akshata alias shubhada Tirodkar

Romance

4.0  

akshata alias shubhada Tirodkar

Romance

प्रियांकित -एक प्रेम कहाणी

प्रियांकित -एक प्रेम कहाणी

68 mins
224


तासा भरा पूर्वी कॉलेज मध्ये असे काही घडले कि कॉलेज मध्ये त्याचीच चर्चा होती आणि प्रिन्सिपॉल सरांनी प्युन बरोबर बोलवणे पाठवले त्या प्रकार मुळे कॉलेज मध्ये बरीच गर्दी झाली होती त्या घोळक्यातून वाट काढत प्युन नेमके ठिकाणी पोहचला आणि डोक्यावर हात ठेऊन बसलेल्या पाहत म्हणाला "अंकित तुला सरानी केबिन मध्ये बोलवले आहे" हे ऐकताच अंकितचा चेहरा जरा गंभीर झाला तो स्वतःला सावरत केबिन कडे वळला


"मे आय कमिंग सर"


"हो अंकित ये ये बस "


अंकित ने खुर्ची सरकवली आणि बसत म्हणाला "सर तुम्ही मला बोलवले "?


अंकित कडे एक नजर टाकत "हो कशाला त्याची हि तुला जाणीव असेल " 


अंकित गंभीर चेहरा करीत म्हणाला "हो सर पण मी मुद्दामहून नाही केले सर प्रसंग असा होता कि त्यावेळी जे योग्य वाटले तेच मी केले "


"अंकित हे काय आहे तुझ्याकडून हि अपेक्षा माझी मुळीच नव्हती तू आणि मारामारी "


"सॉरी सर पण माझा नाईलाज होता सौरभ जर तसे काही बोला नसता तर "


"हे बघ अंकित सौरभ अनाडी मुलगा आहे तो कॉलेज मध्ये फक्त मस्ती करण्यासाठी येतो तसे तुझे नाही तू एक चांगला मुलगा आहेस अभ्यासात हि हुशार आहेस कॉलेज मध्ये तुझे नाव चांगल्या कामासाठी गाजत आहे मग असे मारा मारी करून का आपले नाव खराब का करत आहेस "


"सॉरी सर पण मी हे मुद्दामहून नाही केले त्याने काही अपशब्द प्रियंका सुर्वे साठी काढले आणि ते ऐकून माझा राग अनावर झाला "


"प्रियंका सुर्वे म्हणजे तुझ्याच ग्रुप मधली ना ती "?


"हो सर तिच्यासाठी नाही जर ते शब्द त्याने आणखी कोणाविषयी काढले असते तर मी त्याला तीच अद्दल घडवली असती आणि प्रियांका वर तर मी प्रेम करतो आणि हे सांगताना मला काहीही वाटत नाही कारण हे प्रेम तात्पुरते नाही सर प्रेम म्हणजे नुसते हातात हात घालून कॉलेज मध्ये फिरणे नसते जर मी तिचा आदर करू शकत नाही जर कोणी तिच्याविषयी वाईट बोलत असेल आणि मी गप्प उभा राहून पाहत असेल तर मग ते प्रेम कसले त्या प्रेमाला काय अर्थ जो आपल्या प्रेमाची रक्षा करू शकत नाही सर आमचे प्रेम निस्वार्थ आहे "


हे ऐकून चकित होत सर म्हणाले "वाह अंकित तुझ्या भावना ऐकून खूप बरे वाटले खरंच प्रेम म्हणजे फक्त कॉलेज च्या तीन वर्षांसाठी नसते जर तुझ्या सारखा विचार सगळ्यांनी केला तर कॉलेज चे प्रेम हे नुसते टाइम पास म्हटले गेले नसते असो पण मारा मारी करणे चुकीचे आहे आज त्याच्या फक्त हाताला लागले गंभीर दुखापत झाली नाही म्हणून मिळवले जर काही गंभीर असते तर आम्हला तुझ्याविरोधात उभे राहावे लागले असते आणि सौरभ ला मी समज देईनच पण मला नाही वाटत कि त्याच्यावर काही परिणाम होणार आहे त्यामुळे ह्या पुढे तुझ्या हातून अशी गोष्ट परत घडू नये अशी काळजी घे ये तू आता "


अंकित खुर्चीवरून उठला मान खाली खालून म्हणाला "सॉरी सर मी काळजी घेईन मला माफ करा"असे म्हणून अंकित प्रिंसिपल सर च्या केबिन मधून सरळ कॅन्टीन मध्ये गेला तिथे प्रियांका बसली होती सोबत तिचा ग्रुप हि होता अंकित आणि प्रियांका एकाच ग्रुप मध्ये होते अंकित येताच सगळे उभे राहिले प्रियांका मात्र रडत होती अंकित ने ते पहिले अंकित खुर्चीवर बसताच सगळे त्यांना एकांत देण्यासाठी तिथून निघून गेले अंकित ने प्रियांकाला पाहत विचारले "आता तरी रडू नकोस मी आलोय "


प्रियांका आपले डोळे पुसत म्हणाले "का केलंस तू असे आणि सर काय म्हणाले काही कारवाई तर करणार नाही ना "?


प्रियांका ची अवस्था पाहता त्याने तिला समजावत म्हण्टले "शांत हो प्रिया सर काही म्हणाले नाही मी माझे मत स्पष्ट सांगितले आणि त्यांना हि ते पटले परत असे करू नको असे त्यांनी सांगितले "


"पण तुला काय गरज होती त्याला मारण्याची काही झाले असते म्हणजे "?


"काय गरज होती म्हणजे तो तुला आपल्या प्रेमाबद्दल वाटेल ते वाईट बोलेल आणि मी गप्प राहून ऐकून घेऊ "


"पण मारामारी करणे हे चुकीचे आहे आणि सौरभ कसा आहे हे तुला माहीत हे ना मग कशाला आपण त्याच्या वाटे ला उगीच जायचे त्यांनी काहीही म्हटले म्हणजे खरे आहे असे थोडेच आहे तू ह्या पुढे असे काही हि करणार नाही ज्याने तुझे नाव खराब होईल "


"ओके नाही वागणार"


"बरं बस मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते" असे म्हणून प्रियांका अंकित साठी कॉफी आण्यासाठी गेली 


ती कॉफी घेऊन परतली पण ती निराश होती हे पाहून अंकित म्हणाला "आता तरी हस ना प्रिया "?


"अंकी तुला काही झाले असते तर मी काय केले असते "?


प्रिया मला काहीही होणार नाही बरं बाबा सॉरी ह्या पुढे तुला त्रास होणार असे मी काहीही करणार नाही आता तरी हस आणि त्या दोघाच्या हसत हसत गप्पा सुरु झाल्या 


त्याच्या चेहऱ्यवरचे प्रेम पाहून दूरवर त्याच्या ग्रुप एका सुरात म्हणाला "किसी की नजर ना लगे "


कॅफे अरोमा ची ती संध्यकाळ वाऱ्याची ती झुळूक त्यात कॅफे मध्ये लावलेले ते रोमँटिक गाणे असा क्षण असताना एका टेबलवर दोघेजण गप्पच बसले होते चेहऱ्यवरून दोघेही निराश वाटत होते काही वेळ असाच शांततेत गेला शेवटी त्यानेच तिला पाहत विचारले "काही बोलणार आहेस का ?आल्यापासून पाहतो तू गप्पच आहे गप्पच रहायचे होते तर भेटायला का बोलवलेस "


तिनी त्याच्याकडे पाहत म्हटले "काय बोलू तुला हल्ली वेळ कुठे आहे माझ्याशी बोलायला आता हि तू तसाच बोलास "


"काय हे तू काय बोलतेस म्हणजे तुझे असे म्हणे आहे कि मी तुला वेळ देत नाही असं कधी झालं का कि तू मला बोलवले आणि मी आलो नाही "


"विसरलास वाटत त्या दिवशी मूवी साठी कुठे आला होतास मी वाट बघून घरी निघून गेले साधा सॉरी मेसेज हि गेला नाहीस "


"ओके मान्य आहे मी नाही येऊ शकलो एक इम्पॉर्टंट अर्गेन्ट मीटिंग होती ऑफिस मध्ये घरी पोहचता उशीर झाला थकलो होतो झोपी गेलो सकाळी उठून तुला मेसेज केला "


"तो हि किती वाजता दुपारी बारा वाजता मला काय वाटले असेल ह्याच्या विचार तू केलाच नसशील "


"मला एक कळत नाही तुझा प्रॉब्लेम काय आहे शांत पणे आपण बोलू शकत नाही का आणि थोड मला समजून घेतले तर काय बिघडणार आहे "


"का मी समजून का घेऊ तू घेतलस नाही ना कारण तू बदलास तू पहिली सारखा नाही राहिलास कॉलेज मध्ये असताना कसा नेहमी काळजी घ्याचा कॉलेज संपले आणि काळजी ही "


"हे तू बोलतेस मी आता हि तुझी काळजी तेव्हडीच घेतो कॉलेज संपले म्हणून माझे प्रेम संपले नाही "


"माहित नाही संपले हि असेल"


"म्हणजे तुला काय म्हणायचे आहे आपले प्रेम संपले हे बघ तोंडात येते ते काही बोलू नकोस मला हि खूप बोलता येते पण मी नाही बोलत "


"का बोल ना कळू तरी दे कि तुझ्या मनात काय चाललंय"


"मला गरज नाही वाटत सांगायची भांडायचे होते तर कशाला बोलवलेस मी आलोच नसतो "


"मग जा ना कोणी अडवले तुला तू जाऊ शकतोस "


एवढ्यात तिथे वेटर आला त्याने दोघाना पाहत म्हटले "माफ करा पण मी तुम्हला मघास पासून पाहतो तुम्ही भांडत आहात निवांत बोलून मन मोकळे करा उगीच का भांडता पूर्वी यायच्या तेव्हा कसे मस्त हसत गप्पा व्ह्याच्या आणि आता "असे म्हणून तो निघून गेला 


"पाहिलंस त्याने पण आपल्यात ला दुरावा ओळखला "?


"पूर्वी सारखे पण काही राहिले नाही" असे म्हणून ती निघून गेली आणि तो तिला पाहत राहिला आणि नेमके त्याच वेळी कॅफे मध्ये गाणे लागले "चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा न कहना "

"राघव तू आम्हा दोघांना एकत्र का बोलवलेस मला एकटयाला भेटायचे होते तर एकटे बोलवले असते "


"का म्हणजे तुम्ही दोघे माझे मित्र आहात मग मी तुम्हला एकत्र का बोलवू नकोस "


"मला तू हे का नाही सांगितले कि हि येणार आहे मी आलोच नसतो "


"बस करा रे काय चाललंय काय? तुम्ही दोघे माझ्यासाठी खूप जवळचे आहात आपल्या कॉलेज चे लव्ह बर्डस काय झालं एव्हडा राग आणि मी असे ऐकलंय कि तुम्ही ब्रेकअप करण्यात पर्यंत पोहचलात "


"राघव लव्ह वगैरे कॉलेज मध्ये होते आत सगळे संपले "


"पाहिलंस राघव हि अशी बोलते मग तुझं सांग मी कसा चांगला बोलू "


"नकोच बोलूस "


"गप्प बसा रे मी तुम्हला काय इथे भाडणं करण्यासाठी बोलवले आहे नाही पाहवत तुम्हाला असे भांडताना कॉलेज मध्ये तुमचे प्रेम पाहून वाट्याचे कि मेड फॉर इच अथर आणि आता हे काय पाहतो "


"राघव "?


"काहीच बोलू नका तुम्ही दोघे माझे फक्त ऐका आणि एक मित्र म्हणून तुम्हला ऐकवण्याचा मला हक्क आहे "


"आठवा कॉलेज ची ती पहिली भेट मग वाढत चाललेली ती मैत्री आणि एक दिवस एकेमकांना केलेला प्रपोस आणि मग तुमच्या प्रेमाचे क्षण हेवा वाटायचा किती काळजी प्रेम होते आणि आज एकदम असे कसे ते नाहीसे होऊ शकते" 


"राघव काळ बदला कि वेळ हि बदलते आणि आता आमच्यात तसे परत होणार नाही "


"अरे पण एवढे टोकाचे पाऊल उचलण्या आधी एकदा एकमेकांशी बोलून तरी पहा "


"ती वेळ निघून गेली राघव "


"अग पण" 


"राघव प्रेम मनापासून असले तरच नाते टिकते फक्त नाते टिकवण्यासाठी नाते ओढण्यात काही अर्थ नाही वेळेचं निर्णय नाही घेतला तर आयुष्य भर पश्चताप नको "


"म्हणजे तुम्ही दोघे वेगळे होणार आणि सात जन्माच्या गाठी "


आमच्या नशिबी नाही आम्ही ब्रेकअप करतो असे म्हणून दोघेही उठून निघून गेले राघव हताश पाहत विचार करू लागला कि एवढे प्रेम कसे आटू शकते "


दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये स्पर्धा जिंकल्याबद्ल सगळ्याचे अभिनंदन करण्यात आले खास करून प्रिन्सिपॉल सरांनी ब्रेकअप ग्रुप ला बोलवून त्याचे अभिनंदन केले सगळेच जण शाबासकी मिळवून खूप खुश होते पण अंकित ने पहिले कि प्रियांका अजून हि उदास आहे नक्कीच काहीतरी कारण आहे हे अंकितच्या लक्षात आले जसे ते प्रिन्सिपॉल सरांच्या केबिन मधून बाहेर पडले त्याने प्रियांका चा हात पकडला व सरळ कॅन्टीन मध्ये घेऊन आला दोघे हि समोर समोर बसले अंकित ने प्रियांका कडे पाहत विचारले 


"प्रिया काय झालं एव्हडी उदास का आहेस हल्ली मी पाहत आहे कि तू खूप उदास असतेस पहिली मला वाटले होते नाटकाचे टेन्शन असेल पण काल तर आपण जिंकलो पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकला नाही काय झालं प्रिया काही प्रॉब्लेम आहे का घरी "?


असे विचारताच तिचे भरलेले डोळे पाहून "प्रिया का रडतेस तू सांग ना मी आहे ना बोल मला एवढे परके नको करुस "?


"अंकी तू माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार "?


"काय हे काय विचारतेस तू मला आणि तुला असे का वाटले कि मी दूर जाईन आणि मुळात हे शक्य आहे का"?


"पण अशी वेळ आली तर "?


"एक मिनिट मुळात हे तू मनात का आणलेस काय झालं नक्कीच काहीतरी कारण असल्याशिवाय तू असे काही बोलणार नाही "


"अंकी आपण नाटक केले त्यात आपला ब्रेकअप झाला तशीच वेळ आपल्या खऱ्या आयुष्यात आली तर "


"अरे देवा आता माझ्या लक्षात आले जे नाटकात झाले तेच आपल्या बरोबर होईल ह्याची भीती वाटत आहे प्रिया काय सांगू तुला अग ते एक नाटक होत "


"पण त्याचे हि कॉलेज प्रेम होते आणि काळानुसार ते बदले "


"प्रिया आपण त्या नाटकात फक्त अभिनय केला आणि एक कलाकार म्हटल्यावर कुठल्या हि भमिकेला न्याय देणे हे एका कलाकाराचे काम असते आणि आपण तेच केले म्हणून तर ट्रॉफी आपल्याला मिळाली आणि तुला काय वाटत आपलं प्रेम एवढे कमजोर आहे का कि काळानुसार बदलेल वेडाबाई इतके दिवस हा वेडा विचार मनात तू ठेऊन घेतला होतास काय म्हणावं तरी म्हणतो एवढे आपण जिंकलो तरी एक आनंदची रेख सुद्धा दिसली नाही आणि आपण काही वेडे नाही आहोत एकमेकांना समजून घेत आहोत तसेच पुढे घेऊ उगीच नसता विचार करतेस आता तरी पटलं माझं म्हण "


"हो "


"मग आता नॉर्मल हो प्रियांका आणि अंकित प्रियांकित कधीही वेगळे होणार नाही कळले आता हसून दाखव "


असे म्हणताच प्रियांका च्या चेहऱ्यावर हसू उमटले ते पाहून 


"एव्हडी सुंदर दिसतेस तू हसताना आणि उगीच वेड्या सारखी वागत होतीस वेडाबाई आता तरी शहाणी झालीस ना" 


हे ऐकताच अंकितला पाहत प्रियांका म्हणाली "एवढे दिवस मी तुला सांगितले नाही कारण नाटकाचे टेन्शन होते म्हणून पण आता आता तुझ्याबरोबर बोलून बरे वाटले"


"मग काहीपण प्रिया तू पण ना चल जाऊ दे आईस क्रीम घेऊन येतो तू आईस क्रीम खाताना लहान मुलाप्रमाणे खातेस "


"म्हणजे तू मला "


"तस नव्हे बरे वाटते पाहताना येतो मी" असे म्हणून अंकित आईस क्रीम आण्यासाठी गेला 


आणि प्रियांका मनोमन देवाला प्रार्थना केली "देवा आमची जोडी कायम राहू दे "

कॉलेज चा परिसर गजबजून गेला होता आज निरोप सभारंभ होता अंकितच्या ग्रुप ने लवकर यायचे ठरवले होते अंकित ने मस्त पैकी सूट घातला होता त्यात तो अधिकच सुंदर दिसत होता त्याच्या ग्रुपचे सगळे जमले होते पण प्रियांका चा आणि तिच्या दोन मैत्रिणीचा अजून पत्ता नव्हता अंकित हि सारखा घड्याळात पाहत होता एवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या मुली कडे गेली मोकळे केस आणि साडी नेसलेली ती मुलगी आपली प्रियाचं आहे हे पाहून तो मनातल्या मनात हसला प्रिया येता येता म्हणाली 


"सॉरी हा आम्हाला उशीर झाला आम्ही ना तिथे फोटो काढत होतो मस्त फोटो येतो ना मीरा "


"हो ना प्रिया "


त्यात त्याच्या ग्रुप चा गौरव म्हणाला "म्हणजे आम्हाला तुम्ही विसरलात ग्रुप ग्रुप म्हणतात आणि आमचं सोड प्रिया तू अंकिताला विसरलीस" हे ऐकताच प्रिया ने लगेच अंकितचा हात पकडत एक दम फिल्मी स्टाईल ने म्हणाली "अंकितला विसरणे शक्य आहे का"? ह्यावर सगळे हसले आणि कॉलेज च्या हॉल मध्ये कार्यक्रम होता तिथे गेले कार्यक्रम संपला आणि ग्रुप ने ठरवलेल्या ठिकाणी फिरण्यास गेले खूप फोटो कॅमेरात बंद झाले आणि गप्पा गोष्टी सुरु झाल्या मधेच अंकित ने प्रियांकाचा हात पकडत तिला त्या घोळक्या पासून जरा दूर नेले हे पाहता प्रियांका म्हणाली "काय झालं अंकित असा का मधेच उठून आणलेस "?


