akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

शिवाय -शोध अस्तित्वाचा

शिवाय -शोध अस्तित्वाचा

55 mins
206


" कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।


सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि"


हर हर महादेव हर हर महादेव चा एकच गजर झाला


आणि शिवाय अचानक झोपेतून उठला आणि चौहूबाजूनी पाहू लागला त्याने पहिले तर तो त्याच्या रूम मध्ये होता त्यांना कळले कि जे त्याने पहिले आणि ऐकले ते स्वपन होते झोप डोळ्यावर होती त्यामुळे त्याने डोळे बंद केले आणि त्याच्यासमोर ......परत एकदा स्वप्न झळकले


सोवळे नेसून मंदिरात प्रवेश करताना एक माणूस दिसला त्याने गाभाऱ्या समोर राहून महादेवच्या मूर्तीला नमस्कार केला

तेव्हड्यात तिथे गुरुजी आले त्याचे आशीर्वाद घेऊन त्याने पंचारती हातात पकडली त्याचा चहेरा समोर येताच शिवाय ने डोळे उघडले कारण सोवळे नेसून पंचारती घेऊन तोच स्वतः उभा असलेला त्याला दिसला


शिवाय कॉलेज ला जाणार मुलगा नास्तिक आस्तिक मधला तो त्याला असे स्वप्न पडले कि त्यालाच काहीच कळेना से झाले होते तो त्याच धूंदीत उठला तयार होऊन कॉलेज मध्ये गेला पण त्याचे लक्ष लागत नव्हते सारखे ते स्वप्न त्याच्या समोर येत होते मित्राबरोबर नेहमी गप्पा गोष्टी करणारा आज गप्प का काहीतरी कारण आहे हे त्याच्या मित्राच्या लक्षात आले त्याने त्याला पाहत विचारले


"शिव काय झालं आज एव्हडा कन्फयुज्ड का वाटतोस काय झालं ?


"काय सांगू अमित अरे सकाळी मला एक स्वप्न पडले आणि ते वेगळंच होत आणि ते माझ्यासमोर जशास तसे येत आहे त्यामुळे ते डोक्यातून नाही जात आहे "


"वेगळं म्हणजे "?


"अरे मी सोवळे नेसून एका मंदिरात प्रवेश करतो तिथे असेलल्या मूर्तीला नमस्कार करून गुरुजींचे आशीर्वाद घेतो त्यानंतर मी पेटती पंचारती मी महादेवाच्या मूर्ती समोर ओवळतो आणि माझ्या तोंडी शिव मंत्र चालू असतात आणि हर हर महादेव असा गजर होतो त्या च्या आवाजाने मला जाग आली "


"काय तू आणि सोवळे "असे हसत अमित म्हणाला हे पाहून


शिवाय म्हणाला "हो रे असे स्वप्न मला कधीच पडले नव्हते आणि अचानक स्वतःला एवढे धार्मिक पाहणे कळत नाही रे आणि ते स्वप्न माझ्या डोळ्यसमोर अजून हि येत आहे "


"अरे टेन्शन कसला घेतोस तू मूवी वैगरे पहिली अशील तीच डोक्यात राहिली असेल आणि मग झोपेत तेच दिसले असेल "


"पण मी काल मूवी पहिला नाही मी तर क्रिकेट पाहत होतो "


"अच्छा मग कुछ तो गडबड है "?


"म्हणजे "?


"म्हणजे असे म्हणतात कि पहाटेची स्वप्ने खरी होतात आणि स्वप्नामागे सुद्धा काहीतरी कारण असते कालच मी ना स्वप्नाबद्द्ल विडिओ पहिला होता त्यात असेच काहीतरी सांगितले होते"


" काही कारण मला काहीच कळत नाही मला स्वप्ने पडतात पण एव्हडी लक्षात नाही राहत पण हे स्वप्न एखाद्या मूवी प्रमाणे डोळ्यसमोर येत आहे "


"डोन्ट वरी आपण इंटरनेट गुरूला विचारू असे म्हणून अमित ने पटकन मोबाईलवर टाईप केले तर झटकन तिथे जे आले ते नजर फिरवत अमित ने वाचले आणि शिवाय ला पाहत म्हटले "शिवाय इथे असे लिहिले आहे कि इट्स रेलटेड टू युअर पास्ट "शिवाय कॉलेज मधून घरी परतला पण त्याच्या डोक्यात तो विचार चालू होता आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा आपल्या भूतकाळाशी कसा संबंध असू शकतो आणि बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात चालू होत्या पण एका बाजूनी इंटरनेटवर सगळीच माहिती खरी नसते हे हि त्याला पटत होते आपण त्याच गोष्टीचा विचार करत आहे म्हणून ते स्वप्न आपण विसरत नाही असे त्याला वाटू लागले कारण तो लहान चा मोठा शहरातच झाला होता त्यामुळे त्याचा भूतकाळ शहरातला होता तो विचारत मग्न होता तरी हि त्याच्या कानावर काही बोलणे पडले म्हूणन तो बाहेर गेला तर त्याचे बाबा मोठ्या मोठ्या ने कोणाशी बोलत होते बाबा खूप रागात बोलत होते हे पाहून शिवाय तिथेच थांबला कारण हल्ली बाबा बिसनेस लॉस मध्ये आहे म्हणून चिंतेत आहे हे त्याला माहित होते तरी हि आपुलकीने बाबांनी फोन ठेवताच त्याने बाबांना विचारले


"काय झालं बाबा एवढे रागात का आहात? सगळे ठीक होईल काही चिंता करू नका "


त्याच्या ह्या बोलण्यावर बाबांनी तिरक्या नजरेने त्याला पाहत म्हटले "काही नाही तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे मी माझे पाहीन असे म्हणत बाबा बाहेर निघून गेले त्याचे ते म्हणे ऐकून शिवाय चा चेहरा बावरलेला झाला त्याचे असे जाणे पाहून आई शिवाय जवळ आली आणि म्हणाली "शिवाय बाबा बिसनेस मध्ये चालेल्या लॉस मुळे चिंतेत आहेत महत्वाची मोठी कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कंपनीला मिळाली आहे त्यामुळे ते रागात आहेत तू नको लक्ष देऊ करतील ते कायतरी "


ह्यावर शिवाय गप्प राहून आत गेला कारण त्याच्या बाबानी त्याला पहिलीचे बजावले होते तू माझ्या बिसनेस मध्ये काहीही बोलणार नाही जो पर्यंत मी तुला परवानगी देत नाही


शिवाय रूम मध्ये आला आणि स्वतःशीच बोलू लागला बाबा असे का वागतात म्हणजे नेहमी कडक शिवाय ची आई त्याच्या मागोमाग आली तिने ते ऐकले आणि त्याला पाहत म्हणाली "शिवाय तुझे बाबा असे नव्हते पहिली चा स्वभाव आणि ह्या काही वर्षात त्याच्या स्वभावात बदल झाला आहे पूर्वी ते आमच्याशी गप्पा गोष्टी करत आमच्या साठी वेळ काढत पण ह्या काही वर्षात त्यांनी फक्त बिसनेसला प्रथम प्रायोरिटी दिली आहे पण तुला ते कळणार नाही कारण तू दोन वर्षाचा असलेल्या पासून त्यांनी फक्त प्रगती करण्यातच वेळ दिला त्यामुळे बाबाचे लाड मिळवणे हे तुझ्या नशिबी नाही मिळाले पण पहा ना शिवाय त्यांनी तो वेळ तिथे दिला म्हणून तर आज आपली परिस्थिती चांगली आहे "


ह्यावर शिवाय हसत म्हणाला "पण आई परिस्थिती म्हणजे फक्त पैसा असतो का लोक फॅमिली बरोबर फिरायला जातात कोणी आपल्या गावी जातात मला ते पण नाही ना गाव ना कोणी आमच्याकडे येत ना आपण फॅमिली म्हणून कुठे जातो "


"असे कसे म्हणतोस तू आपण मामा कडे जातो ना "?


"हो जातो ना आई पण धावती भेट ह्याला राहायला कुठे जातो "?


"हो रे ते हि आहे तुझ्या बाबांना नाही आवडत पहिली ना आम्ही दर वर्षी आपल्या गावी जायचो मस्त आठ दिवस राहून यायचो "


"आपल्या गावी "?


हे ऐकून स्वतःला सावरत आई म्हणाली "आपल्या म्हणजे नाही म्हणजे मी माझ्या मामाच्या गावाबद्दल बोलत आहे चल मी किचेन मध्ये जाते असे म्हणून आई पुट्पुट लागली "देवा वेळीच सावरलेस नाही तर उगीच गोधंळ झाला असता "शिवाय च्या घरी त्याचे आई बाबा तो आणि त्याचे आजोबा राहत असत आजोबा वय झाल्यामुळे आपल्या खोलीतच पुस्तक वगैरे वाचून वेळ काढत असत आई शिवाय ला समजावून आजोबा साठी चहा घेऊन आजोबाच्या खोलीत गेली आजोबा पुस्तक वाचत बसले होते


"बाबा चहा"


"वसुधा मघाशी जोरजोरात बोलत होता काय झालं '?


चहा चा कप देत वसुधा म्हणाली "काही नाही बाबा ते बिसनेस चे टेन्शन"


"नाही मला ऐकू आले पण मी बाहेर आलो नाही उगीच एक विचारले तर दहा सांगेल म्हणून गप्पच बसलो "


"नाही बाबा बाबा बिसनेस लॉस मध्ये जात आहे आणि त्यामुळे काम सोडून जाणाऱ्यांची संख्या हि वाढली कमी पगारात कोणी काम करायला तयार नाही" असे ते म्हणत होते


"त्याने हे तुला सांगितले "?


"नाही बाबा मी बोलणे ऐकले ते कोणाशी तरी बोलत होते आणि माझ्यावर कानावर पडले "


"तेच म्हटले आपल्याला तो काही सांगणार नाही कारण तो त्याचा बिसनेस आहे तरी पण त्याला असे चिंतेत पाहून काळजी वाटते म्हणून विचारावेसे वाटते "


"तेच ना बाबा ते खूप टेन्शन मध्ये आहे आपल्याला बोलून नाही दाखवत पण त्याचा चेहरा सगळं सांगून जातो "


"हो हे मात्र तू खरे सांगितलेस त्याचा चेहरा बोलकाच आहे पण त्याच्या आताच्या परिस्थीला आपण पण काही नाही करू शकत "


"हो ना बाबा "


"वसू माझ्या मनात गावाला ला जायचे असे झाले आहे आपण सगळेच एकदा जाऊन आलो तर "


"बाबा हे ऐकतील "?


"तेच ना नाही ऐकणार तो तिथे गेल्यावर मनाशी तरी शांती मिळेल असे वाटते पण हा नाही ऐकणार "


"तेच बाबा आता पण मी शिवाय ला समजावत होती कि बाबा तुझे पहिली खूप प्रेमळ होते आणि अचानक गावाबद्दल बोलणे आले पण मी सावरत त्याला काही कळू दिले नाही "


"पण का वसू त्याला पण आता कळायला हवे तो आता मोठा झाला आहे "


"पण बाबा ह्यांना कळले तर उगीच राग- काढतील म्हणून मी नाही सांगितले"


"काय बोलू आता पूर्वीचा गुणी वामन कुठे हरवला आता फक्त त्यात मला स्वार्थी वामन दिसतो "असे म्हणून आजोबानी डोळ्यात आलेले अश्रू पुसले

शिवाय च्या घरी त्याचे आई बाबा तो आणि त्याचे आजोबा राहत असत आजोबा वय झाल्यामुळे आपल्या खोलीतच पुस्तक वगैरे वाचून वेळ काढत असत आई शिवाय ला समजावून आजोबा साठी चहा घेऊन आजोबाच्या खोलीत गेली आजोबा पुस्तक वाचत बसले होते


"बाबा चहा"


"वसुधा मघाशी जोरजोरात बोलत होता काय झालं '?


चहा चा कप देत वसुधा म्हणाली "काही नाही बाबा ते बिसनेस चे टेन्शन"


"नाही मला ऐकू आले पण मी बाहेर आलो नाही उगीच एक विचारले तर दहा सांगेल म्हणून गप्पच बसलो "


"नाही बाबा बाबा बिसनेस लॉस मध्ये जात आहे आणि त्यामुळे काम सोडून जाणाऱ्यांची संख्या हि वाढली कमी पगारात कोणी काम करायला तयार नाही" असे ते म्हणत होते


"त्याने हे तुला सांगितले "?


"नाही बाबा मी बोलणे ऐकले ते कोणाशी तरी बोलत होते आणि माझ्यावर कानावर पडले "


"तेच म्हटले आपल्याला तो काही सांगणार नाही कारण तो त्याचा बिसनेस आहे तरी पण त्याला असे चिंतेत पाहून काळजी वाटते म्हणून विचारावेसे वाटते "


"तेच ना बाबा ते खूप टेन्शन मध्ये आहे आपल्याला बोलून नाही दाखवत पण त्याचा चेहरा सगळं सांगून जातो "


"हो हे मात्र तू खरे सांगितलेस त्याचा चेहरा बोलकाच आहे पण त्याच्या आताच्या परिस्थीला आपण पण काही नाही करू शकत "


"हो ना बाबा "


"वसू माझ्या मनात गावाला ला जायचे असे झाले आहे आपण सगळेच एकदा जाऊन आलो तर "


"बाबा हे ऐकतील "?


"तेच ना नाही ऐकणार तो तिथे गेल्यावर मनाशी तरी शांती मिळेल असे वाटते पण हा नाही ऐकणार "


"तेच बाबा आता पण मी शिवाय ला समजावत होती कि बाबा तुझे पहिली खूप प्रेमळ होते आणि अचानक गावाबद्दल बोलणे आले पण मी सावरत त्याला काही कळू दिले नाही "


"पण का वसू त्याला पण आता कळायला हवे तो आता मोठा झाला आहे "


"पण बाबा ह्यांना कळले तर उगीच राग- काढतील म्हणून मी नाही सांगितले"


"काय बोलू आता पूर्वीचा गुणी वामन कुठे हरवला आता फक्त त्यात मला स्वार्थी वामन दिसतो "असे म्हणून आजोबानी डोळ्यात आलेले अश्रू पुसले

"हो आजोबा हो नक्की येईन आता फोन ठेवतो असे म्हणून अमित ने फोन ठेवला


शिवाय त्याला पाहत म्हणाला "काय रे आजोबा वाटत "?


"हो रे सुटी पडल्यावर गावी ये म्हणत आहेत लहान असताना मी मामाकडे जायचो आता मोठा झाल्यावर जाणे जरा कमीच झाले दोन वर्षांपूर्वी गेलो होतो तेच आजोबा म्हणत होते आता तू एकटा हि येऊ शकतोस "


"मग गावी टूर फिक्स तर "


"नाही रे पाहू "?


"म्हणजे "?


"अरे तिथे नेटवर्क काँनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कंटाळा येतो जायला "


हे ऐकल्यावर शिवाय ने अमितला पाहत म्हटले" पण तू गेला नाहीस तर आजोबाना वाईट वाटेल ना ?आणि काही दिवसासाठी गावाची पण लाईफ एन्जॉय कर ना त्यातच एक चेंज मिळेल आणि त्यांना हि बरे वाटेल "


"तसे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण मी तिथे एकटाच पडणार मामा वैगरे कामानिमित्त बाहेर राहतात सुटी असली कि येऊन जातात सध्या आजी आणि आजोबा एकटेच राहतात शिवा तू का नाही येत माझ्याबरोबर "?


"मी "?


"हो तू तसे पण तूला तर गावच नाही आणि माझ्याबरोबर गेलास तर मज्जा येईल ना एकमेकांना कंपनी मिळेल आणि आपला टूर पण होईल "


हे ऐकून शिवाय च्या चेहऱ्यावरचे भाव बदल तो उत्साहित होत म्हणाला "यायला हरकत नाही पण आई बाबाच्या कानावर घालतो तसे हि तुझ्याबरोबर जातो म्हटल्यावर नाही म्हणणार पण एक फॉर्मिंलिटी "


"मी करू का फोन "?


"नाही नाही कन्फर्म समज मी संध्याकाळ पर्यत मेसेज करतो" असे म्हणून शिवाय घरी निघाला तो खूप उत्सुक होता गाव तिथली लाईफ त्याला अनुभवायची होती कारण तो गावी कधी गेलाच नाही आणि त्याच्या मामाचे घर हि शहरात असल्याने त्याने गावपण कधी अनुभवले नव्हते


शिवाय घरी पोचला जेवता जेवता त्याने आईच्या कानावर घातले कारण तो आईशी बाबापेक्षा जवळ होता आईने ऐकून घेतले आणि म्हणाली


"पण शिवाय तू जे जाणे महत्वाचे आहे का ते त्याचे मामाचे गाव आहे तू जाऊ काय करणार आहेस "?


"मग आई काय करू आपण तर कधी कुठे जात नाही आणि मी आता मोठा झालो आहे मी आता मला हवे तसे जगू शकतो कि नाही आणि बरोबर अमित असेल ना टेन्शन का घेतेस "


"बरं मी बाबाशी बोलेन "


"नाही आई मी परवानगी नाही मागतोय नि तुला सांगतोय कि मी जाणार "


"पण शिवा बाबांनी नकार दिला तर "?


"आई मी मोठा झालो आता तुम्ही बोट धरून नेण्याचे दिवस गेले तेव्हा तर आपण कुटुंब म्हणून कुठे गेलो नाही" असे म्हणून शिवाय बाहेर निघून गेला

"तुम्ही बोट धरून नेण्याचे दिवस गेले असे शिवाय च्या तोंडून ऐकून शिवाय च्या आईला वाईट वाटले बाबाच्या परवानगी शिवाय गेला तर काय होईल ह्याची चिंता तिला सतावू लागली ती लगेच आजोबाच्या खोलीत गेली


"बाबा मला तुमच्या शी काही बोलायचे आहे"?


"बोल ना अशी अस्वस्थ का आहेस "?


बाबा असे म्हणत शिवाय च्या आईने आजोबाच्या कानावर गोष्ट घातली ते ऐकून


"मग काय झालं जाऊ दे ना त्याला "?


"पण बाबा हे ऐकतील "?


"हे बघ वसुधा शिवा आता मोठा झाला आहे आता त्याला परवानगी ची गरज नाही आणि तो दुसऱ्या मुलानं सारखा पार्टी करण्यासाठी जात नाही गावी जातो ना मग जाऊ दे आणि बरोबर त्याचा विश्वासू मित्र आहे ना मग काय टेन्शन आहे त्याला पण अनुभवू दे गावपण आणि तो पारवाड ला जातोय तिथून आपला गाव ५० किलो मीटर वर आहे त्यामुळे चिंता नसावी आणि गेला तो आपल्या गावी तर काय बिघडलं आणि त्याला गावची ओढ लागली तर बरेच आहे"


"बाबा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण ह्याचा राग "


"असू दे राग जाऊ दे शिवायला तू चिंता करू नकोस तुम्ही किती हि लपून ठेवले तरी सत्य लपून नाही राहणार "


बाबाचे हे उत्तर ऐकून आईला हि वाटू लागले कि शिवाय ला जायला हवे


रात्रीची जेवणे झाली आणि आईने हि गोष्ट बाबाच्या कानावर घातली


"काय काय गरज आहे परीक्षा संपली म्हणजे सगळे संपले का आणि गावी का जायचे काय करणार आहे गावी जाऊन " बाबांनी शिवायला हाक दिली तसे तो बाहेर आला


"बाबा बोलावले "?


"हो तू म्हणे अमित बरोबर त्याचा गावी जात आहे "


"हो बाबा "


"का काही गरज आहे "?


"बाबा सुटी पडणार आहे अमितला एकटे जाण्यास कंटाळा येत होता म्हणून त्याने मला येण्यास विचारले आणि मी हो म्हणालो "


"वाह म्हणजे त्याने विचारले आणि तू सरळ हो म्हणून मोकळा झालास"


"हो बाबा मला पण गावातली लाईफ पाहायची आहे "?


"काय करणार गावात जाऊन त्यापेक्षा रिस्ल्ट लागल्यावर काय करणार तुला पुढे शिकायचे असेल तर शिक माझा बिसनेस जॉईन करायचा असे तर तो विचार कर ते सोडून त्या गावात जाऊन काय करणार आहेस "


"बाबा मी फक्त आठ दिवस राहून येणार आहे मी काही कायमचा नाही जात आहे आणि तिथून आल्यावर मी तुमच्या म्हणण्यावर नक्कीच विचार करिन "


"म्हणजे तुझे जाणे ठरले तर "?


"हो बाबा आम्ही परवा निघतोय आणि ट्रेन ची तिकीट पण बुक केली आहे "


"म्हणजे स्वतः सगळं ठरवून मोकळा झालास "


"बाबा मी आता मोठा झालो आहे काय बरे काय वाईट ह्याची जाणीव मला आहे आणि मी असे काही करणार नाही ज्यामुळे तुमचे नाव खराब होईल" असे सांगून शिवाय निघून गेला बाबा त्याच्याकडे पाहत राहिले "सगळं सामान व्यवस्तिथ घेतलेस ना "?


"हो आई "


"पोहोचल्यावर फोन कर नाही तर विसरशील "


"नाही करेन मी फोन करेन "


"आजोबा नमस्कार करतो"


"हा बाळा सावकाश जा पोचल्यावर फोन कर आणि काळजी घे "


"हो "


"झाली तयारी निघण्याची"?


"हो बाबा अमित मला स्टेशन वर भेटणार आहे "


"मग मी सोडतो तुला मी तसाच जाणार आहे "


"नाही बाबा मी टॅक्सी ने जाईन "


"नाही नको चल "असे म्हणून दोघेही हि कार मध्ये बसले


शिवाय च्या चेहऱ्यावरचा आनंद जाण्याची उत्सुकता पाहून गंभीर होत बाबा म्हणाले "शिवाय तू तिथे जातोस पण हे विसरू नकोस कि आपले जग वेगळे आहे आपण शहरात राहणारी माणसे आहोत गाव निसर्ग संप्पन असेल पण ते करियर नाही घडवू शकत आणि इथे तिथे फिरत राहू नकोस गावातल्या लोकांशी मोजकेच बोल समजले "


"बाबा सॉरी पण मला असे वाटते कि माझ्या गावी जाण्याने तुम्ही खूप पोससिव्ह झाला आहात "


"नाही नाही अजिबात नाही मला फक्त तुझे मन भरकटू द्याचे नाही गावात फ्युचर नाही हे लक्षात ठेव"


एवढ्यात स्टेशन आले बाबानी शिवाय चा निरोप घेतला व कार निघून गेली


शिवाय पुढे चालत स्टेशनवर आला तर त्याला अमित त्याची वाट पहाताना दिसला दोघेही हसत हसत भेटले अमित ने शिवाय ला पाहत म्हणाला "शिवाय फायनली आपण मज्जा करणार " एवढ्यात ट्रेन आली दोघेही आत शिरले आणि आपल्या डब्यात जाऊन बसले आणि ट्रेन सुरु झाली .........

ट्रेन सुरु झाली आणि पळती झाडे दिसू लागली दोघेही खूप खुश होते एक तासात ट्रेन स्टेशन वर पोहचणार होती दोघांच्या गप्पा गोष्टी सुरु झाल्या फोटो काढणे सोशल मीडियावर अपलोड करणे सुरु च होते त्यात शिवाय ने घरी फोन केला त्याचा चेहरा गावभेटी साठी उत्सुकत झाला होता आणि गाडी येऊन स्टेशन वर उभी राहिली दोघेही ट्रेन मधून उतरले अमित ने शिवायला पाहत म्हटले


"शिवा इथून टॅक्सी नाहीतर बस पकडावी लागेल आपण टॅक्सी ने च जाऊ कारण बस चे टायमिंग मला माहित नाही "


"अमित समोर टॅक्सी आहे त्याला विचारू असे म्हणून दोघेही टॅक्सी जवळ गेले भाडे निश्चित करून टॅक्सीत बसले आणि प्रवास सुरु झाला


शहरांतून गाडी गावाच्या दिशेने वळली दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडे आणि मधून रस्ता असा प्रवास सुरु झाला शिवाय अमित शी काही न बोलता तो परिसर पाहण्यात व्यस्त होता मधेच मोबाईल मध्ये फोटो काढत होता अमितला पण ते कळले म्हणून त्याने त्याला काही न विचारता गप्प राहणे पसंद केले गाडी येऊन थांबली तसे अमित ने शिवाय ला सांगितले शिवा आपण पोहचलो ते समोर दिसते ते घर आहे असे म्हणून दोघेही टॅक्सी तुन उतरले अमित पुढे आणि शिवाय मागे असे दोघी चालू लागले


अमित चे आजी आजोबा घराच्या सोफ्यावर वाट पाहत बसले होते त्या दोघांना पाहतच ते पुढे आले आणि आजी आणि आजोबा नि अमित ला मिठी मारली ते पाहून शिवाय च्या डोळ्यात पाणी आले अमित ने त्याच्या पाया पडला आणि शिवाय कडे पाहत म्हटले "आजी आजोबा हा माझा मित्र शिवाय आणि शिवाय हे माझे आजी आजोबा शिवाय"शिवाय ने ने लगेच त्याच्या पाया पडला हे पाहून


"अरे राहू दे बाळा शिवाय वाह देवाचे नाव ओम नमः शिवाय "


"चला आत या" असे म्हणून आजोबानी त्यांना त्याची खोली दाखवली तो पर्यंत आजी किचन मध्ये गेली होती हात पाय धुऊन दोघेही हॉल मध्ये बसले तसे आजी डिश घेऊन बाहेर आल्या आजी ने केलेल्या पुरी आणि उसळीवर दोघांनी ताव मारला दोघांना अराम करा असे सांगून आजी आजोबा आपल्या कामात व्यस्त झाले आजी आजोबाच्या चेहेऱ्यावर आनंद पसरला होता


संध्याकाळी झोपून उठल्यावर आजीने गरमागरम घावणे आणि चहा दिली ते पाहून अमित म्हणाला "आजी आता आणि हे कशाला करत बसलीस उगीच त्रास करून घेतेस "


"अरे तू किती वर्षांनी आलास मग घेऊ दे ना थोडा त्रास नेहमी आम्ही असेल तेच खातो आज तुमच्या निमित्ताने आम्ही पोट भर जेऊ"


हे ऐकून शिवाय म्हणाला "मग आजी तुम्ही आणि आजोबा पण आमच्याबरोबर बसा ना "


"अरे बाळा तुम्ही खा तुम्हला पाहूनच आमचे पोट भरले आहे "


एवढ्यात आजोबा अळू वडी करण्यासाठी पाने घेऊन आले आणि चार हि जण गप्पा गोष्टी करण्यास बसले गप्पा गोष्टी चालू होत्या आजोबा शिवायला म्हणाले


"बाळा तुझ्या घरी कोण कोण असते "?


"आजोबा मी आणि माझे आई बाबा "


"आजोबा राहतात तुमच्याबरोबर मस्त आहे "


"शिवाय बाळा तुझे गाव कुठले "?


"नाही आजोबा मला गाव नाही म्हणजे माहित नाही "


"म्हणजे तुम्ही कधी गावी गेला नाही "?


"कधी गेलोच नाही आजोबानी हि कधी सांगितले नाही ना ते कधी गेले "


"म्हणून तर मी त्याला इथे घेऊन आलो आजोबा "


"बरे केलेस आणि शिवाय तू गाव नाही असे म्हून नकोस तू हि आमचा नातू आहेस जसा अमित तसा माझ्यासाठी तू आहेस "


असे म्हणून आजोबानी त्याला जवळ घेतले ते पाहून तो शिवाय हसत अमित ला म्हणाला "अमित तू खूप लकी आहेस तुला असे आजी आजोबा मिळाले जे मला ओळख नसताना सुद्धा आपलेसे केले ""देवा बापाला गावाची ओढ नाही पण पोराला लागली हे पाहून मन भरून आले असे म्हणून आजोबांनी आपले डोळे पुसले एवढ्यात शिवाय ची आई आत आली ती नि ते पहिले


"काय झालं बाबा तुम्ही रडता "?


