akshata alias shubhada Tirodkar

Romance Tragedy Classics

3  

akshata alias shubhada Tirodkar

Romance Tragedy Classics

अनुप्रिया -एक अनोखी प्रेमाची कहाणी

अनुप्रिया -एक अनोखी प्रेमाची कहाणी

40 mins
283


नजरेस नजर मिळत होती पण शब्द काही फुटत नव्हते मनातून एकमेकांचे झाले होते पण कोणीच कोणाला सांगितले नव्हते पण तो दिवस उजाडला जेव्हा अनुज ने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली हातात गुलाबाचे फुल देऊन प्रिया समोर केली 


"प्रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आपण कधी बोललो नाही पण आपल्या नजरेने मला तुझ्यात गुंतले माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील "


अनुज च्या ह्या प्रश्नाने तिचे मन नाचू लागले होते कारण ती ही ह्या प्रश्नांची केव्हापासून वाट पाहत होती आणी आज तो दिवस आला होता पण प्रियाच्या तोंडून एक शब्द ही निघत नव्हता ती फक्त अनुजला पाहत होती तिला हे स्वप्न आहे की सत्य हेच कळत नव्हते


अनुज गुडघ्यावर तसाच राहुन तिच्या उत्तराची वाट पाहत होता कधी एकदा तिचे उत्तर येते असे त्याला झाले होते पण प्रिया कडून‌ काहीच प्रतिक्रिया येत नव्हती हे पाहून अनुज ने परत एकदा प्रियाला हाक मारली तशी प्रिया कांहीही न सांगता तिथून निघून गेली


अनुजला तिचे असे जाणे मनाला खटकले पण त्याने स्वतःला सावरत तिच्या उत्तराची वाट पाहावी असे मनाशी ठरवले


प्रिया ही ह्या क्षणाची वाट पाहत होती मग ती ने उत्तर का नाही दिले? काय असेल तिचे उत्तर?असे अनेक प्रश्न अनुज साठी अनुउतर राहिले

त्या दिवसाची संध्याकाळ अशीच गेली दोघेही विचारचक्रात अडकले इथे अनुजला समजत नव्हते कि प्रिया अशी का निघून गेली आपण चूक तर नाही केली ना तिला विचारून आणि दुसरीकडे आपल्या अश्या वागण्याने अनुज काय समजत असेल हि गोष्ट तिला सतावत होती ह्या तच रात्र सरली 

दुसरा दिवस उजडाला नेहमी प्रमाणे दोघेही कॉलेज ला गेले दुपारच्या वेळी अनुज आपल्या मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये बसला होता ते दोघे हि वेगवेगळ्या वर्गात शिकत होते त्यामुळे अनुज ची भिरभिरती नजर प्रियाला शोधत होती तेवढ्यात तिला प्रिया आपल्या मैत्रीणीबरोबर कॅन्टीन मध्ये शिरताना दिसली त्याला थोडेसे हायसे वाटले पण त्यानी ठरवले होते आपण मुदाम काहीच नाही विचारायचे त्यामुळे तो न पहिल्या सारखा करून चोरून पाहत होता 

प्रिया समोर च्या टेबल वर बसली ती ने एक नजर अनुज वर टाकली प्रिया कधी एकदा काही सांगते असे अनुजला झाले होते तेवढ्यात अनुज च्या दिशेने ती येताना त्याला दिसली ती येऊन अनुजच्या टेबलं समोर उभी राहिली तसा अनुज हि उभा राहिला हि आता काय सांगेल हि भीती त्याच्या मनात दाटत होती तो काही बोलायच्या आत प्रिया म्हणाली "अनुज जरा बाहेर येतोस का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे "

हे ऐकून त्याला अजून भीती वाटू लागली लगेच हो म्हणत प्रिया च्या मागे गेला ते दोघे कॅन्टीन बाहेरच्या सोफयावर बसले त्याचा कावराबावरा चेहरा पाहत प्रिया म्हणाली "सॉरी अनुज मी काल असे निघून जायला नको होते "

"नाही प्रिया इट्स ओके तुझा नकार असेल तर मला वाईट नाही वाटणार कारण मला वाटते तसेच तुला वाटणे होणार नाही पण तू काल मला सांगितलं असते तर बरे झाले असते इट्स ओके "

"अरे हो थांब जरा माझे म्हणणे तरी ऐकून घे "

"म्हणजे "?

"अरे एवढे दिवस आपले फक्त डोळे बोलायचे आणि अचानक तू काल मला विचारले तर मला आनंदाचा धक्का नाही का बसणार ज्या दिवसाची मी एवढे दिवस वाट पाहत होते आणि अचानक असे काही होणे म्हणजे मी गोधळून गेले कि हे स्वप्न आहे कि सत्य म्हणून मी काहीही न सांगता गेले पण मग मला जाणवले माझे असे जाणे तुला आवडले नसणार म्हणून मी आज ठरवले कि आज तुझ्याशी बोलायचे अनुज मी हि तुझ्यावर खूप प्रेम करते माझा होशील का "?

हे ऐकून अनुज तर सात आसमान उप्पर गेला "काय खरंच प्रिया "?

"हो अनुज मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते "

दोघेही खुश होते दोघांची नजर प्रेमात आतंक डुबून गेली होती एवढ्यात कॅन्टीन मध्ये काचेचा ग्लास पडल्याचा आवाज आला आणि त्याच्या काचा त्याच्या पर्यत पोहोचल्या होत्या हा नेमका अपघात होता कि कोणता तरी संकेत ?

ज्या दिवसापासून त्यानी आपले प्रेम एकमेकांना व्यक्त केले त्या दिवसापासून ते दोघे सोबत दिसू लागले सोबत चालणे वाट पाहणे काळजी घेणे हे चालू होते त्याची जोडी हि खुलून दिसायची पण ह्या सर्वाचा त्यानी अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही सोबत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे त्याचे हे अनोखे प्रेम पाहून" अनु प्रिया " म्हणजे अनुज ची प्रिया आणि प्रिया चा अनुज हि जोडी कॉलेज मध्ये प्रसिद्ध झाली 

असेच दिवस जात होते आणि त्याचे नाते हि बहरत होते एकमेकांच्या सहवासातला प्रत्येक क्षण टिपत ते पुढे जात होते पण त्याच्या नात्याची खबर त्याच्या घरातल्याना नव्हती पण कॉलेज मध्ये अनुप्रिया म्हणजे प्रेमाची दोन पांखरे म्हणजे लव्ह बर्डस म्हणून प्रचित होती

अशीच कॉलेज ची वर्ष सरली आणि शेवटच्या वर्षाचा निरोप संभारंभाचा दिवस उजाडला दोघे हि सोबत उपस्थित होती पण त्याच्या चहेरा आज उतरलेला होता कारण हि तसेच होते ह्यापुढे त्यांना सोबत खूप वेळ घालवणे मिळणार नव्हते कॉलेज चा सभारंभ संपला आणि दोघे हि नेहमी प्रमाणे कॅन्टीन बाहेर असलेल्या सोफयावर बसले 

अनुज निराश होऊन म्हणू लागला "हा दिवस एवढे लवकर येईल हे मी विचार केला नव्हता आणि आज आला देखील "

"हो ना अनुज आता आपले भेटणे कमी होणार "

"हो पण आपले प्रेम नाही आणि आपण आठवड्यातून एकदा भेटायचं "

"हो नक्की पण अनुज आपण किती दिवस असे लपत छपत भेटणार घरातल्याना आपण कधी सांगूया "

"ते हि बरोबर आहे तुझं पण तू काळजी करू नकोस मला चांगली नोकरी मिळाली कि मी स्वतः तुझ्या घरी तुझा हात मागण्यासाठी येईन "

"खरंच अनुज "

"हो प्रिया त्या साठी आपल्याला चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळून चांगली नोकरी मिळवावी लागेल मग करू आपण सुखी संसार "

"खरंच अनुज तुझे विचार किती चांगले आहे "

"हो का प्रिया राणी मग नोकरी नसताना मला तुझे आई बाबा तुझा हात देतील "

"नाही ना खरं आहे तुझं मी किती नशीबवान आहे तुझा सारखा साथ मिळून "

"हो का "

दोघेही हसू लागतात एवढ्यात प्रिया आपल्या डोळ्याला हात लावत म्हणाली "अनुज माझा डावा डोळा फडफडतो आणि असे म्हणतात कि काही वाईट होणार असेल तर "

"प्रिया वेडी झालीस का तू असल्यावर विश्वास ठेवतेस काहीही "

पण खरंच काही वाईट होणार आहे ?

निरोप समारंभ संपन्न झाला परिक्षा ही झाली दोघे ही चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले आता ते दोघे नोकरीच्या शोधात लागले दोघे ही हुशार असल्याने दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी पण चांगली नोकरी मिळाली अशेच दिवस जात होते ते दोघेही आठवड्यातून एकदा भेटत होते


अशाच एका भेटीत अनुज ने प्रियाला एक ऑफर सांगितली ऐकून प्रिया थोडी भावूक झाली पण ह्या ऑफरने जर अनुज चे भवितव्य उज्ज्वल होणार असेल तर तो दुरावा सहन करण्यास तयार होती


"प्रिया नाही यार दोन वर्षे दूर रहाणे मनाला पटत नाही "


"हे बघ अनुज मला ही तुझ्या पासुन दुर राहुन कुठे मन लागणार पण आपण भावनिक न होता भविष्याच्या दृष्टीने विचार करायला हवा "


"बरोबर आहे तुझं चांगली संधी सोडणे नाही मी जाईन अमिरीकेला नोकरी साठी पण दोन वर्ष दूरावा राहील "


"हो पण आपण थोडेच दुर आहोत आपण तर मनाने जवळ आहोत मग कशाची भिती "

"

खरं बोलीस तु दोन वर्षे काय अशीच जातील आणी मी तुला न चुकता दररोज फोन करेन "

"हो आणी मी ही तुझ्या फोनची वाट पाहेन "


"पण त्यापुर्वी मला एक महत्त्वाचे काम करायचे आहे"


"म्हणजे ?


"अगं तुझा हात नको का मागायला अमेरिकेत जाण्यापूर्वी मी तुझ्या आई बाबांशी बोलेन आणी मी दोन‌ वर्षांनी परत आलो की आपण लग्न करु मग काय तिथली सोय पाहुन तुला पण घेऊन जाईन '"


"खरंच"?


"हो मग आपला सुखी संसार सुरु होईल "

"

"अनुज हे ऐकून एवढे भारी वाटत ना "


"हो ना मग प्रत्यक्षात काय करशील "


"हो रे अनुज "


"त्यापुर्वी तुझ्या आई बाबांना सांगायला नको" एवढ्यात अनुज शिकंतो


"काय म्हणत होतास आई बाबांना"?


"अगं तुझा हात हातात द्या म्हणून"


आणी दोघेही भविष्याच्या स्वप्नात रंगून जातात पण हे भविष्य खरंच रंगीत असणार का?

सकाळची वेळ दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला


"नमस्कार काकु मी अनुज सारंगधर प्रियाचा मित्र "


"पण प्रिया घरात नाही आहे ती ऑफिसमध्ये गेली आहे संध्याकाळी भेटेल "


"नाही मला माहीत आहे पण माझं काम तुमच्याकडे म्हणजे प्रियाच्या आई बाबा कडे आहे मी आत येऊ शकतो "


"आमच्याकडे हो ये"


प्रियाचे बाबा पेपर वाचत बसले होते प्रियाच्या आईने त्यांना हाक मारली

"अहो प्रियाचा मित्र आला आहे आपल्याकडे काम आहे म्हणतो"


"नमस्कार काका "


"बस काय काम आहे आणी ते ही आमच्या कडे"


"काकू तुम्ही बसा"


"काका मी प्रियाला मागणी घालायला आलो आहे "


"काय ?"


"काका काकू गेली पाच वर्षे आम्ही नात्यात आहोत "


"काय ?"


"हो आम्ही एकमेकांवर खुप प्रेम करतो आमच्या नात्याबद्दल तुम्हाला मला चांगली नोकरी मिळाली की सांगु या असे ठरवले म्हणून आज मी तुम्हाला प्रियाचा हात मागण्यांसाठी आलो आहे मी प्रियावर खुप प्रेम करतो आणी तिला नेहमी खुश ठेवीन मी इथल्या एका कंपनीत काम करत आहे आणी मला अमेरिकेत नोकरीची संधी आली आहे आणी पुढच्या महिन्यात मी जाणार आहे त्यापुर्वी मी तुम्हाला सांगण्याचे ठरवले आणी हो मी अमेरिकेतून दोन वर्षांनी आल्यावर प्रियाशी लग्न करणार आणी तिथल्या सुख सोयी पाहून तिला पण घेऊन जाणार फक्त तुम्ही तुमच्या प्रियाचा हात मला जन्मभरासाठी द्या "


प्रियाचे बाबा सगळे निमुटपणे ऐकत होते अनुज चे म्हणणे संपताच त्यांनी त्याला पाहत म्हटले


"वाह म्हणजे तुम्ही सगळे ठरवुन मोकळे झालात आम्हाला फक्त औपचारिकता "


"नाही काका तसं नव्हे आम्ही हे पूर्वी सांगितले असते तर अभ्यास सोडून हे काय करता हा प्रश्न उभा गेला असता आणी तो प्रश्न हि बरोबर आहे पण आम्ही आमच्या अभ्यासावर कोणताही परिणाम करून घेतला नाही आणी मी कमवता नसताना तुमच्या मुलीचा हात मागणे माझ्या मनाला पटले नाही पण ह्या पुढे तुमच्या आणी माझ्या आई बाबांच्या परवानगी सगळे होईल "


"तुला माहित आहे ना प्रिया आमची एकुलती एक मुलगी तिला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले आहे आणि कोण तु ओळख ना पाळख आणी येऊन प्रियाचा हात मागतोस आणी तुला काय वाटतं मी सहज देईन प्रियाला विचारल्याशिवाय तुझी विचार पुस केल्याशिवाय मी कोणताही निर्णय सांगू शकत नाही प्रेम वैगरे ठीक आहे लग्न काही भातुकली चा खेळ नाही जो आज मांडला उद्या संपला "


"नाही मला तुमचे सर्व गोष्टी मान्य आहेत एक बाप म्हणून तुम्हाला जी चौकशी करायची ती करा मी फक्त एवढंच सांगेन प्रिया ला मी नेहमी सुखी ठेवीन येतो मी "


काय असेल प्रियाच्या बाबांचा निर्णय अचानक पणे हे गुपित समोर आल्याने ते प्रियाला कसे सामोरे जातील ?

अनुज ने प्रियाला प्रियाच्या घरी घडलेल्या प्रसंग सांगितला प्रियाला थोडी भिती वाटु लागली कारण तिला माहित होते हजार प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार आहे ऑफिसमधून स्वताला सावरत ती घरी पोहचली आई बाबा सोफ्यावर बसले होते त्यांना ‌नजर चुकवत ती आपल्या खोलीत गेली हात पाय धुऊन चहा घेतला पण आज नेहमी प्रमाणे फ्रेश वाटणार चहा तिला आज कंटाळवाणा वाटला एवढ्यात बाबांची हाक आली आणी ती हाॅल मध्ये येऊन उभी राहिली


"बस बेटा मला तुझ्याशी थोडा बोलायचं आहे"


प्रिया आई बाबासमोर च्या खुर्ची त बसली


"बेटा आज सकाळी काय घडलं ह्याची जाणीव असेल तूला अनुज ओळखतेस ना तु त्याला"?


"हो बाबा"


"मागणी घालायला आला होता पाच वर्षे प्रेम आहे म्हणे तुमचं "?


"हो बाबा "


"मग काय तुम्ही तर सगळं ठरवून टाकलं आहे तू कधी मोठी झालीस हे आम्हला कळेच नाही कि तू तुझा जन्मभरचा साथीदार हि निवडलास आणि आम्हला त्याची भनक हि नाही लागली आणि आज तर तो इथे आला सरळ तुझा हात मागायला हे सर्व तुम्ही तुमचं ठरवलं मग आमची कसली परवानगी हवी तुम्हला तो येणार हे तुला माहित होते मग तू आम्हला जरा तरी जाणीव करून का दिली नाही कि तू मोठी झाली म्हणून तुझ्या आयुष्याशी आमचं काही देणं घेणं नाही का "


बाबा च्या अश्या बोलण्याने प्रिया भावुक झाली तिच्या डोळयांत पाणी आले ते पुसत ती म्हणाली "बाबा मी तुमचा राग समजू शकते पण मला वाटले कि अनुज ने तुम्हला समोरासमोर सांगितलं तर बरं होईल बाबा अनुज खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला सुखात ठेवेल "


"तो अमेरिकेला जात आहे आणि दोन वर्षांनी येणार आणि तुझ्याशी लग्न करणार असेच ठरले ना तुमचे "


"हो बाबा आणि अनुज आपला शब्दाशी ठाम राहणार आहे "


"पण ह्या दोन वर्षात जर त्याने तिथेच आपला संसार सुरु केला तर ?कित्येक अशे परदेशी कामानिमित्त गेलेले परत आलेच नाही अश्या घटना आहेत "


"असतील हि बाबा मी नाही म्हणत नाही पण अनुज त्यातला नाही तो संसार करेल तर माझ्याशी बाबा माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे "


"वाह वाह प्रिया एव्हडा आंधळा विश्वास बरा नव्हे "


""नाही बाबा अनुज मध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही


"आता मी काय बोलू तू तर त्याची वकिली करत आहेस "


"बाबा तो खरंच चांगला आहे आणि मी लग्न करिन तर अनुजशीच "


"तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे पण हे बघ प्रिया तू आमची एकुलती एक मुलगी आहेस मी त्या मुलाबद्दल स्वतः विचारपूस केल्याशिवाय माझा निर्णय सांगू शकत नाही "


"पण बाबा तो खरंच चांगला आहे "


"तो तुझ्या नजरेत माझी परवानगी हवीच असेल तरच मला वेळ दे मी माझा निर्णय सांगेन आणि हो आणि नको असेल तर तुला तू हवं तेच कर "


"बाबा असे नका ना बोलू अहो मी तुम्हला दुःख देऊन असे काहीतर करेन का माझी इच्छा एकच आहे कि तुम्ही तुमच्या हातानी मला अनुज च्या घरी म्हणजे माझ्या सासरी पाठवणी करायला हवी "


"काय असेल बाबा चा निर्णय होईल का आईबाबाच्या हातून अनुज च्या घरी प्रियाची पाठवणी ?

जेव्हा पासून अनुज चे घरी कळले होते प्रिया थोडी गप्पच होती काय होईल बाबाचा काय निर्णय असेल ह्याच विचारात ती गुरफ़टलेली अश्याच एका संध्यकाळी ती ऑफिस मधून आली आणि सरळ आपल्या रूम मध्ये गेली आई बाबा दोघे हि टीव्ही पाहत होते तिने चहा घेतला पण आज बाबा काय सांगतील आपला निर्णय ह्याच विचारात ती होती तसे अनुज बदल वाईट असे काहीच नव्हते पण एक वडील म्हणून आपल्या मुलीचा हात देताना आपले बाबा एक "कसूर हि सोडणार नाही ह्याची तिला जाणीव होती 


आईने प्रियाला हाक मारली तशी ती बाहेर आली बाबा नि तिच्या कडे पहिले 


"काय प्रिया हल्ली तुझा चहेरा का उतरलेला असतो "?


"काही नाही बाबा "


"बस मला तुला काही सांगायचं आहे "


हे ऐकताच प्रियाला धडकी भरली काय बाबा सांगतील नाही म्हटले तर आई बाबा चे मन दुखावण्याची हिम्मत तिच्यात नव्हती ती विचारात गडून गेली 


"प्रिया बाबा काय म्हणतात बघ "


"हा आई हा बाबा "


"शांतपणे सर्व ऐकून घे मी तुला निर्णय द्याला वेळ दिला होता बरोबर "


"हो बाबा "


"हे बघ आजपर्यत तुझे मन आम्ही कधीच दुखावले नाही तुझे सुख हेच आमचे सुख आम्ही मानत आलो आणि तुझ्याशिवाय आम्हला आहेच कोण पण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्यामध्ये भावनिक न होता अचूक निर्णय घेणे योग्य आहे त्यासाठी मी तुला वेळ दिला होता जेणेकरून आम्ही एका अचूक निर्णयावर येऊन तुला आमचा निर्णय सांगू "


"मग काय निर्णय आहे बाबा "?


"बेटा अनुज बदल मी विचारपूस केली आहे तशी काही वाईट गोष्ट त्याच्याबद्दल ऐकायला आली नाही "


हे ऐकताच प्रियाचा चहेरा खुलला "बाबा सांगितलं होत ना मी कि तो चांगला आहे म्हूणन 


""अगं हो प्रिया बाबा काय म्हणतात ते ऐक तरी "आईने असं म्हणतात ती जरा गप्प झाली 


"हे बघ प्रिया मी आणि तुझे बाबा तुझे सुखच पाहत आहे लग्न म्हणजे खेळ नाही एकदा कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं ना कि एक जबाबदारी वाढते तू कोणाची तरी अर्धांगिनी होतेस एका माणसाबरोबर आयुष्य घालवणं म्हणजे खायचं काम नाही साथ जर चांगली असेल तर तो प्रवास सुखकर होतो नाही तर मन मारून खडतर त्यात ह्या सगळ्यातून काडीमोड केला तरी हि खूप प्रश्न उभे रहातात त्यामुळे हा निर्णय विचार करूनच करायला हवा "


"हो आई "


तिने बाबाना कडे पाहताच बाबानी सुरवात केली" तर प्रिया तुझे सुख तेच आमचे सुख त्यामुळे आम्ही दोघांनी तुझ्या नात्याला मान्यता दिली आहे अपेक्षा एव्हडीच कि आम्ही आमच्या काळजाचा तुकडा अनुजला सोपवत आहोत त्यानी त्याची चांगली जपवणूक करावी


आणि आई बाबा दोघाच्या डोळयांत पाणी आले दोघाना रडताना पाहून प्रिया हि स्वतःला रोखू शकली नाही ती दोघांचे डोळे पुसत म्हणाली "तुम्ही निश्चित रहा अनुज मला नेहमी सुखात ठेवेल आता हसा पाहू काय रडता आताच मी काही जात नाही अजून दोन वर्ष आहेत आणि तिघेही हसू लागले 


एवढ्यात प्रियाची आई म्हणाली "अरे तुम्हला कसला वास येतो का करपल्यासारखा "?


प्रिया पळत किचन मध्ये गेली "आई अगं गॅस वर मी ठेवलेले दूध करपून गेले "


प्रियाच्या दुधा सारख्या आयुष्यात अनुजचा होकार मिळताच साखर पडली पण करपलेल्या दुधाचं काय ?

आई बाबाचा होकार मिळाल्याने प्रिया खूप खूश होती तिथे अनुज ने हि आपल्या आई बाबांचा होकार पटकावला होता सगळं काही मनासारखं घडलं होत दोघेही भविष्यच्या स्वप्नात रंगून गेले होते आणि अनुज चे अमेरिकेला जाणे येऊन ठेपले आणि सामानाची आवराआवर सुरु झाली प्रिया हि अनुजला मदत करत होती प्रियाच्या आईने आपल्या हाताने बनवलेल्या नारळाच्या वड्याचा डब्बा अनुजला सुपुर्त केला आणि एके दिवशी स्वारी एअर पोर्टला निघाली 


अनुज ला सोडण्यासाठी अनुज चे आई बाबा आणि प्रिया आली होती आई बाबा चे डोळे पाणावले होते अनुज हि एकुलता एक मुलगा होता एवढे दूर जाणार म्हणून त्याच्या जीव कासावीस झाला होता पण अनुज ने भावनिक न होता आई बाबाचा आशीर्वाद घेऊन अनुज प्रिया कडे वळला तर तिच्या डोळ्यात अश्रुंचे ढग दाटून आले हे पाहून "अगं वेडा बाई रडतेस का "?


असे म्हणताच प्रियाच्या अश्रूचा बांध फुटला "काळजी घे अनुज "


"अगं हो घेईन काळजी आणि तू पहिली रडायचे बंद कर "


"बरं तू इथली काळजी करू नकोस आणि फोन करत जा "


"हो हो करत जाईन अगं मी दूर कुठे जातो मी तर तुझ्या जवळच असणार आहे तुझ्या मनात आणि आपण मनातून कुठे दूर गेलो "


"हो बरोबर आहे तुझं अनुज" 


"आणि हो माझी आठवण काढत बसू नको उगीच मला उचक्या लागतील "


"म्हणजे मी तुला विसरून जाऊ "


"नाही नाही तू पण ना अगं आठवण आली कि तुझ्या डोळ्यातल्या गंगा जमुना ना कोण रोखणार "


"अनुज तू पण ना मस्करी काय करतोस "


"बरं नाही करत बरं निघतो उशीर होईल "


"हो काळजी घे आणि फोन "


"करेन आणि तू काळजी घे "


आणि अनुज निघाला प्रिया त्याला पाहत राहिली आणि तो दिसेनासा झाला थोड्याच वेळात अनुजच्या अमेरिका स्वप्नानी गगनभरारी घेतली आणि प्रिया घरी परतली 


ती खूप निराश झालेली ती रात्र तर तिने आठवणीतच काढली 


असेच दोन दिवस झाले ती चा चहेरा पडलेला होता आई बाबा नि आणि अनुज ने समुजत घातली तेव्हा ती कुठे पूर्वपदावर आली अनुजच्या फोन ची तर ती डोळ्यात तेल घालून वाट पाहत असे एकदा का फोन वाजला कि तिच्या गालावरची खळी आपणच खुलायची मग काय मनसोक्त गप्पा व्हायच्या 


तिथे अनुज हि प्रिया ला खूप मिस करत होता कधी एकदा प्रियाचा आवाज ऐकतो असे त्याला व्ह्याचे न चुकता तो प्रियाला फोन करीत असे


असेच दिवस जात होते दोघेही दूर असून हि मनातल्या भावना एकमेकांना जाणवत होते जसे दिवस जात होते प्रियाला अनुजच्या भेटीची उत्सुकता वाढत होती दोन वर्षांनी ती अनुजला प्रत्यक्षात पाहणार होती पण कशी असेल त्याची दोन वर्षांनी होणारी पहिली भेट ?

दोन वर्षानंतर ......


तापलेली जमीन जशी पावसाच्या पाण्याने तृप्त होते तशीच स्थिती प्रियाची अनुजच्या आठवणीने आणि त्याच्या भेटीसाठी झाली होती आणि तो दिवस आला 


पहाटे ४ वाजता अनुज चे विमान भारतात उतरले तिथे अनुज च्या येण्याच्या खुशीनेच प्रियाचा डोळयाला डोळा लागला नव्हता त्याच्या बोलण्यानुसार संध्यकाळी ४ वाजता कॅफे अरोमा मध्ये भेटायचे ठरले होते प्रिया च्या तर चेहऱ्यावर तर आज सुख ओसंडून वाहत होत आणि ते पाहून तिचे आई बाबा हि सुखावले जात होते 


संध्याकाळची ४ वाजता चा भेटीचा वेळ होता पण प्रिया अनुजच्या भेटीच्या ओढीने ३.३० वाजता पोहोचली ती मनातून अनुजला पाहण्यासाठी आतुर झाली होती ती एका टेबलं वर बसली परत परत घड्याळाकडे तिचे लक्ष जात होते परत एकदा तिने नजर टाकली तर ४ वाजायला ५ मिनिटे होती तिने आपले डोळे बंद केले आणि उघडले तर तिला अनुज येताना दिसला ती आनंदाने खुर्चीवरून उठली तो पर्यत अनुज तिच्या समोर उभा होता त्याला पहातच तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून अनुज म्हणाला 


"अरे आता मी आलो तरी रडतेस "


"वेड्या ते आनंदाचे अश्रू आहे मी रडत नाही ते जाऊ दे तू कसा आहेस "?


"मस्त आणि तू "?


"मी पण मस्त "


"बसुया "


दोघे हि बसले अनुजने प्रियाची आवडती कॅपचिनो कॉफी ऑर्डर केली 


"अनुज तुला माहित आहे मी किती किती मिस केलं तुला "?


"हो का बरं आहे मग पण मला तर उचक्या लागल्याचं नाही "


"अनुज तू पण ना म्हणजे तू नाही केलंस मिस मला "


"ह्म्म्म नाही तेवढा वेळ नाही भेटला "


"अनुज माहित आहे केलं अशील का नाही दे मी चांगली ओळखते तुला "


"हो का बरं काका काकू कशा आहेत "?


"दोघे हि मस्त आहेत तू येणार म्हणून एवढे आनंदित आहेत ना "


"बरं प्रिया हि बॅग घे "


"हे काय "?


"तुझ्यासाठी पर्फुम आणि काका काकू साठी ड्राय फ्रुटस "


"माझं बरं आहे पण आई बाबाचे इथे कशाला घरी येणार नाही का ?"


"अगं येणार ना "


"हो आता तर तुला यावंच लागेल आणि ते हि खूप वेळा "


"म्हणजे प्रिया "?


"अरे आपण आता लग्न करणार म्हणजे येणंजाणं राहणार ना जावईसाहेब "


"लग्न "?


"हो लग्न तूच नाही का सांगितले होते बाबांना कि अमेरिकेतून दोन वर्षांनी आल्यावर लग्न करणार म्हणून माझ्या घरी तर तयारी सुरु झाली म्हणजे माझ्या दागिन्यांची वैगरे आणि तुला माहित आहे का लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी मी नको म्हणताना आपली एफडी तोडली "


हे सार ऐकून अनुज गप्प झाला हे पाहून प्रियाने अनुजला म्हटले 


"काय कुठे हरवलास"?


""नाही कुठे नाही पण लग्नाची तयारी एवढ्यात का अजून लग्न कुठे ठरलं "


"माझी आई म्हणते लग्न करण्याऱ्या लॊकांनी आपली तयारी पहिलीच करावी उगीच मग गडबड नको आणि लग्न काय आता तू आलास म्हणजे तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा ठरवतील "


"पण एवढ्या लवकर तयारी कशी होणार"?


"तयारी करायला काय एक काम कर उद्या तू तुझ्या आई बाबांना आमच्या घरी घेऊन ये उगीच उशीर नको "


"नाही पण प्रिया मला असं वाटते कि आपण उगाच घाई करतो "


"म्हणजे अनुज "


"प्रिया खरं सांगू तर मला अजून दोन तीन वर्ष लग्न नाही करायचं "


"काय पण का अनुज ?"


"प्रिया मी तुला कारण नाही सांगू शकत पण मला असे वाटते कि आपण दोन तीन वर्ष थांबलो तर "?


"पण का अनुज काय प्रॉब्लेम आहे काही असेल तर मला सांग आपण सॉर्ट करू "


"नाही प्रिया तसा काही प्रॉब्लेम नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचे "


"पण का अनुज काही कारण नक्कीच असेल पैशाची कमतरता असेल तर आपण साधे लग्न करू मला काही प्रॉब्लेम नाही "


"नाही पैशाची कमतरता नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचं "


"अरे तूच तर बाबांना सांगून गेला होतास आणि आता तुला आणखी दोन तीन वर्ष थांबायचं आहे पण का तुला माहित आहे माझ्या घरी स्थळ येतात त्यांना बाबानी सांगून टाकले आहे कि मी माझा जावई शोधला आहे तो नोकरी साठी परदेशी असतो तो आल्यावर आम्ही ह्याचवर्षी लग्न करणार आणि तुला माहित आहे का येत्या दोन दिवसात आईबाबा तुमच्या घरी बोलणी करण्यासाठी जाणार आहे आता मी त्याना काय सांगू कि तुला लग्न नाही करायचं एवढ्यात पण का ते मला माहित नाही "


"हे बघ प्रिया मी तुला आता एवढेच सांगू शकतो आपण आणि दोन तीन वर्षांनी लग्न करू तुला माझा विश्वास नाही का "?


"आहे पण तू हे का सांगतोस त्याचे कारण पण कळायला हवे ना "


"हे बघ प्रिया तू कुठलाच वाईट विचार मनात आणू नको तुझा अनुज तुझ्या पासून कधीही दूर जाणार नाही लग्न करेन तर तुझ्याशी पण आता नाही हे मात्र खरं आहे "


"पण का "?


"नाही सांगू शकत प्लिझ मला समजून घे "


हे सर्व ऐकून प्रियाचे डोळे पाणावले ती त्याच स्थिती बोलू लागली "आणि मला कोण समजून घेणार आजच्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते ते फक्त काय हे ऐकायला "


"सॉरी प्रिया मला माहित आहे तुला खूप वाईट वाटत आहे पण मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे "


हे ऐकताच प्रिया काहीही न बोलता निघून गेली आणि अनुज तिला थांबवण्यासाठी हाक देत राहिला 


"प्रिया प्रिया "

 काय असेल कारण कि अनुज ला आपल्या लग्नाचे मत बदलावे लागले ?आणि जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रियाचे मन दुखवावे लागले? 


प्रिया अनुजला भेटून घरी परतली घरात पाऊल टाकताच तिला आई दिसली तिनी आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली तिचे असे रडणे आईला काही समजेना जाताना तर ती खूप खुश होती आणि आता आईने तिला विचारले 


"काय झालं प्रिया अशी काय रडतेस "?


तिच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रियाचे बाबा हि आत होते ते बाहेर आले 


"काय झालं बेटा का रडतेस "?


"अहो पाहा ना मी विचारले तर फक्त रडतच आहे "


आईने तिला सोफ्यावर बसवले एक बाजूनी बाबा आणि दुसऱ्याबाजूला आई तिला सावरत होते प्रियाने रडत रडत सारी गोष्ट त्याच्या कानावर घातली हे सारं ऐकून आई हतबल झाली तर बाबाचा पारा चढला 


"काय काय समजतो तो स्वतःला अमेरिकेची हवा गेली वाटत कानात पण तू काळजी करू नकोस त्याच्या डोक्यातली हवा मला माहित आहे कशी काढायची "


तिथे अनुज ची दुखावला होता आज प्रथमच त्याने प्रियाला एवढे दुखावले होते प्रियाचा तो केविलवाणा चहेरा त्याच्यासमोरून जात नव्हता त्याने प्रियाच्या तिथून जाण्यानंतर खूप वेळा तिला फोन लावला पण तिचा मोबाईल स्वीटच ऑफ लागला तो मनातल्या मनात देवाला सांगडे घालत होता "हे देवा तुला तर माहित आहे माझे प्रियावर केवढे प्रेम आहे ते पण आज जे मी प्रियाला सांगितले ते सुद्धा माझा नाईलाज होता प्लिज देवा प्रिया मला समजून घेऊ दे "


 एवढ्यात त्याच्या फोन ची रिंग वाजली लगेच त्याने मोबाइल पहिला तर प्रियाच्या बाबा चा फोन हे त्याला अपेक्षित होतेच त्याने फोन उचलला आणि प्रियाच्या बाबांनी न थांबता त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला अनुज काही न बोलता गप्प राहून सर्व ऐकत होता 


त्याच्या गप्प राहण्याने प्रियाच्या बाबाचा पारा आणखी चढला ते रागातच म्हणाले "काय रे आता का नाही बोलत काही मागणी घाल्याला आलेलास तेव्हा तर मोठ्या प्रेमाच्या गोष्टी सांगत होतास कि मी तुमच्या प्रियाला नेहमी खुश ठेवीन मग आता काय झालं कि अमेरिकेची हवा गेली "


"हे बघा काका तुमचा राग मी समजू शकतो आणि तुमचं बरोबर आहे पण माझे हि काही कारण असेल ना म्हणून तर मी हे सर्व करतो "


"मग सांग ना कसलं कारण ते तिथेच संसार नाही ना थाटलास "?


"नाही काका एवढा विश्वासघात मी प्रियाशी नाही करू शकत "


"मग आता काय करतोस "


"काका मी तिच्याशी लग्न करणार पण आता नाही अजून काही वर्षांनी आणि आता वेळ हि कमी आहे मी फक्त १० दिवसासाठी आलॊ आहे" 


"अजून आठ दिवस आहे पाहिजे तर कोर्ट मॅरेज करू तुला वेळ नसेल तर "


"काका अहो एवढ्या गडबडीत करण्याची काहीच गरज नाही आम्ही मस्त धमाकेदार लग्न करणार असे आमचे दोघाचे स्वप्न आहे" 


"स्वप्न आहे ना मग पूर्ण कधी करणार "


"काका तेच तर मी सांगतो आणि काही वर्षांनी" 


"आता तू जाणार आणि दोन वर्षांनी येणार अरे वयात आलेल्या मुलीचे लग्न त्याच वयात व्हयाला हवे आणि आम्ही तुझ्या भरोश्यावर आमच्या मुलीला घरी ठेव्याचे मला तिचे ओझे नाही पण तुझ्या ह्या बदलत्या मतावर आता माझा विश्वास नाही दोन दिवस देतो तुला विचार कर आणि मला तुझा निर्णय कळव वाट पाहीन तुझ्या फोनाची फक्त माझ्या मुलीच्या सुखासाठी "


आणि प्रियाच्या बाबांनी रागानी फोन ठेवला 


इथे प्रियाला एकच प्रश्न सतावत होता कि असे कोणते कारण आहे जे त्याच्या प्रेमावर भारी पडले आहे आणि जे अनुज तिला हि सांगत नाही आहे एवढे आपले प्रेम कमजोर आहे का 


तिनी आपला मोबाईल ऑन केला तर अनुजचे २० मिसकॉल येऊन गेले होते ती भावुक झाली तिने त्याला फोन लावला तिचे नाव मोबाईल वर झळकताच त्याने पटकन उचला 


"हॅलो "आणि ती रडायला लागली 


अनुज हि तिचा रडवेला आवाज ऐकून रडू लागला 


"हे बघ प्रिया रडू नकोस "


"मग तू असा का वागतोस एवढे दिवस तू दूर होतास तेव्हा तुच्या आवाजाने मला तुझा सहवास जाणवत होता पण आज तुला भेटून सुद्धा एकटे वाटते मला "


"प्रिया तू एकटी नाही आहेस तुझा अनुज तुझ्या नेहमी सोबत असणार "


"मग लग्न करायला का नकार देत आहेस "


"प्रिया मी नकार कुठे देतोय आणि दोन तीन वर्षांनी करू आपण लग्न "


"पण आता का नाही तूच म्हणला होतास ना कि दोन वर्षांनी "


"प्रिया मला सर्व मान्य आहे पण "


"पण काय अनुज कि आपल प्रेम एवढे कमजोर झाले "


"नाही प्रिया ते कधीच कमजोर होणार नाही आपण पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण होतील पण आता नाही प्रिया "


"म्हणजे तू माझं ऐकणार नाही "


"तसं नव्हे प्रिया तुझ्या साठी काहीपण "


"मग आता काय झालं "


अनुज थोडावेळ गप्पच राहतो त्याची हि शांतता प्रियाला अजून दुःख देत होती 


"अनुज गप्प का आहेस बोल ना काहीतरी "


"काय बोलू माझं मन मलाच हजार प्रश्न विचारत आहे तुझ्या पासून दूर जाण्यासाठी रोखत आहे म्हणून मी एक निर्णय घेतला आहे "


काय असेल अनुजचा निर्णय खरंच त्याचा निर्णय बदलेल आणी वेळ त्याला प्रियापासून दुर जाण्यापासून रोखू शकेल ?

असे म्हणतात कि काळ आला कि वेळ हि धावून येते असेच काहीसे प्रियाच्या बाबतीत घडले जे तिला सहन होत नव्हते अनुजशी बोलून हि अनुजने आपला निर्णय काही बदला नाही प्रियाच्या बाबांनी निर्णयासाठी दिलेली वेळ हि निघून गेली आणि अनुज अमेरिकेला निघून गेला 


हे सर्व प्रियाच्या सहनशक्ती च्या बाहेर होते जे काही चालले ते तिला काहीच कळत नव्हते तिला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे असे कोणते कारण जे अनुजला प्रिया पेक्षा मोठे वाटते जेव्हा पासून अनुज चा निर्णय ऐकला त्या दिवसापासून ती स्वतःच हरवत जात होती हसणे नाही बोलणे नाही गपचूप खोलीत राहणे ऑफिस ला सुद्धा ती चार पाच दिवस गेली नाही जसे तिचे आयुष्याचं थांबले होत तिची हि अवस्था पाहून प्रियाचे आई बाबा दोघेही आतून तुटले होते 


अश्याच एका संध्यकाळी प्रिया आपल्या खोलीत अंधारात बसलेली आईला दिसली तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले तिने ते पुसत खोलीतली लाइट लावली आणि तिला पाहत म्हटले 


"प्रिया अंधारात का बसलीस "?


"आई आयुष्यातच अंधार पसरला आणि खोलीत कशाला उजेड हवा "


"हे बघ प्रिया जे झालं ते विसरून जा एक वाईट स्वप्न म्हूणन आणि नवी सुरवात कर "


"कसं विसरू त्याला ज्यांनी मला भविष्याची स्वप्ने दाखवली होती "


"हे बघ तो तर निघून गेला मग तू कशाला उगाच त्रास करून घेतेस "


प्रियाचे बाबा बाहेर राहून सर्व ऐकत होते ते आता येत म्हणाले "बरोबर म्हणते तुझी आई त्या मुजोरांची कशाला हवी आठवण विसरून जा त्याला माझे सोड प्रिया तुझ्या हि विनवणीला भीक सोड दया हि नाही दाखवली आणि त्याच्यासाठी तू हि अवस्था करून घेतलीस खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोला तो पण वास्तवात विश्वासघाती ठरला दोन वर्षांपूर्वी आपल्याच तोंडाने त्याने सांगितले होते कि दोन वर्षांनी मी लग्न करिन आणि आता फिरला तो आपल्या मताशी आणि त्याच्यावर कसला भरोसा ठेवायचा आणि दोन वर्षांनी येऊन सांगेल मला तुमचा मुलीशी लग्नच नाही करायचं प्रिया अश्या माणसाशी संबंध नकोच आपण चांगले स्थळ पाहून आणि तू लग्न कर आणि सुखी हो "


"नाही बाबा मी त्याच्याशिवाय दुसऱ्या मुलाचा विचार हि करू नाही शकत "


"मग काय त्याची वाट पाहत म्हतारी होणार आहेस "?


"तुम्ही शांत व्हा जरा "


"काय शांत होऊ सुषमा गेली चार दिवस तिच्या चेहऱ्याकडे पहिले कि वाईट वाटते आपल्या हसत्या खेळत्या प्रियाची अवस्था पाहून चीड येते मला वाटते त्याच्या थोबाडीत दोन मारावी "


"माहित आहे मला माझी अवस्था काही वेगळी नाही ज्या फुलाला आम्ही एव्हडी वर्ष सुखात वाढवलं तिला कधीच दुःखाची जाणीव होऊ दिली नाही ती आज अश्या परिस्थिती पाहून एकच विचार येतो मी नऊ महिने वेदना सहन केल्या ते हेच पाहण्यासाठी आणि आई चे डोळे डबडबले 


थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही आई आपले डोळे पदराला पुसत होती तर खंबीर असणारे प्रियाचे बाबा हि आज आपल्या चेहऱ्यावर आपल्या वेदना लपवू नाही शकले 


आई आणि बाबाही आतून तुटलेले प्रियाला जाणवले आपल्या मुळे आपल्या आई बाबाना होत असलेला नाहक त्रास तिला जाणवला तशी ती उठली आणि तिने आई बाबाच्या पायावर घालून घेतले तिला आई बाबा नि उठवले 


"आई बाबा मला माफ करा माझ्या मुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही मला कधीच दुःख जाणवू दिले नाही दिले ते फक्त प्रेम तुमचे प्रेम माझ्यासाठी नेहमी अनमोल राहील पण बाबा मला दुसरं लग्न नाही करायचं मला तुमच्या बरोबर रहायचं कायम तुम्ही असताना मला आणि साथेची गरज कशाला "


"पण बेटा आयुष्यभर एकटीच राहणे सोपे नाही "


"का आई तुम्ही असाल ना माझ्या बरोबर माझी प्रेम करणारी माणसं ""


"बेटा आम्ही आज असू उद्या नाही "


"बाबा असं नका ना बोलू तुम्ही दोघे हि कुठे हि जाणार नाही "


"पण प्रिया मला असं वाटत तू लग्नाचा विचार कर कोणाला माहित तुला त्याच्यापेक्षा प्रेम करणारा मिळाला तर "


"पण तो नाही ना आई मी माझ्या मनात माझा तोच जोडीदार निवडला आहे त्यामुळे माफ करा "


"मग काय तू अशीच जगणार रडत "


"नाही बाबा मी ठरवलं आज पासून मी तुम्हा दोघांसाठी जगणार पण लग्नाचा परत विषय नको "


"म्हणजे आयुष्यभर त्याच्यासाठी झुरत राहणार "?"


"नाही आई आजपासून त्याचा अध्याय माझ्यासाठी संपला आता मी तुमच्यासाठी जगणार लहानपणी तुम्ही मला सुखात ठेवले आता माझी वेळ "


आई बाबा नि प्रियाला घट्ट मिठी मारली बाबानी आईला विषय इथेच संपवू पुढे पाहू काय होते ते असा इशारा केला 


खरंच प्रिया अनुजचा अध्याय आपल्या आयुष्यातून संपवेल कि कुठला नवीन अध्यायाला सुरवात होईल ?

खळखळणारा समुद्र आणि ते दोघे किनाऱ्यावर बसले होते वारा हि त्याच्या प्रेमाचे जणू गाणे गात होता असेच त्याचे बोलणे चालू होते आणि अनुज ने प्रिया कडे पाहत म्हटले 


 "प्रिया काहीही होऊ दे कुठली हि परिस्थिती असू दे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही नेहमी तुला सुखात आणि तुझ्या सहवासात राहीन आणि तुझी साथ तर कधीच सोडणार नाही "


हे ऐकून प्रिया हसत म्हणाली "पुरे हा फिल्मी खूप वेळा झाला हा डायलॉग अनुज"


"म्हणजे प्रिया मी फिल्मी होतोय खरंच यार मी माझ्या मनातल्या भावना तुला व्यक्क्त करतो आणि तू हसतेस हेच आपलं प्रेम का"असे म्हणून अनुज ने दुसरीकडे मान वळवली 


हे पाहून प्रिया ने अनुजला प्रेमाने साद घातली" अनुज ऐक ना अनुज "


"नाही ऐकायचं मला "


"अरे रागवलास"?


"नाही मी कशाला रागवेन "


"अरे वेड्या मी मस्करी करत होते तू फिल्मी जरी झाला तरी जे तू बोलास ना त्यावर माझा विश्वास आहे "


"खरंच "?


"हो अनुज माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा विश्वास आणि तो विश्वास तू कधीच नाही तोडणार हे मला माहित आहे "


अनुजला तो क्षण आठवला आणि त्याने त्याचे डोळे बंद केले तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्याने रुमालाने आपले डोळे पुसले आणि मनाशी तो संवाद साधू लागला "विचार हि केला नव्हता कि असा पण दिवस येईल कि प्रियाच्या विश्वासाला तडा जाईल माफ कर प्रिया माझ्यामुळे तुला खूप त्रास होत असेल पण मला वाटत होत कि तू माझ्या त्या विश्वासानी मला समूजन घेशील पण तुझे हि बरोबर आहे आणि आता मला नाही वाटत आपण परत भेटू कारण तू जरी माझ्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतलास तरी तुझे आई बाबा तुला माझ्या वाटेकडे डोळे न लावता तुझा नवीन संसार सुरु करून देतील त्याच हि बरोबर एक पालक म्हणून ते हि चुकत नाहीत मी हि कुठे चुकलो नाही तुला खरं कारण नाही सांगितले कारण ते जर सांगितले असते तर कदचित माझ्याबाबतीतले चित्र तुम्हा सर्वासमोर वेगळे असते पण ज्या वेळी तुला खरं कळेल तेव्हा तुला माझा नक्कीच अभिमान असेल एवढ्यात त्याच्या ऑफिसातला मित्राने त्याला हाक दिली 


"अरे अनुज तू यहाँ है मैं कब से तुम्हे ढूढ़ रहा हूँ क्या हुआ यार तेरा चहरा कितना क्यों उतरा हुआ हैं क्या हुआ "?


"कुछ नहीं यार "


"यार कहते हो और बताते नहीं ""


"कुछ नहीं बस घर की याद आयी "


"अरे यार में हूँ ना तेरे भाई की तरह चल एक एक कॉफ़ी पीते हैं अच्छा लगेका तुम्हे "


दोघेही कॉफी पिऊन परत कामाला लागतात पण अनुज चे काही लक्ष कामात लागत नव्हते प्रियाचा केविलवाणा चहेरा त्याच्या समोर येत होता तो घरी परतला लगेच तयार होऊन त्याच्यासाठी गाडी आली होती त्या गाडीत बसून निघून गेला गाडी येऊन मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली आणि त्याने उतरलेला चेहरा हसरा करत तो आत गेला 


संध्यकाळची वेळ होती प्रियाची आई खिडकी बाहेर आकाशाला पाहत आपल्या विचारात गुंग होती एवढ्यात प्रियाचे बाबा हाका मारत आले 


"सुषमा सुषमा "


प्रियाच्या आईचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने बाबांनी परत एकदा आईला हाक दिली तसे ती आपल्या विचारातून बाहेर आली 


"अहो तुम्ही तुम्ही कधी आलात "?


"काय झालं कसल्या विचारात पडली आहेस "


"आणि कसल्या विचारात असणार आपल्या प्रिया बदल आणि काय देव जाणे तिच्या नशिबी काय लिहिले आहे पुढे कसे होईल हो आपल्या प्रियाचे ?


"काय सांगू सुषमा मनाला घोर लागला आहे पोरीचा संसार सुखाचा सुरु झाला असता तर काळजी मिटली असती पण हि काही ऐकयलाच तयार नाही "


"किती मुजोर निघाला ना तो मी किती खुश होते कि आपल्या प्रियाला आपल्या पेक्षा प्रेम करणारा जोडीदार भेटला म्हणून पण कुठे काय सगळं होत ते नव्हते होऊन बसले आता "


"हो ना तो येणार ह्या आशेवर हि बसली आहे पाहूया पण मला नाही वाटत " 


"मग आपल्या प्रियाचे काय "?


"तेच ना तिला आणि कोणाशीच लग्न करायचं नाही असं कसं चालेल"


"माझं एक ऐकाल "


"काय "?


"आपण आपल्या प्रियाची जन्म पत्रिका भट गुरुजी ना दाखवूया पाहूया तर ते काय म्हणतात आपण गप्प बसून कसे होईल पोरीच्या आयुषाचा प्रश्न आहे "


"हो ते हि आहेस आपण जाऊ या उद्या सकाळी "


दोघे हि दुसऱ्या दिवशी भट गुरुजींच्या घरी गेले पुरातन घर त्या समोर ची गेट उघडली आणि ते आत गेले दामोदर भट प्रसिद्ध ज्योतिषी लोक आपल्या भविष्याची काळजी घेऊन त्याचाकडे येत आणि ते त्याचे निवारण करीत तसे दामोदर भट प्रियाच्या बाबांच्या बाबाचे मित्र त्यामुळे पाहतच क्षणी भट गुरुजींनी प्रियाच्या बाबांना हाक दिली 


"अरे मनोहरा आज इथे कसा काय "?


"भट बाबा जरा पत्रिका दाखवायची होती "


"बरं दाखव "


दोघेही समोर बसले भट गुरुजी नि पत्रिका पाहायला सुरवात केली 


"बाबा मुलीच्या पत्रिकेत विवाह योग आहे ना "?


"म्हणजे रे असा काय विचारतोस 


प्रियाच्या आईबाबांनी सगळी गोष्ट भट बाबाच्या कानावर घातली 


"अरे भिऊ नकोस मनोहरा विवाह योग आहे "


"पण कधी आणि कसा आताचे ऐकून बाबा तुम्हला काय वाटत "?


"हे बघ मनोहरा तू जे सांगितले ते बरोबर आहे पण जो वर बसला त्याच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नाही पण तुझ्या मुलीचे लग्न होईल ते मात्र खरे पण कधी केव्हा कोणाबरोबर हे मात्र मी सांगू शकत नाही त्यामुळे तू थोडा शांत राहा "


"पण बाबा हि सारी गोष्ट ऐकून तुम्हला वाटत "?


"मनोहरा एक आई बाप म्हणून तुझा आणि सुषमा चा जीव तळमळतो ते दिसते पण जी गोष्ट ज्यावेळी वह्यांची असते ना तेव्हाच होते "


"बाबा खरंच असे होईल "


"हो सुषमा देवावर विश्वास ठेव "


भट बाबाचा आशिर्वाद घेऊन ते घरी परतले भट बाबाच्या भविष्यच्या संकेताने त्याच्या मनाला एक दिलासा मिळाला होता तरी पण कसा आणि कधी हे मात्र प्रश्न अनिरूत्तर राहिले 


दिवस निघून जातात तशी वर्षी भरकन निघून जातात अशीच दोन वर्ष निघून गेली प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम होती आई बाबा भट गुरुजीने सांगितलेल्या दिवसाची वाट पाहत होते प्रियाला अनुजच्या येण्याची आस मनाला लागलेली तिला वाटले होते कि दोन वर्षाच्या सांगण्याने अनुज घरी येईल आणि ते लग्न करतील ह्या दोन वर्षात ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते त्यामुळे दुरावा वाढत गेला होता तरी पण प्रियाच्या मनात अनुज येईल हि आस लागली होती पण असे काहीच झाले नाही दोन वर्ष पूर्ण होत आली पण अनुजचा काहीच पत्ता नाही आता मात्र तिच्या मनात अनुज ह्या नावाचा तिरस्कार जागा झाला तिला अनुज चा राग येऊ लागला आई बाबांनी तिला लग्न करण्याच्या दगादा लावला पण आपण लग्न करणार नाहीच हेच तिचे सांगणे होते 


अशीच वर्ष निघत होती प्रियाच्या वयाच्या सर्व मैत्रिणी लग्न होऊन संसारात रमल्या होत्या पण प्रिया आपल्या आयुषाची स्वप्ने एकटीच पाहत होती पूर्वीच्या प्रिया मध्ये आणि आताच्या प्रिया मध्ये खूप बदल झाला होता एकटेपणाची तिला सवय झाली होती आई बाबा हि हतबल झाले होते पण प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने ते काहीच करू शकत नव्हते आई बाबा हेच तिचे विश्व झाले त्यांना खुश ठेवणे हा तिचा मुख्य उद्देश झाला


अशीच ९ वर्ष उलटली आणि १० वर्षाच्या एके दिवशी घरच्या पत्यावर एक पत्र आले आई ने प्रिया चे नाव पाहून न खोलता पत्र प्रियाच्या हातात ठेवले आणि प्रियाने वाचायला सुरवात केली 


कोणाचे असेल ते पत्र आणि कोणी पाठवले असेल ते हि १० वर्षांनी प्रियासाठी ?


१० वर्षानंतर आलेले पत्र प्रियाने वाचले तेव्हड्यात आई मुदाम हुन तिथून निघून गेली आणि प्रियाने पत्र ड्रॉवर मध्ये ठेवून दिले कोणाचे पत्र असेल हि उत्सुकता प्रियाच्या आईला होती पण त्या वेळी तिने काहीच विचारले नाही थोड्या वेळाने आई ने सहज विचारले प्रिया कोणाचे पत्र होते?


"काही नाही आई कॉलेज मध्ये आमच्या बॅच चा माजी स्नेहमेळावा आहे त्याचे ते निमंत्रण पत्र पण मी नाही जाणार "


ह्यावर आईने मात्र तिला का? हा प्रश्न केला नाही ती गप्प राहिली 


प्रिया आपल्या रूम मध्ये आली आणि ती कॉलेज च्या दिवसात गेली काय दिवस होते ते एक एक करून तिच्या समोर सगळे क्षण येत प्रथम वर्षाचा पहिला दिवस मेधा आणि अन्य मैत्रिणी बरोबर गेलेली मस्ती एकत्र अभ्यास मग परीक्षेचे टेन्शन फन वीक मध्ये गेलेली धमाल स्नेहमेळावा घातलेला धुडगूस त्या आनंदित क्षणात ती रमून गेली आणि तो क्षण तिला आठवला ज्यावेळी अनुज स्वतः हुन आपल्या गुडघायवर बसून तिला आपल्या प्रेमाची कबुली देत होताआणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिनी ते पुसत मनाला सावरत म्हण्टले 


"नको त्या जुन्या आठवणी खूप त्रासदायक आहेत "ती उठली तिला वाचनाची आवड होती त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी ती नेहमी वेळ काढ्याची त्यामुळे ती ने आपल्या कपाटातून एक पुस्तक काढले त्यावर आणि त्याचे शीषर्क सुख कोणाला मिळते असे होते आणि ती वाचनात रमून गेली दुसऱ्या दिवशी प्रियाची मैत्रीण मेधा तिच्या घरी आली प्रिया ऑफिस मधून आलेली नव्हती त्यामुळे प्रियाच्या आई बरोबर तिच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात प्रिया आली आणि मेधा ने प्रियाला पाहताचक्षणी तिला जादू कि छप्पी दिली 


"काय प्रिया कशी आहेस "?


"मी बरी आहे आणि तू "?"


"मस्त "


"बरं प्रिया फ्रेश होऊन ये मग बोलू "


"हो 


प्रिया आत गेली तिला जाताना पाहून मेधाच्या डोळ्यात पाणी आले ती मनातल्या मनात म्हणाली 'काय होतीस तू काय झालीस तू "


प्रिया फ्रेश होऊन आली तशी आई मेधा ला म्हणाली "मेधा प्रियाच्या रूम मध्ये बसा गप्पा मारत "तश्या दोघेही रूममध्ये आल्या 


प्रिया ने हातात चहा चा कप पकडत मेधा ला विचारले "कधी आलीस मेधा "?


"सकाळीच आले चार दिवस आई कडे राहणार आता "


"बरं मिस्टर आणि घरची मंडळी ठीक आहेत ना"?


"हो आहेत" 


"प्रिया तुला निमंत्रण पत्र आलं ना "?


"हो आलं आहे "


"मी तर आता स्नेहमेळावा करूनच जाणार किती वर्षांनी परत कॉलेज मध्ये जाणार खुप मज्जा येणार "


"पण मी नाही जाणार "


"पण का "?


"नाही मेधा मी नाही जाणार "


"पण का "?


"मला नाही जायच "


"मी तुझ्या न जाण्याचे कारण समजू शकते पण एक सांगू प्रिया तू जगणं विसरलीस आता पण माझ्या समोर ती पहिली ची प्रिया नाही आहे जिला मी ओळखत होते हि कोणीतरी नवीनच अनोळखी आहे का स्वतःला त्रास करून घेतेस 'काही नाही तू येणार तुला हि बरं वाटेल ऑफिस शिवाय तू कुठेच जात नाही तुला कॉलेज मध्ये असताना भटकायला आवडायचं आणि आता स्वता मध्ये गुदमरत जगत आहे त्या माणसासाठी तू लग्न केलं नाही कशासाठी हा त्याग प्रिया अगं सोड सगळं चांगले स्थळ येत असेल तर लग्न कर संसारात रमून गेल्यावर भूतकाळ हि आपोआ पुसून जाईल त्यामुळे स्वतःचा विचार कर "


प्रिया फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली हे पाहून मेधा ने तिच्या हातावर हात ठेवत परत हाक दिली तशी ती मेधा च्या हाताला घट्ट पकडून रडू लागली मेधा हि आपल्या मैत्रिणीचे दुःख सहन करू शकली नाही तिचे हि डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरत ती म्हणाली 


"प्रिया तुझे दुःख काय आहे ते मला माहित आहे आणि त्या माणसाची जागा तुझ्या मनात काय आहे हे हि मला माहित आहे पण तो एव्हडा निष्टुर असेल असं मात्र मला वाटेल नव्हते पण कधी तरी तो माझ्या समोर आला तर प्रिया मी त्याला जाप विचारल्याशिवाय राहणार नाही अगं अश्या माणसांसाठी तू आपले उभे आयुष्य का वाया घालवत आहे हसणे तर तू विसरलीस आहे हे बघ प्रिया आपण जाऊया तुला हि चांगले वाटेल आणि थोडा वेळा आपण सोबत असल्याने तुझे हि मन विचारातून जरा बाहेर येईल आणि हो तू चिंता करू नकोस तो जर तुझ्याशी बोलायला आला ते माझ्यावर सोड तो तुझ्याकडे येण्याआधी त्याला मला सामोरे व्हावे लागेल मग त्याला मी चांगला धडा शिकवणार जेणेकरून त्याला त्याची चूक कळेल प्लिज प्रिया तू तुझे जगणे सोडून नकोस माझ्या मैत्रीखातीर तरी चल एक दिवस आपल्या मैत्री साठी जगून तरी पहा "


काय असेल प्रियाचा निर्णय आणि प्रिया आणि अनुज १० वर्षांनी समोरासमोर आले तर काय होईल ?

ज्या दिवसाबद्दल प्रियाला काहीच उत्सुकता नव्हती असा स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला संध्यकाळी ४ वाजता कार्यक्रम सुरु होणार होता मेधा प्रियाच्या घरी ३.३० वाजता पोहचली मेधा ने बेल वाजवली तशी प्रियाच्या आई ने दरवाजा उघडला 


"काकू प्रिया तयार झाली ना "?


" हो तयार होत आहे तू आत ये "


मेधा आत आली आणि बसली तिचा आवाज ऐकून प्रिया बाहेर आली तिला पाहताच मेधा म्हणाली 


"प्रिया तू अशी येणार काकूबाई कशी आपण माजी विद्यार्थी म्हणजे म्हतारे अजून झालो नाही ते केस सोड ना छान दिसेल "


"नको मेधा मी अशीच बरी आहे "


"काय बरी आहे ते काही नाही तू ती वेणी सोड आणि केस मोकळे असू दे "


"अगं पण मेधा कशाला"?


"माझ्यासाठी आपल्या मैत्री साठी "


ब"रं बाई सोडते तूच नाही ऐकलंत तर मग येते मी केस विचरून" 


ती आत गेली तशी प्रियाच्या आईने मेधा ला काळजीत म्हटले "बेटा तिला सांभाळ तो जर समोर आला तर "?


"तुम्ही काहीच चिंता करू नका मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे प्रियाला कसलाच त्रास होणार नाही "


आणि दोघेही आईचा निरोप घेऊन कॉलेज च्या दिशेने निघाली कॉलेज च्या गेट मधून आत प्रवेश करताना प्रियाच्या नजरेस सारा भूतकाळ येत होता कॉलेज परिसर माजी विद्यार्थांनी गजबजून गेला होता 


त्या घोळक्यात एक माणूस आपल्या भिरभिरत्या नजरेने कोणाला शोधत होता आणि त्याच्या नजरेस मेधा आणि प्रिया पडली तसा त्याच्या अनुउत्तरित चहेरा खुलला मेधा आणि प्रिया येऊन बसली तसा तो माणूस त्याच्या दिशेने चालू लागला तो येतो हे मेधा आणि प्रिया ला जाणवले तशी प्रिया तिथून काही कारण सांगून निघून गेली मेधा ने तिला रोखले नाही तो मेधा च्या समोर येऊन उभा राहिला 


"मेधा कशी आहेस"? 


दोन तीनदा विचारून हि प्रतिसाद न मिळाल्याने त्याने परत हाक दिली तशी तिनी हि पलटवार केला 


"आता आठवण आली वाटत मिस्टर अनुज "


"मेधा कशी का बोलतेस रागात "


"मग कशी बोलू तुझ्याशी बोलायचे मन नाही माझे आणि काय रे आता समोर आहे म्हणून विचारते असा कसा निष्टुर झालस तू "?


"निष्टुर "?


"मग काय विश्वासघाती की आणि कुठली उपमा देऊ तुला सांग ना प्रेम ह्या पवित्र नात्याला तू डाग लावलास "


"बस मेधा बस "


"का रे तुला ऐकून त्रास होतो विचार कर तिच्यावर काय परिणाम झाला असेल अरे ती तुझ्या पायी आपले जगणे विसरली तिला पाहून ना मला किती यातना होत आहेत ना त्या मी नाही सांगू शकत हे माझ्या गळ्यात पहिले ह्याला मंगळसूत्र म्हणतात मी माझ्या संसारात रमली आहे पण तिचे दुदैव आज हि ती अविवाहित आहे फक्त तुझ्यामुळे आज पण ती इथे येत नव्हती आज ती आली फक्त माझ्या मैत्रीसाठी आणि हो प्लिज इथून जा आमचे हे मैत्रीचे क्षण आम्हला आनंदात अनुभवू दे "


"काय प्रियाने लग्न नाही केलं "?


"का करेल स्वप्नात आणि मनात तर तुला जोडीदार निवडला होता मग ती दुसऱ्या कोण्याच्या गळ्यात कशी वरमाला घालेल पण तुला कशाला हवाय तू तर दिलासा तिला आयुष्यभराचा धडा आणि तू मात्र आनंद राहा "


"नाही मेधा मी तिच्या शिवाय कसा आनंदित राहू "


"का एव्हडी वर्ष नाही राहिलास आता काय संसार हि थाटला अशील"


"नाही मेधा अगं मी हि अविवाहित आहे "


"काय "?


"हो मेधा मी प्रिया शिवाय आणि कोणाशी लग्न कसं करेन "


"मग तुझं न येणं तुझे मत बदलण हे काय"" 


"अगं त्याच्यामागे एक गोष्ट आहे "


"गोष्ट कसली गोष्ट "?


"मेधा मी तुला सगळं खरं सांगतो तुला माहित आहे का मला किती आनंद झाला आहे मला वाटलेले प्रियाचे बाबा प्रियाचे लग्न लावून देतील म्हणून मी गप्प बसलो पण आता नाही तिला खरं कळायला हवे "


"खरं काय खरं "?


""ऐक मेधा मग तुझं ठरव 


अनुज ने मेधा ला सारी गोष्ट सांगितली तशी तिच्या चेहऱ्याचे भाव बदले 


"अरे अनुज तू हे सर्व प्रियाला का नाही सांगितलं तुझ्या न सांगण्याने तुला माहित आहे केवढा गैरसमज झाला आहे आणि त्यातून तुमच्या प्रेमाचा बळी जात आहे अनुज अरे यार मी काय म्हणू हे सर्व तू प्रियाला सांग हि वेळ घालवू नको हि वेळ केली तर तुमच्या प्रेमाचा बळी जाईल "


काय असेल ती गोष्ट ज्यामुळे मेधा चे मन अनुज कडे परिवर्ततीत झाले 

मेधाला अनुज चे सत्य कळल्यावर तिनी अनुज चा हात पकडला आणि अनुज ला घेऊन प्रिया जवळ आली त्या दोघांना पाहून प्रिया ला काय करावे ते कळेना पण तिनी एक नजर हि अनुज च्या चेहऱ्याकडे टाकली नाही मेधा ने पुढे येत म्हण्टले 


"प्रिया अनुजला तुला काही सांगायचे आहे "?


"मेधा मी इथे तुझ्यासाठी आली आहे आणि आपले झाले असेल तर आपण निघूया "


"प्रिया ऐक ना मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे "


"मेधा तुझ्यावर काय जादू केली कि तू बदलीस आणि हो तुझ्याबरोबर आला आहे त्याला सांग मी अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही "


"प्रिया मी अनोळखी प्रिया मी तुझा अनुज "


"मी कुठल्याही अनुजला ओळखत नाही मेधा आपण निघूया "


"प्रिया एकदा त्याच म्हणे ऐकून घेतले तर" 


"हे तू सांगतेस मेधा माझ्या पेक्षा तुला ह्या नावाचा एव्हडा राग यायचा आणि आता काय झालं "?


"हो प्रिया मान्य आहे पण त्याची बाजू ऐकली मला असे वाटते तू पण ऐकून घे "


"मला कोणाचे काहीही ऐकायचे नाही "


"प्रिया प्लिज एकदा माझे ऐकून घे मग तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे "


मेधा ने हळूच तिथून काढता पाय घेतला अनुज ने प्रिया कडे पहिले तिच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला जाणवले प्रियाने मात्र त्याच्या चेहऱ्याला एकदा हि पहिले नाही दुसरीकडे तोंड करून ती गप्प उभी राहिली 


अनुज ने दीर्घ श्वास घेत आपले बोलणे चालू केले 


"प्रिया मला माहित आहे तुला माझ्या वागण्याचा खूप खूप त्रास झाला त्या साठी मी तुझी माफी मागतो प्रिया मी मनापासून सांगतो मी अजूनही तुझाच आहे जे काही झालं त्याला एक बाजू होती पण तुम्हला दिसली फक्त एक बाजू माझं हि चुकले तुला जर सर्व सांगितले असते तर तुझ्या नजरेत तरी विश्वासघाती नाही ठरलो असतो बाकीच्यांचा रोष मी पत्करायला तयार आहे पण तुझा प्रिया मी एव्हडी वर्ष फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत काढली मला वाटलं होत कि तू लग्न केलस अशील पण आज कळे तेव्हा जाणवलं आपलं प्रेम एवढे कमजोर नाही त्यामुळे आपण दोघेही अविवाहित राहिलो "हे ऐकताच प्रियाने अनुज कडे पहिले 


"हो प्रिया मी लग्न नाही केलं तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ कुठे आहे "


"मग तू असा का वागलास आणि ते हि एव्हडी वर्ष "?


"सांगतो प्रिया सगळं सांगतो "


"मी दोन वर्षांनी येऊन लग्न करणार असे सांगून मी अमेरिकेला निघून गेलो पण तिथे काही वेगळच घडणार होते हे मला माहित नव्हते तिथे केल्यावर मी माझ्या कामावर रुजू झालो आणि एके दिवशी आमचे मॅनेजर सर म्हणजे मिस्टर राव सुटीवर असल्याने मला कामा निमित्त मॅनेजर सरांच्या घरी जावे लागले तिथे माझी ओळख त्याच्या मुलीशी झाली तिला पाहून मला विचित्र वाटले तरुणी असून हि ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसली होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती कसलेच हाव भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते एखाद्या वेडी सारखी तिची अवस्था होती ते पाहून मला भरून आले आणि ती मला हाका देऊ लागली तिचे हे बदलेले रूप पाहून एक बाप म्हणून मिस्टर राव चकित झाले गेली दोन वर्ष तिची हि जिवंत शरीर पण मेल्यासारखी अवस्था पाहून ते खचले होते 


मला हा प्रकार काही कळला नाही मी माझे काम आटोपून घरी परताना माझ्या जाण्याने तिचे लहान मुलासारखे रडणे माझ्या कानी पडले मन अस्वस्थ झाले मी रूम वर आलो पण मन काही लागेना तिची हि अवस्था का झाली ?हा प्रश्न मला रात्रभर सतावत होता 


अशीच सकाळ उजाडली मी नेहमी प्रमाणे ऑफिसमध्ये गेलो आणि मला मिस्टर राव नि बोलावले असे सांगण्यात आले आणि मी त्याच्या केबिन मध्ये गेलो त्यांनी मला बसण्यास सांगितले आणि ते बोलू लागले "


"काल ज्या मुलीला तू पहिले ती माझी मुलगी रिया एक फॅशन डिझायनर होती दोन वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराचे अपघातात अकाली निधन झाले त्या दिवसापासून तिची हि अवस्था झाली आहे आम्ही तिला खूप समजावले पण तिला तो धक्का पचवता आला नाही त्यामुळे ती मानसिक रित्या दुर्बल झाली आहे डॉक्टर उपचार चालू आहे पण तिला मनाचा आजार झाला त्याला औषध काय कामाची आज वर्षांनी तिचे हसणे आमच्या कानावर पडले ते हि तुझ्यामुळे आणि ती तुला हाक मारत होती ते नाव तिच्या प्रियकराचा आहे सिद्धार्थ म्हणजे सिद तिने तुला हाक का मारली माहित आहे तुझ्या चेहऱ्यात आणि सिद च्या चेहऱ्यात साम्य असल्याने ती तुला सिद समजली "


"अनुज एक बाप म्हूणन तुला एक विनंती करतो तू आमच्या घरी तिचा सिद म्हणून येऊन तिच्याशी थोडा वेळ घालवशील "?


प्रिया हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली पण मी सरळ नाही म्हण्टले 


"हे बघ अनुज फुकट नाही पाहिजे तेवढे पैसे देईन पण प्लिज माझ्या मुलीला तूच माणसांत आणू शकतो विचार कर आणि सांग 


"प्रिया मला काहीच कळत नव्हते कि काय करावे माझ्या समोर तिची अवस्था आणि तिचे रडणे परत परत येत होते वयात आलेली मुलगी आणि अशी अवस्था रात्र भर विचार केला पण प्रश्नाचे उत्तर काही मिळेना आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर कळले कि रियाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे सिद च्या आठवणीने ती रडून बेशुद्ध झाली होती हे कळताच मनाला खूप वाईट वाटले तेव्हड्यात राव सरांचा फोन आला ते माझ्याकडे आपल्या मुलींसाठी भीक मागू लागले त्याचे ते बोलणे मनाला कुठे तरी टोचत होते मी फोन वर काही न बोलता हॉस्पिटल मध्ये गेलो आणि तडक रिया होती त्या रूम मध्ये गेलो मी दोनदा हाक दिली तशी तिने डोळे उघडले मला पाहतच ती सिद सिद माझा सिद म्हणून रडू लागली मी हि तिला सावरले असेच दिवसातून एकदा भेट होऊन तिच्यात सुधारणा होऊ लागली मग मी घरी हि तिच्या दिवसातून एकदा तिला भेट द्यायचो 


डॉक्टर नि सांगितले होते कि पूर्ण बरी व्हयाला दोन वर्ष तरी लागतील म्हणून मी लग्न पुढे करण्याचा निर्णय घेतला तुला किंवा घरातल्यान सांगितले असते तर तुम्ही वेगळा अर्थ लावला असता तू समजून घेतलं असत पण मनात नाते तुटण्याची भीती आपल्या नात्यात तयार झाली असती आणि ते मला नको होते त्यामुळे मी गप्प राहिलो पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने ४ वर्षात ती माणसात आली पण तुझे लग्न झाले असेल उगीच तुझ्या संसारात लुडबुड नको म्हणून मी तुला दोन वर्षा नंतर भेटलोच नाही 


आज ती पूर्ण पणे माणसात आली आणि ज्यावेळी तिला माझी गोष्ट कळली तीला खूप वाईट वाटले तिनी मला लगेच सांगितले कि तुला मी खरे सांगावे मी जे काही केले ते एक माणुसकीच्या नात्याने त्यात माझा स्वार्थ काहीच नव्हता तिचे बाबा मला पैसे देत होते पण मी नाकारले मी तिला फक्त मानसिक आधार दिला प्रिया आणि मला वाटत एक माणूस म्हणून मी जे केलं ते योग्य केलं "


प्रिया हे सर्व ऐकत होती तिच्या चेहऱ्याचे भाव हि बदले 


"प्रिया मी खरं सांगतो पाहिजे तर हा नंबर घे हा रिया चा नंबर आहे तू खात्री करून घेऊ शकतेस "


प्रिया काही न बोलता तिथून निघून गेली तिच्या मागे मेधा हि गेली 


अनुज ला आज हि प्रिया ने काही वर्षांपूर्वी प्रमाणे अनुत्तरित ठेवले ?


रात्रभर अनुज चा डोळा लागला नव्हता आज कित्येक वर्षांनी तो प्रियाला भेटला होता प्रिया चे हि काही तसेच झाले होते एवढ्या वर्षानंतर‌ अशी‌ भेट होईल असे त्यांना वाटले नव्हते त्याच विचारात रात्र सरत गेली


सकाळी सकाळी अनुजच्या मोबाईल वर एक मेसेज आला अनुज ने मेसेज पहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तो लगेच तयार झाला आणि त्याची गाडी कॅफे अरोमा च्या गेट कडे येऊन थांबली 


आज तो खूप खुश दिसत होता पण मनात थोडी धाकधूक होती तो आत केला आणि त्याची नजर कोणाला शोधत होती आणि लगेच त्यांनी ती पकडली तो हसत हसत त्या टेबल वर आला आणि आपल्या हातात असलेला फुलाचा बुके त्यांनी न डगमगता समोर दिला आणि तो लगेच घेण्यात हि आला तो खुर्चीवर बसला आणि त्याने समोर पहिले आणि विचारले 


"तुझा मेसेज मिळाला आणि राहवले नाही मी आज खूप खुश आहे"


समोरून उत्तर आले "मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे म्हणून मेसेज केला"


"अगं हो खुप वर्षांनी तुझा मेसेज पाहून बरे वाटले बरं काय बोलायचं होतं"?


"हे बघ मी स्पष्टच बोलते जे काही काल घडले ते कितपत खरे किंवा खोटे ह्याची मला सहानिशा करावीशी नाही वाटत त्यामुळे माझा निर्णय झाला आहे"


"कसला निर्णय?हे बघ जे सांगितले ते खरे आहे त्यात कसलीच खोट नाही"


"ते मला ठरवु दे तोच निर्णय मी तुला सांगणार आहे त्यापूर्वी मला एक प्रश्न आहे जो तुला विचारायचा आहे"


"हो ना विचार मी तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे"


"अनुज माझा होशील का ?"


ह्या प्रश्नावर थोडा गंभीर होत अनुज म्हणाला "सॉरी मी उत्तर नाही देऊ शकत कारण मी कधीच कोणाचा झालो आहे आणि तिच्याशी विश्वासघात नाही करणार "


ह्यावर तिनी एक कटाक्ष नजरेने त्याचाकडे पहिले तसा तो हसत हसत म्हणाला 


"प्रिया अगं मी तुझा कधीच झालो आहे आणि परत काय होणार आणि तू खरंच मला तुझा परत होण्यासाठी विचारत आहे" 


"हो अनुज जे तू काल सांगितले ते ऐकून मन बधिर झाले त्यातच मला रात्री रिया चा फोन आला


"काय रिया ने तुला फोन केला "?


"हो काल फोन आला तिचा तिची आपल्याला एकत्र आण्याची तळमळ तिच्या बोलण्यात जाणवली ती मनापासून बोलत होती तु तिला फक्त माणसुकीच्या नात्याने केलेली मदत आणी तु कधी ही तिचा गैरफायदा घेतला नाही हे तिनी प्रामुख्याने सांगितले तुझ्या अनुज सारखा साथी नशीबवान व्यक्तींना भेटतो अशी ती म्हणाली आपल्या मुळे झालेली तुमची ताटातूट आपल्या सहन होत नाही आहे आपले प्रेम आपल्या मिळाले नाही पण तुमच्या बाबतीत तसे होऊ देणार नाही आता परत एकत्र या असंही ती म्हणाली हे सर्व ऐकून अनुज मला तुझा अभिमान वाटतो तु स्वार्थी न होता माणसुकी जपली आपल्या नात्यात दुरावा आला पण आपले प्रेम कमजोर नव्हते म्हणून तर ते अजुनही जिवंत राहिले आपल्या मनात आपण अविवाहित राहून ते सिद्ध झाले "


"खरं आहे तुझं प्रिया मी विचार ही केला नव्हता की आपण असे भेटु प्रिया आता मला काहीही नको आपण लवकरच लग्न करु मला माझी पाहीलेली सगळी स्वप्नं तुझ्याबरोबर पुर्ण करायची आहे"


"हो अनुज भगवान के घर देर हैं अंधेर नहीं म्हणतात ते काही खोटे नाही"


दोघांनीही परत एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणी ते घरी परतले प्रियाचे आई बाबा ही ऐकुन सुखावले दोन दिवसांत अनुज आपल्या आई बाबासह लग्नाची बोलणी करण्यासाठी आला प्रियाला तर हे सुख पाहून भरून येत होतं एवढे दिवस फक्त अश्रु होते आता आनंदाचे क्षण ती अनुभवत होती


लग्नाचा मुहूर्त ठरला दोन्ही बाजूंनी तयारी चालू झाली प्रिया आणी अनुजच्या बारा वर्षांच्या प्रेमाची तपश्चर्या पुर्ण होणार होती मेधा ही तयारी जोमाने करत होती


आणी तो दिवस उजाडला देवाच्या आशीर्वादाने सप्तपदी चे फेरे घेऊन अनुज आणि प्रिया पवित्र बंधनात अडकले अमेरिका सोडून अनुज भारतात स्थायिक झाला सुखी संसार सुरु झाला दोन वर्षांनी त्यांच्या संसारात एक सुंदर कळी खुलली ती म्हणजे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव "अनुप्रिया "ठेवण्यात आले तिघांचे सुंदर सुखी कुटुंब बनले अनुज आणी प्रियाच्या प्रेमाची झलक अनुप्रिया त दिसू लागली


त्याचे प्रेम अतुट होते म्हणून तर कित्येक वर्षांनी अनुप्रिया जोडी एकत्र आली आणि कायम राहिली प्रेमाच्या खडतर प्रवासातून सुखकर शेवट झाला


******************समाप्त*******************Rate this content
Log in

Similar marathi story from Romance