"काही नाही मला तुझ्याशी एकांतात बोलायचे होते "


"बरं बोल "


"प्रिया आज तू खूप सुंदर दिसतेस "


"धन्यवाद पुढे "


"प्रिया पहा ना कधीच तीन वर्ष उलटी आता आपण कॅन्टीन मध्ये येऊन कॉफी पीत गप्पा मारू शकणार नाही एवढेच काय आपलं भेटणे सुद्धा कमी होणार "


अंकितला रोखत प्रिया म्हणाली "म्हणजे "?


"प्रिया कॉलेज मध्ये असताना आपण सोबत होतो आता पुढे नोकरी एकाच ठिकाणी थोडीच मिळणार प्रत्येक क्षण खूप आठवेल तुझे बोलणे रागावणे काळजी घेणे असे म्हणत असताना अंकितच्या डोळ्यात पाणी साचलेले प्रियांका ने पहिले ती त्याला पाहत म्हणाली 


"अंकी वेड्या रडतोस काय आपले कॉलेज संपले म्हणून आपण भेटणार नाही का आपण दररोज भेटू तुला मला भेटावेसे वाटले तर सरळ घरी ये ना "


हे ऐकताच हसत हसत अंकित म्हणाला "हो ना मी विसरलो आणि काही वर्षांनी तर आपण सोबतच असू फक्त नोकरी मिळू दे चांगली येतो कि नाही बघ तुझ्या घरी तुझा हात मागायला आणि मला माहित आहे तुझे आई बाबा मला नाही म्हणणार नाही "


"एव्हडा विश्वास "?


"हो नक्कीच आहे मला पाहत राहा फिल्मी स्टाईल ने बँड बाजा बारात घेऊन येणार "


त्याचे हे बोलणे ऐकून हसत हसत प्रियांका म्हणाली "हो नक्की पाहीन पण अंकित अजून आपली परीक्षा झाली नाही निकाल हि नाही लागला तुला नोकरी नाही लागली आणि तू स्वप्ने पाहिलीस "


"मग माझं सगळं ठरलेले आहे आपला सुखी संसार प्रियांका अंकित देशमुख मस्त वाटत ना ऐकायला "


"हो खूप वाटत चल आता निघूया उशीर होईल असे म्हणून दोघेही ग्रुप ला जॉईन झाले तसे ग्रुप चे सगळे त्यांना म्हणून लागले 


"काय रे एवढे सीक्रेट काय बोलायचे होते तू प्रियंकाला घेऊन गेलास "


"जाऊ दे आता तर कॉलेज हि संपले आता आम्हला लग्नाची तयारी करायला हवी "हे म्हणताच सगळे हसू लागले आणि प्रियांका आणि अंकित आपल्या भावी आयुष्यात डोकावले 


दोन वर्षानंतर .........


संध्यकाळची ती वेळ प्रियांका कॅफे मध्ये बसून घड्याळात पाहत म्हणाली" कुठे राहिला हा पाच मिनिटात पोहचतो असे सांगितले पण अजून पत्ता नाही फोन हि उचलत नाही "


एवढ्यात अंकित ख्रुचीवर बसत म्हणाला "सॉरी उशीर झाला "


नाराज होत प्रियांका म्हणाली "काय हे अंकी कुठे राहिला होतास "


"अग सॉरी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो "


"ओके उशीर झाला म्हणून प्रॉब्लेम नाही तू फोन हि उचलत नव्हता म्हणून काळजी वाटली "


"हो फोन सायलेंट वर होता "


"बरं रिलॅक्स हो "


"हो "असे म्हणत अंकित ने वेटर ला कॉफी ची ऑर्डर दिली आणि गप्पा सुरु झाल्या ते दोघे संध्यकाळी दररोज भेटायचे पण मध्येच पण गप्पा करताना असे वाटायचे जणू हे खूप वर्षांनी भेटले असतील गप्पा रंगात आल्या होत्या मधेच प्रियांका ने अंकिताला विचारले 


"काय आठवत का तू म्हणाला होतास कि नोकरी पक्की झाली कि माझ्या घरी हात मागण्यासाठी येशील म्हणून "


"हो हो लक्षात आहे म्हणजे सकाळी तेच लक्षात ठेऊन मी ऑफिसला जातो डोन्ट वरी ह्या चार पाच दिवसात प्रोमोशन ची घोषणा होणार आहे पुढच्या आठवड्यात येतोच कि नाही बघ "


"नाही मला वाटले कि तू विसरलास कि काय "?


"शक्य आहे का प्रिया "


"काय सांगू शकत नाही काळानुसार प्रेम बदलू शकते ब्रेकअप नाटका सारखं "


"काय हे तुला आता का जाणवले काहीही बोलतेस तू प्रिया असा मी कधी वागलो कि तुला अशी जाणीव होईल "


"अरे हो हो रागवतोस कशाला मी मस्करी केली माझा पूर्ण विश्वास आहे माझा अंकित कधीच बदलणार नाही 


"मग तुझा विश्वास मी असा तोडू शकतो का" असे म्हणून दोघेही हसू लागले 


अंकितच्या आई ने पहिले कि प्रियांका डोक्यावर हात ठेऊन रडत आहे त्या तिथे गेल्या प्रियंकाचे रडणे ऐकून त्या म्हणाल्या "का रडतेस "?


ह्यावर प्रियांका ने रडत रडत म्हटले "काकू आपला अंकित "?


चेहऱ्यावर वेगळेच भाव आणत अंकितची आई म्हणाली "सगळं तुझ्यामुळे झालं "


हे ऐकून प्रियांका ने पटकन म्हटले" काकू "?


"हो तुझ्यामुळे पायगुण वेगैरे लोक म्हणतात पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता पण आता पटलं तुझ्या वाईट पायगुणामुळेच अंकितचा संसार व्ह्याच्या आधी उध्वस्त झाला "


"काकू हे तुम्ही काय बोलता अहो अंकितची अशी अवस्था पाहून मी हि बिथरली आहे "


प्रियांका च्या आई ने अंकितच्या आई कडे पाहत म्हटले "अहो हे काय बोलता ती कशी जबाबदार आहे आणि तिची हि परिस्थिती समजून घ्या "


अंकितच्या आई ने रागात म्हटले "काय आहे ना हे तुमच्यावर बेतले नाही म्हणून तुम्ही सहज बोलू शकता "


तेव्हड्यात ग्रुप मधले सगळेच अंकितच्या आई कडे पाहत विचारू लागले "पण काकू यात प्रियांका चा दोष काय आहे "?


"तिचा पायगुण चांगला नाही म्हणून तर सगळे झाले पत्रिका वैगेरे कुठे पहिली प्रेम करतात म्हणून हो म्हणालो आणि त्याचीच फळ आज भोगत आहोत "


प्रियांका कडे पाहत अंकितची आई म्हणाली "आता एक काम कर इथून निघून जा माझ्या मुलावर तुझी नजर हि पडायला नको एकुलते एक बाळ माझं आज तुझ्यामुळे असे निशब्द पडले आहे "


ह्यावर अंकितचे बाबा आईला रोखत म्हणाले "अग पण त्यात तिची काय चूक तिला थोडेच माहिती होते कि कसे होणार आहे तू पहिली शांत हो उगीच काहीही बोलू नकोस " 


"मला जे सांगायचे मी सांगितले आणि तुम्हला जर तुमचा मुलगा बरा झालेला हवा असेल तर हिला इथून निघायला सांगा"हे ऐकून प्रियांकाच्या बाबांनी प्रियांका चा हात धरला आणि तिला घेऊन जाणार एवढ्यात 


अंकित चे बाबा प्रियांका समोर येत म्हणाले "बाळा आज तुझ्यावर काय बेतले आहे ह्याची मला जाणीव आहे प्रियांका मनाला लावून घेऊ नकोस एकुलता एक मुलगा आईच्या प्रेमापोटी ती सगळे बोलत आहे"


ह्यावर प्रियांका काहीच बोलली नाही आपले डोळे पुसत आई बाबा बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर पडली तिच्या मागोमाग तिचा ग्रुप हि आला ते सगळे प्रियांका काही सांगणार होतेच तेव्हा प्रियांकाच्या बाबांनी गाडी सुरु केली वाटेत एक हि शब्द तिच्या तोंडून फुटला नाही घरी पोहोचताच तिनी आपल्या रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद केला प्रियांका च्या आई वडिलांना हि अंकितच्या आईचे बोलणे आवडले नव्हते 


रोखून ठेवलेले अश्रू नकळत बाहेर आले आणि प्रियांकाच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता आई बाबा धावत दरवाजा कडे गेले आणि दरवाजा उघडण्या साठी आवाज देऊ लागले खूप विनवण्या गेल्यानंतर प्रियांका ने दरवाजा उघडला आणि आई बाबा ने तिला मिठी मारली तशी ती रडत रडत म्हणाली "आई बाबा माझा खरंच पायगुण चांगला नाही का "?


आई बाबा दोघांनी तिला गोजरात म्हटले "नाही बाळा असे काही नाही तू मनाला लावून घेऊ नकोस "


"पण आई बाबा अंकित "?


"हे बघ आम्ही देवाकडे प्रार्थना करू शकतो त्या व्यतिरिक आपण काहीच करू शकत नाही आणि बाळा तू अंकितला भेटायला जाऊ नकोस "


"पण बाबा "


"बरोबर बोलता तुझे बाबा उगीच तिथे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा आपण इथूनच तो बरा होऊ दे ह्यसाठी प्रार्थना करू "


ह्यावर ती काहीच न बोलता गप्प बसली 


दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली रात्र भर विचाराच्या चक्रात प्रियांका अडकलेल्या मुळे तिची झोप झाली नव्हती त्यामुळे ती खूप अशक्त जाणवत होती तरी ती तयारी करून बाहेर जाण्यास निघाली तेव्हा आई ने विचारले 


"प्रिया आज नको जाऊ ऑफिस ला खूप अशक्त जाणवत आहेस सांग त्यांना नाही येत म्हणून जीव पेक्षा काम महत्वाचे नाही "


"नाही आई मी ऑफिस ला नाही हॉस्पिटल मध्ये "


हे ऐकून आई चकित होत म्हणाली "काय हॉस्पिटल मध्ये अग पण "


त्या दोघांचे बोलणे बाबाच्या कानावर पडले तसे ते प्रियंकाला रोखत म्हणाले "हे बघ प्रिया तू तिथे जाऊ नकॊस उगीच अपमान करू घेण्यापेक्षा न गेले बरे तसे हि तुझे तिथे जाणे काहीच फायद्याचे नाही "


"बाबा माझ्या अपमान पेक्षा मला अंकित खूप मोठा आहे मी त्याला फक्त पाहून येते तेवढे मनाला समाधान त्याचा तो वेदनेने भरलेला चेहरा डोळ्यासमोर सारखा येत आहे "


"पण बाळा तिथे त्याची आई असेल तर त्या तुला काही बोल्याशिवाय राहणार नाही "


"आई काय म्हणतील त्या अपमान करतील ना मग करू दे मी अंकित साठी काहीही ऐकायला तयार आहे "


हे ऐकून बाबा समजावत म्हणाले "अग पण तू त्याला भेटून काय करणार तुला तो ओळखत हि नाही "


"बाबा तो जरी मला ओळखत नसला तरी मी त्याला ओळखते ना आम्ही चेहऱ्याने परके झालो तरी कुठे तरी मनाने एकत्र येऊ शकतो "


"तरी पण मला वाटत कि तू तिथे जाऊ नये "


"आई बाबा तुम्ही चिंता करू नका मी त्याला फक्त लांबून पाहीन आणि परत येईन" असे म्हणून प्रियांका बाहेर पडली 


ती गेल्यावर आई काळजीत म्हणाली "काय होणार हो तिथे मला तर आताच धडकी भरली "


"काळजी करू नकोस सगळं ठीक होईल "


"पण अंकितच्या आईने परत अपमान केला तर "?


"काय सांगू मला असे वाटते कि प्रिया त्या सर्वांची तयारी करून केली आहे आणि तिथे न जाता तिचे मन हि लागणार नाही पाहू काय होत दे "


"होय हो सगळं कसे मंगलमय घडत होते आणि हे विपरीत होऊन बसले देवाने हे सर्व लवकरात लवकर सुधारावे हीच प्रार्थना "


"होय आपण हेच करू शकतो आपल्या प्रियाचे सुखाचे दिवस लवकर परतू दे "


सकाळची वेळ होती हॉस्पिटल च्या बाकड्यावर अंकितची आई डोळ्यावर पदर लावून रडत होती हे पाहून त्याचे बाबा तिला म्हणाले


"किती रडशील "?


"रडू नको तर काय करू "?


"हे बघ मला तुझं दुःख कळत पण आपण काहीही करू शकत नाही " 


"तेच तर आपलं दुदैव आहे स्वतःचा पोटचा गोळा आपल्याला विसरला ह्या सारखे दुःख काय असेल "


"हे बघ डॉक्टर आपले प्रयत्न करत आहेत तो लवकर बरा होईल पहिल्यासारखा आणि मग किती त्या गप्पा मार "


"तुम्हला काय वाटत मला माहित नाही कि अंकित ची स्मरणशक्ती कधी येईल ह्या बद्दल डॉक्टर सुद्धा काही सांगू शकत नाही "


"हे बघ शांत हो आज आपल्यावर विचार सुद्धा कधी केला नव्हता असा प्रसंग आला आहे आणि त्याला आपल्याला धीट पणे सामोरे जायला हवे "


"अहो पण काय सांगू'माझे कान आई हा शब्द ऐकण्यासाठी किती व्याकुळ झाले आहे पण तो साधा पाहून हसत हि नाही ते पाहून मन किती बधिर झाले आहे "


"हे बघ त्यात त्याची चूक नाही तो आपल्याला ओळखतच नाही मग तो तसाच वागणार ना आपल्याला त्याला आपलेसे करायला हवे आपल्याला त्याला परत एकदा हृदयात जन्म दयावा लागेल तरच तो आपले हे नाते स्वीकारेल "


त्याचे हे बोलणे ग्रुप येता येता ऐकत होता त्यातला एकजण म्हणाला "बरोबर बोलात काका "


"अरे तुम्ही सगळे जण "?


"हो काका आम्ही ठरवले आहे कि एक तास दररोज त्याच्याबरोबर घालवावा जेणेकरून त्याला काही आठवेल पण काका प्रियांका असती तर अधिक मदत झाली असती "


तिचे नाव ऐकताच अंकितची आई रागात म्हणाली "नाव नको घेऊस तिचे आणि तिला इथे बोलवू पण नको "


"पण काकू अंकित प्रियांका शी खूप जवळ होता आणि त्याचे असे काही क्षण असतील जे आठवून कदाचित त्याची स्मरणशक्ती परत येईल "


"होता ना मग आता नाही आहे "


"पण काकू तुम्ही ह्या सर्वाला प्रियांका ला उगीच जबाबदार मानत आहे त्या बिचारीची ह्यात काहीच चूक नाही "


"राघव आज माझ्यावर काय कोसळले आहे ह्याची जाणीव तुला असेल तर त्या मुलीचे नाव माझ्या पुढ्यात घेऊ नकोस "


वातावरण तापणार हे पाहून राघव ने नमते घेत म्हणाला "सॉरी काकू नाही घेणार "असे म्हणून ते आत गेले 


अंकितचे बाबा काही औषधें आण्यांसाठी गेले होते अचानक त्याची नजर प्रियांका वर पडली त्यांनी प्रियंकाला हाक मारली तशी तिने वळून पहिले 


"काका तुम्ही "?


"तू इथे काय करतेस "


"काका अंकित ला पाहायला आली आहे "


काकांनी बाचकत विचारले "काय पण काल झालं ते होऊन सुद्धा "?


"काका काही झालं तरी मी अंकितला विसरू शकत नाही "


"पण तुला तर माहित आहे कि काकू "


"मी त्याचे बोलणे ऐकायला तयार आहे मला फक्त एकदा अंकितला भेटू द्या" तिच्या डोळ्यात तरले ले अश्रू पाहून काका म्हणाले 


"हे बघ प्रिया मला तुझ्या भावना कळतात पण एक आईचे मन हि मी नाही दुखवू शकत "


"म्हणजे काका "?


"माफ कर प्रियांका तू इथून निघून जा "


"पण काका मला फक्त एकदा पाहू द्या "


प्रियांका समजावत काका म्हणाले "अंकितच्या आई ने सगळ्यांना बजवाले आहे कि कोणी तुला इथे बोलवू नये आणि मीच तुला तिथे घेऊन गेलो तर ती आतून तुटेल "


"काका तुम्हला हि वाटते कि माझा पायगुण चांगला नाही "


"नाही नाही बाळा असं समजू हि नकोस मी नाही मानत ह्या सर्व गोष्टी पण आताची परिस्थिती पाहत अंकितच्या आईचे मन दुखावणे मनाला पटत नाही ती मनाने चांगली आहे पण आईच्या प्रेमापोटी ती तुला खूप काही बोलून गेली जे मला हि नाही आवडले "


"आणि माझे मन काका मी हि त्याच्यावर प्रेम करते माझं हि मन आतून त्याला पाहण्यासाठी व्याकुळ झाले आहे "


"बाळा तू समजुदार आहेस त्यामुळे सांगतो निघून जा नको उगीच तुम्हा दोघाना हि त्रास होईल "


"अच्छा म्हणजे तुम्हाला हि वाटते कि मी निघून जावे तर ठीक आहे येते मी "असे म्हणत डोळे पुसत प्रियांका बाहेर पडली प्रियांका चे आई बाबा दोघेही प्रियांका हॉस्पिटल मध्ये गेल्यापासून चिंतेत होते एवढ्यात दरवाजा ची बेल वाजली प्रियांका च्या आई ने दरवाजा उघडला समोर रडवेल्या अवस्थेत प्रियांका ला पाहून 


"काय झालं प्रिया तू लगेच परत आलीस "?


"आई "म्हणून तिनी आईला घट्ट मिठी मारली 


आईने तिला घरात आणले आणि सोफ्यावर बसवले दोन्ही बाजुंनी आई बाबा बसले तसे तिनी सगळा प्रकार सांगितला त्यावर बाबा म्हणाले 


"मी सांगितले होते तुला तिथे जाऊ नकोस पण जाऊ दे तू मनाला लावून घेऊ नकोस "


बाबांकडे पाहत प्रियांका म्हणाली "पण बाबा एव्हडी मी वाईट आहे का"? 


"हे बघ बाळा सध्या अशी परिस्थिती आहे कि आपण शांत राहण्याखेरीस काहीच बोलू नाही शकत आणि करू हि शकत नाही "


"पण आई मला एकदा भेटू दिले असते तर "?


"प्रिया तुझ्या भावना मला कळतात पण आपण नाही काही करू शकत अंकित ची स्मरणशक्ती केली नसती तर त्याने स्वतः तुला बोलवले असते पण इथे सगळे वेगळे आहे त्यामुळे गप्प बसण्याखेरीस आपल्याकडे काहीच पर्याय नाही "


हे ऐकून प्रियांका उठली आणि गप्प खोलीत निघून गेली आई तिला रोखणार तर बाबा म्हणाले "थोडा वेळ तिला एकटे बसू दे "


प्रियांका खोलीत आली तिला पटकन तिचा चेहरा आरश्यात दिसला तो पाहून ती म्हणाली "बघ अंकित काय अवस्था झाली आहे तुझ्या प्रियाची तू नेहमी माझ्या स्माईल वर कंमेंट द्याच्या ना आज ती स्माईल कुठे हरवली आहे तुझ्यासारखी अंकित का मला विसरलास तू आज तूला डोळे भरून पाहायचे होते पण नाही पाहू शकले कधी येशील तू परत कधी होईल सगळं काही ठीक काहीच कळत नाही काय स्वप्ने पाहिलेली पण आरश्याच्या तुकड्यासारखी तुटून गेली परत कधी येतील ते क्षण "


एवढ्यात तिच्या मोबाईल ची रिंग झाली तिनी पहिला तर मीरा चा व्हिडिओ कॉल होता तिनी लगेच उचला तर सगळ्या ग्रुप ने मिळून तिला कॉल केला होता त्या सर्वाना पाहतच ती रडू लागली तिनी झालेला प्रकार सांगितला तसे ते सर्व तिला समजावू लागले त्यांना पण झालेला प्रकार आवडला नव्हता तिनी अंकिताला भेटण्याची इच्छा सांगितली तसे मीरा म्हणाली


 "सॉरी प्रिया पण काकू बाहेरच असतात आणि त्यांनी आम्हला बजावले आहे "हे ऐकून ती गप्प राहिली ते पाहत सौरभ म्हणाला "तरी पण तू काळजी करू नकोस प्रिया आम्ही काहीही करून तुझी आणि अंकित ची भेट घडवणारच "


"पण कशी सौरभ अंकितची आई "?


तिचा तो चिंतीत चेहरा पाहून सगळे म्हणाले " ते तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही पाहतो काहीतरी "असे म्हणून फोन ठेवला आणि प्रियांका आपली आणि अंकित ची कशी भेट होईल ह्या विचारात पडली संध्यकाळची वेळ होती अंकित चे आई बाबा अंकित असलेल्या रूम बाहेर बाकड्यावर बसले होते एवढ्यात त्यांना अंकित चे डॉक्टर आणि कोणाला घेऊन येताना दिसले "या डॉक्टर या" असे म्हणून अंकितचे डॉक्टर आणि एका डॉक्टरला घेऊन आत गेले हे पाहत अंकितची आई म्हणाली "काय झालं हो नवीन डॉक्टर का आलेत काही प्रॉब्लेम तर नाही ना "?


डॉक्टर आत गेले आणि २ मिनिटातच ते एकटेच बाहेर आले हे पाहता अंकितच्या आई ने त्यांना विचारले 


"काय झालं डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का "?


तसे डॉक्टर हसत हसत म्हणाले "नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आता डॉक्टर आल्या ना त्या सायकेट्रिस्ट आहेत त्या अंकित शी बोलतील त्याच्या बोलण्यातून काही अंकितला आठवले तर आठवू शकते म्हणून एक प्रयत्न पण त्या बाहेर येई पर्यत तुम्ही आत जाऊ नका "असे म्हणून डॉक्टर निघून गेले


अशीच १५ मिनिटे गेली अंकित ची आई घड्याळावर नजर टाकत म्हणाली "काय हो काय चालले असेल आत अंकितला काही आठवले असेल का "?


अंकित चे बाबा निराश होत म्हणाले "हे बघ मी काही सांगू शकत नाही पाहू काय होईल ते "


अर्धा तासांनी त्या डॉक्टर बाहेर आल्या अंकित चे बाबा काही विचारणार आधी त्या डॉक्टर लगबगीने निघून गेल्या हे पाहता अंकित ची आई म्हणाली "अश्या काय त्या डॉक्टर काही विचारले तर न सांगता निघून गेल्या "


"जाऊ दे आपण अंकित च्या डॉक्टर ना विचारू" असे बाबांनी सांगितले तसे ती गप्प झाली व अंकितच्या डॉक्टर ची वाट पाहू लागले ते रुटीन चेकअप ला गेले होते ते आले तसे दोघे हि डॉक्टर च्या केबिन कडे वळले डॉक्टर ची परवानगी घेऊन ते आत आले डॉक्टर त्यांना पाहत म्हणाले "तुम्ही आणि इथे "?


" हो डॉक्टर माफ करा तुम्हला डिस्टर्ब करतो पण एक गोष्ट जाणून घ्याची होती त्या डॉक्टर काय म्हणाल्या डॉक्टर अर्धा तास बोलत होत्या म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी कळले असेल "?


ह्यावर डॉक्टर एक मिनिटे गप्प राहिले आणि मग पाहत म्हणाले "हे बघा त्या काही एमेरजनीसी मुळे गडबडीत होत्या त्यामुळे त्याची आणि माझी भेट झाली नाही पण त्यांनी फोन करून सांगते असा निरोप दिला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल "


अंकितचे बाबांनी हळूच विचारले "डॉक्टर फोन नंबर मिळू शकेल का त्या डॉक्टर चा आम्ही फोन करून विचारतो "


"नाही नाही माझ्या विनंती मुळे त्या इथे आल्या होत्या त्यामुळे त्यांना उगीच तुम्ही त्रास देऊ नका मी पाहतो काय ते "


डॉक्टर चे बोलणे ऐकून निराश होऊन आई बाबा केबिन मधून बाहेर पडले आणि येऊन बाकड्यावर बसले 


"काय माहित पडले असेल हो त्यांना एकदा कळले असते तर बरे झाले असते "


"काय सांगू मी मला काही कळत नाही पाहू डॉक्टर काय सांगतात "


तिथे रूम मध्ये बेड वर झोपून अंकित विचार करत होता "देवा मला काहीच कसे आठवत नाही ती दोन माणसे माझी एव्हडी काळजी घेतात ते माझे आई बाबा आहेत असे सांगतात पण मला काहीच आठवत नाही दररोज न चुकता १ तास घालवणारा माझा ग्रुप म्हणून सांगतात ते पण मला अनोळखी वाटतात एव्हडी जीव लावणारी माणसे आहेत पण मी त्यांना ओळखत हि नाही आणि मघाशी त्या डॉक्टर माझ्याशी भरभरून बोलत होत्या जसे काही त्या मला पहिली पासून ओळखत आहेत त्यांनी मला एकेरी हाक मारली आणि त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून काहीच कळत नाही काय समजावे "प्रियांका बाहेरून घरी आल्यापासून आपल्या रूम मध्ये होती अर्ध्या तास गेला तरी ती बाहेर येईना हे पाहून आई ने बाबांना विचारले "काय हो प्रिया आल्यापासून आतच आहे घरी आल्यावर हि तिचा चेहरा काही ठीक नव्हता पाहून येऊ का "?


"हो आवाज दे "


आई ने आवाज दिला पण प्रियांका ने काही उत्तर दिले नाही म्हणून आई तिच्या रूम कडे गेली दरवाजा बंद होता परत एकदा हाक मारली तसे काही वेळाने दरवाजा उघडला तिचा रडवेला चेहरा पाहून 


"काय झालं प्रिया "?


प्रिया ने आपले डोळे पुसले आणि ती आई बरोबर हॉल मध्ये आली बाबा पण तिचा असा अवतार पाहून चिंतेत म्हणाले "बाळा काय झालं असा का रडवेला चेहरा झाला आहे आणि तू आज ऑफिस मध्ये नाहीतर कुठे गेली होतीस "


ती नी त्या दोघांकडे पहिले तसे आई म्हणाली "बाळा समजू शकते तुला अंकितला भेटायला मिळत नाही म्हणून तू निराश आहेस पण आपण काय करू शकतो त्याच्या आई ने आधीच रोखले आहे आणि आता तर त्याचे बाबा हि तुला भेटण्यापासून दूर करत आहे "


हे ऐकून आपले डोळे पुसत प्रियांका म्हणाली "नाही आई मी अंकित ला भेटून आले आहे "


"काय पण कधी ?आणि कसे ?आणि त्याच्या आईने तुला काही म्हटले नाही ना "?


"नाही आई त्यांना कोणालाच माहित नाही मी तिथे गेले ते "


हे ऐकून बाबा चकित होऊन विचारू लागले "म्हणजे त्याचे तेथे आई बाबा नव्हते "


"होते बाबा "


"मग तू कशी गेलीस "


आई बाबा सगळी माझ्या ग्रुप ची कमाल ग्रुप ने डॉक्टरना सगळे सांगितले आणि डॉक्टरांचे पण आभार कि माझ्या भावना त्यांना कळल्या त्यामुळे त्यांनी मला मदत करायचे ठरवले त्याच्या सांगण्यानुसार मी त्याच्या केबिन मध्ये गेले डॉक्टर चा ऍप्रॉन आणि मास्क लावला आणि त्याच्या बरोबर अंकित असेलल्या रूम मध्ये गेले डॉक्टर हि माझ्यासोबत होते अंकित ला त्यानी मी त्याची मैत्रीण आहे अशी ओळख करून ते निघून गेले 


"काय "?


"मग काय म्हणाला तुला ओळखले "?


"नाही बाबा तो मला पाहून हसला आणि गप्प राहिला मी त्याच्याशी मोकळेपणा ने बोलले कॉलेज मधले किस्से सांगितले अर्धा तास त्याच्याशी बोलले पण त्याला काहीच आठवत नव्हते तो फक्त ऐकत होता निघते वेळी फक्त तो मला म्हणाला माफ कर तू माझी मैत्रीण आहेस पण मी तुला ओळखत नाही आणि तू सांगितलेले क्षण हि मला आठवत नाही आई त्याला असे बोलताना मला ना पाहून मन भरून आले माझा अंकित मलाच विसरला अश्रू डोळ्यात रोखून मी लगबगीने बाहेर पडले जेणेकरून त्याचे आई बाबा मला ओळखू नये तो समोर असून सुद्धा अनोळखी होता "असे म्हणून प्रियांका रडू लागली 


"हे बघ बाळा रडू नकोस आठवेल त्याला काळजी करू नकोस "असे म्हणून आईने प्रियांका ची काढली तशी प्रियांका आपल्या रूम मध्ये गेली तसे बाबा गंभीर होत आईला म्हणाले "तू तिची समजूत काढली पण अंकित ला कधी सगळे आठवेल हे आपण ठाम पणे नाही सांगू शकत आणि मला तर एक भीती सतावत आहे ती म्हणजे त्याला काहीच आठवेलच नाही तर "?

सकाळी अकरा ची वेळ अंकित आपल्या रूम मध्ये असा पाहत फिरत होता कि जसे काही तो त्या रूम मध्ये पहिल्यादाच पोहोचला आहे


"काय पाहत आहेस अंकित हे तुझेच घर आहे आणि हि तुझीच रूम हे घे "


"काय "?


"अरे तुझ्या आवडीच्या अळू वड्या केल्या खाऊन तरी पहा "


अंकित ने त्यातली एक वडी उचली ते पाहून आई म्हणाली "अरे एकच काय घेतोस हि डिश घे" 


अंकित ने डिश हातात घेतली आणि एक तुकडा तोंडात टाकत म्हणाला "आई खरंच खूप छान झाली आहे "


हे ऐकून आई आनंदात म्हणाली "हो का मग अजून आणते तुला जर आठवले असते तर एवढ्यात तू किचन मध्ये वासानेच पोहचला असतास पण ठीक आहे मी आणते तुझ्यासाठी "असे म्हणून आई किचन मध्ये गेली 


अंकित ने ती डिश टेबल वर ठेवली आणि एकटक त्या डिशकडे पाहू लागला आई किचन मधून दुसरी डिश घेऊन आली तरी तो एकटक असे पाहत आहे ह्यावर आई ने त्याला हाक दिली तसे त्याने आई कडे पहिले ह्यावर आई त्याला लागली "काय झालं अंकित असा काय पाहत होतास "?


"काही नाही आई ती डिश मला ओळखीची वाटली "


हे ऐकून आई उत्साहित "होत म्हणाली काय ओळखलस तू त्या डिशला तुझी आवडती डिश ती त्याच डिश मध्ये तू काही खात असे म्हणजे तुला सगळे आठवले तर "?


निराश होत अंकित म्हणाला" नाही काही क्षणापुरती मला ती डिश आठवली पण एकटक पाहून आता काही आठवले नाही "


"जाऊ दे अंकित तू शांत हो डोक्याला विचार करून त्रास देऊ नकोस" असे म्हणून आई डोळे पुसत आई रूम च्या बाहेर आली तिचे ते डोळे पुसणे बाबांनी पहिले ते आईला म्हणाले "काय झालं मी तुला किती वेळा सांगितले आहे कि अंकित च्या समोर रडत जाऊ नकोस "


"नाही हो लक्षात आहे माझ्या ते सर्व पण आज झालेच तसे "


"म्हणजे "?


"आई ने डिश संबंधित प्रकार बाबांना सांगितला तसे ते म्हणले "हे बघ जे झालं ते झालं पण त्याच्या समोर रडत जाऊ नकोस आता त्याला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे आपणहुन सगळं आठवलं तर बरच आहे फक्त आपण त्याच्या निगडित वस्तू त्याच्या समोर ठेवू पाहू काय होत ते एवढ्यात बाबाच्या मोबाईल वर राघव चा फोन आला त्यांनी तो उचला आणि ते बोलू लागले आणि म्हणाले "बरं पण काळजी घ्यावी लागेल कि त्याला त्रास होता काम नये "असे म्हणून फोन ठेवला 


राघव ने गाडी स्टार्ट केली गाडी मध्ये सगळेच ग्रुप चे होते हे पाहून अंकित ने राघवला विचारले "आपण कुठे चाललो आहे "?


राघव ने नेहमी प्रमाणे अंकितच्या पाठीवर मारत म्हणला "घाबरू नकोस अंकित आपण अश्या ठिकाणी चाललो आहे जिथे तुला चांगलेच वाटेल" ह्या उत्तरावर अंकित गप्प बसला कारण त्याला आई ने पण सांगितले होते कि तुझा ग्रुप म्हणजे जीव आहे सगळे जण बोलत होते पण अंकित गप्प आणि आणि गाडी येऊन थांबली 


सगळे उतरले अंकित हि उतरला त्याने समोर पहिले तर मोठ्या अक्षरात कॉलेज असे लिहिले होते आणि अचानक त्याला अंकित अशी हाक ऐकू आली त्याने मागे वळून पहिले 


प्रियांका हसत हसत त्याच्या समोर आली ते पाहून अंकित ने तिला विचारले" तू इथे ?तू तीच ना जी मला हॉस्पिटल मध्ये भेटायला आली होतीस "


"हो मी तीच प्रियांका आणि मी हि ह्याच ग्रुप चा हिस्सा आहे" 


तसे सगळे म्हणून लागले "हो अंकित प्रियांका आमच्या ग्रुप चा हिस्सा आहे आणि महत्वाचे म्हणजे तुझ्या खूप जवळची व्यक्ती आहे "


हे ऐकताच अंकित ने तिच्या कडे पाहत म्हटले "जवळची "असे म्हणताच प्रियांका ने अंकित चा हात पकडला आणि गेट उघडून आत गेली अंकित तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मागे सगळेच आत गेले 


प्रियांका त्याला घेऊन कॅन्टीन कडे गेली कॅन्टीन च्या बाहेर बेंच होते त्याला पहात म्हणाली 


"अंकित तुला माहित आहे हा बेंच आपला फेव्हरेट बेंच होता आपण नेहमी ह्याच बेंच वर बसायचो आणि खूप साऱ्या गोष्टी करायचो आपण सोबत घालवलेले अनमोल क्षण म्हणजे हा बेंच आणि अंकित तू मध्ये मध्ये गाणं सुद्धा म्हण्याचा आणि तुझे गाणे ऐकले कि खूप बरे वाटायचे प्रियांका भरभरून बोलत होती आणि तिनी मधेच अंकित कडे पहिले तर तो फक्त तिला पाहत होता त्याचे ते पाहणे पाहून 


प्रियांका म्हणाली "अंकित असा काय पाहतोस चल आपण पुढे जाऊ" असे म्हणून सगळ्यांनी मिळून अंकितला कॉलेज फिरवलं पण अंकित काहीच बोलत नव्हता शेवटी सगळ्यांनी प्रियांका आणि अंकितची न होणारी भेट झाली होती म्हणून एकांत देण्याचे ठरवले आणि त्याच बेंच वर दोघे बसले प्रियांका ने अंकितचा हात हातात पकडला तसा अंकित आपला हात झटकत म्हणाला "प्रियांका हे काय करतेस "?


तसे प्रियांका म्हणाली "अंकित तुला आठवत नसेल पण आपण दोघे एकेमकांवर प्रेम करत होतो माझे अजून हि तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे पण तू विसरला आहेस पण मी तुझ्या आठवण येणाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला माहित आहे कि तो दिवस नक्कीच येईल "


"काय आपण एकमेकांच्या प्रेमात"? 


"हो अंकित दो दिल एक जान म्हणू शकतोस तू असेच आपले नाते आहे "


"मग तू मला भेटायला का आली नाहीस "? 


हा प्रश्न ऐकून प्रियांका ला काय सांगावे कळेना कारण तिला अंकितला सगळे सांगून दुःख द्याचे नव्हते "ते तुझ्या आईला लव्ह मरेज आवडत नाही आणि आपल्या नात्याची बातमी तिला लागली आहे म्हणून मी त्या दिवशी एकदाच आले "


"काय आईला लव्ह मॅरेज आवडत नाही पण का आणि तुला हे कोणी सांगितले "


"अंकित तुझं मला म्हणाला होतास आणि तू हे हि म्हणाला होतास कि आपण आईला पटवू पण आपण आज भेटलो हे आईला सांगू नकोस उगीच तिला त्रास नको "


"एव्हडं सगळं माझ्या आयुष्यात घडले पण मला काहीच कसे आठवत नाही आपण प्रेम होतो तर तुझा चेहरा सुद्धा मला अनोळखी वाटला "


प्रियांका ने अंकितच्या केविलवाण्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हटले "जास्त विचार करू नकोस काळजी घे" आणि तुला मला भेटावसं वाटलं तर राघवला सांग मी येईन तुला भेटायला "असे म्हणून आणि ती निघून गेली 


प्रियंका चे बोलणे ऐकून अंकित भावुक झाला ती निघून गेली तरी तो तिच्याकडे पाहत होता हे राघव च्या लक्षात आले तसे राघव ने अंकितला हाक दिली तसे अंकित राघव जवळ आला बाकी सगळे गाडीत बसले होते राघवला अंकित ने बाहेरच विचारले "राघव मला तुझ्याशी काही बोलायचे आहे "?


"काय रे काय झालं"?


"आपण एकटेच बोललो तर बर होईल सगळ्या समोर नको "


"ओके असे करू आपण या सगळ्यांना त्याच्या गाडी पर्यत पोहचवू आणि मग आपण बोलू "असे म्हणून राघव ने कार चा दरवाजा उघडला आणि गाडी स्टार्ट केली बाकींना सोडून राघव ने एका जागी गाडी पार्क केली आणि अंकित ला पाहत म्हणाला "अंकित बोल काय म्हणत होतास आणि तुला एकट्यात काय बोलायचे आहे तसे ग्रुप पासून लपवण्यासारखं काय आहे असो तुला त्याच्या समोर नाही बोलायचे मग आता बोल "


"राघव मघाशी प्रियांका ची ओळख करून देताना तुम्ही सगळ्यांनी ती माझ्या जवळची आहे असे म्हणालात आणि प्रियांका ने पण मला सांगितले कि तिचे आणि माझे प्रेम होते त्या बेंच वर घडलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल ती बोलत होती पण ती नि सांगितलेली एक हि गोष्ट मला आठवत नाही खरंच आमचं एवढे प्रेम होते "?


राघव ने अंकित कडे पहिले तर तो बैचेन वाटत होता असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात आहे हे त्याला कळले ते पहाता तो त्याला पाहत म्हणाला "अंकित आपण सगळे ग्रुप चे सहा हि जण एकेमकांचे जवळचे आहोत मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुझ्या जवळची ह्या साठी म्हटले कारण प्रियांका तुझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती तुझ्या मनात तिच्या बद्दल कसलीच भावना नाही तू फक्त तिला एक चांगली मैत्रीण म्हणून पाहू शकतो हे तू तिला वारंवार सांगितले पण ती ने कधीच तुझे ऐकले नाही आम्ही पण तिला खूप समजावले कि आपला ग्रुप हा फक्त घनिष्ठ मैत्रीचा असू दे पण तिचे एकच सांगणे अंकित माझं प्रेम स्वीकारेल असे म्हणू नये पण आता तुझ्या स्मरणशक्ती नसल्याचा फायदा ती तुला प्रेमात पाडून घेऊ शकते पण अंकित प्रेम हे दोन बाजूने असायला हवे एकाच बाजूने कसे होईल सो तू हा विचार करू नकोस "


"मग असे आहे तर तिनी माझा हात पकडला तेव्हा तू काहीच का नाही म्हटले आणि तू मला तिच्या बरोबर जाऊ का दिलेस "?


"काय आहे ना ती मुलगी म्हणून खूप चांगली आहे आणि आमच्या ग्रुप ची आहे त्यामुळे तिला टाळणे बरे नाही वाटत आणि आम्ही किती हि सांगितले तरी ती थोडीच ऐकणार आहे त्यामुळे तुझं दूर राहिलास तर बरे होईल "


"हो ते हि बरोबर आहे "


"अरे पण ती असे म्हणत होती कि माझ्या आईला प्रेम वगैरे आवडत नाही आणि आमच्या प्रेमाची भुणभुण घरी लागली आहे म्हणून ती मला भेटायला एकदाच आली आणि ती घरी येऊ शकत नाही "


हे ऐकून मिश्किल हसत राघव म्हणाला "नाही तसे काही नाही एकदा काकूंना तिनी असेच म्हटले तेव्हा काकूंनी तिला तुम्ही मित्र म्हणूनच छान दिसता असे म्हटले होते त्यामुळे ती तुझ्या घरी येत नाही आणि तुझे प्रेमच नाही तर मग भुणभुण कशाला जाऊ दे तू काकूला हि काही विचारू नकोस तिला मैत्रीण मानतोस तेच बरे आहे सोडून दे तो विचार"


अंकितला राघव चे म्हणे पटले असे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवले तसे राघव ने अंकितच्या घरी गाडी वळवली
 प्रियांका अंकित ला भेटून घरी आली ती आज खूप खुश होती काही तास का असेना आज तिनी अंकित बरोबर काही वेळ घालवला होता अंकित चा चेहरा सारखा तिच्या डोळ्यसमोर येत होता तिला कॉलेज चे दिवस आठवले आणि त्या आठवणीत तीच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटले आता तिला उत्सुकता होती अंकित जे मत जाणून घ्याची म्हणून तिनी राघव ला लगेच फोन लावला 


राघव त्याच्या दोघांच्या जवळचा होता कारण ते तिघे पहिली मित्र होते मग ग्रुप तयार झाला होता राघव ने फोन उचला


"राघव पोहोचलास का घरी "?


"हो आता पोहोचलो का काय झालं "?


"थँक्स आज तुझ्यामुळे मला अंकित बरोबर काही वेळ घालवता आला पण त्याला दुदैवाने काहीच आठवत नाही याच दुःख वाटत" 


"प्रिया थँक्स कशासाठी तुमच्या दोघांच्या सुखासाठी मी काहीही करू शकतो आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस तो हे मुद्दाम हुन नाही करत आहे बिचाऱ्याची स्मृती केल्यावर आपण त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवू शकतो "


"काय म्हणत होता अंकित तुला काही म्हणाला का ?मी त्याला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या "


हे ऐकून निराश होत राघव म्हणाला "काही नाही प्रिया त्याला काही आठवतच नाही मग त्याला गोष्टी सांगून काही उपयोग नाही "


"म्हणजे त्याने तुला विचारले नाही "?


"नाही प्रिया आपण त्याला ओळखतो पण तो नाही त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा करणे बरोबर नाही "


"बरोबर आहे तुझे आज जर माझा अंकित असता तर भरभरून बोलला असता पण आज भेटला तो कोणी दुसराच होता "


"हे बघ प्रिया निराश होऊ नकोस आपल्याला त्याला वेळ द्याला हवा उगीच त्याला काही गोष्टी सांगून त्रास होण्यापेक्षा जर त्याला स्वतःजर काही आठवले तर बरे होईल "


"हो बरोबर आहे तुझे त्याच्यावर काय बेतत असेल त्यालाच माहित आपण सगळे त्याला आपले मानतो पण त्याला तर आपण अनोळखीच आहोत देवा माझ्या अंकितला सगळं आठवू दे परत पहिल्या सारखे होऊ दे" 


हे ऐकून राघव धीर देत म्हणाला "टेन्शन घेऊ नको प्रिया सगळं ठीक होईल भगवान के घर देर है अंधेर नही


"दोन वर्षा नंतर .........."तुम्हला काय वाटत कि ती ऐकेल ......"?


"न ऐकून काय करणार काही मार्ग आहे का ?"


"पण मला नाही वाटत ती काही ऐकेल म्हणून "


हे ऐकून प्रियांका च्या बाबांनी आई कडे पाहत विचारले "म्हणजे आपण तिला तसेच राहू द्याचे "?


"तसे नव्हे पण आपण तिच्या मनाविरुद्ध काही करू शकत नाही ना "?


"मग काय तिचे भविष्य काय ?अजून आपण वाट किती पाहणार आहोत दोन वर्ष उलटून गेली अजून अंकितला काहीच आठवत नाही आहे आणि पुढे आठवेल ह्याची हि खात्री नाही ती वेड्या सारखी वागते म्हणून आपण हि त्याला खत पाणी घालणे योग्य नाही "


"पण तिला समजावणार कोण "?


"हे आपल्यालाच करावे लागणार "


"पण ती ऐकेल का तुम्हला तर माहीत आहे अंकित हा तिच्यासाठी एक हळवा विषय आहे "


"हे बघ ती नी आपले उभे आयुष्य त्याच्या आठवणीत काढणे बरे आहे कि कोणा दुसऱ्याबरोबर आपला सुखाचा संसार करणे "


"तुमचे म्हणे मला पटते हो तसे हि अंकित ला सगळे आठवले तरी ची आई तयार होणार नाही पहिलीच पायगुण बरा नाही मबोलून मोकळ्या झाल्या आहे "


"म्हणून सांगतो आपण प्रियाला समजवून सांगूया अजून किती वेळ आणि वर्ष वाट पाहणार माझ्या नजरेत एक चांगले स्थळ आहे जर सगळे मनासारखे झाले तर ह्याच वर्षी बार उडवून देऊ "


"होय बरोबर बोलता तुम्ही काहीच झाले तरी आपल्या पोरीच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तो आपल्याच सोडवावा लागेल ""


का रे दुरावा असा तू केलास 


समोर असून सुद्धा माझ्यासाठी परका झालास 


विचार हि नव्हता केला असा हि दिवस येईल 


वर्ष उलटून हि तुला माझी आठवणच नाही राहील ....."


एवढ्यात प्रियांकाला हाक ऐकू आली आणि ती नि आपली डायरी बंद केली


आई बाबांना समोर पाहताच "आई बाबा तुम्ही "?


"हो प्रिया काही करत होतीस "?


"काही नाही सहज डायरी लिहीत होते पण तुम्ही दोघे इथे "?


बाबांनी आपला चष्मा व्यवस्थित करत म्हणाले "बाळा आम्हाला तुझ्याशी काही बोलायचे आहे "


"काय असे काय बोलायचे आहे जे तुम्ही इथे आलात मला बाहेर बोलवले असते "


"बस सांगतो "असे सांगून आई बाबा दोघेही बसले आणि प्रियांका समोर बसली 


"प्रिया दोन वर्ष उलटून गेली आहे अंकित ला काहीच आठवत नाही त्याला कधी काही आठवेल ह्याची खात्री नाही दोन वर्ष आम्ही तुझ्यासाठी गप्प बसलो पण आता नाही प्रिया आता काही तरी निर्णय घ्याव्याच लागेल "


प्रिया ने आई बाबा कडे पाहत म्हटले "मला माहित होते कधी ना कधी हा विषय येईलच आणि तो आला "


"मग तू काय ठरवलस "?


"आई मी अंकितशी लग्न करेन "


"काय अग पण त्याला काही आठवत नाही आणि तो तुला कसा स्वीकारेल "


"कोणा दुसऱ्या अनोळखी बरोबर लग्न करण्यापेक्षा मी अंकित बरोबर लग्न करेन तो मला विसरला असेल मी नाही आणि हळू हळू तो हि स्वीकारेल "


"पण त्याचे आई वडील तयार होतील "


"माहित नाही पण मी त्याच्याशी लग्न करणार "


"काय हा वेडे पणा प्रिया पण तो तर तयार नको का आणि त्याच्या आई ने तर पहिलीच पायगुण वरून तुला बोलले आहे आणि ती तयार होतील मला असे वाटते कि तू निर्णय बदलावा काही चमत्कार होईल आणि त्याला सगळे आठवेल हि खोटी आशा मनात न बाळगता तू वस्तुस्थिती पाहून विचार कर आम्हला हि कळते कि जे आम्ही सांगत आहोत ते सोपे नाही पण जे आपले होऊ शकत नाही ते आपले होण्यासाठी कशाला उगीच अट्ठाहास "


प्रियांका ने बाबांचे बोलणे गप्प ऐकून घेतले आणि ती त्यांना पाहत म्हणाली "आई बाबा माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका मी जे ठरवले आहे ते चांगलेच आहे आणि त्यातच मी सुखी असेन "


"काय ठरवलंस प्रिया "?


आई मी लग्न करेन तर अंकितशीच तो मला विसरला असेल मी त्याला नाही आणि त्याच्याबरोबर आयुष्भर तडजोड करायला मी तयार आहे आणि राहिला प्रश्न त्याच्या आईचा तर मी बोलेन त्याच्याशी अंकित साठी मी सगळं काही ऐकायला तयार आहे "असे म्हणून प्रिया उठून निघून गेली आई बाबानी तिच्याकडे पाहत आपल्या डोक्यला हात लावला 


"टींग टॉंग" दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघडला 


"तू आणि इथे कशाला आली आहेस "?


" काकू मला तुमच्याशी थोडं बोलायचे आहे "


"काय बोलायचे आहे तुला आणि ते हि माझ्याशी "


"काकू आपण आत बसून बोलू शकतो का "?


रागाच्या भरात अंकितची आई म्हणाली "तो हक्क तू केव्हाच गमावलास आणि मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही त्यामुळे तू आल्या पाऊली परत जा तुझ्यामुळे झालेला आम्हला त्रास खूप आहे आणखी नको "


हे ऐकून निराश होत प्रियांका काकू समोर हात जोडत म्हणाली "काकू माझं फक्त एकदा ऐकून घ्या मग तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे "


"पण मला तुझे काहीच ऐकून घ्याचे नाही" 


दोघांचे बोलणे अंकितच्या कानावर पडले कोणी तरीबाहेर आले आणि आई मोठ्याने बोलत आहे हे ऐकून तो पाहण्यासाठी बाहेर आला आई पाठमोरी उभी होती तिला पाहत अंकितने विचारले 


"आई कोण आले "?


आईला प्रियांका ची नजर सुद्धा अंकित वर पडू द्याची नव्हती म्हणून ती म्हणाली "कोणी नाही रे "


प्रियांका दरवाजवरच उभी होती ती नि अंकितचा आवाज ऐकला आणि त्याला हाक दिली ओळखीचा आवाज वाटला म्हणून तो पुढे आला 


"प्रियांका तू"? 


अंकित ने प्रियांका ला ओळखले हे पाहून चकित होत आईने अंकितला विचारले "अंकित तू तिला ओळखतॊस "?


तो काही बोलण्या आधीच प्रियांका ने अंकितला पाहत म्हटले "अंकित मला तुझ्याशी बोलायचे आहे "?


"नाही अंकित तुझ्याशी काही बोलणार नाही येथून जा "


डोळ्यात पाणी आणून प्रियांका ने अंकित कडे पाहत म्हटले "पिल्झ अंकित "


तसे त्याने आईला रोखत म्हटले "आई थांब काय म्हणते ते पाहू तरी ये आत ये "असे म्हणत अंकित ने प्रियांकाला आत बोलवले तसे ती आत आली 


तसे आई ने अंकितला विचारले" तू हिला ओळखतॊस म्हणजे तुला सगळे आठवले "


"नाही आई आम्ही हल्लीच सगळे ग्रुप वाले भेटलो होतो तेव्हा प्रियांका हि आली होती तेव्हा ओळख झाली "


"काय म्हणजे राघव माझ्याशी खोटे बोलला "


प्रियांका ने अंकित कडे पाहत विचारले "अंकित मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तू माझ्याशी लग्न करशील ना "?