आपला चष्मा ठीक करत आजोबा म्हणाले "नाही वसू अग सहज अश्रू आले "


"बाबा कारणाशिवाय अश्रू येत नाही "


"काही नाही वसू अग पहा ना वामन ला गावाची ओढ नाही पण आपल्या शिवायला गावाची ओढ पाहून बरे वाटले "


"होय बाबा खरे बोलता तुम्ही त्याला गावाकडे जाण्याचा केवढा आनंद झाला होता आणि हो बाबा आताच त्याचा फोन आला होता कि तो गावात पोचला आणि तो सांगत होता कि अमित चे आजी आजोबा एवढे प्रेमळ आहेत कि काही क्षणात च त्यांनी त्याला आपलेसे केले"


"काय वाह फार छान म्हणजे आपला शिवाय गावकरी झाला असेच देव त्याला गावाची ओढ लावू दे "


रात्रीच्या जेवणास शिवाय चे आई बाबा आणि आजोबा बसले होते बाबांनी आईला विचारले ""शिवाय चा फोन आला होता का मी लावत होतो नॉट रिचेबल येत होता


"नाही केला त्याने फोन रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणत होता अमितचे आजी आजोबा खूप चांगले आहेत काही क्षणात आपलेसे केले असे म्हणत होता"


"हो का जास्त वाहत जाऊ नकोस म्हणून सांग काही झाले तरी ते लोकच ह्याला आधी काय हौस गावात जाण्याची काय माहित "


हे ऐकून आजोबांनी एकाने नजरेने शिवाय च्या बाबाकडे पाहत म्हटले "असते काहीजणांना आवड नाहीतर काही जण आपला गाव आपले मूळ विसरून जातात "


" बाबा तुम्हला नाही वाटत तुम्ही मला टोमणे मारत आहात "


"अजिबात नाही तुला का वाटत मी तुला म्हणतोय म्हणून मी आपले सहज माझ्या नातवाचे कौतुक करत आहे त्याची गावाकडची ओढ पाहून मी हि खुश आहे "


"करा कौतुक राहा खुश पण लक्षात ठेवा त्याला आपले गाव नाही ह्याच भ्रमात राहू द्या" असे म्हणून शिवाय चे बाबा रागात निघून गेले "सर आपण कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू नका ह्या महिन्यात आम्ही कंपनीला पूर्वत आण्याचा प्रयत्न करू "


"सॉरी मिस्टर वामन तुमच्या कंपनीचा ग्रोथ पाहत आम्हाला तुमच्याबरोबर काम नाही करायचे तुमच्या डी -ग्रोथ मुळे आमच्या कंपनीवर परिणाम होईल "


"पण सर जेव्हा तुम्ही स्वतः माझ्याकडे तुमच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला होता त्यावेळी तुम्ही वी आर फॉरेव्हर पार्टनर असे म्हणाला होतात मग त्यावेळीचा विश्वास आज का नाही "


"तुमचे बरोबर आहे मिस्टर वामन पण त्या वेळी आणि आता फरक आहे त्या वेळी तुम्ही सरस होतात कोणी हि तुम्हला त्या जागेवरून हटवू शकत नाही असे वाटत होते पण आता नाही आज तुमची पोसिशन पाहून तुम्ही त्या सरस स्पर्धेत हि नाही आहात "


"सर एकदा विश्वास ठेवून पहा "


"सॉरी मिस्टर वामन व्यक्तींक्त असते तर ठेवला हि असता पण कंपनी चा प्रश्न आहे आणि हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला आहे दोन दिवसात आपले कॉन्ट्रॅक्ट आपण रद्द करूया मी तुम्हला पेपर्स पाठवून देतो "असे म्हणून ती व्यक्ती निघून गेली


ती व्यक्ती जातात शिवाय च्या बाबांनी डोक्याला हात लावला "अजून एक कॉन्ट्रॅक्ट गेले आता काय होणार अचानक अशी साडेसाती लागली कि काही करू शकत नाही आता ह्या व्यवसाय जगात माझा व्यवसाय कसा म्हणून टिकेल "ह्याच टेन्शन मध्ये शिवाय चे बाबा घरी पोहचले


"अग वसू तू जेवून घे तो उशीरा येत असेल म्हणून काहीतरी खाऊन येत असेल"


"नाही बाबा थोडावेळ वाट पाहते तुम्ही झोपा"


"नाही मी बसतो तो आल्यावर जाईन "


"बाबा नको तुम्ही जा झोपा ते येतील "


एवढ्यात दरवाजाची बेल वाजली


"बाबा आले वाटत" असे म्हणून शिवाय च्या आईने दरवाजा उघडला


"आलात पटकन आवरून या मी जेवण वाढते "


"नाही नको मला भूक नाही "


"का कशी कशी भूक नाही"


"एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही नको म्हणून कशाला हजार प्रश्न विचारते "?


हे ऐकून आजोबांनी रागात बाबाकडे पाहत म्हटले "काळजी आहे तिला तुझी म्हणून ती विचारते म्हणून तुझ्यासाठी उपाशी राहिली आहे "


"हे बघा मी तिला नाही सांगितले कि उपाशी राहा म्हणून ती जेवू शकते "


उगीच वातावरण तापू नये ह्यासाठी आई मध्येच म्हणाली "जाऊ दे ना बाबा "


"वसू त्याला भूक नसेल पण तू जेवून घे मी झोपतो" असे म्हणून आजोबा गेले


शिवायचे बाबा रूम मध्ये गेले आणि खुर्चीवर बसून विचार करत बसले आई लगेच आत गेली नाही तिला बाबाचा राग माहित होता आईने कशी बशी एक चपाती खाल्ली आणि रूम मध्ये आली तर बाबा ख्रुचीवर बसलेले दिसले काही झाले तरी बाबांची काळजी तिला सतावत होती म्हणून तिने बाबांना विचारले


"काय झाले कसे का बसला आहात झोपायचे नाही का"?


"वसू माझी झोप उडाली आहे "?


"म्हणजे"?


"अजून एक कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट हातून गेले "


"काय"?


"माहित नाही कुठली साडेसाती लागली आहे "ह्यावर मात्र आई गप्पच राहिली सकाळची वेळ होती आजोबासाठी आई चहा घेऊन गेली आईला पाहत आजोबा म्हणाले


"गेले का महाराज ऑफिस ला "?


"हो बाबा आताच गेले "


"काय झालं एवढा का रागात होता आपली बायको आपल्या साठी उपाशी वाट पाहत असेल ह्याचे त्याला काहीच पडलेले नाही "


"नाही बाबा ते थोडे टेन्शन मध्ये होते "


"कसले टेन्शन "?


"बाबा आणखी एक कंपनी ने कॉन्ट्रॅक्ट रद्द केले म्हणून ते टेन्शन मध्ये होते आधीच कंपनी लॉस मध्ये आहे आणि त्यात आणखी एक धक्का म्हणून चिडचिड सुरु आहे "


"हे सर्व त्याने आपणच ओढावून घेतलेले आहे पहिली तो कसा होता हे मी तुला सांगायला नको बिसनेस ज्या गर्वा पोटी त्याने आपला मूळ स्वभाव सोडला सगळे काही सोडले फक्त पैसा हेच त्याच्यासाठी मोठे झाले आणि आज तोच पैसा जातो म्हटल्यावर तो चिडचिड करतो "


"बाबा तुम्ही म्हणतात ते पटत मला पण त्यांना कोण समजवणार त्याच्यात काही वर्षात झालेला बदल पाहता मलाच आश्चर्य वाटत आहे "


"हो त्याला कोण समजवणार जाऊ दे तू नको लक्ष देऊ आपल्या शिवा चा फोन आलं होता का "?


"नाही बाबा काल केला होता तेव्हडाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना "


"हो असू दे तिथे तो रमला हेच पाहून बरे वाटले "


"चला बाबा मी जेवणाचे पहाते " म्हणून आई किचन कडे वळली


तिथे शिवाय पारवाड मध्ये अमित च्या आजी आजोबा बरोबर गुंतला होता तिथे वातावरण त्याच्या मनात घर करून केले होते अश्याच संध्यकाळी अमितचे आजी आजोबा आणि ते दोघे गप्पा गोष्टी करत होते आणि अमित चे आजोबा म्हणाले


"पोरांनो उद्या मी माझया मित्राकडे शिवगड ला जात आहे तुम्ही पण चला तेवढे ते गाव पण तुम्ही पाहाल खूप सुंदर गाव आहे आपण नक्की जाऊया "


"शिवगड "


"हो शिवगड "


नाव ऐकून दोघेही खुश झाले एकमेकांना हात देत "एस लेट्स गो टू शिवगड "

सकाळ उजाडली नेहमी पेक्षा लवकरच अमित आणि शिवाय उठले ते पाहून आजोबा म्हणाले "अरे तुम्ही दोघे उठलात "


"हो आजोबा आम्ही खूप एक्ससाईडेड आहोत शिवगड ला जाण्यासाठी "


"अरे अरे थांबा पहिली तयारी करा नाष्टा करू आणि मग निघू असे सांगून आजोबा तयारी करण्यासाठी निघून गेले त्या दोघांनी पटापट तयारी केली तोपर्यंत आजीने नाष्टा तयार केला


तिघांनी नाष्टा केला तो पर्यत त्यांनी गाडी सांगितली होती ती आली पटापट आवरून दोघेही गाडीत बसण्यास गेले ते पाहून आजी म्हणाली "कितीहा उत्साह पाहून मला तर तुम्ही लहान मुलं वाटत आहात पण चालायचं हा गेल्यावर तिथेच राहाला हा आजी संध्याकाळी वाट पाहिलं लक्षात असू द्या "


ह्यावर दोघेही हसत हसत म्हणाले "तू पण काहीही हा आम्ही तुला विसरू शकतो का "


"नाही रे बाळांनो मी मस्करी केली रे सावकाश जा "


"आजोबानी येतो" असे म्हणून गाडी सुरु झाली हिरव्या गार झाडाच्या मधून गाडी धावत धावत शहरात जाण्याऱ्या रस्त्यावर आली गप्पा गोष्टी हि सुरु होत्या एक दोन शहर सोडल्या नंतर एक मोठा बोर्ड दिसला त्यावर लिहिले होते शिवगड आणि गाडी त्या दिशेने धावू लागली चार हि बाजूनी हिरवळ शांत पश्याच्या आवाज ह्या वातावरणात गाडी जात होती मधेच दोघे हि थांबले काही फोटो काढले आजोबाना हि त्यांनी आपल्या सेल्फीत सहभागी केले हे पाहून आजोंबा हि बरे वाटले आणि परत एकदा प्रवास सुरु झाला आणि ड्रायव्हरला थांबण्यासाठी सांगितले आजोबानी त्यांना पाहत म्हटले


"बाळांनो उतरा पहिले देवाचे दर्शन घेऊ मगच पुढे त्याच्या घरी जाऊ "


तसे आजोबा आणि ते दोघे उतरले भले मोठे कंपाउंड होते त्याच्या भल्या मोठ्या दरवाजातून ते आत गेले


आजोबानी मंदिर दिसताच "हर हर महादेव शिव शंभो "अशी हाक दिली अमित ने हि आजोबाच्या हाकेला साद दिली पण शिवाय मात्र त्या मंदिराकडे पाहून चकित झाला

शिवाय ची आई सकाळी बाबा ऑफिस ला गेल्यावर आवारात होती एवढ्यात तिला काठीचा आवाज आला ते पाहत ती म्हणाली


"बाबा तुम्ही इथे का आलात मी तुमचाच चहा घेऊन रूम मध्ये येत होते "


"नको वसू अग इथे यायला काही त्रास नाही आणि तुझ्या डोक्याला कमी ताप नाही आणि त्यात माझी सेवा "


"बाबा असे का म्हणता तुम्ही मला कसला त्रास आणि सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे "


"पण वसू माझे घरातले एकटी कशी करतेस त्यात वसू हल्ली वामन च वागणं पाहून मला आता चिंता होऊ लागली आहे काल मी त्याच्या नकळत त्याला न्याहाळत होतो त्याच्या चेहऱ्यावर अजब असे भाव दिसत होते आतून खूप खचला असा जाणवत होता "


"होय हो बाबा बिसनेस मध्ये चालत असेलल्या लॉस मूळे त्यांना टेन्शन आले आहे बिसनेस बंद पडण्याची भीती त्यांना सतावत आहे अचानक झालेला हा बदल त्याच्यासाठी खूप त्रासदायक आहे "


"बरोबर बोलतेस वसू आपला वामन कसा होता ना आणि आता कसा आहे पहिली कुटूंबाच्या पुढे त्याचे विश्व् नव्हते पण जेव्हा पासून प्रगती चे खूळ डोक्यात शिरले तेव्हपासून फक्त काम आणि आपले नाव टिकवण्यातच आपला वेळ घालवला त्यात मग त्याला ना शिवाय चे बालपण जगता आले ना त्याच्या मनात आपल्यासाठी जागा "


"पण बाबा त्यांनी हे सर्व आपल्या आणि शिवाय च्या भविष्यासाठीच केले होते ना "?


"हो माणसाने प्रगती करावी पण त्यात वेळ आपलेपणा पण असायला हवा ह्या काही वर्षात त्याच्यात जी बिसनेसमन असण्याची गुर्मी चढली आहे ती पाहता त्याच्यासमोर आपण पण शून्यच आहोत असे वाटते पहिली तुझ्यासाठी वेळ काढणे तुला बाहेर फिरायला नेणे तो करायचा ह्या काही वर्षात तो एकांत मिळाला का तुम्हाला? नाही म्हणता तो बिसनेस पार्टीला तो नेतो पण तिथे हि तो तुझ्याबरोबर गेला तरी त्याच वातावरणात मिसळतो माझी विचारपूस करायला हि त्याला वेळ नाही आणि शिवाय च तर काही सांगूच नकोस ना कधी तो त्याच्या शाळेत गेला ना त्याचा अभ्यास घेतला मग त्याला त्याची ओढ कशी असेल पैसा आला पण आपलेपण घेऊन गेला ज्या पैशानी त्याला नाव दिले तोच पैसा परत जातो म्हटल्यावर त्याची चिडचिड सुरु झाली आणि वसू आपले सोड ज्या देवासमोर आपण नतमस्तक होतो त्याला हि त्यांनी पैशात मोजले


"हो बाबा माझ्या पण डोक्यात काल तेच चालू होते त्या दिवसाची शिक्षा ह्यांना आज तर मिळत नाही ना "?

त्या दिवसाची शिक्षा ह्यांना आज तर मिळत नाही ना "?


"काय माहित वसू असू शकते त्यांनी त्या गुर्मीत काय काय करून बसला आहे ह्याची त्याला हि जाणीव नसेल काल पासून मनात एक इच्छा येत आहे कि आपण सगळेच गावी जाऊन एकदा देवाचे दर्शन करून आलो तर "?


"हो बाबा मला पण असेच वाटते तेवढे मनाला समाधान पण हे ऐकतील "


"वसू तू बोलून बघ काय म्हणतो ते पहा त्याला यायचे नसेल तर आपण शिवा आला कि जाऊन येऊ"


"हो बाबा मी आजच बोलते "


"वसू मी बोललो असतो पण त्याला माझे म्हणे न पटणारे आहे आता माझे म्हणे त्याला पुरोगामी वाटते त्यामुळे उगीच शब्दाला शब्द नको "


"नाही बाबा तुम्ही नको मी बोलेन "असे म्हणून आईने आजोबांना चहा दिला आणि आजोबा आपल्या खोलीत गेले


एवढ्यात दरवाजाची बेल ऐकू आली आई ने दरवाजा उघडला तर


"तुम्ही "?


"हो "


"काय झालं तुम्ही घरी "


"नाही थोडे डोके दुखत आहे म्हणून आलो "असे म्हणून बाबा आत गेले आणि बेडवर पडले त्याच्यामागोमाग आई गेली डॉक्टर ला फोन करते


"नाही नको तसे काही गंभीर नाही आहे फक्त डोके दुखत आहे थोडा वेळ झोपलो कि ठीक होईल "


"अहो उगीच नका हो टेन्शन घेऊ मला माहित आहे टेन्शन मुळेच हे सर्व होत आहे जाऊ द्या कंपनी गेल्या त्या जाऊ दे दोन घास मिळाले तरी आपण खुश राहू पण उगीच जीवाला त्रास नको "


"तुला म्हण्याला सगळं सोपे आहे वसू माझे नाव माझी प्रतिष्ठा एकदम धुळीस मिळायला लागली आहे आणि मी गप्प राहून पाहत बसू वामन देवधर एवढ्या वर्षात कधीच हरला आणि हरणार हि नाही मी नेहमी जिंकत आलॊ आहे आणि मी जिंकणार "


"पण आरोग्याशी अवहेलना करून नको असली प्रतिष्टा "


"नाही वसू प्रतिष्ठा माणसाला जगात जगवते आणि माझी प्रतिष्टा नाही राहिली तर काय फायदा माहित नाही अचानक असे धक्के मिळायला लागले आहेत ज्याची कल्पना पण मी कधी केली नव्हती "


"माझं थोडे ऐका आपण काही दिवस गावी गेलो तर एक तर मनाची शांती लाभेल आणि देवाचा आशीर्वाद पण लाभेल "


"काय गावी वेडी झाली आहेस का मी तिथे जाऊन काय फरक पडणार आहे मी जे काही कमवले ते माझ्या जोरावर आणि त्या गावात जाऊन मनाला शांती नाही अशांती भेटेल आणि हे तुला बाबांनी सांगितले असेल मला विचार म्हणून पण त्यांना सांग मी जे उभे केले आहे ते माझ्या मेहनतीवर त्यावर नाही त्या गावाचा हक्क आहे ना त्या देवाचा "


"अहो असे काही वेडे वाकडे बोलू नका आपले कुलदैवत आहे आज आपण काही आहोत ते त्याच्या कृपेमुळेच "


"अंधश्रद्धा आणि काही नाही मी काही गावी येणार नाही आणि हो शिवाय ला हि ह्या जाळ्यात ओढू नका "

आजोबानी मंदिर दिसताच "हर हर महादेव शिव शंभो "अशी हाक दिली अमित ने हि आजोबाच्या हाकेला साद दिली पण शिवाय मात्र त्या मंदिराकडे पाहून चकित झाला तिघांनी आत प्रवेश घेतला


गाभाऱ्यातील मूर्तीचा प्रकाश शिवाय वर पडला आणि मूर्ती पाहून शिवाय अजून चकित होऊन पाहू लागला तरी त्याने काही न बोलता आजोबा आणि अमित बरोबर दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा काढून बसले आजोबा डोळे मिटून बसले अमित ने मोबाईल काढला आणि मूर्तीचा फोटो काढण्यास लागला शिवाय आपल्या विचारात इथे तिथे पाहत होता


अमित ने त्याला त्याचा एकांत दिला कारण त्याला जाणवले होते कि काहीतरी आहे जो तो शोधत आहे एवढ्यात मंदिरात लावलेल्या पाटीवर नाव वाचून तो परत परत वाचू लागला त्याला काही कळेना से झाले त्याने अमितला हाक मारली आणि विचारले


"अमित ह्या पाटीवर हे नाव वाच "


"वसंत गणेश देवधर "काय झालं देवधर म्हणून का ?


"नाही रे अमित हे माझ्या आजोबांचे नाव आहे "


"काय आजोबांचे पण ते इथे अरे आले असतील ते कधी येते आणि देणगी वैगरे दिली असेल म्हणून नाव असेल त्यांचे "


"पण आजोबा कधी आले असतील कधी बोलले नाही "


"अरे गेल्यावर विचार ना "


आजोबा डोळे मिटून बसले होते पण त्याचे लक्ष ह्याच्या बोलण्यावर गेले तसे ते उठले आणि आजोबा तिथे आले


"काय झाल "?


"आजोबा हे नाव आहे ते शिवाय च्या आजोबांचे आहे तो चकित झाला पाहून मी म्हटले कि आले असतील कधी दिली असेल देणगी वगैरे "


"कुठलं पाहू असे म्हणून आजोबानी आपला चष्मा चढवला आणि वाचले वसंत गणेश देवधर -पूजेचे मानकरी "


"हेच ना वसंत गणेश देवधर अरे तुम्ही तर ह्या मंदिराच्या पूजेचे मानकरी आहात "


"मानकरी "?


"हो अरे म्हणजे तुझ्या आजोबांना देवाची पूजा करण्याचा मान आहे आणि त्याच्यानंतर तो मान तुझ्या वडिलांना किंवा तुला मिळेल "


"पण आजोबा कधी म्हणजे ना आजोबाच्या तोंडून मी कधी ऐकले आहे ना घरात कधी असे बोलणे झाले आणि मी तर ह्या गावात आजच येत आहे पण अमित मी तुला त्या स्वप्नाना बद्दल सांगितले होते ना "


"हा शिवाय त्याचे काय "?


"अरे ते मंदिर हेच होते आणि हीच ती मूर्ती "


"काय म्हणजे आपण जे इंटनेटवर शोधले होते ते खरे होते इट्स रेलटेड टु युवर पास्ट "म्हणजे तुझा पास्ट इथेच आहे "


"पण अमित मला ह्या बद्दल काहीच माहित नाही कि आजोबांचे नाव इथे कसे आहे"


"काळजी करू नकोस बाळा आपण माझ्या मित्राच्या घरी जाऊ त्याला माहित असेल" असे म्हणून तिघेही मंदिरातून बाहेर पडले

मंदिरातून तिघेही बाहेर पडले आणि आजोबाच्या मित्राच्या घरच्या दिशेने वळले पुढे आजोबा मागे अमित आणि शिवाय शिवाय ला कधी एकदा आजोबाच्या मित्राच्या घरी जाऊन खरे कळते असे झाले होते आणि घर आले आजोबानी बाहेरून हाक दिली


"नमस्कार आत येऊ का दामोदरा "


"अरे या या मी तुझीच वाट पाहत होतो बसा बसा आणि हे दोघे कोण "


"दामोदरा हे माझे दोन्ही नातू आणि हा माझा मित्र दामोदर "


"वाह म्हणजे आज आजोबांबरोबर सैर वाटत केशवा हि कोणाची मुले सुधीर ची कि आपल्या सुधा ची "?


"हा सुधाचा मुलगा आणि हा त्याचा मित्र म्हट्लवर माझाच नातू ना "


"अरे हो हो आमचा केशव म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेणारा मग काय म्हणतोस केशवा कसे चालले "


"बरे आहे मी येत होतो ह्यांना म्हटले कि तुम्ही पण चला आणि दोघेही उत्साहित नाही म्हणाले नाही "


एवढ्यात दामोदर आजोबानी आत हाक दिली तसे चहा घेऊन आजी येत म्हणाली


"बरं केलास आलात ते आमचे गाव तरी पहिले आणि हो मंदिरात जाऊन आलात ना काय आहे ना इथे कोणीही आले तरी पहिली देवदर्शन मग घरच्या गाठी भेटी तशी आमच्या शिव शंभो ची कृपाच आहे "


"हो वाहिनी जाऊन आलो "


"बसा हा जेवूनच जा "असा आग्रह करून आजी आत गेली हे पाहून केशव आजोबा म्हणाले


"दामोदरा एक विचारायच होत"?


"विचार ना "


"तू वसंत देवधर ना ओळखतोस "?


"वसंत देवधर ना "


"अरे हो का रे "?


"नाही त्याच्या नावाची पाटी वाचली मंदिरात म्हणून विचारले "


"हो त्यांना पूजेचा मान आहे पण काय फायदा एवढे पुण्याचे काम असून सुद्धा ती लोक कुठे येतात "


"पुण्याचे काम "?


"हो बाळा सगळ्यांनाच नाही मिळत पूजा करायला ती सुधा गाभाऱ्यात नशीब लागते असे पुण्य कार्य मिळण्यासाठी पण त्यांना काही पडलेलेच नाही "


हे ऐकून शिवाय चा चेहरा गंभीर झाला ते पाहून केशव आजोबा म्हणाले


"दामोदरा हा त्या वसंत देवधारचा नातू आज मंदिरात नाव वाचून खूप चकित झाला कारण त्याला ह्या बदल काहीच माहिती नाही आणि तो ह्या गावात हि पहिलीच वेळ आला आहे "


"वसंताचा नातू म्हणजे तू वामन च मुलगा "?


"हो आजोबा माझे नाव शिवाय आहे "


"शिवाय वाह शिव शंभो चा आशीर्वाद पण बाळा दुर्देव आहे तुमचे कि एवढे पुण्याचे कार्य मिळून हि तुम्ही त्याला लाथाडत आहात "


"पण आजोबा मला काहीच माहित नाही म्हणजे मला लहान पणा पासून हेच सांगण्यात आले आहे कि आमचे गाव नाही आणि शिव गड बद्द्ल मी कधी ऐकले नव्हते आणि आजोबानी हि कधी सांगितले नाही आजोबा तुम्हाला माहित आहे का माझ्यापासून हे का लपवले "?

"आजोबा मला काहीच माहित नाही म्हणजे मला लहान पणा पासून हेच सांगण्यात आले आहे कि आमचे गाव नाही आणि शिव गड बद्द्ल मी कधी ऐकले नव्हते आणि आजोबानी हि कधी सांगितले नाही आजोबा तुम्हाला माहित आहे का माझ्यापासून हे का लपवले असेल "?


"बाळा कदचित तुझ्या बाबा मुळे आजोबानी सांगितले नसेल "


"बाबा मुळे"


"हो कारण च तसे आहे तुझे आजोबा भले माणूस काही वर्षांपूर्वी पोटापाण्यासाठी तुझ्या आजीला घेऊन शहरात गेले आणि तिथेच स्थयिक झाले इथे त्याची आई आणि बाबा राहत असत पण सुटी काढून ते न चुकता गावी येत मग नित्य नियमाने मंदिरात देवाची पूजा करणे असायचे तुझे बाबा तेव्हा लहान तो हि गाव फिरत खेळत असायचा तुमचे घर कसे तेव्हा गजबजलेले असायचे "


"आमचे घर" ?


"हो बाळा इथेच जवळच तुमचे घर आहे पण कित्येक वर्ष बंद असल्याने आता मोडकळीस आले आहे ते पाहून खूप वाईट वाटते आता त्या घराला ना माणसाचा सहवास आहे ना माणसाचा आवाज फक्त तिथे पक्ष्यांची शाळा भरते आता आपल्या माणसाच्या आठवणीने ते घर कोलमडून गेले असावे पहिली तुमच्या घराबाजूनी जात असत तेव्हा रेडिओ चा आवाज येत असे तुझ्या पणजोबा नंतर तुझे आजोबा त्या बंद घराला सुटीत आल्यावर जीवदान देत असत त्या दिवसात तुमचे घर परत खुलून जाई ती परंपरा तुझ्या बाबांनी पण चालवली होती सुटी घेऊन आजी आजोबा सह तुझे बाबा गावी येत एक दिवस त्याचा साफ सफाईत जात असे तुझे बाबा लग्नानंतर हि तुझ्या आईला घेऊन आले होते तुझी आई हि गावात आणि माणसाबरोबर मिसळी होती तुझे बाबा गावी आल्यावर सगळ्याच्या घरी जाऊन विचारपूस करत असत पण मग त्याने काही व्यवसाय सुरु केला आणि त्याची ती गुर्मी त्याला एव्हडी चढली कि तो रुबाब गावात दाखवू लागला लोक हि त्याच्या मध्ये झालेला बदल पाहून चकित झाले कारण नेहमी सगळ्यांना हसत हाक मारणारा मग पुढ्यात पाहून हि आपल्या तोऱ्यात राहू लागला लोकांनी हि त्याचा कडे बोलणे टाळले एवढ्या पूर्ती बरे होते पण त्याची गुर्मी एव्हडी वाढली कि त्याने एकदा कहरच केला "


"कहर असे काय केले बाबांनी "?

"कहर असे काय केले बाबांनी "


"सांगतो बाळा तुला हे सर्व कळायला हवे मंदिरात वर्षांनी एकदा वर्धापन दिनी महापूजा असते तुझे पणजोबा शिव भक्त होते मंदिर उभे करण्यात त्याचा मोठा वाटा होता जिथे आज मंदिर उभे आहे ती जागा तुझ्या पणजोबांनी मंदिरा साठी दिली तेव्हा पासून तो पूजेचा मान तुमच्या कुटूंबाला मिळाला पणजोबा नंतर तुझे आजोबा महापूजा करू लागले महापूजेच्या आधी आठ दिवस तुझे आजोबा गावात येत असत ते हि न चुकता मग वयामुळे तुझे बाबा पूजेस बसू लागले तुझे बाबानी हि कधी पूजा चुकवली नाही पण एका वर्षी जे कोणीच विचार हि न केला असेल असे घडले चार दिवस पूर्वी येणारे तुझे बाबा पूजेच्या आदल्या दिवशी आले तो पर्यंत आजोबानी आणि आम्ही सगळ्यांनी तयारी गेली होती कारण तुझे बाबा तेव्हा बिसनेसमॅन झाले होते त्याला वेळ मिळत नव्हता पण आम्ही समजून घेतले पूजेचा दिवस उजाडला मंदिर फुलांनी आणि रोषणाई ने भरून गेले होते भक्तिगीतांनी परिसर गजबजून गेला होता ठीक १० वाजता पूजा सुरु झाली तुझ्या बाबांना पूजा आटोपून परत शहरात जायचे होते पूजेसाठी दोन तास लागणार होते मग परत महाप्रसाद म्हणून ते लवकर पूजा करा असे गुरुजींना सांगत होते पण गुरुजी ने दोन वेळा त्यांना ऐकून घेतले मग त्यांना शांतपणेने सांगितले


"शांत बसा यजमान पूजा हि शांततेत करायला हवी "पण तुझ्या बाबाचा लक्ष फक्त घड्याळाकडे होता गुरुजींनी ने त्याला पूजेच्या विधी सांगितल्या तर तुझे बाबा काही वेगळेच करत होते हे पाहून गुरुजीनी त्यांना सांगितले


"वामन लक्ष असू दे पूजेत उगीच घाईगडबड चुकीची पूजा नको करुस करून काही फायदा नाही "


हे ऐकून तुझ्या बाबांना राग आला ते पाटावरून उठले आणि सरळ गुरुजींना म्हणाले


"मला असे टाईम पास करायला वेळ नाही हे करा ते करा दोन तास कशाला हवे पूजेला लवकर आटपा "


त्याचे ते असे बोलणे ऐकून आम्ही सगळेच चकित होऊन पाहू लागलो तुझ्या आजोबानी बाबांना विचारले "वामन हे तू काय बोलतोस कळत तुला तू काय बोलत आहेस "?


"बाबा तिथे माझी लाखाची मीटिंग आहे ती माझ्यासाठी महत्वाची आहे मला वाटले होते कि पूजा लवकर होईल पण इथे तर उगीच वेळ फुकट जात आहे मला आता वेळ नाही मी निघालो "


"वामन असे पूजेवरून अर्ध्यवरून उठू नये"


"गुरुजी मी आता उठलो नाही'तर लाखोंची माझी कमाई जाईल त्याचे काय "?


"अरे पण तोच देणारा आहे "


"गुरुजी मी जे काही केलं आहे ते स्वबळावर आहे त्यात देवाचे काय आहे काहीच नाही आज मी मोठा झालो ते फक्त माझ्या हुशारीने देवाचा आशीर्वाद वगैरे काही नसते मी पूजेला पण येणार नव्हतो पण बाबा मुळे आलो आहे" असे म्हणून वामन सरळ घरी निघून गेला सगळे लोक त्यांना पाहत राहिले त्याच्यामागोमाग तुझी आई तू हि होता पण तुला समजूत नसेल आजी आजोबा गेले


घरातून खूप समजवण्याचे आवाज येत होते पण तुझ्या बाबाचा आवाज भारी पडत होता अर्थवट असेलली पूजा गुरुजींनी स्वताच केली ती पूजा संपण्याअगोदरच वामन त्यांना सगळ्यांना घेऊन निघून गेला तो काही परतलाच नाही आणि तुम्हा कोणाला हि त्याने इथे येऊ दिले "


दुसऱ्या वर्षी असे सलग पाच वर्ष तुमच्या घरच्या मंडळीची वाट पहिली पण कोणीच आले नाही ते पाहून गावातल्या कोणाची इच्छा असेल त्याने पूजेस बसावे असे ठरवले त्यात तुझ्या आजोबाची काही चूक नव्हती म्हणून मंदिरात त्याचे अजून हि नाव आहे कारण ते वामन च्या समोर असमर्थ होते "

"दुसऱ्या वर्षी असे सलग पाच वर्ष तुमच्या घरच्या मंडळीची वाट पहिली पण कोणीच आले नाही ते पाहून गावातल्या कोणाची इच्छा असेल त्याने पूजेस बसावे असे ठरवले त्यात तुझ्या आजोबाची काही चूक नव्हती म्हणून मंदिरात त्याचे अजून हि नाव आहे कारण ते वामन च्या समोर असमर्थ होते "


"काय बाबा असे वागले "?


"हो बाळा म्हणून कदाचित तुझ्या आजोबांनी तुला काही सांगितले नसेल आता तो मोठा माणूस गावात येऊन काय करणार म्हणून तुला हि गावापासून दूर ठेवले असेल आता मोठा झाला असेल ना त्याचा बिसनेस आता तर विचारूच नको असे वागणे असेल त्याचे बाळा तुला माझे बोलणे ऐकून वाईट वाटत असेल पण वामन चा त्या दिवसाचा व्यवहार पाहून सगळ्यांना त्याचा राग येऊ लागला देवापेक्षा आपण मोठा आहे हे त्याचे बोलणे अतीच झाले पण म्हणतात ना अति तिथे माती असते ते आता नाही पण त्याला कधी तरी नक्की कळेल "हे ऐकून शिवाय गप्प झाला ते पाहून


अमित चे आजोबा म्हणाले "बाळा तू वाईट वाटून घेऊ नकोस कारण ह्यात तुझी काहीही चूक नाही "


"नाही आजोबा वाईट नाही पण बाबा चे वागले ते बरोबर नव्हते आजोबा मला माझे घर पाहायचे आहे "?


"हो बाळा चल जाऊया "असे म्हणून दामोदर आजोबा अमित त्याचे आजोबा आणि शिवाय घराबाहेर पडले


दामोदर आजोबा पुढे आणि मागे सगळे शिवाय सगळीकडे पाहत चालत होता आणि एके ठिकाणी येऊन थांबले दामोदर आजोबांनी शिवाय ला पाहत म्हटले ते पहा तुझे घर


शिवाय ने पहिले तर भले मोठे कैलारू घर आणि त्या समोर वाढलेली झाडे त्या घराला आजूबाजूनी पकडून होती आत घराचा दरवाजा हि त्यामुळे दिसत नव्हता अशी घरे त्याने फक्त हॉरर मूवी मध्ये पहिली होती पण आज आपलेच घर असे प्रत्यक्षात पाहताना त्याचा चेहरा जरा गंभीर झाला


दामोदर आजोबा शिवाय ला पाहत म्हणाले "पाहिलंस बाळा काय झाले ते एके काळी हे घर कसे होते आणि आज काय स्थिती आहे ती पाहून खूप वाईट वाटत रे पण आम्ही काही करू शकत नाही कारण ते तुमचे घर आहे "


"हो आजोबा कित्येक वर्ष बंद असल्याने भयानक जाणवत आहे "


"बाळा भयानक घर नाही तुझ्या बाबाची वृत्ती झाली त्याच्यामुळेच एक घर तुम्हा लोकांना परके झाले बिचारे एकटे तुमची वाट पाहून भयानक दिसू लागले आहे शिवाय एक सांगू का "?


"हो आजोबा सांगा ना "?


"बाळा आता तू मोठा झाला आहेस आणि भावी पीडी म्हणून तुझं आता हि परिस्थिती सुधारू शकतो तुझे बाबा काही आता इथे येणार नाही पण तू मात्र हा गाव आणि आपले कुलदैवत विसरू नकोस तुझ्या बाबाला खूप काही वाटत असेल पण आज जो तो काही आहे त्याला देवाचा आशीर्वाद आहे


शिवाय ने आजोबाच्या म्हण्याला होकार दिला तसे सगळे दामोदर आजोबाच्या घरी परतले दुपारचे जेवण करून संध्यकाळी बाहेर पडले शिवाय ने दामोदर आजोबाच्या पाया पडला आजोबा त्याला पाहत म्हणाले "यशवंत हो पण मी सांगितलेले लक्षात असू दे तुला इथे आणण्यामागे देवाचा काही उद्देश असेल "


शिवाय ने दामोदर आजोबाचा निरोप घेतला आणि गाडी पारवाड कडे निघाली पण शिवाय च्या मनात मात्र भयानक स्थिती असलेल्या त्याच्या घराने घर केले .........

शिवाय आणि शिवगड हुन उशिरा बाहेर निघाले होते म्हणून पारवाडला रात्री पोहचले दरवाजात आजी वाट पाहत उभी होती गाडी येऊन थांबली गाडीतून तिघेही उतरले आजीने त्यांना पाहत लगेच गरम पाणी हात पाय धुण्यासाठी दिले ते हात पाय धुऊन हॉल मध्ये येऊन बसले आजी आजोबाना पाहत म्हणाली


"किती उशीर केलात हो मित्र मिळाला म्हणून पोरांना हि तिथे बसून ठेवले चला आता उशीर नको जेवायला चला" असे म्हणून आजी आत गेली


शिवाय वाटेत हि काही बोलला नाही आणि आता हि तो गप्पच आहे हे अमित आणि त्याच्या आजोबाच्या लक्षात आले अमित नि शिवाय कडे पाहत म्हटले


"शिवा चल जेवूया "


"नाही अमित तुम्ही जेवा मला भूक नाही आहे "


"असे कशी भूक नाही दुपारी पण तू जेवला नाहीस "


"नाही अमित मी थोडा वेळ एकटा बसू का "?


"बरं बाळा बाहेर बस तुला वाटेल तेव्हा जेव चल अमित त्याला त्याच्या एकांत मिळायला हवा"असे म्हणून आजोबा आणि अमित आत गेले आजीने त्यांना जेवण वाढले आजीला शिवाय बद्दल आजोबानी सांगितले तशी ती म्हणाली "काय असे झाले काय विचार करत असेल ना पण एक बरे झाले कि त्याला खरे कळले काही लोक ना गुर्मीत सगळे विसरून जातात नाही अचानक असे सगळे समोर आल्यावर तो बिचारा काय करणार बसू दे त्याला एकांतात मी थांबते त्याला जेवणासाठी "असे म्हणून आजीने हळू जाऊन बाहेर पहिले तर शिवाय डोळे बंद करून होता


शिवायच्या मनात विचार चालू होता" बाबा असे कसे वागू शकतात ते असे वागले त्यामुळेच त्यांनी मला गावाशी दूर ठेवले पण आजोबा आईने हि मला कधी शिवगड बद्दल सांगितले नाही बाबाच्या आदेशानुसार सगळे चालले त्याच्या पुढे ना आईचे चालू शकते ना आजोबांचे कारण बाबाचा स्वभावच तसा रागीट आहे पण दामोदर आजोंबा म्हणाले ते चूक नव्हते कि देवाने तुला इथे काही उद्देशाने बोलवले आहे कारण ते मंदिर ती देवाची मूर्ती जशास तशी माझ्या स्वप्नात आली होती कुठेच काही वेगळे नव्हते जशास तसे त्या घराला पाहून किती भीती वाटू लागली हॉरर मूवी मध्ये असल्यासारखे ते आमचे घर बाबाच्या एक चुकीमुळे असे झाले किती त्रास आजोबाना आजीला आणि आईला पण सोसावा लागला असेल आजोबाना पण आपले घर पाहण्याची इच्छा असेल पण बाबामुळे ते गप्प बसले असतील पण नाही मला आता आजोबाना गावी घेऊन यावेच लागेल आणि मी येणार असे म्हणून शिवाय आत गेला अमित जेवत होता


अमिताला पाहत शिवाय म्हणाला "अमित मी उद्या घरी निघतोय तू आणखी काही दिवस राहणार आहेस ना "?


"का रे असे अचानक अजून दोन दिवस आहे ना "


"बाळा आमचं काही चुकलं का "?


"नाही आजोबा तुमचे काही चुकलं नाही तुम्हाला मी खूप सारे धन्यवाद द्याल हवे तुमच्या मुळे मला सत्य कळले काही नाही आजोबा माझ्या आजोबाना परत एकदा गावात आण्याचे होते त्याची पण इच्छा असेल ना आपले घर पाहण्याची "


"हो बाळा बरोबर बोलास तू तुझ्या आजोबा ची ती इच्छा नक्कीच असेल आणि ती मात्र तू पूर्ण कर पण पहिले जेवण कर आणि मग उद्या जाण्याची तयारी "


असे म्हणून आजीने शिवाय आणि आपल्यासाठी पान वाढले आणि दोघांनी एकत्र जेवण केले रात्री आपले बॅग पॅक केली अमित हि बरोबर निघाला आजी आजोबाचा आशीर्वाद घेऊन पारवाड गावातून गाडी शहराकडे वळली .......

टिंग टॉंग दरवाजाची बेल वाजली शिवाय च्या आईने दरवाजा उघडला समोर पाहून ती चकित होत म्हणाली


"शिवा तू आलास "


"हो आई "


"अरे तू तर परवा येणार होतास ना "?


"नाही आई आलो असे म्हणून तो आपल्या रूम मध्ये गेला


आई मागोमाग गेली "बरे चल फ्रेश हो तो पर्यंत मी काही खाण्यासाठी करते असे म्हणून आई किचन मध्ये गेली आजोबानी शिवाय चा आवाज ऐकला तसे ते हि बाहेर आले शिवाय फ्रेश होऊन बाहेर आला आणि आजोबा म्हणाले


"काय रे शिवा लवकर आलास दोन दिवसांनी येणार होतास ना गावात कंटाळा आला वाटत "?


"नाही आजोबा आज मी येणार नव्हतो मी तर अजून तिथे राहणार होतो पण महत्वाचे काम आहे म्हणून आलो "


"महत्वाचे तुला रे कसले काम महत्वाचे "?


"आहे काहीतरी काम "


एवढ्यात आई किचन मधून डिश घेऊन आली आणि शिवाय च्या समोर ठेवली ते पाहून आजोबा म्हणाले "बरं खा आणि जरा आराम कर मग सांग मला गावातल्या गोष्टी "


"हो नक्कीच आजोबा तुम्हला पण ऐकून खूप ख़ुशी होणार "


शिवाय ने आईने दिलेले खाल्ले आणि बेड वर जाऊन पडला तेव्हड्यात आई आली आई ने पहिले कि तो झोपला म्हणून परत गेली काही तासानंतर शिवाय उठून बाहेर आला त्याला पाहत आई म्हणाली "बरे झाले तू उठलास शिवा बॅग मधले कपडे काढून दे धुवायला टाकते "


"हो आई "असे म्हणत शिवाय ने आपला चेहरा पाण्याने धुतला आणि तो रूम मध्ये आला बॅग उघडली आणि धुवायचे कपडे बाजूला काढले आणि आईच्या हातात दोन पिशव्या देत म्हणाला "आई ह्यात अमितच्या आजीने लाडू दिले आहेत आणि त्या पिशवीत प्रसाद आहे "


"प्रसाद "?


"हो आई शिवगड गावी गेलो होतो तिथल्या मंदिरातला प्रसाद आहे "


हे ऐकून आई गंभीर होत म्हणाली "काय शिवगड गावी ?अरे तू तर पारवाडला गेला होतास ना मग शिवगड्ला कसा पोहचलास "?


"नाही गेलो होतो पारवाडलाच पण अमितच्या आजोबांचे मित्र राहतात शिवगड्ला ते तिथे जात होते मग आम्हाला पण म्हणाले कि तुम्ही चला मग मी आणि अमित हि गेलो मस्त गाव आहे आई आणि मंदिर हि म्हणून मुद्दाम तिथला प्रसाद आणला "


"तसे नाही बरेच केले तू प्रसाद आणलास तो "?


"हो आई बाबांना हि दे हा आणि हो आजोबा मी नेऊन देतो "


"का मी देईन ना आजोबांना आणि बाबांना नको त्यांना नाही आवडत "


"आई मी आणला ना प्रसाद मग मीच देतो आजोबाना आणि बाबांना का नाही आवडणार नक्कीच आवडेल आणि तसे हि आजोबाना गावच्या गोष्टी ऐकायच्या आहेत मघाशी म्हणत होते" असे म्हणून प्रसाद घेऊन तो आजोबाच्या खोलीकडे वळला आणि आई इथे विचारात अडकली

आजोबा आराम खुर्चीवर डोळे बंद करून बसले होते त्याच्या तोंडी ओम नमः शिवाय चा जप चालू होता शिवाय येऊन त्याच्या शेजारी बसला त्याची हालचालीची जाणीव झाली तसे आजोबांनी डोळे उघडले


"अरे शिवा तू "?


"आजोबा घ्या "


"काय रे "?


"आजोबा मी शिवगडला गेलो होतो तिथल्या स्वयंभू शिव शंभो मंदिरातला हा प्रसाद तुमच्यासाठी खास घेऊन आलो "


"काय शिवगड आणि तू पण तू तर "?


"म्हणजे आजोबा मी पारवाडला गेलो होतो अमितच्या आजोबांचे कोणी मित्र शिवगड्ला राहतात त्याना भेटायाला जात होते तर ते म्हणाले मी तिथे जात आहे तर तुम्ही पण चला मग आम्ही पण गेलो मस्त गाव आहे आजोबा आणि मंदिर तर फारच सुंदर आहे "


हे ऐकून आजोबाच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी चष्मा काढून ते पुसले ते पाहून शिवाय ने विचारले" काय झालं आजोबा तुमच्या डोळ्यात पाणी "?


"नाही रे सहज असे म्हणून आजोबांनी शिवाय च्या हातातली पिशवी घेतली आणि प्रसाद तोंडात टाकत "शिव शंभो "असे म्हणून त्यांनी हात जोडले हे पाहून शिवाय म्हणाला "आजोबा तुम्हला मी नक्की तिथे घेऊन जाईन तुम्हला पण ते मंदिर खूप आवडेल "


हे ऐकताच आजोबाचा दाटलेला कंठ फुटला ते रडू लागले हे पाहून शिवाय त्यांना धीर देत म्हणाला "मी तुम्हला नाही विचारणार कि तुम्ही का रडत आहात पण एवढे सांगेन आजोबा कि मी तुम्हला तुमच्या शिवगडला घेऊन नक्की जाईन "


आजोबांच्या हुंद्क्याचा आवाज ऐकून येऊन आई धावत आली "काय झालं बाबा तुम्ही का रडत आहात "?


"काही नाही आई आजोबाना मी शिवगडच्या गोष्टी सांगत होतो त्यांना मी हे पण म्हणालो आहे कि मी त्याना तिथे घेऊन जाईन "


"शिवा तू जरा बाहेर जा आजोबांना एकटे सोड आणि उगीच काही सांगत नको बसू आई ने असे सांगताच शिवाय बाहेर गेला ते पाहून आई म्हणाली "बाबा तुम्ही ठीक आहात ना ?


"हो ठीक आहे "


"बाबा त्रास करून घेऊ नका "


"नाही मी तर खुश आहे कि शिवाय शिवगड्ला जाऊन आला पहा ना ह्या त्या नात्याने का होईना माझ्या देवाचा प्रसाद माझ्याकडेपोहचला नकळत का असेना शिवाय ने मला तिथे घेऊन जाण्याची तयारी दाखवली आणि तो काय म्हणाला माहित आहे का तुमच्या शिवगडला शिवगड बद्दल तो ज्या प्रेमाने बोलत होता ते पाहून बरे वाटले ज्या गावाबद्दल अनोळखी असून तो एव्हडा भरभरून बोलला पण जर त्याला कळले कि ते त्याचेच गाव आहे तर किती आनंद होईल "


"काय तो असा म्हणाला कि तुमच्या शिवगडाला"?


"हो मी ऐकून जरा चकित झालो पण काही विचारले नाही वसू हा तिथे गेला ह्याच्या नावावरून तर कोणीही ओळखतील ह्याला खरे कळले तर नसेल ना "?


" बाबा मला आता त्याच गोष्टीची भीती वाटते "?

संध्याकाळी सातची वेळ दरवाजावरची बेल वाजली शिवाय च्या आईने दरवाजा उघडला निराश असे शिवाय चे बाबा आत शिरले शिवाय हॉल मधेच होता त्याला पाहत ते मिश्किल हसत विचारू लागले "तू कधी आलास? तू तर परवा येणार होतास ना ?काय झालं गाव पण जमलं नाही वाटत "?


"नाही बाबा तसे काही नाही मला तर अजून राहायचे होते पण इथे माझे महत्वाचे काम आहे म्हणून मी आलो "


"मह्त्वाचे काम ते कसले आणि तुला रे कसले महत्वाचे काम "?


"आहे बाबा वेळ आल्यानंतर सांगेन "


हे उत्तर ऐकून बाबा तडक आपल्या रूम मध्ये गेले थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाहेर आले आई ने चहा चा कप बाबाकडे पुढे केला तसा त्यांनी तो हातात पकडला ते पाहून शिवाय आईला पाहत म्हणाला "आई बाबांना प्रसाद दे ना "


हे ऐकून आई जरा गडबडत म्हणाली "मग देते शिवा "


"मग कशाला आताच दे ना "


त्याचे ते बोलणे ऐकून बाबांनी दोघांना पाहत विचारले "कसला प्रसाद "?


"काही नाही हो तो अमितच्या मामा कडे गेला होता ना तिथल्या देवाचा प्रसाद दे म्हणतोय "


"नाही नाही आई तो पारवाडचा प्रसाद नाही मी तर शिवगडचा प्रसाद दे म्हणतोय "


हे ऐकल्यावर रागात बाबा म्हणाले "काय शिवगड तू कशाला गेला होतास शिवगड्ला तुला जाण्याची काय गरज होती "


"बाबा मी गेलो होतो पण अमितच्या आजोबांबरोबर त्याचे तिथे मित्र राहतात ते जात होते त्यानं भेटण्यास मग आम्हला पण म्हणाले या म्हणून मग आम्ही हि गेलो "


"काय तू कशाला गेलास मी सांगितले होते ना कि इथे तिथे फिरू नकोस त्यांनी बोलवले आणि तू गेलास काय गरज होती जाण्याची "


"रिलॅक्स बाबा एवढे का रागवत आहात मी तिथे जाऊन काही चूक केली असे मला नाही वाटत हे नवीन गाव पाहण्याची संधी मला मिळाली "


"काय संधी ह्याला संधी म्हणतोस तुला एका मल्टि नॅशनल कंपनी मध्ये नोकरी लागली जर तू स्वतःचा बिसनेस उभा करण्याचे ठरवले तर ह्याला संधी म्हणतात त्या गावात काय आहे संधी सारखे मूर्ख कुठला "


"बाबा खरंच तो गाव खूप सुंदर आहे तिथला निसर्ग घरे आणि मंदिर वाह आपण एकदा नक्की जाऊ तुम्हाला पण आवडेल तो गाव "


"बस हे अति होतंय रिझल्ट नंतर काय करायचं हा विचार कर हे गाव फिरण्यापेक्षा महत्वाचे आहे "असे म्हणून बाबा रागाने आत गेले त्याचे ते बोलणे आई आणि आजोबा ऐकत होते ते शिवाय कडे पाहत राहिले

"बस हे अति होतंय रिझल्ट नंतर काय करायचं हा विचार कर हे गाव फिरण्यापेक्षा महत्वाचे आहे "असे म्हणून बाबा रागाने आत गेले त्याचे ते बोलणे आई आणि आजोबा ऐकत होते ते शिवाय कडे पाहत राहिले


बाबा आत गेले तसे आई शिवायला म्हणाली "बाळा तू असा विचित्र का वागतोस "?


"विचित्र म्हणजे आई "


"बाळा तू त्या गावच्या गोष्टी बाबा समोर काढत नको जाऊ त्यांना गाव वगैरे नाही आवडत त्यांना शहरात च राहणे आवडते "


"पण आई मी कुठे काय म्हणालो मला तो गाव आवडला आणि मी ते सहज असे सांगितले त्यात एवढे राग येण्यासारखे काय आहे आणि मी फक्त प्रसाद दे म्हणालो "


"जाऊ दे असे म्हणून आई आत गेली आजोबा तिथेच बसून सर्व ऐकत होते आई आत जातात "बाबांनी तिला रागात पाहत विचारले


"काय सांगितले तुम्ही त्याला ज्या मुळे तो शिवगड पर्यत पोहचला आणि पाहिलस तो कसा बोलत होता हे पहा बाबांना सांगून ठेव त्याला शिवगड बद्दल काही कळता काम नये "


"नाही हो आम्ही त्याला कधीच शिवगड बद्दल काहीच सांगितले नाही आणि तो तिथे नकळत पोहचला "


"नकळत पोहचला पण पोहचला ना ह्या बद्दल आणखी त्याला काहीही कळता कामा नये "


"बाबा त्याची गरज नाही मला सर्व माहित आहे "


बाबांनी दरवाजाकडे पहिले तर शिवाय बाबांना पाहत होता "काय हे तू काय बोलतोस तुला काय माहित आहे "


"बाबा मला शिवगड बद्दल सगळे माहित आहे पण ते ना आईने ना आजोबानी सांगितले "


"मग कोणी सांगितले "?


"देवाने "


"देवाने "?काहीही मूर्खां सारखा बोलू नकोस "


"खरेच बाबा मला देवाने सांगितले काही दिवसापूर्वी मला पडलेले स्वप्न त्यात दिसलेले मंदिर दुसरे तिसरे कुठले नसून शिवगड चे शिव मंदिर होते मी ते मंदिर प्रत्यक्षात पाहून चकित झालो तिथे मी आजोबांचे नाव पहिले आणि त्यातून मग मला सगळे समजले आणि हो आपले घर हि पाहून आलो आणि तुम्ही का जाणे गावी जाणे बंद केले ते कारण हि मला समजले आहे


"शिवा पुरे मला तुझे गाव पुराण ऐकायचे नाही तुला सत्य समजले तर एक सांगतो तू तिथे परत जाण्याचे विसरून जा तुला गाव नाही हे समज "


"बाबा लहान असताना मी तुमचे हे खोटे खरे समजून बसलो होतो पण आता नाही मी गावी जाणार "


"शिवा "असे म्हणून बाबांनी शिवाय वर हात उगारला ते पाहून आजोबा जोरात ओरडले "वामन हात खाली घे "

"बाबा लहान असताना मी तुमचे हे खोटे खरे समजून बसलो होतो पण आता नाही मी गावी जाणार "


"शिवा "असे म्हणून बाबांनी शिवाय वर हात उगारला ते पाहून आजोबा जोरात ओरडले "वामन हात खाली घे "


"बाबा प्लिज तुम्ही मध्ये येऊ नका "


"का येऊ नको तू शिवा वर हात उचलणार तो हि विनाकारण आणि मी गप्प बसू "


"हे बघा बाबा तुम्ही तुमच्या काही गोळ्या असतील त्या घ्या आणि आराम करा "


"मला काय करायचे ते तू सांगू नकोस पाहिलंस तू जे सत्य एव्हडी वर्ष लपवून ठेवलंस ते देवानेच त्याच्यासमोर आणले आणि तो काय चुकीचा बोलला आपला गाव आपले कुलदैवत आपले घर असताना आपण आपल्या गुर्मीत जगत आहोत असे नाही तुला वाटत आणि हीच गुर्मी ने तुला आज बिसनेस मध्ये लॉस करून ठेवले आहे


"बाबा उगीच कुठला अर्थ कुठे लावू नका आणि माझा बिसनेस चे टेन्शन तुम्ही घेऊ नका एव्हडं सगळं मी स्वबळावर केलं आहे आणि हे लॉस हि प्रॉफिट मध्ये आण्याची ताकद माझ्यात आहे "


"हो नक्कीच आहे म्हणून काही दिवस झाले तुझ्या कपाळावर आठ्या पहिल्या तू शून्यात नजर घालून विचार करताना पहिले तू मेहनत केलीस नाही असे कोण म्हणत मेहनत केल्याशिवाय यश मिळतच नाही पण त्या मेहनतीला गुर्मीचे पांघरूण घालून तू जे काही वर्ष झाले तू करत आहे त्यात तू देवाला सुद्धा कमी लेखंलंस रे "


"बाबा पुरे देव देव देव काय केलं तुमच्या देवाने आज मी जे काही आहे ते माझ्या स्वबळावर आहे "


"हो त्याच्या आशिर्वादाशिवायच तू एव्हडा मोठा झालास अरे कुलदैवत म्हणजे आई बापा सारखे असते दूर जरी असले तरी आपल्या बाळासाठी त्याची कृपा असतेच लोक वर्षा तुन एकदा तरी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतात ते उगीच का अरे आई बापाला विसरल्यानंतर त्यांना जसे वाईट वाटते तसे कुलदेवाचे हि असते तू तर देवाला पैशात मोजू लागला किती वर्ष झाली साधी आठवण हि काढली नाहीस आपल्या पुरातन घराला विसरलास त्या घराचा वास्तु पुरुष हि आमची वाट पाहून थकला असेल तू मानत नशील पण तू आज जो काही आहेस त्यात आपल्या देवाचा आशीर्वाद नक्की आहे "


"बाबा हो बरोबर बोललात रात्र दिवस मी मेहनत करतो ते काहीच नाही उगीच मला एवढ नाव मिळालं तुमच्या देवाने दिले हो ना "


"माझ्या देवाने तुला काय दिले आहे ते समोर आहे तुला आठवत नसेल पण शिवाय च्या जन्मावेळी जे झाले ते तरी आठवू शकतोस तेव्हा तुझा हा पैसा हि उपयोगी पडला नसता आणि तुझे नाव हि नाही"


"बाबा तुम्ही मला किती भुलवण्याचा प्रयत्न केला तरी मी गावी जाणार नाही "असे म्हणून बाबा बाहेर निघून गेले

आजोबाच्या बोलण्याने बाबा रागाने बाहेर गेले ते पहाता शिवाय ने आजोबा कडे पाहत विचारले "आजोबा माझ्या जन्मावेळी काय झाले होते जे तुम्ही बाबांना आठव म्हणून सांगत आहात "


"बाळा खूप कठीण काळ होता तो आमच्यासाठी पण शिव शंभो ने निवारण केले "


"म्हणजे आजोबा "?


"बाळा तू जेव्हा आईच्या पोटात होता तुझ्या आईला नऊ महिना चालू होता दोन दिवसाची डॉक्टरांनी तारीख दिली होती अश्याच एके दिवशी आम्ही सगळे म्हणजे आजी बाबा मी आणि तुझे आजी आजोबा मामा वैगरे बाहेर हॉल मध्ये गप्पा मारत बसले होते एवढ्यात आम्हला आवाज आला आम्ही सगळेच धावत आत गेलो तर रूम मध्ये तुझी आई पडली होती ती बेशुद्ध झाली होती तिला तसे पाहून सगळेच घाबरलो तिला हाका मारत होतो पण ती काहीही उत्तर देत नव्हती आम्ही तसे तिला हॉस्पिटल मध्ये नेले डायरेक्ट ऑपेरेशन थिएटर चा लाल बल्ब पेटला आणि आमच्या जीवाची घालमेल सुरु झाली सगळे कसे हताश होऊन पाहत होतो तुझे बाबा तर एवढे रडत होते सगळेच देवाचा धावा करत होते एवढ्यात एक नर्स बाहेर आली आम्ही तिला विचारले आणि तिनी जे उत्तर दिले ते ऐकून आमची पाया खालची जमीन सरकली ती म्हणाली "एक तर दोघे वाचतील किंवा ...."ह्या किंवा ने आमचा जीवाला अधिक घोर लागला आम्ही मनोमन शिव शंभोचा धावा केला मी मनोमन शिवाला सांगडे घातले मनात धावा आणि नजर त्या बल्बवर टिकून होती एका तासाने बल्ब बंद झाला आणि आम्हला सगळ्यांना धडकी भरली डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले "चमत्कार म्हणावे कि नाही कळत नाही एव्हडी काळजी करण्यासारखी परिस्थिती असून हि बाळ आणि आई सुखरूप आहे "हे ऐकून मनाला शांती मिळाली अणि माझा शंभो मला पावला होता मग काय आनंदाचे वातावरण आणि शिव शंभो ला सांगडे घातल्याप्रमाणे तुझे नाव त्याच्या नावा मधून ठेवण्यात आले शिवाय मग आम्ही तुला घेऊन मंदिरात देवाच्या चरणाशी ठेवले आणि देवाने आशीर्वाद रूपी तुझ्या डोक्यावर फुल पडले त्या दिवसापासून तुझे बाबा कुलदेवाला अधिक मानू लागले पण ह्या काही वर्षात पैसा नाव ह्या जाळ्यात तो ओढला गेला आणि तो ह्या सगळ्याला योगायोग समजून बसला आहे "


"म्हणजे माझ्या शिवाय नावामागे हि गोष्ट आहे "


"हो बाळा आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे होते आणि असणार हि फक्त आपण त्याची आठवण करायला हवी "


"आजोबा आपण शिवगड ला जाऊ मी तुम्ही आणि आई बाबा ना नको येऊ देत "


"नाही नको शिवा बाबांना सध्या एकटे सोडून जाणे योग्य नाही बिसनेस च्या टेन्शन मुळे ते खूप त्रासात आहे सर्व ठीक होऊ दे मग जाऊ त्या देवानेच सर्व ठीक करावे आणि ह्यांना आपल्या कडे येण्याची बुद्धी दयावी "


"हो शिवा आई म्हणते ते बरोबर आहे देवा शिव शंभो तुझं काय तरी कर डोळे मिटण्याआधी एकदा तरी तुझे सह कटुंब दर्शन घेण्याची इच्छा आहे ती पुरी कर रे बाबा ".......असे म्हणून आजोबानी आपले अश्रू पुसले शिवाय ला आपल्या नावा मागचे कारण कळताच शिवाय मनात विचार करू लागला "देवानेच मला जीवन दान दिले स्वप्नात येऊन आपले अस्तित्व दाखवले देवा मला गावी यायचे आहे पण आजोबाच्या म्हण्यानुसार बाबा ना घेऊनच फक्त बाबा तयार व्हायला हवे देवा तुझे अस्तित्व बाबांना पण जाणवून दे "


"अरे माझ्या नावामागची गोष्ट अमित ला कळायला हवी "असे म्हणून शिवाय ने अमितला फोन लावला पण फोन नॉट रिचेबल येऊ लागला


"अरे ह्याचा फोन का लागत नाही "असे म्हणून शिवाय ने अमित ला परत फोन लावला पण फोन नॉट रिचेबल लागला ते पाहून त्याने मेसेज टाईप केला आणि झोपी गेला


सकाळ उजाडली तसे त्याने मोबाइल पहिला तर अमितचा रिप्लाय होता त्याने लगेच वाचले "शिवाय आज आपण भेटू "


नेहमी च्या ठिकाणी भेटण्याचे ठरले शिवाय येऊन पोहचला होता तो अमित ची वाट पाहत उभा होता अमित येताच अमित ने शिवाय ला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला "किती दिवसांनी आपण भेटतो ना "?


हे ऐकून शिवाय म्हणाला "काय हे काय बोलतोस दोन दिवसापूर्वी तर आपण गावाहुन आलो "


"गावातून "?


"हो तुझ्या मामाकडून पारवाड हुन "


"पारवाडला कोण गेलेलं "?


"अमित असा काय करतोस मी आणि तू "


"वेड्या मी काही पारवाडला नाही माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो आणि अचानक ठरल्या मुळे तुला सांगू नाही शकलो आणि आजच आलोय "


"काय ?मस्करी पुरे झाली अमित एव्हडी ओव्हर एकटिंग नको "


"शिवा मी मस्करी नाही करत खरेच मी हे आठ दिवस मावशी कडे होतो आणि मी मध्ये तुला कॉन्टक्ट केला होता पण तुझा फोन नॉट रिचेबल आल्याने आणि मला हि नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने मी परत नाही केला "


"अमित हे तू काय बोलतोस अरे गेले आठ दिवस मी तुझ्याबरोबर तुझ्या मामाच्या घरी होतो "


"शिवा हे पहा असे म्हणून अमित ने मोबाईल मध्ये असलेला मावशीकडला फोटो दाखवला त्यातली तारीख पाहून शिवाय चकित झाला त्याने अमितची पुरी गॅलरी चेक केली पण त्यांनी सोबत काढलेले फोटो त्याला कुठेच दिसेनासे झाले आणि त्यांनी सगळे फोटो अमितच्या मोबाईल मध्ये काढले होते तेव्हड्यात त्याला एक फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढलेले आठवला त्याने लगेच मोबाईल पहिला आणि फोटो दाखवत हा पहा तुझ्या आजी आजोबा बरोबर काढलेला माझा फोटो "


तो फोटो पाहत "शिवा हे कोण आहेत "?


"अरे हे तुझे आजी आजोबा ना "


"नाही शिवाय ह्यांना तर मी पहिलेच वेळ पाहत आहे "


"काय ?अरे हे काय बोलतोस अमित मस्करी पुरे झाली "


"शिवा खरेच ना आपण हे आठ दिवस सोबत होतो ना हे फोटोतले माझे आजी आजोबा आहेत माझ्या आजी आजोबाचा फोटो हा पहा असे म्हणून अमित ने शिवाय ला फोटो दाखवला शिवा मला असे वाटते कि तुला रेस्ट ची गरज आहे "


"मग शिवगडला आपण गेलो ते काय "?


"शिवगड मी हे नाव प्रथमच ऐकत आहे आणि मी कशाला येईन "


"मग मी हे आठ दिवस कोणाबरोबर घालवले" हा विचार शिवाय करू लागला अमित ला हि हे सर्व ऐकून विचित्र वाटू लागले


"शिवा मी खरं सांगतो मला ह्यांच्यातले काहीच माहिती नाही येतो मी "असे म्हणून अमित गेला पण शिवाय विचार चक्रात अडकला शिवाय च्या मनात हजार प्रश्न उठले कि अमित आला नव्हता तर तो पारवाडला कोणासोबत गेला ?आणि कोणा कडे राहिला? तो त्याच विचारात घरी पोहचला तो सरळ आजोबाच्या खोलीत गेला आजोबाचा डोळे बंद करून ख्रुचीवर ओम नमः शिवाय चा जप चालू होता म्हणून शिवाय थोडा वेळ आजोबाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला आजोबा कधी डोळे उघडतील ह्या कडे त्याचे लक्ष होते कधी एकदा त्यांना सांगतो असे झाले होते


काही मिनिटांनी आजोबानी डोळे उघडले आणि समोर शिवायला पाहून ते "शिवा तू कधी आलास "?


"हा आजोबा मघाशी आलो तेव्हा तुम्ही नामजप करत होता म्हणून मी हाक नाही दिली "


त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आजोबांनी त्याला विचारले "शिवा काय झालं एव्हडा गोधळेला का आहेस "?


"हा आजोबा काहीच कळत नाही काय करावे "


"पण झालं तरी काय "?


"आजोबा मी हल्ली अमित बरोबर पारवडला गेलो होतो आणि तिथे काही दिवस राहिलो हि आणि तुम्हला माहित आहे का मी तिथून शिवगड्ला गेलो तिथे मला सत्य कळले जे सत्य तुम्हा सर्वानी लपवून ठेवले होते "


"अरे हो शिवा हे आम्हला माहित आहे तू न माहित असेलल्या सारखा का सांगतोस तू आणलेल्या प्रसाद हि मी खाल्ला आणि तुझ्या बाबांना हि तुला सत्य कळले हे समजले त्यात काय झाले "


"आजोबा मी आज अमितला भेटलो त्याने मला मिठी मारत म्हटले " किती दिवसांनी आपण भेटत आहोत "


"ह्यावर मी त्याला म्हणालो कि अरे दोन दिवसांपूर्वीच तर आपण तुझ्या मामांच्या गावाहून आलो आहे"


"हे ऐकल्यावर मला त्याने असे पाहत म्हटले काय मामाच्या घरी कोणाच्या "?


"अरे तुझ्या पारवाडला नाही का गेलो होतो आपण "


"काय मामांच्या गावी मी तर मावशीच्या घरी गेलो होतो जो आज सकाळी आलो जाताना गडबड होती म्हणून सांगता आले नाही आणि तिथे गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम होता आणि मी तुला फोन लावत होतो तर तुझा फोन नॉट रिचेबल येत होता आजोबा हे ऐकून मी चकित झालो आजोबा तो माझ्याबरोबर पारवाडला गेल्याचे सरळ सरळ नाकारत होता "


"अरे त्या काय एवढे त्याने मस्करी केली असेल "


"नाही आजोबा आम्ही सोबत काढलेलं एक हि फोटो त्याच्या मोबाईल मध्ये नाही आणि त्याने आपल्या मावशी बरोबर आणि काढलेल्या फोटो ची तारीख हि आम्ही पारवाडला असतानाची होती आणि मी जिथे त्याचे आजी आजोबा म्हणूंन राहिलो ते हि त्याचे आजी आजोबा नाही त्याने आपल्या आजी आजोबाचा फोटो दाखवला तर ते वेगळेच होते मग आजोबा मी एवढे दिवस कोणासोबत राहत होतो "


"काय खरेच अमित खोटे बोलत नाही मस्करी करत नाही आहे ना "?


"नाही आजोबा अमित अशी मस्करी नाही करणार त्याने मला बस तिकीट हि दाखवली ज्याचा फोटो त्याच्या मोबाईल मध्ये होता जे तिकीट त्याच्या नावावर आहे आणि येण्या जाण्याची तारीख हि "


"काय हे कसे असू शकते "असे म्हणून आजोबा विचार करू लागले आणि शिवाय त्याच्या चेहऱ्यवरचे भाव टिपत होता


काही वेळानंतर त्यांनी शिवाय कडे पाहत म्हटले "शिवा नाही हे असू शकते "


"म्हणजे आजोबा "?


"बाळा तू मला तुझ्या स्वप्नाबद्द्ल सांगितले होते त्याच थोड्यादिवसात तुला पारवडला जाण्याचे आले आणि नकळत तू शिवगड्ला पोहचला आणि जे सत्य आम्ही एवढे दिवस लपवून ठेवले होते ते बाहेर आले बाळा हि त्याची रचना आहे "?


"कोणाची आजोबा "?


"बाळा शिव शंभो नि हे तुला सत्य कळावे म्हणून घडवून आणले तू एवढे दिवस देवाच्या सानिध्यात होतास "


"काय आजोबा देवा बरोबर"?


"हो शिवा हि देवाचीच कृपा आहे चुकलेल्या माणसाला परत वाट दाखवण्याचे कार्य देव करत आहे एवढे वर्ष लपवून ठेवलेलं सत्य त्याने तुला कळू दिले फक्त हि देवाची किमया तुझ्या बाबांना कळायला हवी तरच तो देवाची किमया स्वीकारेल "


"आजोबा मला हे विचित्र वाटत होते पण आता खरेच असे होऊ शकते ह्यावर विश्वास बसला"


"बाळा श्रद्धा हि मनापासून हवी अंधश्रद्धा नव्हे "

शिवाय ने आजोबांबरोबर झालेले बोलणे अमितला सांगितले तो हे सर्व ऐकून चकित झाला कारण असे काही त्याने फक्त मूवी मध्ये पहिले होते पण प्रत्यक्षात असे काही घडू शकते हा विचार हि त्याने केला नव्हता पण आपल्या नावामुळे का असेना शिवाय ला गाव मिळाले आणि त्याचा तो आनंद पाहून तो खुश झाला होता


शिवाय ने घडलेल्या सारा प्रकार आईला सांगितला होता तो ऐकून ती चकित झाली देवाचे चमत्कार असतात पण ह्या वरून तिने ते अनुभवले होते आजोबा आणि आईचे हि ह्यावर बोलणे झाले


"बाबा हे सर्व देवांनी आपल्याला त्याची आठवण करण्यासाठी केले असेल गेले कित्येक वर्ष आपण आपल्या गावी गेलो नाही आपले घर बंद पडले आहे शिवाय पासून सत्य आपण किती लपवले पण त्याला कळायचे तेच झाले "


"हो ना आपले तोंड वामन ने बंद केले पण तो हे विसरला कि त्याच्यावरती पण एक अशी शक्ती आहे ज्याच्यापुढे कोणाचे चालत नाही पण हि गोष्ट त्याला कोण सांगणार "


"हो ना बाबा शिवा शिवगड्ला कसा पोहचला हे जरी सांगितले तरी ते आपल्यालाच मूर्ख ठरवतील "


"जाऊ दे हा विषय त्याच्यासमोर नको काढू त्या देवाने शिवायला आपल्या चरणाशी नेले तसे ह्याला पण एके दिवशी घेऊन जाईल एव्हडीच इच्छा आहे पाहू ते तो कधी पुरी करतो "


"हो बाबा पहिली देवाने त्याच्यावरचे हे टेन्शन चे ओझे उतरावे बिसनेस मध्ये चालत असलेल्या लॉस मुळे ते पुरते खचले आहे "


"खचला आहे तो ते दिसत आहे पण त्याची ती गुर्मी अजून नाही गेली ऐकलं नव्हते स्पष्ट सांगितले त्याने कि मी गावी जाणार नाही मग आणि काय बोलायचे "


"बाबा तुम्ही शांत व्हा मला कळते शिवाय ने गावच्या घरची परिस्थिती सांगितली तेव्हा पासून तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात पण सगळे सुरळीत होईल "


"नाहीतर काय करू वसू अग त्या घरात मी लहानाचा मोठा झालो वामन ने माझे जाणे हि बंद केले आणि वयानुसार एकटे फिरणे नाही जमत घराला म्हणे झाडांनी वेढले आहे असे होईल हयाची कल्पना होती एवढे वर्ष बंद असल्यावर आणखी काय होणार "असे म्हणून बाबा आत आपल्या खोलीत गेले


तिथे ऑफिस मध्ये निराश लेला चेहरा घेऊन विचार करत वामन बसला होता एवढ्यात त्याचा मॅनेजर तिथे आला वामनला गंभीर होत म्हणाला


'सर काय करायचं आता ?सगळ्याच कंपनीने आपल्याशी कॉन्ट्रॅक्ट तोडले आता फक्त एक कम्पनी उरली त्यावर आपण आपला बिसनेस कसा मोठा करणार "


"काहीच कळत नाही रवी मला वाटत कि मला बिसनेस बंद करावा लागेल पण भिऊ नका तुमचे काय ते पैसे देऊन टाकेन कोणाचं एमपॉलयी चे पैसे मी नाही ठेवणार राहिली गोष्ट बँकेचे कर्ज ते मला कशा हि परिस्थिती फेडावे लागेल "


"सर तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत मी फक्त ह्या साठी तुम्हला म्हणालो कारण आपली कंपनी कुठे होती आणि आजची परिस्थिती पाहता वाईट वाटत हो "


"रवी हे तू सांगतोस बाकीचे नाही उरलेल्या पैकी काहींचे बोलणे ऐकले मी ते सोडतील ह्या दोन दिवसात काम आणि त्यात त्याचे काही चुकीचे नाही आपल्या भविष्यसाठी ते माझे लॉस का सहन करतील तुला पण जर चांगला जॉब मिळत असेल तर तू पण जा रवी "


"सर हे काय बोलता तुम्ही बाकीच्यांचे मला माहित नाही पण मी तुम्हला सोडून नाही जाणार प्रॉफिट आपण मिळून गेलाय मग लॉस पण वाटून घेऊ ना सर "


"खरेच मी किती नशीबवान आहे तुझ्या सारखा सहकारी माझ्या ऑफिस मध्ये काम करत आहे "


"चिंता नसावी सर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमचा बिसनेस तो माझा बिसनेस ना मग मला हि चिंता आहे "

"थँक क्यू सो मच सर परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्द्ल खरंच खूप आनंदाची बातमी दिली "असे म्हणून वामन ने फोन ठेवला


आणि स्वतःशी बोलू लागला "वाह आजचा दिवस एव्हडा आनंदित असेल असे मला वाटले नव्हते ज्या दोन कंपनी माझ्यासाठी प्रॉफिट होत्या त्या स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट रद्द करून गेल्या आणि आज स्वतःहून परत येण्याचे म्हणतात म्हणजे माझा बिसनेस परत प्रॉफिट मध्ये येईल कोणी एका माणसाने म्हणे माझ्या कंपनी ची ग्रँटर राहून परत आणले पण जे नाव त्यांनी सांगितले ते नाव मी तरी कधी ऐकले नाही कोण असेल तो माणूस कैलाश पर्वतकर त्याचा नंबर मिळाला असता तर बरे झाले असते पण जाऊ दे माझे पहिलीचे काम त्यांनी पहिले असेल माझे नाव तसेच आहे उगीच कोण कोणासाठी ग्रँटर नाही राहता रवी च्या कानावर घालायला हवे असे म्हणून रवीला वामन केबिन मध्ये बोलवतो


"सर मला बोलवले "


"अरे हो मला तुला आनंदाची बातमी द्याची आहे आपल्या प्रॉफिटॅबल कंपनी ज्या स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट सोडून गेल्या होत्या त्या परत येत आहे त्यांनी स्वतःहून उद्या परत कॉन्ट्रॅक्ट करण्याचे सांगितले आहे आपण परत एकदा प्रॉफिट मध्ये येऊ आणि तुला महिला आहे हे सर्व एका माणसामुळे झाले म्हणजे तो हि बिसनेस ऍड व्हाइसेर आहे त्याने आपल्या कंपनीची ग्रँटर म्हणून हमी दिली आहे त्याचा नंबर नाही मिळू शकला पण नाव काही कैलास पर्वतकर असे सांगितले आहे ना आनंदाची ची बातमी "


हे ऐकून रवी वामन कडे पाहत राहिला"काय झाले ऐकून शॉक बसला ना "?


"हो सर हे सर्व कसे अचानक "


"हो मला हि कळत नाही पण जे झाले ते चांगले च झाले ना "


"हो सर "


"अरे मग काय झालं तू असा गंभीर का आहेस "


"काही नाही सर ऐकून जरा गोधळलो आहे" असे म्हणून रवी बाहेर गेला


घरी आल्यावर वामन ने मोठ्या दिमाखात हि गोष्ट घरी सांगितली आई आणि आजोबानी मनोमन देवाचे आभार मानले पण सांगताना वामन आपल्या नावामुळे आणि मेहनती मुळे हे सर्व परत मिळाले हे सांगायला विसरला नाही ती रात्र तो शांत पणे झोपला सकाळी त्याला ऑफिस मध्ये जाऊन परत कॉन्ट्रॅक्ट करायचे होते परत एकदा आपला बिसनेस मोठा होणार हि गोष्ट त्याला खुश करत होती


सकाळी उठताच वामन ने मोबाईल चेक केला तर रवीच्या नावाने साठ लाख ट्रान्सफर केलेला मेसेज मिळाला तो वाचून वामन म्हणाला


"रवीने मला एवढे पैसे का ट्रान्सफर केले बिसनेस ची परिस्थिती पाहता मला मदत म्हणून पण एवढे पैसे त्याच्याकडे कुठून आले "?


फोन न लावताच लगेच तयारी करून वामन ऑफिस मध्ये पोहचला आणि रवीला आत बोलवले


"रवी मला माहीत आहे तुला माझी बिसनेस ची काळजी आहे पण त्यामुळे तू स्वतः ची सेविंग मला द्यावी अशी माझी इच्छा नाही आणि आज आपल्याला कॉन्ट्रॅक्ट परत मिळणार आहे त्यामुळे टेन्शन नाही सॉरी पण एवढे पैसे तुझ्याकडे असतील असे वाटले नव्हते "


"नाही सर हे तुमचे पैसे मी तुम्हला देत आहे "


"माझे पैसे मला म्हणजे "?


'सर हे पैसे तुम्ही ठेवा नाहीतर कैलाश पर्वतकर मला सोडणार नाही "


"कैलाश पर्वतकर तो तुला कुठे मिळाला आणि त्याने तुला मला पैसे द्याला का सांगितले "

"कैलाश पर्वतकर तो तुला कुठे मिळाला आणि त्याने तुला मला पैसे द्याला का सांगितले "?


"सर सॉरी माझे चुकले "


"म्हणजे "?


"सर माझ्यामुळेच आपली कंपनी लॉस मध्ये गेली"


"काय"?


"हो सर आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी ने मला असे करण्यास पैसे दिले होते आणि त्याच् मुळे मी आपल्या कंपनीच्या लोकांशी भेटताना तुमची कमी सांगत होतो त्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट तोडले आणि काही लोक आपल्या काम सोडून गेली ते हि माझ्या सांगण्यावरूनच "


"काय हे काय बोलतोस तू रवी तुला कळते का "?


"हो सर जे पैसे मी तुम्हाला ट्रान्सफर केले ते पैसे मला हे सर्व करण्यासाठी मिळाले होते "


"काय रवी तू असा वागू शकतोस आणि मला हे तू उघड पणे सांगत आहेस त्या दिवस तर सर मी तुमच्या पाठीशी आहे वैगेरे म्हणून जी सहानभूती दाखवली ती काय होती "?


"सर ते एक नाटक होते "


"तुला लाज नाही वाटत मला असं सांगताना किती विश्वास करत होतो मी तुझ्यावर आणि तू माझा विश्वास घात केलास पण त्या कैलाश पर्वतकर ला तुझ्याबद्द्ल कसे कळले "


"सर मला नाही माहित पण तुम्ही पैसे ठेवा आणि हा माझा राजीनामा कैलाश तो शिवगड्ला राहतो त्याने मला फोन करून सांगितले आणि त्याच रात्री माझ्या स्वप्नात महादेव आले आणि त्यांनी पण मला सुधारण्याचा इशारा दिला तुम्हला उगीच त्रास दिलासा तर पहा असे म्हणाले आणि देवाचा इशारा कोण नाही मानणार येतो मी "असे म्हणून भयभयीत होत रवी केबिन बाहेर गेला


"कैलाश पर्वतकर शिवगड महादेव "काय आहे सर्व


त्या कैलाश पर्वताकरचा पत्ता मला पाठवतो म्हणून सांगितलेला परत विचारतो असे म्हणून वामन ने फोन केला "सर मी वामन बोलतो तुम्ही मला त्या कैलाश पर्वताकारचा पत्ता पाठवणार होता ना "?


"हो आताच पाठवतो हो "


"हो सर प्लिज "


वामन ने फोन ठेवला आणि मेसेज आला ते पाहत "आला मेसेज "


"शिवालय शिवगड हा पत्ता आहे कैलाश पर्वताकरचा अरे हा पत्ता तर शिवगडच्या मंदिराचा आहे असे म्हणून वामन विचार करू लागला आणि काही मिनिटे तो गप्पच राहिला आणि म्हणाला शिवगड म्हणजे देवाने हे सर्व "


पटकन वामन ऑफिस मधून बाहेर पडला आजच्या कॉन्ट्रॅक्ट ची मीटिंग उद्यावर ठेवून लगेच तो घरी आला


शिवाय च्या आईला पाहत म्हटले "वसू बाबा आणि शिवाय ला रेडी वाहायला सांग आणि तू हि रेडी हो "


"हो पण आपण कुठे जातोय "?


"शिवगडला "


"काय शिवगड्ला "


"हो का ते नंतर सांगतो" असे म्हणून तयारी करण्यास वामन गेला आईने आजोंबां आणि शिवाय ला सांगितले ते लगेच तयार झाले कोणीही वामन ला काहीही विचारले नाहीतिघेही मनातून खूप खुश होते दोन तासात शिवगडाला पोहोचले सगळे उतरले आणि मंदिरात गेले वामन ने मंदिरात प्रवेश करताच देवाला हाथ जोडत म्हटले


"देवा मला माफ कर एव्हडी वर्ष मी तुझ्याकडे पाठ फिरवली पण तू मात्र माझ्यावर लक्ष देत होतास ह्या दोन दिवसात जे तू घडवून आणलेस ते मी नाकारू नाही शकत ते जर तू केले नसतेस तर आयुषाचे बरे वाईट करायला हि मागे राहिलो नसतो कारण हरणे पचवता आले नसते देवा तू चे अस्तित्व मी माझ्या गुर्मीत विसरलो पण तू मला ते दाखवलेस वामनाला असे रडताना पाहून आजोबा आई आणि शिवाय हि भावुक झाला गुरुजी हि त्याचे ते रडवे बोल ऐकून म्हणाले


"वामन रडू नकोस तुझी चूक तुला कळली हे बरे झाले अरे आपले कुलदैवत आपल्या वर नजर ठेवून असते पण आपण विसरतो आणि मग संकटात पडलो कि आठवण करतो जाऊ दे गेल्या गोष्टी उरगळात बसण्यात काही अर्थ नाही काही वर्षांपूर्वी त्या दिवस अर्धवट पूजेवरून गेला होतास पण आज पहा पूजेच्या वेळीस तू आलास चल पूजा करून घे तेवढे तुझ्या मनाला हि समाधान "


"नाही गुरुजी काका तो मान मी कधीच गमावला तो माझ्या शिवाय चा आहे शिवाय पूजा कर"


आजोबानी हि वामनाच्या बोलण्याला होलार दिला तसा शिवाय गुरुजी आजोबांबरोबर गेला सोवळे नेसून आला गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे पूजा केली आणि पंचारती घेऊन आरती साठी उभा राहिला आणि आरती सुरु झाली जे त्याने स्वप्नात पहिले होते तो ते आज प्रत्क्षात अनुभवत होता त्याने मनोमन देवाला पाहत म्हटले "शिव शंभो तुझी लीला अगाध आहे "


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy