगून लग्न मोडले त्यानंतर तिला स्थळे आली नाही कशी येतील बाप घोटाळेबाज म्हणून शिक्का तिच्यावर बसला होता आणि आजही ती बिचारी अविवाहित आहे त्या वेळी तिच्यावर आणि तिच्या आई वर जे दुःख पसरले असेल ह्याची जाणीव साठे ना व्हायला हवी "


"चला आमच्याबरोबर मिस्टर साठे" म्हणून अनामिका आणि विराज विक्रम साठे ना घेऊन घरातून बाहेर पडले आणि वीणा साठे डोळ्यात पाणी काढून त्याना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या 

अनामिका मिस्टर साठे ना घेऊन केल्यापासून वीणा साठे सोफ्यावर रडत बसल्या होत्या एवढ्यात दरवाजाची बेल वाजली मिस्टर साठे परत आले का म्हणून त्यांनी पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर राघवला पाहून त्या रडू लागल्या 


"राघव बाबाना अनामिकाने पडकून नेले आता काय होईल तुझे बाबा असे काय करतील ह्यावर विश्वास नाही रे बसत तू सांग अनामिकाला "


"आई शांत हो बस बघू हे बघ मला सर्व कळले म्हणून मी घरी आलो आहे मला माहित होतो कि हे कळताच तुझी अवस्था काय होईल "


"मग सांग ना रे तिला सोड म्हणून चुकले आमचे आम्ही तिचे स्थळ स्वीकारले आता लग्नला हि ती नकार देत आहे काय होऊन बसले राघव होते ते नव्हते झाले "


"आई शांत हो बाबांनी जे केले ते खरेच अनपेक्षित होते आणि अनामिका आपले काम करत आहे आणि गुन्ह्याची शिक्षा वाहायला हवी ना "


"काय शांत होऊ मला काहीच सुचत नाही तू असेच सहज कसे बोलू शकतोस अरे तुझे बाबा जेल मध्ये राहणार तुझे लग्न तुटले काय काय सहन करू "


"आई तू शांत बस मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येतो बाबांना भेटावसं नाही वाटत तरी पण जाऊन येतो "


" मी पण येते "


"नाही आई नको तू त्या अवस्थेत बाबांना नाही पाहू शकत येई पर्यत शांत राहा आपल्या ह्या सत्याबरोबर जगावे लागणार आहे "


असे म्हणून राघव पोलीस स्टेशन कडे वळला साठे आणि साप्ते ना जेल मध्ये ठेवण्यात आले अनामिका आणि विराज पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले एवढ्यात समोर राघव दिसला त्याला पाहताच 


"राघव तू इथे "?


"हो बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आलो "


"काकू बऱ्या आहेत ना "?


"आहे तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित आहे त्यामुळे थोडा धक्का बसला आहे तिला "


"थँक क्यू राघव "


"कशासाठी न्याकाय म्हणतोस तू जे केलंस ते करणे कोणाला हि नाही जमणार न्याय मिळवून देण्यासाठी तू जी मदत केली आहे ना खरेच हट्स ऑफ राघव आपल्या वडिलांन विरुद्ध उभे राहणे सोपे काम नाही "


"अनामिका त्यांनी जे केले ते पाहून मी गप्प बसावे एवढे माझे मन निष्टुर नाही मी येतो "असे म्हणून राघव निघाला.... 


 राघव ने पोलीस इन्स्पेक्टर कडून विक्रम साठे ना भेटण्याची परवानगी घेतली आणि तो जेल च्या दिशेने गेला आपल्या वडिलांना दुरून हि कैदी च्या कपड्यात त्याने ओळखले तो त्या जेल च्या जवळ आला त्याला पाहून विक्रम साठे च्या डोळ्यात पाणी आले त्यांनी राघवला पाहत विचारले "तू इथे आई कशी आहे "?


त्यांना नजर न मिळवता तो म्हणाला "काळजी करू नका मी आहे तिला पाहण्यासाठी तुम्ही जे केले ना विश्वास नाही बसत कि तुम्ही माझे बाबा आहात खूप कष्ट करून व्यवसायाची सुरुवात केली कशी केली ती आता कळले मला मुळीच इच्छा नव्हती तुम्हाला भेटण्याची पण एक ओढ होती मुलगा म्हणून त्या ओढीने मला घेचून आणले "असे म्हणून डोळे पुसत राघव घरी परतला 


अनामिका पोलीस स्टेशन मधून ऑफिस मध्ये आली आणि आपल्या केबिन मध्ये गप्प बसली हे पाहून विराज म्हणाला "मॅडम काय झालं एकदम गप्प झालात "?


"काही नाही रे राघव चे वाईट वाटते एव्हडा चांगला मुलगा असून असे सहन करावे लागले दुसरा कोणी असता तर मदत केली नसती पण त्याने मोठ्या मनाने सगळे केले "


"हो मॅडम खूप कठीण होत पण त्याने केले "


एव्हडयात दरवाजावर हाक ऐकू आली विराज ने पहिले तर सविता देशमुख हात जोडून उभी होती अनामिकाला पाहत तिनी म्हटले 


"मॅडम तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही आज तुमच्यामुळे माझ्या बाबाच्या आत्म्याला शांती मिळाली त्याचवरचा आरोप खोटा ठरला माझे बाबा निर्दोष सिद्ध झाले "


अनामिकाने तिला पाहत म्हटले "असे नका म्हणू मी माझे काम च केले आणि सत्य कधी लपून नाही राहत "


सविताच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अनामिका भारावून गेली 


अनामिकाने साठे च्या घरी जायच्या आधी आपल्या घरी आई बाबाना सगळी गोष्ट कानावर घातली होती कि राघव चे स्थळ हा एक तिचा प्लॅन होता साठे ना पकडण्याचा आणि ह्यात राघव ने हि मदत केली आहे हे ऐकून अनामिकाचे आई बाबा दोघेही चकित झाले अनामिकाच्या आई ने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पहिली होती ती धुळीस मिळाली होती 


राघव च्या आईला मात्र ह्याची खबर नव्हती आणि राघव ने ती आईला सांगितली नव्हती तिला राघवाचे लग्न विनाकारण तुटल्याची खंत वाटत होती पण राघव ने अनामिका चा विचार सोडून दयावा असे तिला वाटत होते म्हणून ती त्याला समजवण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेली 


राघव आपल्या रूम मध्ये विचार करत गप्प बसला हे पाहून आई ने विचारले "काय झालं राघव कसला विचार करतोस बघ मी आणि काय विचारते कसला करणार होते ते नव्हते झाले त्या मुलीने सून म्हणून न येता आपला इंगा दाखवला राघव सोडून ते तिचा विचार पण राघव मला एक कळत नाही रे अनामिका आपल्या घरात एकदाच आली ती हि आपल्या आई वडिलांबरोबर आणि हॉल मधून निघून गेली मग आमच्या रूम मधला विडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे कसे पोहचले "


हे ऐकताच राघव म्हणाला "आई जाऊ दे सोडून दे तो विचार आपलंच नाणं खोटं त्यात तिला दोष देऊन काय फायदा तिनी आपले काम केले "


"ते हि खरे आहे पण दोन दिवसावर साखरपुडा आणि लग्न मोडणे म्हणजे "


"हे बघ आई कोणती मुलगी एका गुन्हेगारांच्या मुलाशी लग्न का म्हणून करेल आणि ती हि एक डिटेक्टिव्ह "


"तू विचार करू नकोस मी उमा मावशीला सांगितले तुझ्यासाठी स्थळे पाहण्यासाठी "असे सांगून आई निघून गेली 


स्वतःशी राघव म्हणाला "आई तुला जर कळले असते कि तुमच्या रूम मध्ये कॅमेरा मी लपवला होता आणि अनामिकाच्या प्लॅन प्रमाणे लग्नाचं खोटं नाटक केले हे सत्य तू पचवलंस नसते त्यामुळे जे गुपित आहे ते गुपितच राहू दे "

मिस्टर साठे ची आज कोर्टात हजेरी होती आणि सगळे पुरावे त्याच्याविरुद्ध असल्याने त्याना आणि साप्ते ना दहा वर्षाचा कारावास जाहीर केला कोर्टाचा निर्णय ऐकताना राघव खूप भावुक झाला होता त्याच्या डोळ्यातले ते तरलेले अश्रू अनामिकाने पहिले राघव ने निकाल ऐकला आणि सरळ कोणाला हि न भेटता निघून केला 

रात्रीची जेवणे झाली अनामिका आपल्या रूम मध्ये आली ती नेहमी प्रमाणे आपले आवडीचे गाणे ऐकण्यासाठी तिनी एअर बड्स आपल्या कानात अडकवली पण क्षणात तिनी गाणं बंद केलं आणि फोन लावला 

"हॅलो राघव" 

"हा अनामिका बोल "

"झालं जेवण "

"हो काय म्हणत होतीस "

"आर यु ओके "

"का असे का म्हणालीस "

"आई नो राघव कोर्ट मध्ये तुझे भरलेले डोळे मी पाहिलेत "

"तसे काही नाही अनामिका बाबा हे माझे आदर्श होते पण त्यांना त्या अवस्थेत पाहून थोडा भावुक झालो आणखी काही नाही "

"राघव खरंच तू खूप मोठे धाडस केलेस"

"अनामिका माझे बाबा म्हणून मी एका गुन्हेगाराला पाठीशी नाही घालू शकत आणि जे मी केले त्याची खंत हि मला नाही "

"राघव तू खूप चांगला माणूस आहेस माझी कधीही मदत लागली तर माझा मैत्रीचा हात तुझ्यासाठी सैदव असेल हे विसरू नकोस काळजी घे "असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला 

फोन ठेवताच राघव स्वतःशी बोलू लागला "माहित नाही अनामिका पण तुझा आवाज ऐकला आणि बरे वाटले जर तुला माझ्याशी मैत्री ठेवण्यात काही अडचण नाही तर ....असे म्हणून राघव गप्प झाला 

काय असेल त्याच्या गप्प राहण्यामागचे कारण ?

'अना काय करतेस "


"काही नाही आई सांग काय म्हणत होतीस "


"हे बघ फोटो बघ "


"कसले फोटो"? 


"अग मावशीने तुझ्यासाठी स्थळे आणली आहेत "


हे ऐकताच अनामिका रागाने म्हणाली "आई तुला मी किती वेळा सांगितले होते कि मला लग्न नाही करायचे मग ती स्थळे कशाला"? 


"काय लग्न नाही करायचे अशीच एकटीच राहणार आहेस का "


"का एकटी का तुम्ही आहात ते काय "?


"आम्ही आम्ही किती दिवस तुझ्याबरोबर असू हे बघ वेडेपणा करू नकोस "


अनामिका आईला समजावत म्हणाली "आई मला त्या बंधनात नाही अडकायचे माझे काम माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि त्या बंधनात अडकले कि मग संसाराच्या अडचणीत मी अडकणार आणि मला ते नको आहे" 


"काम काम काम कामाच्या बाहेर पण एक आयुष्य असते आम्ही पण तुझ्यासाठी काही स्वप्ने पहिली आहेत ती तू नाही पूर्ण करणार का आणि लग्न म्हणजे काही अडचण नाही दोन जीवाचा एक सुखी प्रवास असतो "


"हे बघ आई लग्न म्हणजे आयुष्य सुखी होते हे चुकीचे आहे आणि मी लग्न करणार नाही हि काळया दगडावरची रेख आहे "असे म्हणून अनामिका निघून गेली 


अनामिकाच्या आईने डोक्याला हात लावला आणि म्हणू लागली "देवा काय रे हे काय आहे हिच्या नशिबी तुझं बघ रे बाबा त्या काळ्या दगडावरची रेख पुसून टाक "


तिथे राघवच्या घरी राघवच्या आईला तिच्या बहिणीचा फोन आला 


"हॅलो वीणा" 


"हा बोल "


"वीणा तू मला राघव बद्दल स्थळे पाहायला सांगितली होतीस ना "


राघवच्या आईने उत्साहित होत विचारले "हो मिळालं का "?


थोडं गंभीर होत" नाही खोटं नाही सांगणार पण कठीण वाटतंय वीणा "


"पण का असे का म्हणतेस "?


"अग लोकांचं असे म्हणे आहे कि ज्याचा बाप तुरुंगात शिक्षा भोगतो त्या घरची सून म्हणून आम्ही आमची मुलगी कशी देऊ "


"काय अगं पण ह्यात राघवचा काय दोष त्याने तर असे काही केले नाही तो स्वभावाने किती चांगला आहे "


"मान्य आहे वीणा आपल्या राघवला कोणीच नाव ठेवू शकत नाही पण लग्न घरदार पाहून करतात "


रडवेल्या सुरात वीणा म्हणाल्या "म्हणजे आपल्या राघवचे लग्न "?


"काय सांगू माफ कर वाईट बोलते पण भावोजी नि जे केले त्यात एकाचा बळी केला हि गोष्ट लोक विसरू शकत नाही आणि त्याच्या कर्माची फळे मात्र आपल्या राघवला भोगावी लागणार" असे म्हणून फोन ठेवला 


आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत वीणा देवाला हात जोडत म्हणाल्या "देवा माझ्या सोन्यासारख्या राघवच्या नशिबी काय लिहिलंस आहे तुलाच माहित "


अनामिकाच्या नशीबी स्थळे आहेत तर तिला लग्न नाही करायचे आणि इथे राघवच्या न केलेल्या चुकीमुळे स्थळे नाकारत आहे काय असेल दोघाचे नशीब ?

संध्याकाळची ४ ची वेळ कॅफे शॉप मध्ये राघव कोणाची तरी वाट पाहत बसला होता एव्हडयात त्याची नजर पडली तो उठून उभा राहिला त्याला पाहत ती म्हणाली 

"बस बस राघव उभा वैगरे का झालास "?

""काही नाही गं सहज" 

"बर बोल "

"काय बोलू"? 

"तू तर मेसेज केला होता कि भेटायचे आहे म्हणून काही बोलायचे आहे "

"हो अनामिका सॉरी म्हणजे मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना "?

"अरे नाही आपण मित्र आहोत मग डिस्टर्ब वगैरे काही नाही तसे हि नवीन केस नाही आली त्यामुळे आम्ही फ्री आहोत "

"ओके ओके ""

"काकू कशा आहेत "

"आहे बरी आता काय जे सत्य आहे ते स्वीकारल्याशिवाय काही पर्याय नाही "

"हो रे ते हि आहेच सोड तो विषय बोल काय म्हणत होतास "?

"एका गुन्हेगाराचा मुलगा असून सुद्धा मला तू तुझा मित्र मानतेस हे माझ्यासाठी खूप आहे "

"एक मिनिट हे तू काय बोलतोस मी इथे कुठल्याही गुन्हेगारांच्या मुलाला भेटायला आलेली नाही तर माझ्या मित्राला भेटायाला आली आहे जो मनाने खूप चांगला माणूस आहेस त्यामुळे हा मनातला विचार काढून टाक " 

"थँक क्यू अनामिका थँक क्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल नाही तर लोक मला आता एका आरोपीच्या मुलाच्या नजरेने पाहतात खूप वाईट वाटत मी काही केलं नसताना त्याच्या नजरा काळजात लागतात "

हे बघ इमोशनल होऊ नकोस लोकांचे काय रे लोक हजार बोलतील तू कसा आहेस हे तुला माहित आहे ना मग झालं बोल काय बोलायचे होते "

"अनामिका एक चांगला माणूस म्हणून माझी प्रतिमा तुझ्या मनात आहे तर मला तुझ्या आयुष्यात जन्मभरासाठी जागा देशील "

"काय हे काय बोलतोस तू राघव "?

"अनामिका प्लॅन दरम्यान आपण भेटत होतो मला तुझा सहवास आवडला पण माझ्या मनात तुझी जागा तू पक्की त्या दिवशी केलीस जेव्हा माझ्या डोळ्यातले अश्रू तुला दिसले आणि काळजी पोटी तू फोन केलास तुला खरं सांगू त्या वेळी मला एकटच वाटत होत तुझा आवाज ऐकावा असे वाटत होता आणि तुझा फोन आला फोन वर बोलून खरेच बरे वाटले तेव्हा कळले कि मी तुझ्यावर प्रेम करू लागलो 

हे सर्व ऐकून अनामिका त्याला पाहत राहिली तिला कळेना कि काय म्हणावे ती गप्प उठून निघून गेली आणि राघव तिला फक्त पाहत राहिला 

अनामिका घरी परतली आपल्या रूम मध्ये गप्प बसली तिला हे सर्व राघव कडून अपेक्षित नव्हते त्यामुळे ती थोडी बैचेन झाली तिथे राघव हि आपण अनामिकाला उगीच विचारले तिला काय वाटलं असेल ह्याचा विचार करत होता आपण तिला विचारून काही चूक तर नाही गेली ना ह्या विचारतच त्याची रात्र गेली 


सकाळी उठून त्याने पहिले अनामिकाला "सॉरी" म्हणून मेसेज केला 


अनामिकाने त्यावर उत्तर म्हणून "मला तुला संध्यकाळी भेटायचे आहे" असे सांगितले अनामिकाचे हे उत्तर पाहून राघवला थोडेसे हायसे वाटले 


संध्यकाळी सांगितलेल्या ठिकाणी राघव जरा लवकरच पोहचला आणि तो अनामिकाची वाट पाहू लागला एवढ्यात अनामिका येताना त्याला दिसली अनामिका येऊन त्याच्यासमोर बसली तसे त्याने तिच्या नजरेस नजर न मिळवता सॉरी म्हटले त्यावर ती म्हणाली सॉरी "कशाला तू काही वाईट काम नाही केलंस सॉरी कशाला म्हणतोस "?


"तसे नव्हे अनामिका मी अचानक तुला असे विचारले तुला ते कसे तरी वाटले असेल मला माहित आहे माझे विचारणे योग्य नव्हते कारण एक गुन्हेगारच मुलगा असे तुला काय विचारतो तरी पण तू म्हणालीस होतीस ना कि माणूस म्हणून मी चांगला आहे मला असे वाटले कि तुला हि मी आवडतो म्हणून मी तुला विचारले "


"हे बघ राघव मी तुला पहिली हि सांगितले आहे तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस नाहीतर आपल्या पहिल्या भेटीत मी सांगितलेल्या प्लॅनला तू होकार दिला नसता परक्याला न्याय देण्यासाठी आपल्याच माणसाविरुद्ध उभे राहणे सोपे नसते राघव तू जे केलंस ते खूप अवघड होते पण कसला हि विचार न करता तू न्याय दिलास हाच तर तुझा स्वभाव खूप चांगला आहे आणि मला तो स्वभाव खूप आवडतो म्हणून च मी तुला मित्र म्हणून मनाने स्वीकारले तुझ्यासारखा मित्र सोबत असेल तर खरंच एक सकारत्मक ऊर्जा बाजूला असते" हे ऐकून अलगद हसू राघवच्या चेहऱ्यावर पसरले 


ते पाहून अनामिकाने विचारले "काय झालं हसलास का "?


"काही नाही माझी एव्हडी स्तुती एका डिटेक्टिव्ह च्या तोंडून ऐकून भारावून गेलो बाकी काही नाही "


"मी काही खोटं नाही बोलत डिटेक्टिव्ह च्या तोंडून म्हणून त्यांना मन नसते काय "


"तसे नव्हे अनामिका तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस बोल तू तू काही म्हणत होतीस "


"हा राघव तू खूप चांगला माणूस आहे तुझ्यासारखा जीवन साथी लाभणे हे खरंच भाग्यची गोष्ट आहे आणि तू आपल्या साथीला नेहमी सुखात ठेवशील ह्यात तिळमात्र शंका नाही पण माझा तुला नकार आहे हे बघ तू असे समजू नको कि तू एका गुन्हेगारांचा मुलगा म्हणून मी तुला नकार देते पण मी कधीही तुला त्या नजरेने नाही पहिले आणि मुळात मला लग्न करायचे नाही माझ्या कामातच मला खूप सुख मिळते त्यामुळे माझा तुला नकार आहे पण एक मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी असणार तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा येते मी "


असे म्हणून अनामिका निघून गेली आणि राघव तिला पाहत राहिला त्याचा डोळ्यातले अश्रू त्याच्या प्रेमाच्या अधुरी कहाणीची वेदना सांगत होत्या 


************समाप्त ********************


Rate this content
Log in

Similar marathi story from Action