"काय अंकित आणि लग्न हे होणे अशक्य आहे "


"पण काकू तुम्हला तर माहित आहे ना कि मी आणि अंकित एकमेकांवर किती प्रेम करतो "


हे ऐकून अंकित ची आई म्हणाली "हे बघ तुझे आणि अंकितचे लग्न होणे अशक्य आहे" 


"पण का काकू ?त्याला काही आठवत नसेल पण मला तरी आठवते ना आणि मी त्याच्याबरोबर त्याला सगळे आठवण होईपर्यत तडजोड करायला तयार आहे "


हे ऐकून अंकित ने प्रियंकाला चकित होत विचारले "एक मिनिट प्रियांका माझ्यासाठी तू तडजोड का करशील "?


"कारण मी तुझ्यावर प्रेम करते आणि लग्न करेन तर तुझ्याशीच अंकित "


'पण मी तयार असेन तर ना "?


"म्हणजे अंकित "


"एकतर्फी प्रेमातून संसार नाही होऊ शकत प्रियांका "?


"एकतर्फी प्रेम कोणाचे "?


"तुझे माझ्यावर असलेले प्रेम एकतर्फी आहे "


"कोण सांगत अंकित आपण दोघे हि एकमेकांवर प्रेम करत होतो मनात अजून हि तुझ्याबद्दल तेवढेच प्रेम आहे "


"हे बघ प्रियांका माझी स्मृती गेली म्हणून तू काहीही बोलशील आणि मी ते खरे समजेन असे नाही होऊ शकत "


"अंकित हे तू काय बोलतोस अरे आपण लग्न करणार होतो तुझे असिसिडेन्ट झाले आणि तुझी स्मृती गेली नाहीतर आज आपले लग्न झाले असते आपण दोघांनी घालवलेले प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यसमोर असे उभे आहेत आपण केलेले एकमेकांना मेसेज गिफ्ट्स सगळे काही आपल्या प्रेमाबद्दल बोलत आहे काकू तुम्ही तरी सांगा ना तुम्हला तर सगळे माहित आहे "


तिचे ते हळवे बोलणे ऐकून अंकितच्या आई म्हणाल्या" हे बघ प्रियांका त्या असिसिडेन्ट मधून माझा अंकित वाचला हेच माझ्यासाठी मोठे आहे आणि आता आम्ही कसे जगतो ते आमचे आम्हला माहित आहे आम्ही आमच्या अंकित ची जबाबदारी घेण्यसाठी गंभीर आहोत त्यामुळे या पुढे तुझी पाऊले आमच्या घरी न लागलेलीच बरी ये तू "


प्रियांका ने रडवलेल्या चेहऱ्याने अंकित कडे पाहत या"अंकित "अशी हाक मारली 


त्यावर अंकित तिला पाहत म्हणाला "प्रियांका कशाला वेडेपणा करतेस तू माझ्यावर जीव ओतून प्रेम करत अशील आणि करत हि आहेस हे दिसते पण मला तुझ्यासाठी प्रेमाच्या काहीच भावना नाही मी तुला एक चांगली मैत्रीण म्हणून पाहत आहे त्यामुळे हा वेडेपणा सोड आणि तुझ्या आयुष्याचा विचार कर तू एक चांगली मुलगी आहेस असा वेडेपणा करून तू स्वतःला तर त्रास करून घेणारच पण तुझ्या आई बाबा चे काय त्यांना पण तुझ्या अश्या वागण्याचा त्रास होत असेल "


हे ऐकून प्रियांका स्तब्ध झाली तिच्या तोंडून एक शब्द हि बाहेर येईना ती गुपचूप घराबाहेर पडली प्रियांका च्या आई बाबांना तिथे काहीतरी होणार ह्याची खबर होतीच म्हणून ते प्रियांका च्या मागोमाग आले होते अंकितच्या घराजवळच गाडी ठेऊन ते प्रियांका ची वाट पाहत होते एवढ्यात प्रियांका येताना दिसली तसे दोघे हि पुढे आले प्रियांका ची अवस्था पाहून त्यांनी तिला काही विचारले नाही प्रियांका त्याच्याबरोबर घरी निघून गेली घरी आल्या आल्या तिने स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतले आई बाबा बाहेर अस्वस्थ होऊन तिला समजावत होते दरवाजा उघडण्यास सांगत होते पण आतून काहीच आवाज ना उत्तर येत होते आई बाबा दोघेही दरवाजा बाहेर बसले त्याच्या हुंद्क्याचा आवाज ऐकून कि काय दरवाजा उघडला 


प्रियांका ने दरवाजा उघडला आणि सरळ आई बाबांना मिठी मारून रडू लागली तिचे ते रडणे पाहून आई बाबांना हि आपले अश्रू थांबवता आले नाही रडत रडत तिनी सगळा प्रकार आई बाबांना सांगितला तसे आई बाबा तिला धीर देत म्हणाले "आम्ही तुला सांगत होतो पण सोड सोडून दे तो विचार अंकितच्या तोंडूनच ऐकले ना मग आता आणखी कशाला त्रास करून घेतेस जाऊ दे देवाने तुझ्या नशिबात आणखी कोणीतरी लिहिला असेल "


"पण आई मला एक कळत नाही अंकितला कोणी सांगितले कि आमचे प्रेम एकतर्फी आहे "


"त्याच्या आईनेच सांगितले असेल तसे हि पायगुण हे एक कारण आहेच त्याच्याकडे आणि अंकितला काही आठवत नाही "


"पण आई आमची भेट झाली हे त्याच्या आईला माहित नव्हते "


"जाऊ दे तू सोडून ते तो विचार उगीच विचार करून डोक्याला कशाला त्रास देते "


"पण बाबा त्याला कोणीतरी खोटे सांगितले आणि त्याला काहीच आठवत नाही म्हटल्यावर मग तो विश्वास ठेवणारच ना "?


"हे बघ जे झालं ते आपण बदलू नाही शकत खोटे खरे देवाला माहित तू हा विषय सोडून दे "


"पण बाबा त्याला खरे कळायला नको का त्याची फसवणूक होत आहे "


"पण प्रिया त्याने स्पष्ट सांगितले आहे मग तू आणखी खरे सांगून काय करणार आहेस त्याच्या आईला सर्व माहित असताना त्या पण गप्प बसल्या आणि त्यांनी पण तुला पूर्वीच दूर राहायला सांगितले मग कशाला अट्टहास करतेस "


"नाही बाबा अंकितला सगळं खरे कळेच पाहिजे "


"अगं पण त्याला काही आठवत नाही त्यात त्याच्या आईचा विरोध कसे शक्य आहे आणि तो एकच मुलगा नाही आहे ह्या जगात "


"आई पण माझ्यासाठी तो सगळ्यात एक असेल तर "


"हे बघ प्रिया भावनिक होऊ नकोस सत्य स्वीकार आणि सत्य हेच आहे कि तुला अंकित ला विसरावे लागेल कठीण आहे पण तुला परिस्थितीला सामोरे जावे लागेल आमच्या पाहण्यात एक चांगले स्थळ आले आहे आणि आम्हाला वाटते कि ते उचित आहे "


"बाबा मला थोडा वेळ हवा आहे "असे म्हणून प्रियांका उठून निघून गेलीअंकित ची आई अंकित च्या रूम मध्ये आली तिनी अंकित ला हाक मारली पण अंकित ने काहीच उत्तर दिले नाही हे पाहता "काय झालं अंकित एव्हडा कसला विचार करत आहेस "?


"काही नाही आई प्रियांका चा विचार करत होतो तिचा तो रडवलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येत आहे 


"हे बघ तू विचार करू नकोस तुला त्रास होईल 


"पण आई ती एवढे माझ्यावर कसे प्रेम करू शकते पण मला तिच्या बद्दल काहीच भावना वाटत नाही आणि काही आठवत हि नाही खरंच आई तिच्या म्हण्याप्रमाणे मी हि तिच्यावर प्रेम करत होतो का "?


ह्यावर आई एकदम गप्पच झाली तिची ती शांतता पाहून ती काही म्हण्याआधीच अंकित म्हणाला "पण मला राघव खोटे का सांगेल कि ती माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती "


हे ऐकून आईने चकित होत विचारले "काय हे तुला राघव ने सांगितले "


"हो आई त्या दिवशी मी त्याच्याबरोबर गेलो होतो तेव्हा प्रियांका पण होती ती मला सगळे कॉलेज फिरुन सोबत घालवलेल्या क्षणाची आठवण करू देत होती पण मला काहीच आठवले नाही म्हणून मी राघवला विचारले तर तो म्हणाला कि ती माझ्यावर एकतर्फी प्रेम करते आणि तिला असे वाटते कि कधीतरी मी तिचा स्वीकार करेल तुला हि ती असे काहीतरी म्हणाली होती आणि तू हि तिला एक मैत्रीण म्हणूनच शोभते असे सांगितले असे तो म्हणत होता "


"हे सगळं तुला राघव ने सांगितले "?


"हो का आई "?


"काही नाही असेच विचारले "


"आई ती असा वेडेपणा का करते कसे मी सांगू तिला कि माझे तिच्यावर प्रेम नाही "


"हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस आणि तिचा विचार हि सोडून दे आज तुझ्या तोंडुन ऐकून तिला तिचे उत्तर मिळाले असेल असे म्हणून आई बाहेर गेली 


प्रियांका ने आपल्या ग्रुप ला मिळून अंकितच्या घरी घडलेला प्रकार सांगितला ते ऐकून मीरा रागात म्हणाली "एकतर्फी कोणी सांगितले असे आम्ही साक्षीदार आहोत तुमच्या प्रेमाचे अंकित विसरला म्हणून आम्ही विसरलो नाही आणि मुळात अंकित च्या आईला सर्व माहित असून सुद्धा त्या गप्प बसल्या म्हणजे तुमचा राग आहे म्हणजे तुम्ही माणुसकी हि विसराल ह्याला काय अर्थ आहे एका वेळी ह्यांनीच प्रियाला सून म्हणून स्वीकारले आणि आज त्याचे प्रेमच नाकारतात म्हणजे काय "?


त्या तसेच करणार पायगुण वाईट आहे ना मग त्या कशाला सांगतील त्यांना तर प्रियांका अंकित पासून दूर गेलेली हवीच त्यांना सांगून किंवा समजावून काही फायदा नाही पण मला असे वाटते कि आपण सगळ्यानी जाऊन अंकितला समजवावे त्याच्या तरी डोक्यात थोडा तरी प्रकाश पडेल "


प्रियांका सर्वांची आपल्यासाठी तळमळ पाहून म्हणाली "काही फायदा होणार नाही सुमित तो आज असा बोलत होता जसे मी खरेच त्याच्यावर एकतर्फी प्रेम करते पण मला एक कळत नाही त्याच्या मनावर असे कोणी कोरले कि माझे प्रेम एकतर्फी आहे "


"राघव तू बोल ना रे काहीतरी आपणच आता प्रियाला मदत करायला हवी "


"काय बोलू सुमित मला काहीच कळत नाही"


"अरे पण आपल्या काहीतरी करायला हवे ना अंकितला एकतर्फी वाटले तरी खरी गोष्ट आपल्याला माहित आहे आपण असे करूया आपण अंकितच्या घरी जाऊ आणि त्याला सगळं खरे सांगू पाहू तरी तो काय म्हणतो ते त्यावर "


"तुला वाटत तेवढे सोपे आहे ते "


"म्हणजे "?


"आपण लाख सांगितले तरी अंकितच्या आई चे प्रियांका बद्दल चे मत आपण बदलू नाही शकत "


"अरे पण आपल्याला त्याच्या आईशी काय घेणेदेणे आपण अंकितशी बोलू ना आपल्याला अंकित आणि प्रियांका एकत्र आलेले हवे आहेत "


"सुमित अंकित सध्या अश्या परिस्थिती आहे जिथे त्याला आपण किती हि सांगितले तरी ते पटणार नाही "


"पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ""मीरा आपण लाख सांगू कि अंकित तू प्रियांका वर प्रेम करत होता पण त्याला प्रियांका बद्दल तश्या भावना नाहीत मग 'तो आपल्या बोलण्यावर का विश्वास ठेवेल आणि त्याच्या आईला प्रियांका नको म्हटल्यावर त्या हि तिच्या विरोधात बोलतील आणि सध्या तरी तो त्याच्याबरोबर आहे म्हटल्यावर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल "


"जाऊ द्या तुम्ही नका त्रास करू माझ्यासाठी आमचे प्रेम अधुरेच राहिले "असे म्हणून प्रियांका निघून गेली ते पाहून मीरा म्हणाली "खरंच कोणी हे अंकितला खोटे सांगितले तो माझ्या हाती लागू दे नाही त्याला प्रेमाचा पाढा वाचविला तर नाव मीरा नाही सांगणार" 


"कंट्रोल मीरा आपल्याकडे फक्त पाहण्याखेरीस काहीच नाही" 


"राघव हे तू बोलतोस "


"हो परिस्थिती नुसार बोलावे लागते" असे म्हणून राघव तिथून निघून गेला 


"आई बाबा मी तुम्हला त्या दिवशीच सांगितले कि मला ह्या सर्व गोष्टी साठी वेळ हवा मग परत तो विषय का काढता "


"हे बघ प्रिया बाळा किती दिवस टाळशील आणि तुला ह्या सर्वाला कधी ना कधी सामोरे जावे लागणार आहे मग आता का नको आणि तसे हि खूप उशीर होण्यापेक्षा आताच काही तो निर्णय घेतलेला बरा "


"आई अंकित शिवाय मी कोणत्याच मुलाचा विचार नाही करू शकत अंकीत माझ्यासाठी काय आहे हे तुम्हा दोघांना हि माहित आहे मग परत परत तोच विषय का "


"मग काय करायचं ठरवलेस आयुष्य भर अंकित ची स्मरणशक्ती येण्याची वाट पाहणार आहेस का आणि त्याने तुला स्प्ष्ट सांगितले कि तुझे एकतर्फी प्रेम आहे म्हणून मग कशाला त्यात गुंतत जात आहेस "


"पण आई हे त्याला कोणीतरी सांगितले आहे माझा अंकित असा नाही आहे त्याच्या ह्या परिस्थीचा फायदा घेतला गेला आहे "


हे ऐकून बाबा प्रियांका कडे पाहत म्हणाले "हो तुझे म्हणे बरोबर आहे त्याच्या ह्या परिस्थीचा फायदा घेतला गेला पण कोणी कशासाठी का उत्तर नाही आहे आपल्याकडे आणि तीच उत्तरे तू शोधत बसणार आहेस का मग पुढे काय तुझं भविष्य काय ?हे बघ आमच्या एकुलत्या एक लेकीला आम्ही सुखी पाहू इच्छितो हि आमची चूक आहे का सांग ना प्रिया तुझ्या मनातल्या भावना आम्हाला कळत नाही असे वाटते तुला पण आणि जी गोष्टीची आपल्याला खात्रीच नाही त्या साठी थांबणे हा मूर्खपणा नाही का आमचे ऐक एक चांगले स्थळ आले आहे तू त्याच्याशी बोल मुलगा खूप चांगला आहे आणि आपले नवीन आयुष्य सुरु कर "


आईने हि बाबाच्या सुरात सूर मिळवत म्हणाली "हे बघ बाळा असा वेडेपणा करू नकोस एकदा तू संसारात रूळलीस कि तुला ह्या सर्वाचा विसर पडेल आणि अंकितची स्मृती परत आली तरी तो परिस्थिती समजून घेईल तेव्हडा तो समजुदार आहे बाळा आम्हला तुला असे नाही पाहवत आमचा पण विचार कर आम्हला पण तुझे डोळे भरून सुख पाहू दे तू जर अशी च दुःख गाळत राहिलीस त्याचे दुःख आम्हला किती होईल तुझ्या वाटेला ते सुख यावे हीच आमची इच्छा आहे "असे म्हणून आईने आपल्या पदराने आपले डोळे पुसले 


प्रियांका ने आई बाबा कडे पहिले तर त्याचे डोळे भरलेले होते ती काही न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेली तिचे असं गप्प राहणे आई बाबांना चिंतेत पाडत होते 


दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया चे आई बाबा घराबाहेर पडले गाडी येऊन गेट पाशी उभी राहिली त्यांनी बेल वाजवली दरवाजा उघडण्यात आला 


"तुम्ही "?


"हो थोडे बोलायचे होते" 


"मला माहीत आहे तुम्हला काय बोलायचे आहे ते त्यामुळे मी तुम्हला इथेच सांगते प्रियांका चे आणि अंकितचे लग्न होऊ शकत नाही "


"अहो पण तुम्हला माहित आहे ते एकमेकांवर प्रेम करत होते आणि तुम्ही सुद्धा त्याच्या लग्नाला होकार दिला होता मग आता त्यांना दूर करून काय फायदा राहू दे त्याना सुखात "


"हो दिला होता पण त्याचे परिमाण पाहत आहे "


"अहो पण आजच्या जमान्यात पायगुण वैगेरे कोण घेऊन बसते आणि मुळात तुम्ही प्रियांका ला विनाकारण दोष देत आहात "


"काय ना माझा एकुलता एक मुलगा मला ओळखत नसला तरी माझ्यासमोर आहे ना हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे त्यामुळे मी परत त्याला धोक्यात घालू शकत नाही या तुम्ही "


हे ऐकून प्रियांका चे आई बाबा आलेल्या पाऊली परत फिरले 

"काय प्रियांका चे आई बाबा आले होते ?त्या दिवशी प्रियांका आली आणि आज ते पण का "?


"होय हो प्रियांका चे आणि अंकितचे लग्न करा असे म्हणत होते ते दोघे एकत्र सुखात राहतील असे काही बोलत होते "


"मग तू काय सांगितले आणि अंकित त्यांना भेटला "


"नाही मी दरवाजवरूच त्यांना पाठवले त्यांना स्पष्ट सांगितले कि ते अशक्य आहे "


"अरे देवा काय होऊन बसले एवढ्यात सगळे आलबेल असते पण होते ते नव्हते होऊन बसले "


"तेच ना आज आपला मुलगा आपल्यासमोर आहे पण वागताना अनोळखी सारखा वागतो ह्याचे खूप वाईट वाटते हो "


"म्हणजे प्रियंकाच्या नाही तर त्याच्या आई बाबांना सुद्धा प्रियांका चे लग्न अंकित शी करायचे आहे "


"पण ते होऊ शकत नाही त्या दिवशी ती येऊन गेली आम्ही एकलो नाही म्हणून आई बाबा ना पाठवले असेल "


ह्यावर अंकितचे बाबा गप्प राहिले हे पाहून काय हो "काय झालं तुम्ही एकदम गप्प का झालात "?


"मी विचार करतो जर अंकितला सगळे आठवले आणि त्याला हि आपल्या नकाराची गोष्ट कळली तर मग तो आपल्यावर रागवेल त्या पेक्षा मला असे वाटते कि आपण त्या दोघांचे लग्न करून दिले तर "


"काय हे तुम्ही काय बोलता त्या दोघांचे लग्न अहो फक्त लग्न ठरवलं तर आपल्या अंकित वर किती आघात झाला मला परत विषाची परीक्षा नको अंकितला सर्व आठवलं तर त्याचा राग सोसण्याची माझी तयारी आहे "


"पण तुला वाटत नाही तू खूप पुरोगामी विचार करतेस असिसिडेन्ट होण्यात आणि प्रियांका चा पायगुण नाही पटत "


"तुम्हाला काय वाटत मला प्रियांका शी कठोर वागायला आवडते ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि आपल्या अंकितवर तिचे खूप प्रेम आहे पण चंद्राचे रूप पौर्णिमेला जसे सुंदर दिसते तसे अमावसेला नाही आणि मी जो निर्णय घेतला आहे तो आपल्या अंकितच्या हिताचा आहे "


"अगं पण जे झाले ते परत होईल असे तुला का वाटते आणि त्याचे प्रेम दूर करून आम्हला काय मिळणार "?


"हे बघा सध्या तरी प्रेम फक्त तिचे आहे अंकितला तिच्याविषयी काहीच वाटत नाही आणि अंकित बरोबर जे झालं ते आयुष्भर पाहण्यासाठी खूप आहे आणि काय व्हावे असे तुम्हला वाटते आणि तुम्हला नाही पटत पायगुण वगैरे पण मला हि पटत नव्हत्या पण अनुभवावरून अश्या गोष्टी नाकारू नाही शकत आणि एक आई म्हणून मी माझ्या मुलाच्या आयुष्याशी नाही खेळू शकत प्रियांका हा विषय आपल्य्साठी बंद "असे म्हणून अंकित ची आई उठून गेली 


सकाळची वेळ प्रियांका चे आई बाबा प्रियांका बद्दल बोलत बसले होते प्रियांका च्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडीने ते दोघेही अस्वस्थ झाले होते एवढ्यात प्रियांका च्या बाबाचा फोन वाजला त्यांनी तो उचला 


"हॅलो हा बरे "काही मिनिटे बोलून त्यांनी फोन ठेवला 


प्रियांका ची आई त्यांना पाहत म्हणाली "कोणाचा फोन होता? आणि काय सांगतो असे तुम्ही म्हणालात "?


"आपल्याला स्थळाविषयी सांगितले होते त्याचा फोन होता कधी पाहण्याचा कार्यक्रम करूया विचारत होते "


"अरे देवा आता काय करायचे "?


"काय करणार आपण त्यांना बांधून नाही ठेवू शकत काहीतरी सांगावेच लागेल ना त्यासाठी आपल्याला प्रियाला तयार करावे लागणार "


"पण कसे तुम्हला तर माहित आहे "


"ते माहित नाही पण हे स्थळ खूप चांगले आहे आणि मुख्य म्हणजे मुलगा आपल्या प्रियाला समजून घेऊ शकतो "


"पण प्रियाला कसे सांगणार "?


"आपण आपल्या परीने हि खूप प्रयत्न केले पण अंकितचे आणि तिचे लग्न अशक्य आहे आता प्रियाला दुसरा मार्ग पकडावा लागेल "


"होय तुम्ही खरे बोलता आपल्याला तिला समजावेच लागेल "


संध्यकाळी प्रिया ऑफिस मधून आली फ्रेश होऊन चहा चा कप घेऊन हॉल मध्ये बसली आई बाबा एकमेकांकडे पाहून नजरेत खुणा करताना तिने पहिल्या त्या दोघांना पाहत ती म्हणाली" काय झालं काही बोलायचे आहे का "?


"हो प्रिया त्या स्थळ वाल्याचा फोन आला होता कधी पाहण्याचा कार्यक्रम करूया असे विचारत होते "


"बाबा "


"हे बघ प्रिया आता परत मला वेळ हवा असे म्हणू नको "


"पण आई "?


"बाळा तुला काय वाटत आम्ही परत परत हा विषय का काढतो आम्हाला तुझ्या भावना कळत नाही का कळतात आम्हाला पण वाटते कि तुझे आणि अंकितचे लग्न व्हावे पण बाळा ते आता अशक्यच नाही अवघड वाटत आहे आम्ही आमच्या परीने हि प्रयत्न केलें त्यामुळे दुसरा मार्ग निवडलेला बरा मुलगा चांगला आहे एकदा भेटून घे मग पाहू पुढे "


प्रिया ने आई वडिलांकडे पहिले तर त्याच्या डोळ्यात तिच्या उत्तराची वाट पाहताना ते तिला दिसले तिनी डोळे बंद केले आणि काही मिनिटे तशीच बसली ...

प्रिया ने डोळे उघडले आणि आई बाबा कडे पहिले त्याच्या केविलवाण्या नजरा तिला खूप काही सांगून जात होत्या तिनी त्यांना पाहत म्हटले "बाबा मी त्या मुलाला भेटण्यास तयार आहे "


हे ऐकताच त्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले खुश होत दोघे हि म्हणाले "खरंच प्रिया तू तयार आहेस आम्ही स्वप्न तर पाहत नाही ना "


"नाही हे स्वपन नाही सत्य आहे" असे म्हणून प्रिया रूम मध्ये गेली तिचा कंठ दाटून आला होता रूम मध्ये येताच तो बांध फुटला आणि ती रडू लागली तिनी होकार मनापासून न देता फक्त आई वडिलांसाठी दिला होता


दुसऱ्या दिवशी भेटण्याचा कार्यक्रम ठरला प्रिया आणि आई बाबा सांगितलेल्या ठिकाणी पोहचले ओळख पाळख होऊन दोघाना एकांतात बोलण्यास सांगितले दोघेही समोरासमोर बसले होते काही मिनिटे शांततेत गेली तसे तो म्हणाला


"मी राजीव देवधर मल्टि नॅशनल कंपनी मध्ये मॅनेजर आहे मला हे पाहण्याचे कार्यक्रम नाही आवडत पण घराच्यां समोर काही बोलता येत नाही मला असे वाटते कि तुला हि हे आवडत नाही पण बी रिलॅक्स मला एक मित्र म्हणून समज आणि माझ्याशी बोल तरच आपल्यात बोलणे होऊ शकते "


त्याचे हे समजुतीचे बोल ऐकून प्रिया म्हणाली "नाही इट्स ओके "


"ओके हे बघ माझ्या काही अपेक्षा वगैरे नाही मला माझी पार्टनर माझी मैत्रीण म्हणून खूप आवडेल जर आपल्या आवडी निवडी जमत असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही मला ना हिंडायला फार आवडत सेविंग करावी पण मन मारून जगू नये हा माझा लायफ चा फंडा आहे तुला आवडत फिरायला ?


तरीही प्रियाचे गप्प राहणे पाहून" काय झालं तू काहीच बोलत नाही आहेस असं तर नाही ना कि तुझ्या मनात कोणी दुसरा "?


हे ऐकून प्रिया थोडी बेचैन झाली हे पाहत "हे बघ घाबरू नकोस तसे असेल तर मला सांग मला काही प्रॉब्लेम नाही नकार द्याचे माझयावर आहे तसे हि मला एवढ्यात लग्न नाही करायचे "


प्रिया काही बोलण्यात एवढ्यात थांबली आणि काही नाही म्हणून परत गप्प बसली


"काय झालं तू काही म्हणत होतीस "?


"काही नाही "


"तू नेहमी एव्हडी गप्प असतेस कि आज तुला अवघड वाटतंय माझ्याशी बोलायला "?


"नाही मला बोलायला आवडत पण मोजक्याच आपल्या लोकांशी ""


"ओ म्हणजे मी परका आहे म्हणून तू बोलत नाहीस पण इट्स ओके हळू हळू होईल सगळं ठीक "


"म्हणजे "?


"म्हणजे प्रियांका मला तू आवडलीस "


"काय पण मी काहीच नाही बोलले नाही तरी पण "


"इट्स ओके नेहमी बोलण्यानेच माणूस ओळखता येत नाही चेहऱ्यवरून हि माणसाची पारख करता येते आणि तू खूप चांगली मुलगी आहे हेच दिसते माझं मत मी सांगितले आता तुझ्यावर आहे " असे म्हणून राजीव तिथून उठून गेला प्रिया च्या उत्तराची वाट पहातो असे म्हणून त्यांच्या घरच्यांनी निरोप घेतला


वाटेत आई बाबा राजीव विषयी बोलत होते त्यांना तर मुलगा आवडला होता पण त्याच्या ह्या चर्चेत प्रिया मात्र गप्प होती प्रियाने होकार कळवावा असे त्यांना मनापासून वाटत होते पण काय असेल प्रियाचे उत्तर

"हॅलो राघव "


"हा प्रिया बोल "


राघव च्या कानावर प्रियाने आजच्या कार्यकर्माविषयी घातले


तसा तो गंभीर होत म्हणाला "मग तू काय ठरवलेस "?


"काय बोलू मला काहीच कळत नाही अंकितला सर्व आठवले असते तर किती बरे झाले असते आणि त्यात त्याला कोणी सांगितले कि मी एकतर्फी प्रेम करते त्यामुळे अधिक घोळ होऊन बसला नाहीतर मी त्याला समजावले असते पण राघव हे त्याला कोणी सांगितले असेल कोणाला आम्ही एकत्र आलेले नको आहेत काहीच समजत नाही "


निराश होत राघव म्हणाला "माहित नाही प्रिया "


"राघव काही सुचत नाही रे आई बाबा माझ्या उत्तराकडे डोळे लावून बसले आहेत आणि राजीव हि तसा चांगला मुलगा आहे पहिल्याच भेटीत आपलेपणा वाटला अंकित सारखा हळवा स्वभाव आहे त्याचा नाव ठेवण्यासारखे तर त्याच्यात काहीच नाही "


"मग तू काय ठरवलेस राजीव ला होकार देणार "?


"हे तू काय बोलतोस राघव अंकित शिवाय मी कोणाचा विचार नाही करू शकत अंकित माझ्यासाठी काय आहे हे तुला माहित आहे तो मला ओळखत नाही ह्याच्यापेक्षा तो मला त्याच्यावर एकतर्फी प्रेम करते हे म्हणतो हे खूप मनाला लागले आहे समोर असून सुद्धा किती दूर आहे तो माझ्या किती स्वप्ने पहिली होती ती काचेच्या तुकड्या सारखी फुटून गेली मी अंकितसाठी आजन्म वाट पाहायला तयार आहे पण आई बाबा मला तसे राहू देणार नाही आणि ते माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत "


"मग आता काय करणार "?


"माहित नाही पण राजीव ला होकार देऊन मी त्याला फसवू नाही शकणार कारण मी त्याला अंकितची जागा नाही देऊ शकत "


"मग तू काय करणार आहेस "?


"हे बघ प्रिया उगीच काही मनात वाईट आणूं नकोस हा पाहू काय होत ते "


"काय पाहणार आहेस राघव अंकित शिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे "असे म्हणून प्रिया ने फोन ठेवला


"नाही प्रिया मी असे होऊ देणार नाही" असे म्हणून राघव घराबाहेर पडला "काय कुठे घेऊन जातोस तू अंकितला"?


"काळजी करू नका काकू आज मीराचा वाढदिवस आहे आणि तिनी आम्हला डिनर साठी बोलवले आहे तसे अंकितला लक्षात असते पण आता ह्या अवस्थे मुळे त्याला काही आठवत नाही आणि त्याला आठवत नाही म्हणून आम्ही त्याला ग्रुप मधून वेगळे नाही ठेवू शकत "


हे ऐकून आई हळू आवाजात विचारू लागली "पण ती तिथे येणार ना "?


"काळजी करू नका प्रिया बिसिनेस टूर ला गेली आहे त्यामुळे ती नाही येणार"


"मग ठीक आहे मला तिची नजर माझ्या अंकितवर पडू द्याची नाही "


"पण काकू जे झालं त्यात मला नाही वाटत प्रियाचा काही दोष होता "


"काय तुला नाही वाटत नाहीच वाटणार कारण तू तिचा मित्र आहेस पण जे मी अंकित समोर असून एक आई म्हूणन भोगत आहे ना ते खूप अवघड आहे "


"मान्य आहे काकू पण जर अंकितला सर्व आठवलं तर तो तर हे ऐकणार नाही "


"नाही ऐकला तर मी त्याला कसे रोखायचे हे मला माहीत आहे "


"पण काकू अंकित प्रियांका शिवाय खुश राहू शकत "


"का असे कुठे लिहिले आहे कोणा एका साठी जगणे नाही थांबत "


दोघेही बाहेर पडले वाटेत मीराच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घेऊ म्हणून अंकित मागे लागला पण आपल्या ग्रुप मध्ये गिफ्ट देत नाही असे राघव ने अंकितला समजावले आणि गाडी येऊन एका ठिकाणी थांबली अंकित ने पहिले तर ते एका पार्क मध्ये आले होते त्याने राघव ला पाहत विचारले "इथे डिनर आहे "?


"हो चल" असे म्हणून राघव अंकित ला घेऊन पार्क च्या शेवटच्या टोकाला आला तिथे उभे राहून सारे शहर दिसत असे आणि रात्र होत आल्याने तो परिसर प्रकाशात जगमगून गेला होता हे पाहून अंकित म्हणाला "वाह राघव मस्त आहे हा परिसर "


"हो ना मग बस "दोघेही तिथे असलेल्या सोफ्यावर बसले


राघव ने अंकितला पाहत म्हटले "अंकित हि जागा तुझी आवडती जागा आहे आपण दोघे कधी कधी इथे येऊन खूप गप्पा मारल्या आहेत आणि आज हि आपण तेच करणार आहोत "


"काय पण तू तर म्हणत होतास कि मीराचा वाढदिवस आहे मग ती कुठे आहे "


"नाही तसे काही नाही "


"म्हणजे "?


"म्हणजे मी खोटे बोललो नाहीतरी काकू तुला माझ्याबरोबर पाठवणार नव्हती "


"काय पण का ?"


"मी सांगतो ते फक्त शांतपणे ऐक काही प्रश्न असतील ते संपूर्ण ऐकल्यानंतर विचार जे मी सांगतो ते खरेच आहे ह्यात काहीच विषय नाहीं अंकित तू आणि प्रियांका एकमेकांवर खूप प्रेम करत होतात एवढे प्रेम कि कोणाची हि नजर लागू शकते आणि तसेच झाले तुमचे प्रेम म्हणजे एका जीवात जगणारी दोन माणसे म्हणून तर आम्ही तुम्हला प्रियांकित म्हणत असू तर कॉलेज मधून सुरु झालेले तुमचे प्रेम कॉलेज नंतर हि तसेच राहिले तू नोकरीत सेटल झाला आणि तुम्ही दोघानी एकमेकांच्या घरी सांगितले तसे मैत्री मुळे ओळख असल्याने तुमच्या दोन्ही कुटूंबानी होकार दिला आणि वर्षात लग्न करायचे ठरवले मग काय तुम्ही दोघानी आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहण्यास सुरवात केली एक एक स्वप्नांचे मनोरे तुम्ही दोघे रचत होतात पण कोणची दृष्ट लागली नाही माहित आणि तुझे असिसिडेन्ट झाले आणि तुझी समरणशक्ती गेली आणि ह्याचे सारे खापर तुझ्या आईने प्रियांका वर फोडले तिचे म्हणे कि तिच्या वाईट पायगुणामुळे तुझ्या आयुष्यात येताच तुझ्यावर आघात झाला तर मग पुढे काय त्यामुळे तिनी प्रियांकाला तुझ्यापासून दूर राहण्यास सांगितले आणि मित्र म्हूणन आम्हला हि तिला तुझ्यापासून दूर ठेवण्यास सांगितले म्हणून मी त्या दिवशी एकतर्फी वगैरे तुला खोटे सांगितले कारण मला दोन्ही बाजू सांभाळ्याचा होत्या आईचे मन राखून प्रियांका ला तुला भेटावयाचे होते पण ह्या सर्वांचे विनाकारण दुःख मात्र प्रियांका भोगत आहे "


"पण तू हे मला आता का सांगतोस "?


"अंकित प्रियांकाच्या घरच्यांनी तुझ्या समरणशक्ती परत येण्याची खूप वर्ष वाट पहिली आता त्यांनी एक स्थळ प्रियांका साठी आणले आहे आणि त्यांना वाटते कि तिनी लग्न करावे पण ती तुझ्यावर प्रेम करताना दुसरा कोणाचा कसा विचार करू शकते नाही पाहवत अंकित तिला असे काहीतरी कर "


"मी काय करू मला तिच्याविषयी कुठलीच भावना नाही आणि तू खरे सांगतोस कशावरून प्रियंकाचे मन राखण्यासाठी तू मला खोटे सांगू शकतो "


"काय नाही अंकित प्रियांका फक्त तुझी आहे आठव अंकित आठव तुझे आणि प्रियांका चे प्रेम आठव" असे म्हणून राघव रडू लागला आणि अंकित त्याच्याकडे पाहत राहिला

राघव ने आपले डोळे पुसले आणि अंकित ला म्हणाला "चल तुला घरी सोडतो "वाटेत त्या दोघांचे काहीच बोलणे झाले नाही अंकित एका नजरेने राघवला पाहत होता तर राघव मात्र आपले सारखे डोळे पुसत होता गुपचूप घरच्या गेट पाशी त्याला सोडून राघव निघून गेला अंकित चे आई बाबा त्याची वाट पाहत होते अंकित घरात शिरला तो काही न बोलता सरळ आपल्या रूम मध्ये गेला दमला असेल म्हणून आई बाबा नि काही विचारले नाही राघव घरी पोहचला पण नेहमी पेक्षा आज तो देवाला जास्त विनवण्या करत होता त्याला एक मित्र म्हणून प्रियांकाची मनस्थितीची जाणीव होती आणि एकतर्फी चे खूळ राघव नेच अंकितच्या डोक्यात घातले होते म्हणून तो अधिक पश्चताप करत होता


तिथे प्रियांका तर मोठ्या महा चक्रात सापडली होती एकीकडे प्रेम तर दुसरी कडे आई बाबाची इच्छा आणि नाव ठेवण्यासारखे राजीव मध्ये काहीच नव्हते राजीव सारखा नवरा मिळेल तर सुखच असेल पण प्रियांका ला राजीव ला फसवायचे नव्हते आणि ती अंकित शिवाय दुसरा कोणाचंच विचार करू शकत नव्हती आई बाबांनी उत्तर कळवण्यासाठी प्रियंकाला दोन दिवसाचा अवधी दिला होता पण उत्तर मात्र तिला सापडत नव्हते आता काही देवच काहीतरी करेल ह्या आशेकडे तिनी डोळा लावला होता


दुसऱ्या दिवशीची सकाळ ब्रेकफास्ट साठी अंकित आणि त्याचे आई बाबा बसले होते पण अंकित गप्प चूप खात होता नेहमी पेक्षा आज तो खूप वेगळा जाणवत होता म्हणून आईने त्याला विचारले " काय झालं अंकित काल तू बडे पार्टीतून आल्यापासून पाहते जरा वेगळाच जाणवत आहेस काय झालं तिथे कोणी तुला काही म्हटले का"?


"नाही "असे म्हणून अंकित गेला आणि लगेच तयार होऊन बाहेर आला त्याला पाहत आईने विचारले "कुठे निघालास "?


"काम आहे येतो "म्हणून तो बाहेर पडला आई बाबा मात्र चिंतेत पडले अंकित ची गाडी येऊन गेट पाशी उभी राहिली त्याने बेल वाजवली दरवाजा उघडण्यात आला


"तू आणि इथे "?


"काकू प्रियांका आहे "?


"हो आत आहे" प्रिया अशी हाक देताच


प्रिया ला हाक ऐकू येताच प्रिया बाहेर आली समोर अंकिताला पाहून ती चकित होत म्हणाली "अंकित तू इथे म्हणजे तुला सगळे आठवले "


" प्रियांका मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे "हे ऐकताच प्रियांकाच्या मनात एकदम कळी खुलली


"हो आपण गार्डन मध्ये बसू" म्हणून दोघेही गार्डन मध्ये गेले


काय असेल त्याचे बोलणे खरंच अंकितला सर्व आठवले असेल ?"बोल अंकित काय बोलायचे आहे आज कित्येक वर्षांनी तुझ्या तोंडून माझे नाव ऐकून खूप बरे वाटले "


"प्रियांका हे बघ भावनिक होऊ नकोस "


"म्हणजे आणि तू मला प्रियांका का म्हणतोस प्रिया म्हण ना तुझ्या तोंडून प्रियांका हे नाव कसे तरीच वाटते "


"नाही प्रियांका जास्त बरे वाटते "


"म्हणजे "?


"मी असे ऐकले कि तुला स्थळ आले आहे "


"कोणी सांगितले तुला राघव ने ना "


"हो राघव नेच मग तू काय ठरवलास "?


"म्हणजे अंकित तू हे मला काय विचारतोस मी तुझ्याशीवाय आणखी कोणाचा विचार करू शकते का "?


"का नाही प्रियांका तुझं राघव ला सांगितले ना कि राजीव खूप चांगला मुलगा आहे म्हणून मग काय हरकत आहे आणि तसे पहिले तरी मला काही आठवत नाही त्यामुळे मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत मग तू माझा विचार का करत आहेस "?


अंकित कडे एक नजर टाकत ती म्हणाली "अंकित तू मला विसरलास मी नाही माझ्यासाठी तू तोच अंकित आहेस "


"तरी पण प्रियांका मला असे वाटते कि तू हे लग्न करावे उगाच माझ्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खराब करू नकोस "


"काय हे तू काय बोलतोस अंकित मान्य आहे तुला काही आठवत नाही पण मला तरी सगळे आठवत आहे आणि आमचे प्रेम विसरण्यासारखे नाही आणि मी तुला ह्या परिस्थिती हि स्वीकारायला तयार आहे मी माझे प्रेम परत मिळवण्यासाठी वाट पाहीन आणि तुला कोणी सांगितले असेल आणि ते तुला पटले हि असेल कि मी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करते तर तुला समजायला हवे तसे समज पण मला माहित आहे कि हे प्रेम एकतर्फी नसून आपल्या दोघांचे आहे "


"परत तू वेडेपणा करत आहेस प्रियांका मला तुझ्याबद्दल भावनाच नाही मग तू माझा का म्हणून स्वीकार करशील वेडेपणा सोडून दे नवीन आयुष्य सुरु कर "


"अंकित तू असा कसा असे म्हणून प्रियांका रडू लागली प्रियंकाला असे रडताना पाहून अंकित म्हणाला" प्लिज प्रियांका रडू नकोस "


"मग काय करू अंकित माझी स्वप्ने अशी तुटताना पाहू "


"प्रियांका परत तू तोच विचार करतेस मूव्ह ऑन"


"तुला सांगायला काय ह्या डोळ्यसमोर माझी स्वप्ने तुटताना पाहताना किती दुःख होते ते माझे मला माहित आहे आणि तुला जर हेच सांगायचे होते तर इथे कशाला आलास उगीच क्षणभरासाठी माझ्या मनाला उगीच आशा दाखवण्यासाठी "


"प्रियांका तुझा राग मला कळतो पण जे सत्य आहे ते आपण नाकारू शकत नाही"


"झालं बोलून तुझं तर इथून निघून जा "


"जशी तुझी इच्छा म्हणून अंकित निघण्यासाठी वळला आणि प्रियांका एकदम जामिनावर कोसळली आवाजाने त्यांनी मागे वळून पहिले आणि तो लगेच" प्रियांका प्रियांका" अशी हाक मारू लागला त्याने प्रियांका च्या आईला हाक दिली आणि लगेच तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले


राघव आणि ग्रुप आई बाबा आणि अंकित हि हॉस्पिटल च्या वैटिंग रूम मध्ये वाट पाहत होते काही क्षणात डॉक्टर बाहेर आले तसे सगळे पुढे आले डॉक्टर त्यांना पाहत म्हणाले "डोक्याला जबर मार लागला त्यामुळे ती बेशुद्ध आहे शुद्धीवर आल्यावर पाहू असे म्हणून डॉक्टर निघून गेले सगळेच चिंतेत पडले


अंकित हि चिंतेत पडला कारण त्याच्याच बोलण्यामुळेच प्रियांका कोसळली होती तो एकप्रकारे गोधळेला सारखा झाला होता तो गप्प चूप एका जागेवर डोळे मिटून बसला आणि काही तास झाले डॉक्टर ने प्रियांका शुदीवर आले असे सांगितले तसे तिचे आई बाबा आत गेले अंकित गुपचूप बसला होता अचानक तो प्रिया असा ओरडला तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले


तो उठला आणि राघवला पाहत विचारू लागला "राघव प्रिया कशी आहे "?


प्रिया असे म्हणताच राघव ने चकित होऊन त्याला विचारले "म्हणजे अंकित तुला सगळे आठवले "


"हो माझी प्रिया मला भेटायचे आहे राघव माझ्यामुळे ती आज हॉस्पिटल मध्ये आहे "


प्रिया चे आई वडील आतून डोळे पुसत बाहेर आले प्रिया ची आई रडत म्हणाली "काहीच बोलली नाही प्रिया फक्त आम्हाला पाहत राहिली "


हे ऐकून अंकित म्हणाला "काय काहीच उत्तर दिले नाही तिने मी भेटून येतो "


अंकितला रोखता आई म्हणाली "नाही नको तुला पाहून परत "


"तसे काही नाही होणार काकू मला सर्व आठवले आहे आणि माझ्यासाठी तिनी एवढे सहन केले आहे आता तिच्या डोळ्यात एक अश्रू हि येऊ देणार नाही असे म्हणून अंकित आत गेला


अंकित दरवाजा उघडून आत गेला त्याने पहिले कि प्रिया डोळे मिटून पडली होती अंकित ने हाक मारली तसे तिनी डोळे उघडले तिला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू बरसले ते पुसत त्याने प्रियाचा हात हातात पकडला "प्रिया सॉरी माझ्यामुळे तुला हे सर्व पण ह्या पुढे नाही मला सर्व आठवले आपले प्रेम सगळे आता फक्त तू बरी हो मग आपण लग्न करू तुझी सारी स्वप्ने तुटली नाहीत पूर्ण होणार आहेत तुला जास्त त्रास देत नाही तुला आरामाची गरज आहे लवकर बरी हो मी वाट पाहत आहे काळजी घे "असे म्हणून अंकित बाहेर आला


त्याला सर्व आठवले ह्याचा सगळ्यांना आनंद झाला होता पण प्रिया ठीक होऊ दे म्हणून सगळे देवा समोर विनवण्या करू लागले अंकित ला सर्व आठवल्यामुळे प्रियाच्या आई बाबांना थोडेसे हायसे वाटले अंकित ने फोन करून घरी कळवले तसे त्याचे आई बाबा हि चकित झाले


अंकित ला सर्व आठवल्यामुळे प्रियांका च्या आई बाबांनी राजीव ला प्रियंकाच्या तब्येतीचे कारण सांगून टाळले तसे हि त्यांना उगीच राजीव ला अडकून ठेवायचे नव्हते आणि राजीव ने हि ने ते स्वीकारले


अंकित दररोज हॉस्पिटल मध्ये जाऊ लागला त्याच्या येण्याने प्रिया ला हि हळू हळू बरे वाटू लागले तिला डिस्चार्ज देण्यात आला अंकित प्रियाच्या घरी जाऊन तिची काळजी घेऊ लागला हे सर्व पाहून प्रियांका चे आई बाबा खूप खुश होते पण त्याला भीती होती त्याच्या लग्नाची अंकित तर तयार होता पण त्याचे आई बाबा कसे तयार होतील ह्याची चिंता त्याला लागली होती त्याची हि भीती अंकित ने ओळखली त्यांनी त्यांना शब्द दिला काही झाले तरी आपण लग्न प्रियांका शीच करेन


असेच दिवस जात होते प्रियांका आता बरी झाली अंकित ने प्रियंकाशी लग्न करण्याचा ठरवलं अजून त्याला तिला त्रास द्याचा नव्हता त्यांनी आपल्या आई बाबांना विचारले आपल्या परीने खूप समजावले पण तिच्या आईचा विरोध पाहता त्याने आपला निर्णय सांगितला कि "आपण लग्न करणार तर प्रियांका शी "


आई वडील ऐकणार नाही हे पटल्यावर अंकित ने आई बाबाच्या विरोधात जाऊन लग्न करायचे ठरवले प्रियांका ने अंकित ला आपण वाट पाहू त्याच्या उत्तराची असे सांगितले पण अंकितला अजून उशीर करायचा नव्हता त्याचा ग्रुप प्रियांका चे आई वडील प्रियांका चे मामा मामी असे मिळून त्याचे लग्न झाले


लग्न होऊन अंकित आणि प्रियांका घरी आले दरवाजाची बेल वाजली आई ने दरवाजा उघडला त्या दोघाना असे पाहून ती रागात म्हणाली "तुम्ही दोघानी लग्न केले अंकित तुला आमची अनुपस्थिती जाणवली नाही कशी जाणवणार हिचे प्रेम आमच्यासमोर काहीच नाही ना हिच्या च मुळे तुझी दोन वर्ष अजाणतेत गेली पूर्वी धक्का मिळाला आहे तरी हि तुला सांगितले तरी हि तू आपल्या पाहिजे तेच गेले "


तो काही बोलणार एवढ्यात अंकितचा मामा म्हणाला "ताई जाऊ दे ना घरी आल्या लक्ष्मीला आनंदात आत घे अगं आपल्या अंकितच्या सुखातच आपले सुख आहे आणि आज तिच्यामुळेच तर त्याची समरणशक्ती परत आली आहे ह्याचा आनंद समज आणि त्यांना आत घे " "अंकितच्या मामाने आईला समजावले तश्या त्या म्हणाल्या "काही झाले तरी तू माझा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे हे सर्व तुझेच आहे त्यामुळे मी तुला घरात येण्यापासून रोखू शकत नाही पण मी प्रियांका चा माझी सून म्हणून स्वीकार करू शकत नाही "


"मग आई मग घरात घेऊन काय फायदा तू तिला स्वीकारणार नाहीस तर "?


"मग मी काय पाहू नुसत्या ठरावा ने तुझ्यावर एवढे संकट आले आता तर ती तुझी अर्धांगिनी झाली आहे आणखी काय पाहावे लागणार आहे "


"आई प्लिज आज तिच्याच मुळे मला सर्व आठवले आहे आणि मी तुला हि ओळखू शकलो आहे हे तू नाकारू नकोस "


"नवीन नवरी मुलगीला असे अडवून ठेवणे बरोबर नाही "


अंकितच्या बाबाचे हे बोलणे ऐकून त्याला पाहत आई विचारू लागली "हे तुम्ही बोलता आपल्या अंकित बरोबर काय झालं हे विसरलात "?


"मी काही विसरलो नाही आणि मला वाटत तू उगीच खेचत आहेस येऊ दे त्याना या बाळांनो "असे म्हणून अंकितच्या बाबांनी अंकितच्या आईला दरवाजवरून बाजूला केले तसे अंकितचि मामी आत गेली आणि गृहप्रवेशाची तयारी करून बाहेर आली


गृहप्रवेश करून दोघांनी आईला लांबूनच नमस्कार केला बाबांनी मात्र भरभरून आशीर्वाद दिला


अंकित प्रियंकाला घेऊन रूम मध्ये आला त्याने प्रियांकाच्या चेहऱ्याकडे पहिले तर तिचे डोळे भरलेले दिसले तिला पाहत तो विचारू लागला


"काय झालं का रडत आहेस हे बघ प्रिया मला माहित आहे आईच्या वागण्याचे तुला वाईट वाटत आहे पण आई मनाने वाईट नाही आहे थोडे दिवस मग बघ ती आपणच तुला आपलेसे करेल "


ह्यावर प्रियांका ने काहीच बोलले नाही अंकित ने प्रियांका समजावले पण तोच आता दोन नात्याच्या चक्रव्यूहात अडकला

"बाहेर गेलेत का अच्छा ऐकून माझे मन राहावे ना म्हणून मी पळत तुझ्या काळजी पोटी आले असे कसे तू लग्न होऊ दिले तू पण काय करणार अंकित ऐकत नसेल त्याला दिसणारच नाही कि तिच्यामुळे एव्हडा त्रास त्याला सहन करायला लागला "


"काय बोलू मी मनात भीती ने घर केले आहे आता आणखी काही वाईट पाहण्याची माझी हिम्मत नाही त्यांना मी सांगितलेले पटत नाही"


"ते हि खरेच आहे म्हणा प्रेम ना ते आंधळेच असेल पण अंकितचे बाबा का त्याच्या बाजूनी आहेत सत्य परिस्थिती माहित असून सुद्धा "


"तेच ना त्यांना पायगुण वैगरे ह्यावर विश्वास नाही म्हणून ते सुद्धा त्यांना पाठींबा देऊन मोकळे झाले सुमा आपण एक केले तर "


"काय "?


"मला ज्या ज्योतिषाकडे तू घेऊन गेली होतीस ज्याने मला प्रियांकाच्या पायगुणा बदल सांगितले त्याच्याकडे आपण अंकितला आणि यांना नेले तर त्याला खरे पटेल "


हे ऐकताच गोंधळत सुमा म्हणाली "नाही नेण्यास काही नाही पण तो थोडाच ऐकून घेणार आहे आणि वर मी नेले हे त्याला कळले तर उगीच कांगावा करेल म्हणून मी तुला माझ्याबद्दल सांगू नको म्हणून सांगितले होते "


"हो उगीच माझ्यामुळे तुला ताप नको "


"बरं मी येते तू मात्र तिच्या गोड बोलण्यात येऊ नकोस शक्यतो अंकितला तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयन्त कर "असे म्हणून सुमा निघून गेली


सुमाला अंकितचे बाबा बाहेर भेटले विचारपूस करून घाई गडबडीत ती निघून गेली हे पाहता अंकितचे बाबा अंकितच्या आईला आत येत विचारू लागले "काय ग तुझी सुमा मैत्रीण गडबडीत होती आज गप्पा साठी थांबली नाही वाटत "?


"नाही तिला काही कामे नाहीत का इथे थांबायला "


"काय झालं रागावतेस कशाला "?


"मग काय करू जे चाललंय ते पाहत राहू "


"म्हणजे "?


"तिला तुम्ही सून म्हणून घरात घेऊन चूक केली आहेस "


"झालं सुरु तुझं आता सगळं चांगला होत आहे तर मग कशाला उगाच त्या गोष्टी काढून आताचे सुख हिरावून घेत आहेस ती एव्हडी चांगली मुलगी आहे आणि तू तिला उगीच दोष देत आहेस "


"अहो मी उगीच नाही बोलत तिची पत्रिका तशी बोलते "


"हे बघ तुला जर तिला आपलेसे करायचे नाही तर तिला दोष पण देऊ नको "असे म्हणून बाबा तिथून निघून गेले


प्रियांका मात्र अंकितशी लग्न होऊन पण खुश नव्हती कारण अंकित ची आई तिला सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हती दिवसे दिवस तिचा तिरस्कार वाढत होता ह्याची झळ मात्र अंकित आणि प्रियांका च्या नात्याला लागत होती


"तुम्ही मला समजावून काय साध्य करणार आहात जे सत्य आहे ते आपण नाही बदलू शकत कि प्रियांका चा पायगुण चांगला नाही आहे "


"हे बघ हा वेडेपण बंद कर "


"वेडेपणा नाही सत्य आहे तिच्या पत्रिकेत दोष आहे मी उगीच नाही सांगत मला एका ज्योतिषाने सांगितले "


"ज्योतिषाने तू कधी गेली होतीस "


"मला सुमा ने नेले होते "


"काय सुमा तिनी कधी नेले आणि तू कधी ज्योतिषावर विश्वास ठेऊ लागलीस "


"मी हि गोष्ट तुम्हला सांगितली नाही पण अंकितच्या असिडेन्ट नंतर जे झाले ते पाहून मी बिथरली होते त्यात सुमाने माझ्या मनाच्या शांती साठी ज्योतिषाकडे नेले त्याने तिच्यात दोष आहे आणि त्यामुळे अंकितला धोका आहे असे सांगितले म्हणून मी तिला स्वीकारण्यास तयार नाही "असे म्हणून ती रडू लागली


हे पाहून "काय मग हि गोष्ट तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस "?


"ज्योतिषी वैगरे तुम्हाला पटत नाही हे मला माहित होते म्हणून मी काही सांगितले नाही "


"अच्छा तसे असेल तर आपण दोघे जाऊ त्या ज्योतिषाकडे मला पण पाहू दे त्याचे भविष्य "


"तुम्ही "?


"हो का नाही मला पण काही प्रश्न पडलेत त्याची उत्तरे मिळतात कि पाहू "


"पण माझ्याकडे त्याचा नंबर नाही सुमा कडे असेल "


"लाव फोन सुमाला आणि सांग आपण जाऊ उद्या भेटायला "
"काय म्हणजे ते नाही भेटू शकत अच्छा "


"काय झालं काय म्हणाली सुमा "?


"नाही ते ज्योतिषी बाहेरगावी गेले आहेत कधी येणार माहित नाही असे म्हणत होती "


"मग त्याचा नंबर घ्याचा ना "?


"नाही नंबर लागत नाही म्हणाली "


अच्छा मला पत्ता सांग मी पाहून येतो "


अंकितचे वडील अंकितच्या आईने सांगितलेल्या पत्यावर गेले तर त्यांना दरवाजा उघडा दिसला ते आत गेले अर्ध्या तासाने ते बाहेर आले त्याची वाट तर आई पाहतच होती तिनी आल्या आल्या प्रश्नची सरबत्ती सुरु केली तसे बाबा म्हणाले ""बस सगळे सांगतो पण सुमाला पण बोलवून घे"


"पण का "?


"सांगतो तिच्यासमोर मला बोलायचे आहे "


सुमा तासाभरात अंकितच्या घरी पोहचली


अंकितच्या बाबांना पाहून ती म्हणाली "काय झालं भाऊ तुम्ही मला असे का बोलवले "?


"सुमा स्पष्टच बोलतो तू मध्ये तुझ्या मुलीचे आणि अंकितचे नाते जुळले तर बरे होईल असे म्हणाली होतीस ना "?


हे ऐकून सुमा चकित होऊन म्हणाली "नाही म्हणजे हो त्याचे काय "


"मग ते आपण आता जुळवू शकतो "


हे ऐकून अंकितची आई आणि सुमा त्याच्याकडे पाहत म्हणाली "काय हे तुम्ही काय बोलता तो लग्न झाला आहे "?


"नाही हिला ती पसंद नाही मग काय फायदा सून म्हणून आम्हला कोणीतरी हवीच ना "


"पण ते आता कसे शक्य आहे "?


"आपण अंकितचे लग्न तुझ्या मुलीशी लावून देऊ म्हणजे तुझे म्हणे पण खरे होईल"


"अहो पण तो ऐकणार आहे का त्या मुलीला सोडायला आणि असे माझ्या मुलीला तळमळत जगताना मला नाही पाहायचे "


"नाही नाही काही त्रास होणार नाही तिला आम्ही आहोत ना आमच्या अंकित च्या पत्रिकेत दोन विवाह आहेत आणि तुमच्या मुलीच्या नावात विवाहित पुरुषाशी लग्न आहे "


हे ऐकून रागात सुमा म्हणाली "काय हे तुम्हाला कोणी सांगितले माझ्या मुली बदल वाटेल ते बोलू नका "


"माझ्या ओळखीच्या ज्योतिषीनी सांगितले तुझ्या ओळखीचा आहे तो "


"नाही बाई मला माझ्या मुलीला तुमच्या घरी नाही द्याचे आणि मला आता इथे येणे पण नकोसे झाले जाते बाई मी येते असे म्हणून सुमा घाबरा घुबरा होऊन गेली अंकितचि आई मात्र आपल्या नवऱ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली

सुमा अशी निघून गेली ते पाहून विचित्र नजरेत पाहत अंकितच्या आईने अंकितच्या बाबांना विचारले "हे काय बोललात तुम्ही अहो मला सून हवी म्हणून मी सुमा च्या मुलीला सुरीवर नाही चढवू शकत अंकित तिला कधीच आपलेसे करणार नाही हे माहित असू सुद्धा तुम्ही असे काय बोलून बसला तिला किती वाईट वाटले असेल ह्याचा विचार केलात का आणि दोन लग्न हे सर्व कुठल्या ज्योतिषाने सांगितले "?


"वाईट म्हणजे आपल्या मुलीबद्दल कोणी आरोप केला तर वाईट वाटते आणि आपण जेव्हा दुसऱ्याच्या मुली बदल बोलतो तेव्हा वाईट वाटत नाही का तुझ्या मैत्रिणीला आणि मी त्याच ज्योतिष कडे गेले होतो जिथे तू आणि सुमा गेली होतीस "


"काय "?


"हो त्याच ज्याच्या सांगण्यावरून तू प्रियांका ला धारेवर धरले आहेस "


"पण आम्ही गेलो तेव्हा तर असे काही सांगितले नाही मग तुम्हला का सांगेल तो "?


"नाही सांगितले असेल आणि तो तेच सांगतो जे त्याचे भरलेले खिसे सांगतात "


"म्हणजे मला काही कळले नाही "


" तो ज्योतिषी पैसे खाऊ आहे पैश्याच्या जोरावर सत्य असत्य घडवून सांगण्यात तो पटाईत आहे "


"काय हे तुम्ही उगीच कोणावर आरोप करू नका तुम्हला ह्या सर्व गोष्टी पटत नाही म्हणून उगाच कोणावर आरोप लावणे बरोबर नाही "


"मी उगाच नाही सांगत पुरावा आहे"


"पुरावा "?"


"मला एक सांग सुमाने तुला असिसिडेन्ट नंतर त्या ज्योतिषाकडे नेले त्याने तुला तेव्हा प्रियांका चा पायगुण बरोबर नाही म्हणून सांगितले पण त्या अगोदर हॉस्पिटल मध्ये तू कुठल्या आधारावर प्रियांका वर पायगुण चांगला नाही म्हणून दोष देऊन बसली "


"नाही प्रियांका जे आणि अंकितचे ठरले हे मी सुमाला सांगितले तशी ती मला म्हणाली कि प्रियांका ची पत्रिका असेल तर दे माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहे मी प्रियंका कडून पत्रिका घेतली तिला वाईट वाटू नये म्हणून सुमाला दिली त्या ज्योतिषाकडे सुमा ने पत्रिका दाखवली होती ती नि मला मग फोन करून ती अंकित साठी योग्य नाही आहे म्हणून सांगितले होते पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पण असिसिडेन्ट नंतर मला तिचे बोलणे खरे वाटू लागले "


"वेडेबाई सुमा तुझ्याशी खोटे बोलली तुझी जीव भावा ची मैत्रीण "


"का हे काय बोलत आहात आणि पण 'ती का बोलेल खोटे "


"कारण तिला आपल्या मुलीचे लग्न अंकितशी करायचे होते "


"काय हे तुम्हाला कोणी सांगितले तिनी तर कधी असे म्हटले नाही


"हो का मग अंकित ची स्मरणशक्ती गेल्यावर तिचे आणि तिच्या मुलीचे आपल्या घरी वरचेवर येणे आणि आठवत असेल तुला तिनी एकदा म्हटले होते अंकितला आता सांभाळू घेणारी जोडीदार पाहिजे जी तुम्हला ओळखीची असेल अंकित चे आणि सावी चे जर सूर जुळले तर खूप बरे होईल आठवले "


"हो ती असे म्हणाली होती पण तिने ते सहज म्हटले होते "


"हो पण ते तिला म्हणायचेच होते "


"नाही हो मला नाही पटत ह्या सर्व गोष्टी "


"नाही पटत ना मग हे ऐक असे म्हणून मोबाईल रेकॉर्ड चालूं केला आणि त्या ज्योतिषाचे बोलणे अंकितच्या आई च्या कानावर पडले ते ऐकून ती म्हणाली मग आपल्या अंकितचा असिसिडनेट "


"तो एक केवळ योगायोग होता "


"नाही तरी माझा विश्वास नाही बसत सुमा असे नाही वागू शकत ती माझी एव्हडी काळजी करते "


"स्वार्थ साठी माणूस काहीही करू शकतो तेव्हा त्या माणसाला नाते नाही आपले स्वार्थ दिसते आणि तुला नाही पटत मग तुझ्या परीने पटून घे "असे म्हणून बाबा निघून गेले


"टिंग टॉंग" दरवाजावरची बेल वाजली समोरच्या व्यक्तीला पाहून सुमा ने विचारले


"तू आणि इथे "?


"हो सुमा तू गेल्यापासून फोन उचलत नव्हती म्हणून तुला भेटायला आले आता चल आत थोडे बोलायचे आहे "असे म्हणत दोघी आत आल्या


सोफयावर बसता बसता अंकितच्या आईने सुमाला पाहत म्हटले "सॉरी हा सुमा काल हे जे बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस माहित नाही पण आपण गेलेल्या ज्योतिषांनी त्यांना असे का सांगितले "


"हे बघ मला त्या बदल काहीही बोलायचे नाही आणि तुमच्या घरचे संबंध ही नको "


"सुमा असे का बोलत आहेस मी माफी मागितली ना मग सरळ सरळ तोडल्या सारखे का बोलतेस "


"तू माफी मागितली पण माझ्या पोरी बदल जे काही बोलले ते माझ्या मनाला लागले आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही "


"पण सुमा ते तेच बोलले जे त्यांना सांगितले आहे आणि तू हि म्हणत होतीस ना कि ते ज्योतिधी जे सांगतात ते खरे असते म्हणून "


हे ऐकल्यावर सुमाचा चेहरा जरा गंभीर झाला ती अंकित च्या आईला पाहत म्हणाली "सगळ्या गोष्टी खऱ्या असू शकतात असे नाही ना "?


"हो का मग सुमा प्रियांका बद्दल बोलताना तर तू ज्योतिषाची बाजू घेऊन बोलत होतीस "


"म्हणजे तुला काय म्हणायचे "?


"मला जे म्हण्याचे आहे सुमा ते तुला नक्कीच कळले असेल "


"म्हणजे तुला काय म्हण्याचे आहे स्पष्ट सांग "


"हेच कि तुझ्या मुलीबद्दल कोणी वाईट बोलले तर तुला राग आणि वाईट हि वाटले आणि तूच प्रियांका बदल किती वाईट बोललीस ती काळ्या पायाची पायगुण चांगला नाही ती घरात आली तर नाती तुटतील"


"मी बोलले तरी ते खरे होते अंकित चा असिसिडेन्ट ते तू नाही नाकारू शकत "


"सुमा तो एक केवळ योगायोग होता किंवा कोणी तरी जाणून बुजून केले असावे "


"म्हणजे तुला काय म्हण्याचे आहे "?


"हेच कि तू प्रियांका बद्दल माझ्याशी माझी मैत्रीण असून सुद्धा खोटे बोललीस का ते मला माहित नाही "


"तू माझ्यावर सरळ सरळ आरोप करत आहेस "


"आरोप नाही पुरावा बोलतो त्या ज्योतिषांनी अंकितच्या बाबांना काही पैशासाठी सगळे खरे सांगून टाकले "


"काय "?


सुमा आपल्या मुलीला माझी सून व्हावी म्हणून तू जे रचले त्यात मी फसत गेले आणि निष्पाप प्रियांका वर आरोप गेले ती बिचारी माझ्याशी मी तिरस्कार करून हि बोलायला येते पण मी अपमान करून तिचे मन दुखावले आणि हो तुझ्या माहिती साठी सांगते ह्या शहरातल्या प्रसिद्ध गुरुजींना आम्ही प्रियांका ची पत्रिका दाखवली त्यांनी ती पाहून एकच म्हटले "लक्ष्मी आहे हि तुमच्या घरची तिला कधीही दुखावू नका "असे म्हणून अंकितची आई निघून गेली


"काय झालं प्रिया अशी गप्प का बसली "?


"अंकित हे सर्व कधी संपेल एकाच घरात राहून आई माझ्याशी बोलत नाही आपण एक झालो पण मला असे वाटते कि त्या आपल्या पासून दूर गेल्या "


"तसे काही नाही तेच सांगायला मी आलो "


"म्हणजे "


"बाहेर बाबांशी तेच बोलत होतो आणि ऐकून खूप शॉक झालो कारण मी पण विश्वास नाही ठेवू शकत कि ती व्यक्ती तशी वागेल "


"म्हणजे "


अंकित ने सुमा बद्दल प्रियांका ला सांगितले ते ऐकून चकित होत प्रियांका म्हणाली


"काय हे सर्व सुमा मावशींनी आणि ह्यावर आई काय म्हणाल्या "?


"हो प्रियंका सुमा मावशीने सगळं गेले असे बाबा म्हणत होते आणि बाबांनी सांगितल्यावर आई काहीच म्हणाली नाही पण आज आई तिला भेटायला गेली आहे "


"अरे देवा एका माणसामुळे आपल्या घरात विनाकारण एवढे रामायण घडले "


"येऊ च दे त्या सुमा ला नाही धक्के मारून हाकलून दिले तर बघ तिच्या मुळे आई तुझ्याशी वाईट वागू लागली मैत्री नेच आईच्या पाठीत खंजीर घुपसला "


"मी आत येऊ शकते "


"आई "


"खरे बोललास तू माझ्या मैत्री नेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला प्रियांका कडे पाहत हात जोडत अंकितचि आई म्हणाली "माफ कर प्रियांका मी तुझ्याशी खूप वाईट वागले "


"नाही आई नाही म्हणत प्रियांका ने तिचे हात हातात पकडत म्हटले "आई त्यात तुमची चुकी नाही आहे अहो माझ्या जिवा भावाच्या मैत्रीने जरा मला असे काही सांगितले असते तर मी तिच्यावरच विश्वास ठेवला असता आणि माझी माफी मागून मला तुमच्यापासून दूर करून नका असे म्हणून प्रियांका ने अंकितच्या आईला घट्ट मिठी मारली हे पाहून अंकितच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यात त्याच्या पाठीवर हात पडला त्याने मागे वळून पहिले तर बाबा होते ते हसत हसत म्हणाले "वाह वाह दोघांचे प्रेम खूप उतू जात आहे आम्हला पण त्यात घ्या "हे ऐकून अंकितची आई म्हणाली "तुमचे पण काहीही हा अहो एवढ्या दिवसांनी माझ्या सुनेचे लाड करते ते पाहवत नाही का "ह्यावर सगळेच हसू लागले खूप दिवसांनी अंकितच्या घरी हसण्याचा आवाज गुंजला


लग्न सध्या पद्धतीने झाले म्हणून घरात पार्टी करण्याचे ठरवले सगळे संगे सोयरे नातेवाईक ना आमंत्रणे गेली अंकितच ग्रुप हि कार्यक्रमाची तयारीत लागला


आणि ती सुंदर संध्यकाळ आली संगे सोयऱ्यानी घर भरून गेले आज अंकित आणि प्रियांका खूप सुंदर आणि अधिक खुलून दिसत होते मनोरंजन कार्यक्रम आणि मेजवानी चालू होती अंकित ने प्रियांका चा हात हातात घेत "साथ दे तू मला "ह्या गाण्यावर डान्स केला "आणि सगळं परिसर" प्रियांकित "प्रियांकित "ह्या नावाने उजळून केला


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance