akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

असा ही रंग

असा ही रंग

17 mins
201


"ये पळा नाहीतर भैया रंगवणार "अशी आरोळी करत १० -१२ वर्षाची मुले पळत होती 


"कुठे पळणार तुम्ही मी तर आज तुम्हाला रंगवणार म्हणत गौरव ने आपल्या लहान भावंडांवर रंग फेकले आज दरवर्षी प्रमाणे मयेकर कुटूंबीय एकत्रित रंगपंचमी चा आनंद घेत होते 


घरचा परिसर विविध रंगानी तसेच संगीतानी दणाणून गेला होता मयेकर कुटुंब म्हणजे प्रख्यात घरगुती वस्तूचे व्यवसायिक आणि राजकारणाशी निगडित असलेले एकत्रित कुटुंब आणि त्याची रंगपंचमी म्हणजे बघण्यासारखी सगेसोयरे नातेवाईकांना हि आमंत्रण असल्याने बरीच लोक जमली होती 


सकाळी सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी कुठे संपला तसे सगळे जण घरात परतले सगळेच जण थकून गेले होते कुटुंबाचे प्रमुख घनश्याम मयेकर ज्यांना सगळे दादा म्हणत ते आपल्या खोलीत विश्रांती करत होते मध्येच ते उठले आणि त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि ते फोन वर बोलू लागले २० मिनिटे बोलल्यानंतर त्यानी फोन ठेवला आणि त्यानी आपले आवडते पुस्तक वाचण्यास काढले पण एक दोन पानं वाचताच त्यांनी पुस्तक बंद केले आणी कपाटात ठेवले त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर पुस्तकातच ते रमत असतं


जेवण्याची वेळ होत झाली म्हणून दादा ना त्याच्या नोकर बंडू त्याना बोलवण्यासाठी आला 


"दादा चला जेवायला "


"अरे दादा कुठे गेले "?


नोकर पटकन जिना उतरून खाली गेला आणि सगळयांना खबर गेली तसे दादाचे सह कुटूंबीय एकत्रित आले दादा ना ४ मुलगे आणि एक मुलगी होती


सून नातवंडे असा गोतावळा जमा झाला घर भर आजूबाजूला शोधले गेले त्याचा फोन हि रूम मध्ये होता त्याच्या मित्रांना फोन करण्यात आला ४ हि मुलगे ४ दिशेने शोधण्यासाठी निघाले घरातून हि विचारपूस करण्यासाठी फोन लावले जात होते वॉचमन हि खात्रीशीर सांगितले कि "त्यांनी दादा ना बाहेर जाताना नाही पहिले "दादा ची आवडती फियाट पण तिथेच उभी होती सगळेच दादाच्या काळजीने व्याकुळ झाले 


सगळीकडे शोधून सगळे घरी परतले सकाळ पर्यत थांबू म्हणुन सगळे थांबले सकाळ होताच मात्र अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि हि बातमी वाऱ्यासारखी पसरली

घनश्याम मयेकर बेपत्ता हि बातमी वाऱ्यासारखी पसरली त्याच्या घरात चौकशी करण्यासाठी लोकांचा जमवाडा एकत्र झाला पोलीस हि आपल्या बाजूने घरातल्याची चौकशी करत होते पत्रकार हि अनेक उलट सुलट प्रश्न विचारत होते 

"हे बघा आम्ही आमचा तपास सुरु ठेवला आहे काही हाती लागले तर आम्ही तुम्हला खबर करू असे सांगून पोलीस तेथून निघाले "

"प्लिज आम्हला आणखी प्रश्न नका विचारू आम्ही सध्या उत्तर देण्याच्या परस्थिती नाही आहोत "असे सांगून मयेकर कुटुंबीयांनी पत्रकारांची रजा घेतली 

दादा ची मुलगी बातमी मिळताच सासर हुन माहेरी पोहोचली ती नि वडिलांच्या प्रेमापोटी घरातल्याना हजार प्रश्न विचारले त्यामुळे काही कुटुंबीय दुखावले गेले 

"हिला काय म्हणायचं आहे आम्ही दादाची काळजी नाही घेत "

"तेच ना आज आली आहे आणि आम्हला सांगते "

असे बोलणे कानावर पोचताच सगळयांना दादा च्या मोठ्या मुलाने सुभाष ने शांत केले आणि सगळेच दादा च्या येण्याकडे वाट पाहत बसले एव्हड्यात दरवाजाची बेल वाजली 

"तुम्ही या" 

"मी हे काय ऐकतो दादा बेपत्ता आहे "

"हो तुम्ही बरोबर ऐकलंत "

"अहो हि बातमी मिळताच मी तडक निघालो पोलीसानी काय सांगितले "

"तपास चालू आहे" 

"हे बघा मला माहित आहे हे बोलणे इथे योग्य नाही पण दादा च्या बेपत्ता होण्याने आपल्या पार्टी चे खूप मोठे नुकसान होणार आहे निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे आणि विरोधकांसाठी तर हि सुसंधी असेल कारण दादा ना ह्या मतदार संघात अजून कोणीही हरवले नाही फक्त दादामुळेच आपल्या पार्टी ची सीट कित्येक वर्ष ह्या मतदार संघात शाबूत आहे आता कसे होणार "

"हो ते हि आहेच "

"दादा च्या जागेवर तुम्ही कोणाला उभे करणार "दादाच्या ४ नंबर मुलाने सुधांत ने विचारले 

 "दादा तोपर्यंत मिळाले तर दादाच उमदेवार असतील नाही तर विचार करायला लागेल "

हे "ऐकताच दादाचा ३नंबर मुलगा सुबोध म्हणाला "विचार कसला करायचा त्यात दादा खेरीस कोणा एका मयेकरलाच तिकीट मिळायला हवे 

"तुमचे म्हणे बरोबर आहे कारण लोक तुमच्या कुटूंबाला खूप मानतात आणि सीट शाबूत ठेवण्यासाठी मी सगळ्याशी बोलून निर्णय घेईन" असे म्हूणन ती व्यक्ती निघाली 

ती राजकारणी व्यक्ती जातात सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले 

मयेकर कुटुंबीय राजकारणाशी जवळचे होते दादा बेपत्ता झाल्याने त्याच्या जागेवर कोणी उभे राहावे हा मोठा प्रश्न होता ती राजकीय व्यक्ती गेल्यापासून सगळेच गप्प होते एवढ्यात दादाच्या मोठ्या मुलाने सुभाष ने सगळ्याचे लक्ष आपल्याकडे वळवले आणी आपल्या भावांना पाहात म्हटले "मला तुम्हा तिघांशी काही बोलायचे आहे जरा त्या खोलीत या "तसे चार हि भाऊ खोलीत गेले 


काही विलंब न करता सुभाष ने बोलण्यास सुरुवात केली "हे पहा दादा नंतर मी घरात मोठा असल्याने मी जर निवडणुकीस दादाच्या जागेवर उभा राहिलो तर तुम्हला काहीच आक्षेप असणार नाही हे मला माहीत आहे तरीही मी तुम्हाला विचारत आहे "


हे ऐकताच दादाच्या दुसरा मुलगा सुशांत म्हणाला "असे कसे दादा तू मोठा म्हणून तुला उमेदवारी मिळणे हे बरोबर नाही दादाच्या प्रचारासाठी मी रात्र दिवस फिरायचो "


त्याच्या बोलण्याला सुधांत आणि सुबोध यांनी हि दुजोरा दिला "आम्ही पण जायचो प्रचाराला सगळी व्यवस्था आम्ही पाहायचो "


हे ऐकताच सुभाष जरा नाराज झाला त्याने त्याच सुरात विचारले" मग तुम्हला मी उमेदवार म्हणून चालणार नाही "?


एकाच सुरात तिघेही म्हणाले "सॉरी दादा पण तू मोठा आहेस म्हणून तुला उमेदवारी मिळणे ह्याला आमचा विरोध आहे "


"अच्छा मग योग्य उमेदवार कोण आहे "?


तिघेही एकदम स्वतःकडे च बोट दाखवू लागले 


"अरे पण तिघांना नाही देणार ते कोणा एकट्यालाच मिळणार "


असे म्हणताच चौघांनी आपण कसे दादा ना मदत करत होतो आणि त्याची परतफेड म्हणून आपल्याला कशी उमेदवारी मिळावी हे एकमेकांना पटून देण्याचा प्रयन्त केला पण तो प्रयत्न मोठ्या आवाजात झाला आणि हे शब्द दादाच्या मुलीच्या सुमन च्या कानावर पडले 


ती लगेच त्या खोलीकडे वळली आणि रागाने विचारू लागली "काय चालाय अरे आपले दादा बेपत्ता आहे आणि तुम्ही इथे वाद घालता"?


हयावर सुभाष ने हळु आवाजात सांगितले "वाद नाही सुमन आम्ही बोलत होतो दादाच्या उमेदवारी बदल तुला काय वाटत मी मोठा म्हणून मलाच हि उमेदवारी मिळावी ना मी ह्यांना तेच सांगतो तर ह्यांना ते पटत नाही "


ह्यावर सुधांत म्हणाला "सुमन तुला तर माहित आहे मी प्रचारासाठी किती फिरायचो मग उमेदवारी मलाच नको का मिळायला "


सुबोध आणि सुशांत ने हि आपली बाजू मांडत "आम्ही पण कामे केली आहेत उगीच नाही सभा वेळेवर होत होत्या "


हे सगळं ऐकून सुमनला राग आला ती त्याच आवाजात म्हणाली "झालं तुमचं सगळ्याच दादाचे वारसदार म्हूणन तुम्ही पुढे आला आहात पण तुम्ही हे हि विसरलात कि दादाची एक मुलगी पण आहे "


"म्हणजे सुमन "?


"तुम्ही सगळेच उमेदवारी साठी दावे करत आहात तर मी का नको मी पण दादाची मुलगी आहे आणि समाजसेविका पण त्यामुळे दादाची खरे आदर्श मी पुढे नेत आहे त्यामुळे उमेदवारी तर मलाच मिळायला हवी "


"पण सुमन आम्ही भाऊ असताना तू "?


"का असे कुठेच लिहिले नाही कि भाऊ असताना बहिणीने वारसाहक्क न मागावा त्यामुळे हे विसरू नका "


सुमन च्या अश्या बोलण्याने सगळेच चक्रावले कारण समाज सेविका असल्याने राजकारण्यांशी तिची ओळख जास्त होती त्यामुळे उमेदवारी तिच्या गळाला अलगद लागणार होती 

एक राजकीय व्यक्ती अशी अचानकपणे बेपत्ता होते मोठा प्रश्न उभा राहिलेला पोलीस हि आपल्या परीने तपास करत होते पत्रकार तर काही बातमी मिळेल ह्या हेतूने दादाच्या घराजवळ घुटमळत होते राजकीय वर्तुळात हि चर्चे ची बाब बनली होती मयेकर कुटूंबाला हि दादाच्या बेपत्ता होण्याने चिंता होती त्यापेक्षा घरात उमेदवारी मुळे कलह निर्माण झाला होता 


दादाच्या पाच हि मुलानी आपल्या आपल्या परीने पक्ष श्रेष्टी ची गाठी भेटी वाढवल्या होत्या सगळ्यांनाच उमेदवारी हवी होती पण कोणा एकलाच मिळणार होती पक्षा साठी हि चिंता वेगळीच वाढत होती पण सीट साबूत ठेवण्यासाठी मयेकर कुटुंबातील कोणा एकालाच उमेदवारी देणे योग्य होती पण कोणाला हा मोठा प्रश्न सतावत होता 


हा तिडा सुटावा म्हणून मयेकर कुटूंब एकत्र येऊन चर्चे बसले खरे पण जो तो आपणच योग्य आहे ह्यावर कायम असल्याने चर्चे चा काहीही फायदा झाला नाही घरातली व्यक्ती बेपत्ता असून हि घरात उमेदवारी साठी रस्सीखेच चालू होती हे पाहून पोलिसाची संशयाची सुई मयेकर कुटूंबावर फिरकली सगळ्या व्यक्ती ची कसून चौकशी सुरु झाली 


उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत होती पण उमेदवार काही ठरत नव्हता विरोधकांचा प्रचार हि सुरु झाला होता ह्या संदर्भात सभा संपून पक्ष प्रमुख घरी परताना फोन वाजवला 


"हॅलो देशपांडे साहेब" 


"कोण बोलत "?


"मी घनश्याम मयेकर "


"दादा तुम्ही" 


"हो मी "


"पण तुम्ही आहात कुठे "?


"मी कुठे आहे ते सांगू शकत नाही "


"अहो पण तुमच्या नसण्याने इथे काय गोधंळ उडाला आहे ह्याची तुम्हला कल्पना हि नसेल "?


"मला माहित आहे माझ्या नसण्याने माझ्या घरातच उमेदवारी साठी रस्सीखेच चालू आहे ना "?


"तुम्हला हे माहित आहे मग आहात कुठे तुम्ही आणि निवडणूक जवळ आली आहे "


"मी सगळं भेटल्यावर सांगेन फक्त माझे एक काम करा मी तुम्हला संपर्क केला हे तुम्ही कोणालाच सांगून नका "आणि ऐका दादांनी देशपांडे ना काही गोष्ट सांगितली तसे देशपांडे हसत हसत म्हणाले "तुम्ही निसंकोच राहा मी कोणालाच काहीच सांगणार नाही तुम्हला हवे तसे होणार "


फोन ठेवल्यावर देशपांडेच्या चेहऱ्याचे भाव बदले काय असेल ती गोष्ट आणि कुठे असतील दादा ?

देशपांडे नि दादाचा फोन येताच दुसऱ्या दिवशी तातडीची बोलावली त्यात दादाची मुलं पण हजर होती 


"नमस्कार मी इथे तुम्हाला बोलवण्यात चे कारण तुम्हला सर्वाना माहित आहे दादा म्हणजे आपले घनश्याम मयेकर अचानक पणे बेपत्ता झाल्याने त्याच्या जागेवर कोणाला उमेदवारी दयावी हा तिडा अजून सुटत नाही आहे अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे आणि मयेकर कुटूंब तुमच्यातला कोणीच मागे येत नाही आहे त्यामुळे ह्यावेळी आम्ही असे ठरवले आहे कि उमेदवारी कोणी दुसऱ्याला दयावी जेणेकरून आमचा वेळ उगीच वाया जाणार नाही"


हे ऐकताच दादाची मुले एकाच सुरात म्हणाली

"अहो पण दादाचा गड आजपर्यत दादांनीच राखला आणि तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊन विषाची परीक्षा का पाहता "?


देशपांडे ह्यावर हसत हसत म्हणाले "दादा चा गड दादांनी आपल्या कार्यानी राखून ठेवला होता आणि तो पुढे तो मयेकराकडे असायला हवा तर तुमच्या चारपैकी कोणा एकलाच उमदेवारी मिळेल मग कोण तयार आहे मागे फिरायला सांगा मी आताच तुमच्या पैकी एकाची उमेदवारी घोषित करतो "


हे ऐकताच मात्र सगळे एकमेकांच्या तोंडावर पाहू लागले पण मागे सरण्यासाठी कोणीच तयार नव्हते हे पाहता देशपांडे पाच मिनिटे थांबले आणि खुर्चीवर उठून जात जात म्हणाले" मी ठरवलं आहे माझा उमदेवार आता भेटू उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी 


ह्या गोष्टीने दादाची मुलं आणखी बैचेन झाली आयती आमदारकी मिळणार होती ती आता कोणा परक्यच्या गळ्यात पडेल ?हि भीती हि त्याना जाणवत होती आजपर्यत हि आमदारकी फक्त दादाच्या नावे होती एकमेकांवर मागे न हटण्याच्या आरोप मात्र त्यांनी सुरु केला पण स्वतः मागे हटण्याचा पर्यंत मात्र कोणा कढून हि झाला नाही 


दादा नंतर कोण असेल नवीन उमदेवार ?हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्यांच्या नजरा नवीन उमेदवार शोधायला लागली 

नवीन उमेदवार कोण असेल ह्याची उत्सुकता सगळ्यांना होती मयेकर भावंडे मात्र नाराज होती कारण त्यांना उमेदवारी मिळणे अशक्य होत तरी पण त्यांनी आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवले होते पण देशपांडे नि त्यांना काहीही दुजोरा दिला नाही आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उजाडला सगळेच उत्सुक होते 


सकाळी देशपांडे तयार होऊन त्यांनी कोणाला तरी आवाज दिला आणि ती व्यक्ती देशपांडे च्या समोर आली त्या व्यक्तीला पाहत देशपांडे म्हणाले 


"चला निघूया उशीर होईल "


"तशी ती व्यक्ती हि हसत म्हणाली "


"हो "


आणि दोघेही गाडीत बसून निघाले वाटेत एका ठिकाणी गाडी थांबून एका व्यक्तीस गाडीत घेण्यात आले उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी अनेक पक्ष्याच्या कार्यकत्यांची गर्दी होती आणि देशपांडेच्या पार्टी चे कार्यकर्ते तर आपला उमेदवार पाहण्यासाठी उत्सुक होते गाडी येऊन थांबली तशी देशपांडे उतरले आणि त्या मागोमाग एक व्यक्ती उतरली त्या व्यक्तीला पाहतच सगळ्यांनी एकच जलोष केला पण त्या तिसऱ्या व्यक्तीला पाहून मात्र सगळेच आश्चर्य चकित झाले ते तिघेही आत अर्ज देण्यासाठी गेले आणि हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पत्रकार येऊन तिथे धडकले ते तिघेही बाहेर येताच अनेक प्रश्न त्यांना विचारण्यासाठी पत्रकार पुढे सरकवले तेव्हा देशपांडे पुढे आले आणि म्हणाले "दादा ना पाहून तुम्हा सर्वाना आश्चर्य झाले असेल पण दादा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील" आणि घनश्याम मयेकर नि पत्रकारांना पाहत म्हटले "मी कुठे होतो हे मी तुम्हला वेळ आल्या नंतर सांगेन पण आता एक महत्वाची घोषणा हि निवडणूक मी न लढता आपल्या मतदारसंघातला समाजसेवक आणि युवा आणि खरा नेता अमित सरपोदार माझ्या जागेवर निवडणूक लढेल आजपर्यत तो अपक्ष म्हणून लढत आला पण माझ्या अनुभवांनी नेहमी माझा विजय केला पण आता वेळ आली आहे खरे कर्तृत्व गाजवण्याची त्यामुळे मी तुम्हला सगळयांना विनंती करतो कि अमितला भरघोस मतांनी निवडून आणून दादा म्हूणन माझ्यावर जेवढे प्रेम केले तेवढे त्याच्यावर करा "


हे ऐकताच एका पत्रकार ने दादांना थेट विचारले "म्हणजे दादा तुमचा वारसदार म्हणून तुम्ही आपल्या घरातली व्यक्ती न आणता कोणा परक्याला का उभा करत आहेत "


"माझा उद्देश आणि कार्य अमितच पुढे नेऊ शकतो "असे म्हणून ते गाडीत बसून गेले दादा नि आपल्या कार्यकर्त्याची सभा घेऊन अमित ला पाठींबा दिला आणि त्याला जिकून आण्यासाठी आपण प्रचार करणार हे घोषित केले तशी हि बातमी वाऱ्यासारखी एव्हडी पसरली कि त्यात तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले 


दादा सापडले म्हणून पोलिसांनी सुस्कारा सोडला पण विचारपूस करण्यासाठी देशपांडे चे घर गाठले पण दादांनी आपल्याला कोणालाच भेटायचे नाही हे सांगितले पण पोलिसा खेरीस देशपांडे नि कोणालाच घरात घेतले नाही पोलिसानी दादाचे सगळे म्हणे ऐकून त्याची सुरक्षा वाढवली मयेकर कुटूंबीय त्याची मुलं उमेदवारी परक्या माणसाला दिली म्हणून अश्यर्यचकित झाली आणि नाराज झाली आणि त्या साठी त्यांना भेटण्यास उत्सुक होती पण दादा नि साफ नकार दिला पण देशपांडे ना विनवणी करून दादाची मुलगी सुमन त्याना भेटायला आली 


"दादा हे काय कुठे होता ?तुम्ही आणि आम्हला भेटण्यास नकार का देत होता ?आणि आपले एवढे मोठे घर असताना इथे का राहता? आणि त्या अमितला तुम्ही का दिली उमेदवारी ?पण पहिली चला आपण आपल्या घरी जाऊ मगच निवांत बोलू "


"मी कुठे होतो ह्यापेक्षा कोणाला उमेदवारी मिळेल हे तुमच्यासाठी महत्वाचं होत ना"?


"असं काय बोलता दादा अहो तुम्ही आम्हाला हवे आहात " 


"हो का म्हणून माझ्या मागे उमदेवारी साठी लढलात माझा खरा वारसदार बनण्याच्या दावा केलात ""


"दादा ते स्वाभाविक होते कारण सगळ्याकडे वेगवेगळी कारणे होती "


"हो ना होती म्हणून तर तुम्ही घरातच राजकारण सुरु केलं "


"दादा तसे नाही ते चार हि जण वाद घालत होते मग मला पण वाटलं कि मी पण तुमची मुलगी दादा आम्ही तुमची मुलं असताना परक्याला उमेदवारी देणे मनाला पटत नाही ""


"जाऊ दे सुमन मी माझा निर्णय घेऊन झालोय आणि परका कोण आणि आपले हे मला चोख कळले आहे त्यामुळे तू ये "


"पण दादा तुम्ही इथे किती दिवस राहणार आपल्या घरी चला "?


"ज्या घरात माझ्या जीवाला धोका आहे तिथं मी नाही राहू शकत "


"धोका म्हणजे कोणापासून "?


सांगीन सगळे सांगीन पण निवडणूक निकालांतर "


"म्हणजे त्या अमितकडे राहणार तुम्ही "?


"मला नाही माहित पण सांगेन तुम्हा सर्वाना भेटून सांगेन आता तू ये मला प्रचाराला जायचं आहे "


आणि दादा उठून गेले 


काय असेल घरात न राहण्याचं आणि कोणा दुसऱ्याला आपली जागा देण्याचे कारण?

दादा नि आपल्याला आपली उमेदवारी दिली हि गोष्ट अमित साठी मोठी होती अमित एक मध्मय वर्गीय कुटंबातील लोकांना मदत करणे हि त्याची जणू आवडच नोकरी करून आपल्या लोकांना लागलेली मदत तो करायचा गेली तीन वर्ष तो दादा म्हणजे घनश्याम मयेकर ह्याच्या विरोधात अपक्ष म्हणून लढत होता आणि त्याचा सामना हि चांगला रंगायचा दादा ना हि त्याचे अप्रूप वाटायचे दादा चे वय आणि अनुभव पाहत मात्र दादा च निवडून यायचे पण ह्यावेळी चित्र पालटणार होते कारण खुद्द दादा अमितचा प्रचार करणार होते म्हणजे त्याच्यासाठी सोने पे सुहागा होता 


दादा हि कसून लोकांपर्यत अमित ची बाजू पटवून देत होते हे पाहत अमित ला आपल्या विजयाची पताका नजरेस येत होती अश्याच एका संध्यकाळी प्रचार करून दादा खुर्चीवर बसले आणि अमित ने लगेच पाण्याचा ग्लास दादा समोर पुढे केला 


"अरे तू का आणलेस मी घेतले असते"


"नाही दादा तुम्ही माझ्यासाठी एव्हडं करता "


"काही करत नाही मी माझ्या प्रचाराला नसतो का फिरलो " 


"दादा तुम्ही मला तुमची उमेदवारी दिली हीच मोठी आहे "


"मी दिली नाही तू ती कमवलीस आहे आणि हो उपकाराच्या गोष्टी करू नकोस "


"दादा एक विचारू "?


"विचार ना "?


"दादा तुम्ही तुमच्या पाच मुलां पैकी एकाला उमेदवारी न देता मला का दिली "


"माझी मर्जी कारण तू खरा नेता आहेस आणि खरा नेता विजयी होणार "


दादाचा अमितसाठी चाललेला प्रचार पाहून दादाची मुले खूपच राग राग करत होती पण त्या खेरीस ती काहीस करू शकत नव्हती मतदानाचा दिवस उजाडला अमित ने दादाचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्यकर्ते आणि दादांसह मतदारकेंद्रावर पोहोचला 


मत घालण्यासाठी मयेकर कुटूंबीय आप आपल्या गाडीने येत होती जो तो दादांशी बोलण्याचा प्रयन्त करत होती पण दादां सगळ्याची नजर चुकवत होते दादा अमित मागे ठाम पणे उभे पाहून मयेकर भावंडांचा जलपाळट होत होता त्यांना एकच चिंता सतावत होती आज अमितला उमेदवारी दिली उद्या त्याला संपत्तीला हिस्सा दिला तर ?


मतदान चोख पार पाडून अमित दादांसह घरी परतला आता उत्सुकता होती निकालाची ?

घनश्याम मयेकर तसे पक्के राजकारणी त्यांनी अमितला आपली स्वखुशीने उमेदवारी दिली हीच गोष्ट राजकीय वर्तुळात खळबळ उडवत होती काहींनी तर त्याचे काही नाते असतील असे तर्कवितर्क लावले होते आणी असे दिवस जात होते आणी निकालाचा दिवस उजाडला अमित दादा आणी देशपांडे सगळेच जण निकालाच्या ठिकाणी पोहचले एक एक करून निकाल जाहीर होत होता तसे कार्यकर्ते ही जल्लोष करत होते


मयेकर भावंडे तर अमित चा पराभव व्हावा ह्यासाठी त्यांच्या विरोधात आपल्या वडिलांना फितुर करून संपती बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे असा प्रचार सुरू केला होता पण दादांनी तो पलटून लावला


एक एक करून दुपारपर्यंत सगळे निकाल जाहीर झाले आणी जे व्हायचं तेच झाले अमित भरघोस मतांनी विजयी झाला आणी सगळ्यांनी एकच जल्लोष केला अमित ने पहिले दादांचे आशीर्वाद घेतले आणी सगळ्यांचे आभार मानले विजयी मिरवणूकीसाठी गाडी सज्ज होती तसे अमित सह दादा आणी देशपांडे ही गाडीवर विराजमान होऊन विजयी मिरवणुकीत सहभागी झाले इथे मयेकर भावंडे मात्र नाखुश झाली विजय मिरवणूक संपवून अमित आपल्या घरी जाण्यास निघाला तेवढ्यात दादांनी त्याला बोलावले


"अमित उशीर होत नसेल तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे"


"नाही दादा बोला"


"अमित आजपासून हा मतदारसंघ तुझा मी जसा जपला तसा तु जपशील ही मला खात्री आहे तरी ही तुला सांगावेसे वाटले"


"दादा तुम्ही काहिच चिंता करू नका तुम्ही दिलेली जबाबदारी मी चोख पार पाडीन आणी चुकलो तर हक्काने माझे कान धरा"


ह्यावर हसत हसत दादा म्हणाले "ते करायला मी नसणार आणी मला माहित आहे तशी वेळ ही येणार नाही"


"दादा धन्यवाद तुमच्या विश्वासासाठी पण नसणार म्हणजे तुम्ही कुठे जात आहात"?


"मी उद्याच निघणार म्हणून तर आज तुझ्याशी बोलायचे ठरवले"


"पण दादा कुठे जाणार तुम्ही"?


दादांनी अमितला सर्व सांगितले हे ऐकून


"नाही दादा तुम्ही कुठे ही जाणार नाही पाहिजे तुम्ही माझ्यासोबत रहा"


"नाही अमीत ह्या सगळ्यातून मला शांतता हवी आहे"


"पण दादा"


"अमित तु कणखर आहेस त्यामुळे तु हे आव्हान चांगल्याप्रकारे उचलशील"


"चल आता निघ खुप उशीर झाला"


"दादा पण तुम्हाला भेटायचे असेल तर"?


"नाही अमित मी ह्या नंतर कोणालाच भेटणार नाही"


"पण दादा"


"अमित मला भेटावेसे वाटले तर मी भेटींन"


अमित ने दादा ना कडकडून मिठी मारली दादा हि भावुक झाले 


"चल वेड्या रडवशील मला निघ आता" असे म्हणतच अमित तिथून निघून गेला 


आणि दादा आपल्या रूम मध्ये आले पाठोपाठ देशपांडे हि आले देशपांडे नि दादांना खूप समजवले पण आपण जाणार हे नक्की सांगून ते झोपी गेले आणि आपल्या घरी एक निरोप पाठवला 


"काय असेल तो निरोप "?

सकाळ उजाडली दादांनी आपली बॅग भरून ठेवली होती गाडी हि सांगण्यात आली होती देशपांडे हि दादाच्या जाण्याने भावुक झाले होते देशपांडेच्या निरोप घेऊन गाडी मयेकर सदन वर येऊन थांबली आणि दादा गाडीतून उतरले आणि सरळ आत गेले तर त्याचे कुटूंबीय निरोप मिळाल्याने त्याची वाट पाहत होते ते सरळ आपल्या खुर्चीवर जाऊन बसले आणि त्यांनी सगळ्याकडे पहिले नि बोलण्यास सुरवात केली 


"आज मी तुम्हा सर्वाना शेवटचे भेटण्यास आलो आहे "


"म्हणजे दादा "?


"मला माहित आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात मी माझी मुलं असताना अमितला उमेदवारी दिली हि तुम्हाला पटलेली नाही मी एवढे दिवस कुठे होतो आणि घरी का आलो नाही हे एकदा मला तुम्हला जायच्या अगोदर सांगायच आहे माझी पाच मूल आणि माझं कुटुंब माझ्या शब्दाबाहेर नसणारे आणि माझा हुकूम नेहमी पाळणारे माझे पुत्र हा माझा अभिमान होता पण रंगपंचमी दिवशी घडलं ते पाहून मला इथून जाणेच योग्य वाटले गौरव माझा आवडता नातू पण त्या दिवशी त्याच्या मित्राबरोबर त्याचे झालेले बोलणे ऐकले आणि ....


"गौरव अरे यार तू कधी आमदार होणार "?


"अरे काय करू आमचे आजोबा आपली खुर्ची मुलांना देत नाही आहेत ते मला कुठले आणि मला आमच्या व्यवसायात काहीच इन्टेरेस्ट नाही "


"हो रे तुझे आजोबा खूप खडूस आहेत ना "


"हो रे त्याच्यापुढ्यात कोणाची बोलायची हिम्मत नाही होत नेहमी दरारा कधी एकदा वाटत हा दरारा एकदाचा संपून टाकावा "


"बस हे ऐकलं आणि वाटलं तिथेच जाऊन दोन मुस्काटात द्यावी पण मनात एक विचार आला तरुण रक्त रागाच्या भरात काही झाले तर आणि एक फोन ज्या फोन ने मला जाणवू दिले कि माझी अनुपस्थति कुटंबासाठी किती फायदेशीर आहे आणि ती सगळ्यांना हवी आहे तेव्हा वाटलं माझं कुटूंबच हेच आहे ना? आणि जीवाच्या भीतीने मी घर सोडण्याचा निर्णय घेतला मी घरातून छुपे मार्गातून बाहेर गेलो कधीही न परतण्यासाठी पण तुमच्यात चाललेली उमेदवारी ची रसीखेच पाहून माझी सत्तेची आस मला जगू देत नव्हती तेव्हाच मी ठरवलं उमेदवारी तुम्हा कोणालाच मिळता कामा नये "


"वाह दादा वाह ह्या वयात हि तुम्हला सत्ता हवी होती म्हणून स्वतःच्याच मुलांना डावलून परक्याला आपलंस केलंत "


"ते सोड सुधांत छुपा मार्ग हे हि आपल्या साठी नवेच आहे "


"हो छुपा,मार्ग जो फक्त तुमच्या आईला वसू लाच माहित होता तुम्ही सगळे लहान असताना काही राजकीय घडामोडी अश्या घडायच्या त्यामुळे मला तो मार्ग बनवावा लागला ज्याच्या मार्ग आमच्या कपाटातून होतो तो सरळ आपल्या मागच्या रस्त्याशी मिळतो त्यामुळे इथून गेलो तर कोणीच पाहू नाही शकत मी इथून गेलो आणि माझ्या मागे उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही सगळेच एकमेकांवर तुटून पडलात तेव्हा जाणवले माझे असणे फक्त एक दरारा होता माझे असणे नसणे तुम्हला काहीच फरक देणारे नाही तेव्हाच ठरवले ह्यातून बाहेर पडावे कायमचे आणि हो मी तेच सांगण्यासाठी इथे आलो आहे तुमचा माझ्या वर राग असेल मी तुम्हला उमेदवारी नाही दिली म्हणून पण तुम्ही लहान असतानाच तुमच्या आईने माझ्याकडून वचन घेतलेलं कि मी तुम्हाला राजकारणात कधीही आणणार नाही आणि तिचा मी शब्द पाळला हे पेपर पाच हि मुलाच्या समान संपत्ती वाटून दिली आहे आता ती कशी सांभाळ्याची हि तुमची जबाबदारी आजपासून मी एका आश्रम राहायला जाणार आहे स्वतःला ह्या मोह माये पासून दूर शांततेत माझे उरलेले जीवन जगणार आज तुम्ही जे वागलात त्याला मी हि तेव्हडाच जबाबदार आहे "


"पण दादा आम्ही तुम्हला असे नाही जाऊ देणार "


"नाही उगीच खोटे वागणे नको संपला माझा दरारा कोणीही मला नका थांबवू आणि मुळात थांबवण्याची इच्छा हि नसेल तुम्हला तुमची आई खरेच म्हणायची राजकारणात दरारा पुरे घरात नको पण मी ते समीकरण समजलो नाही आणि तुमच्याशी नेहमी दराऱ्यात वागलो आणि आणि माझी कमी जाणवली तेव्हा तुम्ही सगळे आपली मते मांडू लागले जाऊ दे मी इथून माझे थोडे सामान नेतो आणि माझी एक महत्वाची गोष्ट "


"दादा पण आम्हला तुम्हला भेटायचं असेल तर पत्ता "


"नाही मला कोणाशी हि भेटायचं नाही आहे असे म्हणून दादांनी नोकर बंडू ला हाक दिली 


"बंडू माझ्या खोलीतले माझे काही सामान गाडीत ठेव आणि ते आपल्या खोलीकडे वळले "


काय असेल ती महत्वाची गोष्ट ?

दादा मागोमाग आणि बंडू हि खोलीत आला दादांनी बंडू ला सांगितले तसे सामान बंडू गाडीत ठेवण्यासाठी गेला सामान काही मोठे नव्हते त्याची पुस्तके जी नेहमी त्याच्या जवळ होती 

दादा आपल्या पत्नीच्या फोटो कडे आले आणि डोळ्यातले पाणी पुसत म्हणाले" वसू आज हे घर मी कायमच सोडून जात आहे एव्हडी वर्ष माझा गाजावाजा होता पण तो आता नसणार आहे तू मला नेहमी सांगायची कि राजकारण आणि घरात अंतर ठेवा पण मी ते काही कधीच ऐकलं नाही मुलाना नेहमी माझ्या हुकूमावर ठेवले म्हूणन ते माझ्यापेक्षा तुझ्याशी जास्त जवळ होते ते बोलत होते पण भीती ने हे मला आता जाणवले खरं तर मी काही वर्षांपूर्वीच राजकारण सोडायला हवे होते पण सत्ता आणि त्याची आस मला पायउतार होण्यास रोखत होती एवढे दिवस मला माझी मुलं माझा आदराने हुकूम पाळतात असे वाटत होते पण नाही रंगपंचमी दिवशी असा हि रंग दिसेल अशी अपेक्षा नव्हती पण झालं ते बरेच झाले माझे डोळे उघडले मन जिकूंन जे करायचं होत ते मी मनावर हुकूम गाजवून केले कुटूंब त्यातला आपलेपणा मी कधी जाणवलाच नाही दरवर्षी रंगपंचमी चा उत्सव ती हि एक राजकीय खेळीचं होती


आज सर्वाना आपल्या छुप्या मार्गाबद्दल कळले तो ही मी तेव्हा माझ्या फायद्यासाठी केला होता तेव्हाच तु मला राजकारण सोड म्हणून सांगत होतीस पण मी काही ऐकले नाही पण आज एवढा अनुभवी राजकारणी एवढे नाव असुनही आज मला एकटे वाटते आज तुझ्या सोबतीची गरज जाणवते पण तु माझ्याबरोबर नाही आहेस पण मी घेतलेला निर्णय तुला योग्य वाटला‌ असेल पण माझ्यासोबत मी माझी महत्वाची गोष्ट नेण्यासाठी इथे आलो आहे ते म्हणजे तुझा फोटो जो मला नेहमी माझ्या एकांतात सोबत देईल "असे म्हणुन आपल्या पत्नीचा फोटो उराशी धरून खोली बाहेर पडले


त्याचे कुटुंबीय ही दादांच्या बदलाने भावुक झाले होते आज त्यांना हे बदलेले दादा हवे होते पण हे नियतीस ते मान्य नव्हते

दादांचे डोळे डबडबले त्यांनी कोणालाच न पाहाता सरळ बाहेरचा रस्ता पकडला आणि गाडीत बसून गाडी गेट बाहेर निघून गेली आज आपल्या सत्तेचा राजा असणारा व्यक्ती मात्र कुटूंबास परका झाला

*********समाप्त ******************


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy