Ajay Nannar

Abstract

4.0  

Ajay Nannar

Abstract

आज काही तुफानी करू या

आज काही तुफानी करू या

2 mins
295


Mumbai येथुन Nashik जाण्यासाठी रेल्वे निघते. Nashik पोचते तेंव्हा रात्रीचे सुमारे 01:00 वाजलेले असतात.

सर्व प्रवासी आपापल्या घरी जातात पण तिथे एक देखनी आणि सुंदर अवघ्या 21 वर्षाची तरुणी एकटीच उभी असते. बहुदा तिला न्यायला कोणी येत असेल म्हणुन ती थांबलेली असावी.

एक तास उलटुन जातो पण कुणिच येत नाही. ती phone try करते पण ते ही निष्फळ. आजुबाजुला रिक्षा बघते

पण ते ही उपलब्ध नसते. मग ती तरुणी रात्रीच्या 02:30 ला एकटीच रेल्वे स्टेशन मधुन एकटीच पायाने घाबरत-घाबरत घराकडे निघते.

रात्रीचे सुमारे 03:00 वाजलेले असतात. ती तरुणी ब्याग हातात घेउन घाबरत-घाबरत चालत असते.

तितक्यात तिला रस्त्याच्या एका वळणावर 5-7 तरुण मुले उभे असलेले तिला दिसतात. अचानक ती थांबते व घाबरुन विचार करु लागते की या तरुणानी जर आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर यांच्या तावडीतुन वाचवणारं कुणीच नाही...!!

ती तरुणी स्वत:लाच धीर देत-देत पुढे जात असते. तितक्यात त्या तरुणांची नजर त्या मुलीवर पडते. ती मुलगी सुद्धा त्यांच्याकडे बघते. ती आणखीनच घाबरते...

त्या तरुनाना कळुन चुकते की ही मुलगी फार घाबरलेली आहे. तितक्यात एक तरुण तिला आवाज देतो...

सगळीकडे भयान शांतता, निर्मणुष्य रस्ता रात्रीचे सुमारे 03:15 वाजलेले असतात एक सुंदर आणि देखणी अवघ्या 21 वर्षाची युवती एकटीच रस्त्याने जाते तेंव्हा तिला ऐन पंचवीशीतले तरुण आवाज देतात, तेंव्हा त्या तरुणीचे हात-पाय थंडे पडुन थर-थर कापत असतात.

त्यातीलच एका तरुणाने पुन्हा आवाज दिला आणि म्हटला,

"ताई, घाबरु नकोस हि गांधीची Dilli नसुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा Maharashtra आहे. इथे महीलांचा आदर केला जातो अनादर नाही, मग ती महीला कोणत्याही समाजाची असो. बिनधास्त होऊन घरी जा, तुझ्या शरिरालाच काय केसाला सुद्धा धक्का लागणार नाही....."

ती तरुण मुलगी सुटकेचा निश्वास टाकते व त्यांच्याकडे बघुन स्मित हास्य करते आणि मनातल्या मनात शिवाजी महाराजांना प्रणाम करून निघुन जाते.....!!! सारे जग उगाच नाव घेत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract