Jyoti gosavi

Abstract

5.0  

Jyoti gosavi

Abstract

आठवणी

आठवणी

2 mins
1.2K


जुने फोटोंचे अल्बम पाहताना मन देखील त्यांच्याबरोबर भूतकाळात जाते. मनाच्या वारुळातून आठवणीच्या मुंग्या धावत बाहेर येतात. काही फोटो जुन्या काळातले अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले. काही फोटो सत्तावीस वर्षापूर्वीचे माझ्या लग्नातले, काही फोटो कॉलेज, ट्रेनिंग ,त्या काळातले.


काळाच्या पडद्याआड गेलेली कितीतरी माणसे पुन्हा दिसली. त्यात माझे आई-वडील, सासुबाई होत्या. अरे! माझ्या लग्नात आई अशी दिसत होती? सासूबाईंनी ही साडी घातली होती? माझा शालू असा होता? मी अशी दिसत होते? असे कितीतरी प्रश्न मनातल्या मनात पडले. त्याहीपेक्षा मागच्या काळात आईच्या काखेत असणारा माझा फोटो, त्यानंतर एकदम दहावीसाठी परीक्षा सेंटरच्या रिसीट वरती लागणारा फोटो, मग ट्रेनिंग मधले फोटो, कॅपिंग सेरेमनी, या माझ्या मैत्रिणी, हा मला आवडलेला मुलगा वगैरे वगैरे आठवणी मनात भिरभिरून गेल्या.

 

त्यानंतर हे आपण दोघं लोणावळ्याला गेलो होतो हनीमून साठी. हातामध्ये हात घालून अगदी तिथल्या रेल्वे ट्रॅक मधून, बोगद्यातून देखील फिरलो .भुशी डॅमला गेलो, एकविरा देवीला गेलो. या अशा कितीतरी आठवणी. मग गर्भारपण, डोहाळ जेवण, आठंगुळ सासरच्यांनी केलेले कौतुक मग ते अवघड बाळंतपण, मुलांचे आंघोळ घालताना चे फोटो, पहिल्या वाढदिवसाचे फोटो, चालायला लागल्यावर, रांगायला लागल्यावर, असे कितीतरी फोटोच फोटो हे मुलांच्या मुंजीतले फोटो त्यावेळी मी किती आजारी होते. अगदी चेहऱ्यावर आता पण ते आजार पण दिसते. बापरे! कसाबसा तो कार्यक्रम पार पाडला. नंतर नवीन घर घेतलं हे घराच्या वास्तुशांती चे फोटो. कोण कोण आलं होतं त्या वेळी ?  मी ही अपूर्वा सिल्क घेतली होती. किती छान दिसत होती. साडी पण एका धुण्यातच खराब झाले ही आठवण पण जागी झाली.


 हा फोटो मला वक्तृत्वात मिळालेल्या ट्रॉफीचा, हा फोटो मला काव्य मंडळात मिळालेल्या सर्टिफिकेटचा, ही अशी रांगोळी दिवाळीत काढली होती. असा किल्ला केला होता. हा लक्ष्मीपूजनानंतर काढलेला फॅमिली फोटो किती वेगळे होतो नाही. मग मुले हळूहळू मोठी होतात आपल्यापासून सुटी होतात. त्यांना सोडून आपण दोघं राजा राणी पुन्हा नवीन नवीन फिरायला लागतो. पुन्हा एकदा सेकंड हनीमूनला जातो. शिमला, कुलू, मनाली किती मस्त बर्फ होतं त्यावेळी दहा वर्षापूर्वीचे जीन्स पॅन्ट मला अजुनही बसत होती. वाव मी मस्त फिगर मेंटेन केली होती. नंतर मुलं अजून मोठी झाली. मग आम्ही चारधाम यात्रा केली. हे त्याचे फोटो, आत्याबरोबर काशी यात्रा केली आत्याला पण घेऊन गेलो होतो.


आत्या म्हणजे मुलांची आत्या. हे माझ्यासोबत चे कलिग. मग हळूहळू बऱ्याच ठिकाणी फिरायला लागलो डिजिटल युग आलं. हातामध्ये डिजिटल कॅमेरे, मोबाइल आले आता फोटो त्यामध्ये काढले जाऊ लागले. कॉम्प्युटर नाहीतर त्या टीव्ही ला जोडून बघू लागलो. हातातच कॅमेरा, मोबाईल असल्यामुळे प्रत्येक सिच्युएशनचे फोटोच फोटो. सेल्फी युग सुरू झालं. हजारोने फोटों मोबाईलमध्ये पडलेत. पण त्यात मजा नाही. आपण ते धुवत पण नाही आणि अल्बम पण बनवत नाही. जी मजा फोटो कसा आलाय याबद्दलची क्यूरासिटी तेव्हा होती ती आता उरली नाही. आता अतिपरिचयात अवज्ञा झालेले आहे. त्या फोटोचे महत्त्व राहिले नाही पूर्वीच्या प्रत्येक जुन्या फोटो भोवती एक आठवण एक कहाणी गुंफलेली असायची. कालाय तस्मै नमः


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract