akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy Inspirational

रुद्राय -भक्तीची शक्ती

रुद्राय -भक्तीची शक्ती

21 mins
235


"हर हर महादेव "म्हणत रुद्राय ने मंदिरात उपस्थित असल्याकडे सगळ्याकडे आरती फिरवली आज त्याच्या २१वा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्याच्या घरातल्यानी शंभू महादेव मंदिरात त्यांच्यातर्फ पूजा केली गेली तसे हि तो ह्या मंदिराच्या अध्यक्षाचा श्रीरंग देवधर याचा नातू श्रीरंग देवधर म्हणजे साधे सरळ व्यक्तीमव स्वतःचा कपड्याचा व्यवसाय दोन्ही मुले व्यवसात आणि दोन्ही मुलांना एका मुलाला दोन्ही मुली तर एका मुलाला एक मुलगा आणि तो म्हणजे रुद्राय हा एकटाच नातू 


तर पूजा वैगरे झाली आणि सगळे घरी परतले संध्याकाळी घरात पार्टी होती त्याची तयारी जय्यत चालू होती श्रीरंग नि आपल्या कपाटातून काहीतरी काढले ते आपल्या सफारीच्या खिश्यात ठेवले व ते रुद्राय च्या खोली कडे वळले तर रुद्राय फोन वर बोलत होता फोन वर त्याच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत होता म्हणून ते थांबले ते समोर असलेल्या खुर्चीवर बसले त्याने फोन ठेवताच ते उठले आणि रुद्रायला जवळ घेत म्हणाले 


"रुद्राय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे घे "


"काय आहे हे"? 


"माझ्याकडून तुला गिफ्ट पहा उघडून तुला आवडेल "


रुद्राय ने उघडले तर त्यात एक सोन्याचे ब्रासिलेट होते ते पाहत 


"आजोबा हे कशा साठी तुम्हला माहित आहे कि मला ह्या सोन्याच्या वस्तू नाही आवडत "


"अरे पण तू देवधारचा नातू आहेस आज संध्यकाळच्या पार्टी मध्ये घाल तुला मस्त दिसेल "


नको मला नको असे म्हणून रुद्राय ने ती डब्बी श्रीरंग याच्या हातावर ठेवली आणि त्यांना पाहत म्हटले "आणि आजोबा पार्टी घालून मिरवणे मला नाही आवडत "


त्याचे ते असे वाकडे बोलणे ऐकून" बरं राहील हे जाऊ दे तुला आणखी काय पाहिजे सांग "


"आजोबा मला काही नको "


"असे कसे आज वाढदिवस आहे तुझा आजोबा कडे लहानपणी कसा हट्ट करायचा मोठे झाल्यावर तू तो हट्ट सोडला पण मला तुला गिफ्ट दिल्यशिवाय राहवत नाही "


"आजोबा सांगितले ना मला काही नको "असे म्हणून रुद्राय बाहेर निघून गेला 


संध्यकाळ होत आली तसे घरात पाहुणे मंडळी जमली सगळयांच्या उपस्थिती केक कट करण्यात आला रुद्राय ने आपल्या घरातील सगळ्यांना केक भरवला पण आजोबाना नाही आणि त्या पार्टीच्या गडबडीत हे कोणच्या लक्षात आले नाही हळू हळू सगळी मंडळी निघून गेली रुद्राय हि आपल्या रूम मध्ये जात असताना श्रीरंग यांनी त्याला रोखत विचारले "काय झालं बेटा गेली २०वर्ष मला पहिला केक भरवल्याशिवाय तू राहत नसे आणि आज सगळयांना भरवलास पण मला मात्र न पाहिल्यासारखे केलेस आणि आज सकाळ पासून मी पाहतो तुझा माझ्याकडे व्यवहार काही वेगळाच आहे काही चुकले का माझे तर सांग ना असा परक्यासारखा वागू नकोस "?


ह्यावर फक्त मिश्किल हसत रुद्राय आपल्या रूम मध्ये गेला पण श्रीरंग याना ते खूप मनाला लागले त्यांनी आपल्या पत्नीशी सुधा याच्याशी ह्यावर बोलणी गेली तर त्यांनी समजावत त्यांना सांगितले कि "तुम्ही ना रुद्राय कडून खूप अपेक्षा ठेवता केक भरवला नाही अहो गडबडीत विसरला असेल आणि नेहमी आजोबा आजोबा करत राहावे असे नाही ना तो आता लहान नाही आहे २१वर्षाचा झाला आहे वयानुसार माणसात बदल घडतोच "


असे म्हणून श्रीरंग याना त्यांनी समजावले पण आज आपला नातू आपल्यापासून खूप दूर जात असल्याचा आभास त्यांना होत होता 

रुद्राय ने मंदिरात ओम नमः शिवाय चा जप करत प्रवेश केला रुद्राय शिव भक्त लहानपाणापासून त्याला शिव भक्तीची ओढ तसे पाहत त्याचे घरचे हि शिव भक्त म्हणून तर त्याचे नाव रुद्राय ठेवण्यात आले 


रुद्राय ने मंदिरात प्रवेश करताच त्याला पाहत पुजारी म्हणाले "शुभ प्रभात रुद्राय कसा झाला वाढदिवस आणि महादेवाकडे काय मागितलेस "


रुद्राय हसत हसत म्हणाला "वाढदिवस चांगला झाला सगळी आपली माणसे आली होती आणि देवाकडे काय मागू ते तर नेहमी माझ्या पाठीशी असतात "


"हो रे तुझ्या सारखा भक्त असल्यावर का नाही असणार खूप कौतुक वाटत रुद्राय तुझे तुझ्या सारखा कॉलेज मध्ये जाणार मुलगा मंदिरात दररोज आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नाही हे पाहून खरंच मन भरून येते ""


"पुजारी काका त्यात काय मोठे आपण आपल्या आई बाबा च्या पाय पडून बाहेर निघतो मग महादेव हि माझे आई बाबा च आहेत सकाळी इथे येऊन त्याचे दर्शन घेणं हि माझी आवड आहे आणि ती मी जपत आहे "


"खरंच श्रीरंग देवधरांचा तू नातू शोभतोस ते सुद्धा भक्तीत लिन होतात "


"चेहऱ्याचा भाव बदलत रुद्राय म्हणाला "नाही काका मी कोणाचा तरी कोण आहे म्हणून मंदिरात नाही येत तर माझी आवड मला इथे आणते"


"तू बोलण्यात हि पटाईत आहेस "


"काका एक विचारू स्वप्ने खरी असतात का "?


"का रे काही स्वप्ने पडली का "?


"नाही सहज विचारले "


"हे बघ असे म्हणतात कि पहाटेची स्वप्ने खरी असतात आता ते किती खरे आणि खोटे देवाला माहित "


"बरं असे म्हणून रुद्राय ने महादेवच्या मूर्ती समोर डोळे मिटून हात जोडले "हे देवा जे काही मी काल स्वप्नात पहिले ते पाहून माझी मनस्थिती खूप खचली आहे ते जर खरं असेल तर मी न्याय देईन मला साथ दे "


असे म्हणून रुद्राय बाहेर पडला तो कॉलेज मध्ये पोहचला इंटर्वल झाला आणि तो आपल्या मित्राच्या घोळक्यातून त्याच्याकडे गेला तो एकटाच बसला होता त्याला पाहत 


"हाय मोहित" 


"हाय रुद्राय "


"अरे तू काल का नाही आलास "?


"नाही रुद्राय तुला तर माहित आहे काय कारण आहे ते "


"पण मला एक कळत नाही जे झालं त्याची शिक्षा तुला कशाला मिळत आहे "?


"कारण ते माझे आजोबा आहेत आणि मलाच नाही आमच्या पूर्ण कुटूंबाला मिळत आहे आम्हाला चार चौघात मिसळून घेतले जात नाही आमच्याशी बोलणे म्हणजे काहीतरी पाप केल्यासारखे वागतात मला कंटाळा आलाय ह्या सर्वाचा कधी कधी मी आजोबा वर राग काढतो कि तुम्ही असे का केलंत पण ते रडत एवढेच सांगतात कि मला फसवलं गेलंय"


"बरोबर बोलत आहेत ते त्यांना फसवलं गेलंय "


"काय"? 


"हो मोहित तुझे आजोबा निस्वार्थ पणे देवाची पूजा करायचे "


"पण तुला कसे कळले "?


"ते महत्वाचे नाही पण मला तुझ्या आजोबांना भेटायचे आहे "


"काय पण कशासाठी तुझ्या घरी कळले तर "?


"कळू दे मी तुला असे एकटे पणात नाही पाहू शकत एक मित्र म्हणून मला जे वाटते ते मी करेन कधी नेतोस घरी "?


ह्यावर मात्र मोहित गप्पच झाला 

रुद्राय ने आज मोहित च्या घरी जाण्याचे पक्के गेले होते कॉलेज सुटल्यावर रुद्राय मोहित ची वाट पाहत गेट पाशी उभा राहिला मोहित आणि रुद्राय एकाच वर्गात शिकत होते मोहित ने त्याला न पाहिल्यासारखे गेले आणि तो पुढे चालू लागला पण रुद्रयाने त्याला वेळीच पकडले आणि म्हणाला "मोहित नेतोस ना मला तुझ्या घरी "?


"रुद्रा मला असे वाटते कि तू उगीच ह्यात पडत आहेस "


"नाही मोहित जे चूक आहे ते बरोबर गेलेच पाहिजे "असे म्हणत मोहित चा हात पकडून तो चालू लागला वाटेत त्याने आईला फोन करून वेळ होईल म्हणून सांगितला


दोघेही घरी पोहचले मोहित ने बेल वाजवली तसा दरवाजा उघडला आणि दोघेही आत आले मोहित सरळ रुद्राला घेऊन आजोबा असलेल्या खोलीत गेला त्याचे आजोबा काहीतरी वाचता होते ते त्या दोघांना पाहून


"काय रे मोहित काय झालं ह्या वेळी तू इथे आणि हा कोण "?


"आजोबा हा माझा मित्र रुद्राय तुम्हला भेटायला आला आहे "

आपला चष्मा पुसत त्यांनी म्हटले "तुझा मित्र मला भेटायला "?


रुद्राय ने हात जोडत म्हटले "हो नमस्कार आजोबा मला तुम्हला भेटायचे होते "


त्याचाकडे पाहत मोहित चे आजोबा म्हणाले "कोण रे तू जो मला भेटायला आलास "?

"आजोबा मी रुद्राय देवधर"

हे नाव ऐकताच जरा गंभीर होत ते म्हणाले "देवधर म्हणजे तू श्रीरंग देवधरांचा कोणीतरी "?

"हो मी श्रीरंग देवधर याचा नातू"

"काय तू कशासाठी आलास इथे तुझ्या आजोबांना कळले तर ते रागावतील"

"आजोबा मला नाही त्याची पर्वा पण काही वर्षा पूर्वी जे घडले ते खूप वाईट घडले आणि त्याचे विनाकारण परिणाम तुम्ही भोगत आहात"

रुद्रा चे बोलणे ऐकून चकित होत आजोबा म्हणाले "काय हे तू काय बोलत आहेस आणि कशा बद्दल "?

"आजोबा मला सर्व माहित आहे तुम्हाला फसवल गेलय "

"पण बाळा तुला हे कोणी सांगितले "

"ते महत्वाचे नाही आजोबा पण मी जे बोलतो ते खरे आहे ना "

आपल्या चष्मा काढून डोळे पुसत ते म्हणाले "काय सांगू माझ्याकडे माझ्या निर्दोष असण्याचा पुरावा नाही त्यामुळे सगळ्याच्या नजरेत मी एक अपराधी आहे पण माझ्या महादेवाला माहित आहे कि मी निर्दोष आहे आणि माझा देव मला न्याय नक्की देईल पण बाळा तुला हे सर्व म्हणजे जेव्हा हि घटना घडली तेव्हा तुझे बाबाचे लग्न सुद्धा झाले नव्हते मग एवढ्या वर्षांनी हि गोष्ट तुला सांगितली कोणी "

"आजोबा तुमच्या घरावर सगळ्याचा रोष आहे हे सगळयांना माहित आहे तुमच्या घरापासून आणि माणसांपासून दूर ठेवण्याचे काम सतत कोणी ना कोणी करत असत पण सत्य तेच आहे जे दिसले कि नाही हे कोणी अजून शोधले नाही "

"बाळा तुझ्या तोंडून हे ऐकून खरेच बरे वाटले कारण त्या वेळी तुझे आजोबा ज्यांना मी खूप मान द्याचो त्यांनी पण एक ऐकले नाही सरळ मला पोलिसांच्या ताब्यात दिले बाळा तू असे समजू नको कि तुझे आजोबा म्हणून मी हे सांगतो पण त्याच्यकडून एक अपेक्षा होती पण त्यांनी माझी तुरुगांतून सुटे पर्यंत एक भेट हि घेतली नाही "

"जाऊ दे आजोबा तुम्ही काळजी करू नका तुमच्या वरचा हा डाग मी पुसणार आणि खरा अपराधी समोर आणार "

"पण बाळा ते कसे होईल त्या गोष्टीला तर किती वर्ष उलटून गेली लोकांची समजूत हि मीच अपराधी म्हणून झाली "

आजोबांकडे हसत हसत रुद्राय म्हणाला" महादेवावर विश्वास आहे ना मग निश्चित रहा "असे म्हणून रुद्राय निघून गेला पण त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहून आजोबानी हात जोडले 

रुद्राय गेला तसे मोहितचे आजोबा लगेच देवघरात गेले त्यांनी महादेवच्या मूर्ती समोर हात जोडत म्हणाले "देवा काय रे हे आज हे मी काय पाहतो श्रीरंग देवधरांचा नातू मला न्याय देण्यासाठी आलाय देवा मी तुझी निस्वार्थ पणे भक्ती केली लोकांनी मला अपराधी मानले पण माझी तुझ्यावरची भक्ती कमी झाली नाही मला माहित होते तू एक ना एक दिवस मला न्याय देशील आणि आज त्याचे बोलणे ऐकून वाटले कि मला न्याय मिळेल "असे म्हणून नमस्कार करून मोहितचे आजोबा आपल्या खोलीत आले 

मोहित ला मात्र हे कळत नव्हते कि रुद्राय एवढ्या ठाम पणे आपल्या आजोबाच्या बाजूनी कुठल्या आधारावर उभा आहे पण त्याचे मन पण सांगत होते कि त्याचे आजोबा काही वाईट करणार नाही 

रुद्राय घरी आला जेवण केले आणि तो आजीच्या खोलीत गेला तर आजी पहुडली होती त्याला पाहतच 

"अरे रुद्रा काय झालं मी झोपली नाही आहे ये आत ये "

"आजी मला वाटले कि तू झोपलीस म्हणून "

"नाही नाही रे बाळा काय म्हणत होतास आणि आज कॉलेज मधून यायला उशीर झाला ना आम्ही जेवणासाठी वाट पाहत होतो "

"हो आजी महत्वाचे काम होते कॉलेज चे बर आजी मला ना कॉलेज मध्ये एक प्रोजेक्ट दिला आहे त्या साठी ना मला तुझ्याकडून थोडी माहिती हवी"

आजी हसत हसत म्हणाली" काहीतरी च काय मी काय तुला माहित देणार तुझ्या आईला विचार किंवा बाबाना नाहीतरी आणखी कोणाला "

"नाही आजी त्यांना काही माहिती नसेल पणती माहिती तुला असेल "

"काय बघ बाबा मला माहित आहे ते सांगू शकते त्या बाहेर मला माहित नाही विचार काय विचारायचे "

"आजी आपल्या मंदिरात वामन पुजारी म्हणुन होते ना ज्याच्या घरी कोणीच जात नाही म्हणजे त्याच्या घरी जाणे म्हणजे पाप लागणे असेच काही म्हणतात ना "

"हो होते नाव घेऊ नकोस त्याचे पण तुला कशाला हवे "

"आजी तोच तर प्रोजेक्ट आहे "

"हा कसला प्रोजेक्ट"? 

एवढ्यात रुद्राय चे आजोबा आत आले रूद्राला पाहून म्हणू लागले "काय आज आजी बरोबर गप्पा चालू आहे वाटत "

ह्यावर रुद्राय ने काहीही उत्तर दिले नाही आजीला पाहत तो म्हणाला "आजी मी निघतो "हे पाहून आजी म्हणाली "काय हो आज मधेंच घरी आलात "

ते पाहून केविलवाणा चहेरा करत आजोबा आजीला म्हणाले "नाही थोडे बॅंकचे बुक न्याला आलोय पाहिलास कसे मला डावलून गेला आजोबा अशी हाक सुद्धा मारत नाही तो पहिली आजोबा हे आजोबा ते आजोबा वॉल्क जाऊया आजोबा तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात आणि आता नजर सुद्धा करून बोलत नाही आता तू मला हे सांगू नकोस कि तो लहान नाही वगैरे तो घरातल्या सगळ्याशी नीट बोलतो पण मी जेव्हा तिथे पोचतो तेव्हा तू निघून जातोआता हि तसेच केले तुझ्याशी प्रेमळ बोलत होता मी आल्यावर निघून गेला असे काय चुकले कि तो माझ्याशी असे वागत आहे तुला माहित आहे काल संध्याकाळी मी आईस क्रीम आणले होते कोमल आणि काव्या ने रुद्राला हाक दिली तसे तो आला त्यांनी सांगितले कि आईस क्रीम खा आजोबानी आणली आहे त्याने माझ्यासमोरच हातात घेतलेली आईस क्रीम खाली ठेवत मला नको असे म्हणत निघून गेला मी त्याला विचारले तर मला नको असे खोचक उत्तर दिले तो माझ्याशी असा का वागतो ह्याचे कारण मला नको कळायला मी विचारले तर तो काहीच सांगणार नाही "

शांत व्हा तुम्ही मी बोलेन त्याचाशी असे म्हणून आजीने श्रीरंग याना शांत केले पण त्याच्या डोळ्यातले अश्रू नातवाच्या प्रेमासाठी आसुसले होते 

संध्याकाळी मंदिरात जायचे नाटक करून आजी मुद्दाम रुद्रायाला घेऊन घराबाहेर पडली महादेवाचं मंदिर तसे दूर नव्हते दोघांनी मंदिरात प्रवेश केला देवाचा आशीर्वाद घेतला थोडा वेळ मंदिरात बसून बाहेर घरी जाण्यासाठी पडले तर आजी रुद्राला पाहत म्हणाली 


"रुद्रा समोरच्या बागेत जरा बसुया संध्याकाळचा वारा मस्त येतो मन शांत होत रे "


रुद्रा ने होकार दिला आणि ती दोघे बागेमध्ये गेली एका सोफयावर दोघेही बसली 


वाऱ्याची एक झुळूक आली ते पाहता आजी म्हणाली "मस्त वारा येतो ना रूद्रा "?


"हो आजी मस्त वारा येत आहे "


रुद्रा च्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली "रुद्रा एक विचारू का "?


"आजी विचार ना असे काय विचारतेस "?


"तुझे आणि आजोबांचे काही बिनसले आहे का "?


"का आजी "?


"नाही हल्ली तू त्याच्याशी कमीच बोलतो म्हणून विचारले "


"नाही आजी तसे काही नाही "


"मग तू काल उठून का गेलास आणि आजोबानी आणलेले आईस क्रीम का नाही खाल्ले "


"आजी हे तुला कोणी सांगितले "


"हे बघ रुद्रा मला सांगायला नको मला पण तसे जाणवले काय झालं बाळा काही झाले असेल तर सांग ना? त्यांना पण तुझ्या अश्या वागण्याचा त्रास होतो खूप जीव लावता रे ते तुला आणि पहिली कसे तू आजोबा आजोबा करत असायचा त्याची त्यांना सवय झाली आणि तुझे हे वेगळे रूप पाहून ते हि मनाला लावून घेत आहेत "


रुद्रा सोफयावरून उठत म्हणाला "आजी निघूया "


त्याचे असे उत्तर ऐकून" रुद्रा मी तुला काहीतरी विचारले त्याचे उत्तर देण्याचे सोडून तू निघण्याचे म्हणतोस 


रुद्रा ने आजीकडे पाहत म्हटले "आजी काही प्रश्नाची उत्तरे आपण योग्य वेळी देणे योग्य असते "

रुद्राय चे आजोबा कडचे वागणे कठोर झाले आहे हे सगळ्याच्या लक्षात आले होते रुद्राय नेहमी मोठ्याचा आदर करणारा अचानक असा कसा बदला हा प्रश्न सर्वा समोर उभा राहिला ह्या बद्द्ल रुद्राय च्या वडिलांनी सुशांत देवधर यांनी रुद्राय शी बोलायचे ठरवले तसे ते संध्यकाळी रुद्राय च्या रूम मध्ये गेले 

रुद्राय पुस्तक वाचत बसला होता तो त्या पुस्तकात एव्हडा मग्न होता कि समोर त्याचे बाबा येऊन खुर्चीवर बसले हे हि त्याच्या लक्षात आले नाही बाबांनी त्याला पहिले तर तो एव्हडा गुंतला होता कि त्याना शेवटी त्याला हाक द्यावी लागली तसे त्याने पहिले त्यांना पाहत तो म्हणाला 

"बाबा तुम्ही इथे आणि कधी आलात "?

"जेव्हा तू ह्या पुस्तकात गडून गेला होतास असे काय वाचत आहेस कि तुला आजूबाजूचा विसर पडला "

"काही नाही हो बाबा स्वप्ने खरी कि खोटी यावर पुस्तक आहे ते वाचत होतो "

"स्वप्ने खरी कि खोटी रुद्र असली कसली तू पुस्तक वाचतो रे "

"बाबा ह्यात आध्यत्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूनी स्वप्नाना बद्दल माहिती दिली आहे ती जाणून घेत होतो" 

"ग्रेट खूप छान माहिती मिळवत आहेस "

ह्या वेळी बाबाचे त्याच्या खोलीत येणे अशक्य होते म्हणून त्याने त्यांना पाहत विचारले "बाबा काही काम होते "?

"हो बेटा जरा बोलायचे होते "

"हा बोला "असे म्हणून रुद्र ने वाचत असलेल्या पुस्तकाची पाने दुमडून पुस्तक बंद केले आणि बाबा कडे पाहत म्हटले "बोला बाबा "

"रूद्रा लहानपणापासून आज पर्यत तू मला कधीच तुझ्यावर रागवण्याची संधी दिली नाही म्हणून तर तू सगळ्याचा आवडीचा आहे पण बेटा काही दिवसापासून जे तुझे वागणे आजोबांकडे आहे ते पहाता प्रश्नचिन्ह उभे राहत आहे कि तू असा त्याच्याशी का वागत आहे काय झालं आजोबांशी असे वागताना तुला वाईट नाही वाटत एकदा तरी विचार केलास का त्याना कसे वाटत असेल माझा रुद्रा असा का वागतो असे म्हणून काल ते माझ्यासमोर रडले त्यांना रडताना मी कसे पाहू शकतो रुद्रा तुझ्या मनात जे चालू आहे ते स्पष्ट पणे बोल" 

"बाबा मला काही प्रश्नाची उत्तरे हवी "?

"प्रश्नांची उत्तरे "?

"हो"

"कसल्या प्रश्नांची उत्तरे "?

"बाबा तुमच्यकडून नाही आजोबा कडून हवी "

"रुद्रा हे तू काय बोलत आहेस तू एव्हडा हि मोठा झालास नाही कि आजोबाना प्रश्न करशील आणि कसल्या प्रश्नांची उत्तरे आणि हे त्यांना कळले तर त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा जरा तरी विचार केला आहे का "?

"बाबा काही गोष्टी आपल्यासाठी अंधारात आहेत त्या उजेडात यावे लागतील "

असे म्हणून रुद्राने पुस्तक उघडले आणि वाचू लागला

रुद्राय च्या बाबांनी त्याच्याशी बोलायचे ठरवले खरे पण त्याच्या अजब बोलण्याने तेच विचारात पडले घडलेला प्रकार त्यांनी कोणाला सांगितला नाही पण त्याच्या हि मनात हजार प्रश्न उभे राहिले की रूद्रा एवढा कसा बदला आणि का ?


रुद्राय चे मोहित च्या घरी जाणे वाढले त्या घटने बद्द्ल तो त्याच्या आजोबा कडून माहिती घेत होता आणि त्या घटनेत असलेल्या माणसांना तो स्वतः हुन भेटत होता हे त्याचे भेटणे रुद्राय च्या आजोबाच्या कानावर पडले तसे ते रागाच्या भरात घरी परतले तर रुद्राय घरी परतला नव्हता त्यांनी सगळा प्रकार सगळ्या घराच्या समोर सांगितला तसे सगळेच काळजीत पडले सगळे रुद्रा ची वाट पाहत होते एवढ्यात रुद्रा घरी आला त्याने घरात प्रवेश करता पहिले कि सगळी मंडळी हॉल मध्ये बसली होती तो आपल्या रूम मध्ये जाणार होता कि आजोबानी त्याला रोखले आणि विचारले 


"आज उशीर का झाला कॉलेज मधून यायला "?


"कॉलेज मध्ये एक्सट्रा क्लासेस होत्या "


"खरं बोलतोस तू "?


रुद्राय ने आजोबा कडे पाहत म्हटले "बस आजोबा उगीच त्यांना दोष देऊन नका"


हे ऐकताच रागाच्या भरात श्रीरंग म्हणाले "काय त्या अपराध्याची बाजू घेऊन बोलतोस पाहा पाहा हा आपला रूद्राय काय बोलत आहे तुझे वय काय आहे रुद्राय ह्या वयात चांगला अभ्यास करियर करायचे सोडून हि डिटेक्टिव्ह गिरी करत आहेस आणि काय मिळणार आहे तुला नाही रे आमचेच चुकले तुझे एवढे लाड केले ना हे बघ रुद्राय लहानपानपासून आता पर्यत तू फक्त माझे प्रेम पहिले ह्या पुढे ह्या प्रकरणाशी किंवा त्या वामन पुजारीच्या घरी जाशील तर माझा राग पाहशील "


"आजोबा माझ्या अभ्यासाची चिंता नसावी आणि जर आपल्या समोर चुक होत असेल तर गप्प बसून सहन करणं हे मला तुम्हीच शिकवलं नाही मग मी अन्याय कसा सहन कारेन "


हे ऐकून रागाच्या भरात आजोबानी रुद्राय वर हात उचला आणि स्वतःला सावरत ते आपल्या खोलीत गेले रुद्राय हि निघून गेला सगळे आजोबांचे आणि नातवाचे शीतयुद्ध पाहून चकित झाले 

आजोबा आपल्या खोलीत आले आणि शांत ख्रुचीवर बसले त्याच्या मागोमाग आजी हि आल्या आजोबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांना लहान मुलाप्रमाणे रडताना पाहून त्याच्या पत्नी सुधा त्यांना सावरत म्हणाल्या "शांत व्हा मला माहित आहे तुमच्यावर काय बेतले असेल रुद्रा वर तुम्ही रागाच्या भरात हात उचला तरी मनाला तुमच्या खूप लागले आहे जाणवते मला पण मला एक कळत नाही हा त्या वामन पुजारीच्या प्रकरणाशी एव्हडा का जवळ जात आहे त्या प्रकरणाला तर किती काळ उलटून गेला "


स्वतःचे डोळे पुसत आजोबा म्हणाले "त्यांनीच कान भरले असतील त्याचे म्हणून तो असा वागतो सुधा तू तरी माहित आहे ना त्या माणसाने काय केले होते ते काळ उलटला तरी त्याचे कर्म मात्र सगळ्याच्या लक्षात अजून हि आहे मला तर त्याचे तोंड हि पाहण्याची इच्छा नाही म्हणून तर तो समोर आला तरी मी नजर फिरवतो "


"हो सगळं माहित आहे श्रद्धेच्या आड आपली पिशवी भरली आणि काय "?


"तेच ना हे रुद्रा ला कळत नाही पाहिलंस कसा उद्धटा सारखा बोलत होता एक वेळ माझ्या मनाला हि पटत नव्हते कि तो आपला रुद्रा आहे "


"जाऊ द्या शांत व्हा त्याच्या डोक्यात काय चालू आहे महादेवालाच ठाऊक त्या दिवशी मला पण त्या बद्दल विचारत होता आणि एवढ्यात तुम्ही आल्यावर तो निघून गेला "


"सुधा आपण रुद्रा समजुतीत आल्यावर त्याचा घरी जायचे नाही हे सांगितल्यावर त्याने कधीच प्रश्न केला नाही मग आताच हा त्याचा अट्टाहास का आणि हे त्याचे वागणे त्याच्या वाढदिवसाच्या दिवसापासून सुरु झाले आहे माझ्याशी किती प्रेमाने वागणारा माझा रुद्रा आज माझ्यावर रागात आहे काय करू कसे समजावू त्याला कि त्याचे हे आजोबा त्याला किती प्रेम करतात "असे म्हणून ते रडू लागले 


तिथे रुद्रा आपल्या रूम मध्ये गप्प बसला होता एवढ्यात त्याची आई आत आली त्याच्या शेजारी बसली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला समजावत म्हणाली "बाळा काय झालं आजोबांशी असे वागणे शोभत नाही तू मोठ्याचा कधी अनादर करत नाहीस मग आज आणि आजोबानी आपल्याला सांगितले कि त्या घरापासून दूर राहा मग ते आपल्या भल्यासाठी असेल ना मग ऐकायला नको का बाळा आजोबाच्या वेळी काय झालं हे त्यांना ठाऊक असेल तुला लोकांवर जास्त विश्वास आहे कि तुझ्या आजोबावर मग विचार कर ना तुझ्या सारख्या शहाण्या मुलाने असे वागलेले बरे दिसते का अरे तू चांगला शिक मोठा हो हीच आमची इच्छा आहे ते सोडून तू हा कलह का करत आहेस "


आई कडे पाहत रुद्रा म्हणाला" आई मी तुला माझ्या मनातले नेहमी सांगत असतो म्हणून तुला सांगतो त्या काळी काय झालं हे आपल्यला माहित नाही जे सांगितले तेच खरे असे नाही होऊ शकत ना त्याच्या मागे हि काही असू शकते आणि आई तू नेहमी म्हणते ना कोणावर हि अन्याय होता कामा नये मग मी तेच करतो "


"अरे पण रुद्रा "


"आई तुला लवकरच कळेल काय सत्य आणि काय असत्य तेव्हा तुझं म्हणशील दिसत तसे नसते रुद्रा "असे म्हणून रुद्राय उठून गेला आणि आई त्याला पाहत राहिली 


सकाळी नेहमी प्रमाणे कॉलेज मध्ये जायच्या अगोदर रुद्रा मंदिरात आला त्याने देवाच्या समोर डोळे बंद करून हात जोडले आणि तो मनातल्या मनात म्हणू लागला "देवा जे सत्य आहे ते माझ्यासमोर आले आहे पण ते सगळ्या समोर यायला हवे आणि ते मी आज आणणार आहे फक्त तुझा आशीर्वाद असू दे" असे म्हणून त्याने डोळे उघडले तर त्याला मूर्तीवरचे फूल खाली पडलेले दिसले ते पाहून आपल्या ला महादेवाची साथ आहे हे मनाशी पक्के करून तो कॉलेज मध्ये गेला 


हल्ली तो बराच वेळ मोहित बरोबर घालवत असे कॉलेज सुटले तसे तो मोहित बरोबर त्याच्या घरी गेला तो सरळ त्याच्या आजोबा ना भेटला आजोबाशी त्याने बराच वेळ गप्पा मारल्या आणि शेवटी त्यांना असे काहीतरी सांगितले ते ऐकून 


ते त्याला समजावत म्हणाले " नाही बाळा नको माझ्यासाठी तू वाईट होऊ नकोस जा बाळा जा तू तुझ्या घरी जा "


पण रुद्रा आपल्या निर्णयावर ठाम होता त्यांना पाहत तो म्हणाला "नाही आजोबा संध्यकाळी मी तुम्हला न्यायला येणार आणि माझ्यासाठी तुम्हला यावेच लागेल "असे सांगून तो निघून गेला 


दर सोमवारी संध्याकाळी देवधर कुटूंबातर्फ़ मंदिरात आरती होत असे आज हि सगळे मंदिरात उपस्तिथ होते आरती करण्याची वेळ होत आली पण रुद्रा चा काय पत्ता नव्हता रुद्राला फोन लावला तर उचलत नव्हता म्हणून सगळेच काळजीत पडले 


मंदिरातल्या पुजारी नि श्रीरंग याना विचारले "काका अजून आला नाही रुद्रा आरती ची वेळ निघून जाईल कुठे गेला तो आज पहिलीच वेळ त्याने उशीर लावला "


एवढ्यात लोकांचा गाजवजा ऐकू आला "हे काय करतोस रुद्रा ह्याला कुठे मंदिरात आणत आहेस "?


लोकांचा आवाज ऐकून देवधर कुटुंब मंदिराच्या बाहेर आले त्यांनी पहिले कि वामन पुजारी चा हात धरून तो मंदिराच्या पायरी चढण्याचा प्रयत्न करत होता आणि देवळात उपस्थित असलेले लोक त्याला रोखत होते त्या लोकातल्या एकट्याने श्रीरंग याना पाहत म्हणाला "श्रीरंग राव तुमचा नातू पहा काय करत आहे" रुद्राच्या बाबानी रुद्रा ला ओरडत म्हणाले "रुद्रा काय करत आहेस तू ह्या माणसाला इथे का आणले"?


ह्यावर रुद्रा म्हणाला "बाबा मंदिर सर्वांचे आहे मग यांनी आणि याच्या कुटूंबानी ह्या मंदिरात का येऊ नये "?


त्याचे हे बोलणे श्रीरंग राव ऐकत होते पण त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता त्यांनी रुद्राला पाहत म्हटले" अति होतंय रुद्रा खूप अति होतंय जे प्रश्न तू आम्हला विचारत आहेस ना तोच प्रश्न त्या माणसाला विचार ज्याच्या तू हात धरला आहेस तो तुला सांगेल का त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर आम्ही सर्वानी बहिष्कार टाकला सांग ना रे गप्प का माझ्या नातवाला तर फितूर केलंस आणि आता काय मंदिरात हक्क मागण्यासाठी आलास तर विसरू जा आलेल्या पाऊली परत निघून जा मंदिरात तुला प्रवेश नाही "ह्यावर जमलेल्या लोकांनी हि सूर लावला "हो हो नाही प्रवेश नाही "


सगळे एका बाजूला आणि रुद्रा एकटा हे पाहून रुद्राच्या आई ने रुद्रा ला समजावत म्हणाली "रुद्रा वेडेपणा का करतोस गप्प एकटाच मंदिरात ये आणि आरती कर "


"नाही आई ज्याचा अधिकार त्यांना मिळाला हवा "


"हो का मग आजपासून तू त्याच्याबरोबर राहा माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहे "हे श्रीरंग रावचे बोलणे ऐकल्यावर रुद्रा चे आई बाबा दोघेही चकित होऊन आजोबांकडे पाहू लागले तसे ते त्याना दोघांना पाहत म्हणाले "माफ करा पण ह्याला हीच भाषा कळते ज्याच्या बाजूनी तो उभा आहे ना तोच त्याला आपला माणूस वाटत आहे आम्ही नाही त्याला काय करायचे ते करू दे चला आपण आरती करू "


आजोबा कडे न पहाता रुद्रा म्हणाला "हो करा आजोबा करा आरती पण देवाला पण तुमचे खरे रूप माहीत आहे"


हे ऐकताच रागाने श्रीरंग "म्हणाले तोंड संभाळून बोल कोणाशी बॊलतोस तू आणि कसले खरे रूप "?

आजोबानी रागाने कसले खरे रूप हा प्रश्न रुद्राला विचारताच रुद्र आजोबाना पाहून म्हणाला "आजोबा काही वर्षा पूर्वीची गोष्ट तो दिवस आठवा ज्या दिवशी आपल्या मंदिराचा वर्धापनदिन होता सगळ्यांनी मिळून मोठ्या उत्सहात तयारी केली तुम्ही सकाळ पासून मंदिरात च होता संध्याकाळची वेळ झाली आणि ह्या शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी मंदिरात आला आणि त्याने देणगी म्हणून काही पैशाची बंडले फंड पेठी कडे ठेवली ते गेले तशी तुम्ही ती मंदिराच्या लाकडी कपटामध्ये ठेवली कार्यक्रम संपता तोवर रात्र झाली तसे तुम्ही सगळे निघून गेले पुजारी वामन आजोबानी शेवट दरवाजा बंद केला व ते हि निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी वामन आजोबा जेव्हा मंदिरात आले तर त्यांना कपटाचा दरवाजा उघडा जाणवला म्हणून त्यांनी सगळ्यांना खबर केली तसे सगळे जमले त्या दिवशी अखेरीस आणि दुसऱ्या दिवशी पहिली वामन आजोबा घटना स्थळी उपस्थित होते म्हणून संशयाची सुई त्याच्याकडे गेली ते स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही आणि सगळ्यांनी दुजोरा देत पोलीस त्यांना चोरीच्या आरोपात घेऊन गेली पण खरं तर त्यांनी चोरी केली नव्हती चोरी तर वेगळ्याच माणसाने केली मात्र अपराधी वामन आजोबा ठरले आजोबा तुम्ही ती रक्कम आपल्या कोटाच्या खिशात टाकली व कपाटाचे चे दार हलकेच बंद केले आणि समोर असलेली खिडकी मुद्दाम उघडी ठेवली जेणे करून वाऱ्याने तो दरवाजा पूर्ण उघडावा आणि चोरी झाल्याचे दिसावे हो ना आजोबा रुद्रा ने आपल्या आजोबा कडे पाहत विचारले तसे 

रागाने श्रीरंग म्हणाले "काय हे तू काय बोलत आहे आणि हे तुला कोणी सांगितले उगीच माझ्यावर आरोप नको करू ह्या वामन ने तुला पुरता माझ्या विरोधात उभा केला आहे पण मी तसे व्हायला देणार नाही "

"आजोबा शांत मला हे कोणी सांगितले हेच जर तुम्हला कळले तर पुरती अनामिक भीती तुमच्या मनात जागृत होईल हे मला वामन आजोबानी नाही प्रत्येक्ष महादेवानी स्वप्नात दाखवले "

"काय हे तू काय बोलत आहेस उगीच त्याचे नाव घेऊन पाप करू नकोस हा वामन तर पुरता अपराधी झालाच आहे देवाचे पैसे खाऊन आता तू त्याचे नाव खोटे वापरून स्वतःला त्या पापात ओढवू नकोस "

"हो का आजोबा मग मला सांगा मी जे सांगितले ते खरे आहे कि खोटे तुम्ही खिश्यात बंडले ठेवली हि गोष्ट तुमच्या खेरीस कोणाला माहित आहे कोणालाच नाही पण तुम्ही हे विसरलात ज्याच्या जागेत तुम्ही हे केले तो कसा गप्प बसेल "

स्वतःला सावरत श्रीरंग म्हणाले "हे बघ तुझ्या कुठच्या हि प्रश्नांची उत्तरे दयायला मी बांधलेला नाही "

"मग महादेवासमोर उभे राहून त्याच्या नजरेला नजर मिळूवुन सांगा कि हे तुम्ही नाही केलं म्हणून वामन आजोबा तयार आहे हे करायला द्या त्याना प्रवेश मंदिरात ते करतील स्वतःला सिद्ध "

"हे बघ मी तू सांगतो ते ऐकायला वेडा नाही झालो आणि मला काहीही सिद्ध करायचे नाही "

ह्यावर मिश्किल हसत रुद्रा म्हणाला "आजोबा कर नाही डर कशाला जर तुम्ही हे नाही केलंत तर माझीच नाही इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना तुमच्यावर संशय येईल आणि तुम्ही महादेवा समोर खोटं बोललात तर त्याच्या तांडवाला सामोरं व्हावे लागेल आणि तुम्हला काय वाटले महादेवांनी काही वर्षांपूर्वी ते पाहून तुम्हला माफ केले नाही आज कित्येक वर्षांनी तुमच्याच माणसाला खरे दाखवून तुम्हला तुम्ही केलेल्या कर्माचा पाठ वाचून दाखवला आता निर्णय तुमचा"

असे म्हणून बाहेरूनच रुद्रा ने आवाज दिला "महादेव तुम्हीच पहा एक निष्ठावान भक्त बाहेर उभा आहे आणि निष्टवान असल्याचे नाटक करणारा आत" असे म्हणताच सगळेच श्रीरंग याना महादेव समोर उभे राहून खरे सांगण्यास सगळ्यांनी सांगितले त्याचे ते बोलणे ऐकून श्रीरंग राव एकदम गडबडले त्यांनी सगळ्यांकडे पाहत म्हणाले "शांत वाह असे म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले "हो मीच चोरी केली हे ऐकताच सगळे चकित होऊन त्याना पाहू लागले तर वामन पुजारीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण चेहऱ्यावर समाधानाचे भाव आले 

रुद्रा च्या वडिलांनी आपल्या वडिलांकडे पाहत विचारले "बाबा तुम्ही "?

"हो मला नाही वाटले ले कि हे सत्य कधी सर्वासमोर येईल पण देवासमोर कोणाचेच चालत नाही हे पटले "

त्याच्याकडे रागाने पाहत सुधा म्हणाल्या "अहो पण तुम्ही देवाला पण घाबरला नाही "?

"सुधा मला तेव्हा पैशाची गरज होती "

"म्हणून तुम्ही एका निष्पापाचा बळी दिलात आणि असली कसली गरज होती कि तुमच्या चांगल्या स्वभावाला हि अशी गंज लागली "

"व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार होती आणि बँकेचे कर्ज त्यामुळे त्या स्थितीत मला तेच सुचले आणि मी ते पैसे बँक मध्ये भरले "

"काय अहो उपाशी राहिलो असतो पण एक निष्पापचे पाप आपल्या माथी का म्हणून मारून घेतले आपल्या सुखासाठी कोणाचे तरी घर बहिष्कारात पडले ह्याचे तुम्हला जरा हि काही वाटले नाही आणि त्या दिवसापासून तुम्ही कुठल्या तोंडाने महादेव समोर उभे राहता आणि आपण भक्त म्हणून का सांगता तुमच्या सारखा भक्त म्हणजे भक्तीला काळिमा फासणे तुम्हला वाटले कि झाली वर्ष निघून गेली पण महादेवांनी तुमचे सत्य तुमच्या माणसासमोर आणले लाज वाटते मला तुम्हला माझा पती म्हण्याची असे म्हणून आजीने वामन पुजारीना हात जोडत म्हटले "भावोजी मला माफ करा आपल्या घराशी असेलेले आपले चांगले संबंध ह्याच्या करणी मुले बिघडले त्या बरोबर तुम्हला किती त्रास झाला हे जाणवते पण खरेच तुमची भक्ती निष्टवान होती म्हणून महादेवांनी तुम्हला एवढ्या वर्षांनी न्याय दिला रुद्रा खरंच महादेवांनी तुझ्या स्वप्नात येऊन सगळे दाखवले ह्याला म्हणतात भक्तीची शक्ती रुद्र वामन आजोबाना घेऊन आत ये असे म्हणून आजीने पुजारी काकांना सांगितले चला आरतीची तयारी करा आज खरा भक्त आरती करणार" असे म्हणून वामन पुजारीच्या हाती पंचारती देण्यात आली आरती सुरु झाली घरातले तसेच बाकीच्या लोकांनी हि श्रीरंग याना न पाहिल्यासारखे करत आरतीत सहभागी झाले हे पाहून ते रडू लागले 


आरती झाली तसे सगळ्यांनी वामन पुजारीची माफी मागितीला आणि आज पासून त्याच्यासाठी हे मंदिर खुले आहे हे सांगिलते तसे त्याचे डोळे अजून भरले रुद्राने वामन आजोबाचा हात पकडत त्यांना घरी सोडण्यास पाऊल टाकले तर त्याला त्याचे आजोबा रडताना दिसले हे पाहून त्यांनी मोठ्याने म्हटले "भक्ती दिखाव्याची नसावी मनातून असावी तरच ती खरी असते "

वामन आजोबाना घेऊन रुद्रा घरी परतला घरात बातमी पोहचतच सगळे खुश झाले वामन पुजारी ने रुद्रा कडे पाहत म्हटले"रुद्रा महादेव स्वयं मला न्याय देण्यसाठी तुझ्या रूपात आले असे म्हणून त्यांनी हात जोडले त्याच्या हाताला पकडत रुद्रा ने त्याना मिठी मारली 


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Action