आधुनिक तंत्रज्ञान
आधुनिक तंत्रज्ञान


आधुनिक तंत्रज्ञान - लहान मुलां-मुलींसाठी योग्य नाही.
आजच्या जगात लहान मुला मुलींकरिता तंत्रज्ञान चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा त्या वस्तूंना सुरक्षित ठेवून काही वर्ष
मोठे होत पर्यंत दूर ठेवू शकता.आधुनिक तंत्रज्ञानात फक्त स्मार्टफोन, मोबाइल, लैपटॉप याच वस्तु येत नाहीत इथे हजारों वस्तुचा भरना आहे.विज्ञानाच्या प्रगतीला कोणीच थांबवू शकत नाही .वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून आजचे प्रगतीशील तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे याचा सन्मानच झाला पाहिजे. लहान मुलांच्या नावाखाली तंत्रज्ञानाला बदनाम करू नये ही गोष्ट फारशी खरी वाटत नाही.
स्मार्ट मोबाइलसुद्धा अनुपयोगी वस्तू नाही यात सारे जग सामावलेलं आहे हो तुम्ही फक्त तुमच्या लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावं किंवा त्यांना हौस म्हणून ती वस्तू घेऊन देऊ नये आईवडीलच लहान मुलांची हौस पुरवितात नाही त्या वस्तू घेऊन देतात त्यामुळे मुलांना तशी सवय झालेली असते.ती मूले त्या वस्तुच्या आहारी जातात. प्रत्येक वस्तू आपल्याला मिळतच असते ही भावना ठेवून आजचे लहान मुले वागत असतात. सहा महिन्याच्या बाळापासून तर सोळा वर्षाच्या बालकापर्यंत अनुबंध ठेवने गरजेचे आहे. परंतू या सर्व गोष्टी फक्त आई-वडीलच करू शकतात दुसरं कुणीही करू शकत नाही. आधी आपणच त्यांना लाडाने प्रत्येक वस्तूचा पुरवठा करीत असतो जेव्हा डोक्यावरून पाणी जाते तेव्हा कारणीभूत यंत्राला ठरवितो .
मोबाइल सारखा यंंत्र विकसित तंत्र मोठे झाल्यावरच हाताळण्याची मुभा दिली पाहिजे. मी स्वत: बघितले चोरून लपवून मोबाइल शाळेत आणतात. मधल्या सुट्टीत दोन ते तीन मुले वीडियो गेम्स, टिक टॉक,अश्लील फोटो, चित्रपट बघतात.आई वडिलांचे मोबाइल फोन लपून वापरतात.
तसेच आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख बुद्धी घेऊन जन्माला आलेली आहे ज्या गोष्टी मोठ्यांना समजत नाही त्या गोष्टी लहान मुलांना समजतात कित्तेक आई-वडील अशी आहेत की ती मुलांकडून मोबाईल ज्ञान समजून घेतात किंवा लॅपटॉप वर कार्य कसे करायचे ते समजून घेतात त्यापासून फायदेच फायदे आहे या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक वस्तू तंत्रज्ञानातच मोडत असते. पहिली पायरी ओलांडत नाही तोच विज्ञानाशी किंवा तंत्रज्ञानाशी संबंध येतो. मुळातच जगाचा आधारच तंत्रज्ञान आहे हे लक्षात असू द्यावे. तंत्रज्ञान कुठे नाही ते आपल्या किचन पासून तर गार्डन पर्यंत प्रत्येक वस्तूतच आहे कोणतीही वस्तू आपल्या हातात घेतली की ती तंत्रज्ञानापासूनच बनलेली आहे. एवढं लक्षात असू द्या.
किचन मध्ये प्रत्येक वस्तू तंत्रज्ञान आहे आपण साधा गॅस सुरू करतो ते तंत्रज्ञान आहे विज्ञानाचा आविष्कार आहे गॅस सुरू करून भांड्यात तेल टाकून जेव्हा त्यात मोहरी टाकतो आणि ती तडतड आवाज करते त्यातही तंत्रज्ञान आहे किचन मध्येच मिक्सर आहे ग्राइंडर आहे मायक्रोवेव आहे इतर खूप वस्तू आहेत त्या विज्ञानाच्या आविष्काराने तंत्रज्ञानातच मोडतात. इलेक्ट्रिक सिटी प्रत्येकच गोष्टीत आवश्यक आहे जर एक तास अर्धा तास लाईट नसली तर आपली अनेक कामे खोळंबली जात असतात.
आपण लहान मुलांना कोणत्याही तंत्रज्ञानापासून दूर ठेवू शकत नाही. पूर्ण जगात तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. बाहेर पाय ठेवला की घरात पाय ठेवला की तंत्रज्ञानाशी सामना होतो मुलांच्या भविष्याकरिता या सर्व वस्तु अती आवश्यक आहे. त्यामुळेच मुले प्रगती करतात. एखाद्या खेळण्याच बघा खेळणा हातात घेतलं की काही मुलं खेळतात काही मुले त्याला तोडून त्याचे कलपुर्जे वेगळे काढून बघतात त्याचे पूर्ण हिस्से काढून बघतात की हे कसे तयार केले आहे आणि कशा प्रकारे हे यंत्र संचालित होत असते त्या वस्तुची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय लहान मुलांचे समाधान होत नाही.
नविन तंत्रज्ञानापासून नवप्रयोग करुण सांस्कृतिक कार्यक्रमात बालकांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच त्याचा लाभ घेवू शकतात. छोट्या मोठ्या कार्यक्रमातूनच मोठमोठे कलाकार घढलेले आहेत. त्यांनी आपले राज्य तंत्रज्ञानाच्या जोरावरच जनामनात स्थापिले आहे. काही कलाकारांनी उंच भरारी घेवून शिखरे गाठली आहेत. कोणत्या गोष्टिवर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे हेही सांगितले पाहिजे. यावर सुद्धा विचारमंथन करणे आवश्यक असते.या सर्व गोष्टी तंत्रज्ञानातच येतात.
तसेच यावरसुद्धा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गायन, वादन, पारंपारिक नृत्य, वेशभूषा या गोष्टींना नवीन शोध लावून संस्कृती संवर्धन योजनेत सहभागी झाले पाहिजे, इमाने एतबारे नि:पक्षपातीपणे कलाक्षेत्राला समृद्ध केले पाहिजे. आत्मविश्वास जागवला पाहिजे. जेणेकरून कलाविष्काराला स्फुरण चढेल. जर आपण या गोष्टींना प्राधान्य दिले तर खरच लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. स्टेज डेअरिंग येवून उद्याचा महान नेता,नट-नटी,अभिनेता ,व्याख्याता घडू शकतो. म्हणून संस्कृतीक, लोककला, या सर्वांच उगम सांस्कृतिक कार्यक्रमातूनच होत असतं. मुलांना, मोठ्यांना प्रेरणादाई व स्फुर्ती देणारे असते.यात विशेष भर घालून तंत्रज्ञानाचे घटनाकार आहोत. असे म्हणता येईल.
काही मुलांची खूप बारीक सूक्ष्म दृष्टी व बुद्धि असते जर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आपण वाट दाखवली तर ते तंत्रज्ञानात मोठे अविष्कार करू शकतात . या सायन्सच्या जमान्यात विमाने,गाड्या,बसेस,रेल्वे सर्व तंत्रज्ञानात मोडत असते पावलोपावली तंत्रज्ञानाचा सामना होतो आपण आपल्या मुलांना मोठे झाल्यानंतर शिक्षण शिकण्यासाठी शाळेत पाठवीत असतो तेंव्हा शाळेमध्ये तंत्रज्ञानाचा पूरेपुर वापर केलेला असतो.टेबल-खुर्च्या ,चटया,फळा,खडू ,पेन पेंसिल,वहां पुस्तकें, या सर्व वस्तु तंत्रज्ञानाने बनलेल्या असतात जर का तुम्हाला मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचे असेल तर त्याला ना शिकवलेले बरे.परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या,जी नीरक्षर होती त्यांनीपन तंत्रज्ञानाचा आधार घेतला होता.जेव्हा मानव पहिल्यांदा सृष्टिवर आले तेव्हा त्यांनी देखिल निरनिराळे शोध लावून आग पेटविण्याचा अविष्कार केला होता.दगड़ावर दगड़ घासून त्यांनी आग चेतावली होती.
कॉलेजात गेल्यानंतर तिथे कुणी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, क्लासवन ऑफिसर , शिक्षक, प्रोफ़ेसर, किंवा इतर बनतात आधी लहानपणापासूनच ते तंत्रज्ञान हाताळत असतात तेच मुले हमखास यशस्वी होतात.धरून बांधून झालेले विद्यार्थी मागे पडतात. तेव्हां आई वडीलांनी समजून घ्यायला पाहिजे की मुलांची दिशा चुकलेली आहे. डोळस अवलोकन केल्यास आपणास दिसून येईल की "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" पण आजकाल ते कोणी बघत नाही जर बघितलं तर तुमच्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी मोठी प्रथित यश देवून जाईल आणि साऱ्यां परिवारचे जीवन सार्थक होईल.
प्रत्येक वस्तुमधे तंत्रज्ञान लपलेले आहे. तयार करायला मशीनचा उपयोग केला जातो तेव्हाच त्याला आकार-उकार देण्यात येते,साधी पायात घातलेली चप्पल सुद्धा तंत्रज्ञानाने तयार केलेली असते.असल्या अनेक वस्तू आहेत की त्या घरातच असून त्या फार उपयोगी असून त्या तंत्रज्ञानातच मोडतात. त्याचा फायदाच होतो नुकसानाची फार कमी शक्यता असते. साध्या हातातल्या बांगड्या, दागिने,अंगावरचे कपडे नवनवीन प्रकारचे डिजाइंस तयार करून मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळाली आहे.हे सर्व तंत्रज्ञानाच्या बळावर जीवनात तामझाम दिसतो आहे.
बाथरूम मध्ये अनेक वस्तू गिझर,नळ ,वाशिंग मशीन, कमोड, बाथटब इत्यादि वस्तु हमखास असतात. पुढेही नवनवीन शोध लावून तंत्रज्ञानात भर घालण्याचा अट्टाहास मोठ्या प्रमाणावर होतो आहे.
इत्यादी अनेक वस्तू गार्डनींग केल्यास तिथेही प्रत्येक वस्तू लागतात फांद्या वृक्ष तोडण्यासाठी किंवा आकार देण्यासाठी खत निर्मिती, बी-बियाने, नव नवीन भाज्या, वृक्षवेली, तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. आधी त्यावर संशोधन करतात, माती, पाणी, खताचे प्रमाण घेवूनच व्यवस्थित रोपन करतात. या सर्व गोष्टी करण्याकरीता तंत्रज्ञानाचीच गरज आहे.
प्राकृतिक वस्तूच्या भरोशावर आज जीवन जगू शकत नाही. जेवण तयार करायचं आहे तेंव्हा चक्की वरून गहू दळून येईल तेव्हाच आपण पोळ्या करू शकतो. पोळ्या सुद्धा लाटाव्या लागतात त्यामागेही तंत्रज्ञान आलं आपण जेव्हा जेवण करीत असतो तेव्हा आपल्याला खाण्यासाठी पूर्ण दाताचा वापर करावा लागतो त्यांना चावून-चावून खाणे तसेच आपल्या लिव्हर, जठराग्नी प्रवेश केल्यावर ते आपले पूर्ण शरीर त्या कामात व्यस्त असतं ते ही तंत्रज्ञानातच मोडतं तंत्रज्ञानाच्या विरोधात ओरड करणे चुकीचे आहे. पावलोपावली विज्ञानापासून विकसित झालेल्या वस्तु तंत्रज्ञानातच मोडतात.
साधे उदाहरण आहे ,आपण कोणतं गाणं सुद्धा विना तंत्रज्ञानाचा ऐकू शकत नाही.रेडिओ,टीव्ही,कम्प्युटर,होम थिएटर सर्व तंत्रज्ञानात बसतात.घरही बांधायचे असले तर तिथे सीमेंट, विटा, लोखंड, गिट्टी विना तंत्रज्ञान तयार केलेल्या नसतात त्यासुद्धा तंत्रज्ञानानेच बनवलेल्या वस्तू आहे. तसेच सर्वच वस्तूचा पुरेपूर आपण फायदा घेतो म्हणजेच तंत्रज्ञानाचा आपण फायदा घेत असतो. अशी कोणतीच वस्तू दिसत नाही. साधी भाजी चिरायला सुद्धा आपल्याला कटर,पावशी किंवा चाकू लागतो त्या वस्तू सुद्धा तंत्रज्ञाना पासूनच बनलेल्या आहेत.
तुम्ही लहान मुलांना कसं काय त्यापासून दूर ठेवू शकता आपल्या अंगाअंगात कनाकनात तंत्रज्ञान भरलेला आहे. पाताळापासून तर आकाशापर्यंत तंत्रज्ञानाची झेप गेलेली आहे ग्रहावर सुद्धा जाऊन पोहोचलेलो आहोत ब्रह्मांडतल्या अनेक ग्रह आपल्याला आकर्षित करतात. त्या पण तंत्रज्ञानाने विज्ञान दृष्ट्या पाहिल्यास ती आपआपली काम करतात सूर्यापासून आपणास ऊर्जा मिळते म्हणजेच ऊर्जेशिवाय आपलं शरीर निकामी असतं चंद्रापासून आपल्याला शांती शितलता मिळते अंधारात उजेड मिळतो आपल्या शरीराला शांत शीतलतेची,झोपेची आवश्यकता आहे आपले हे शरीर पंचधातू पासूनच बनलेले आहे त्यामुळे आपल्याला सगळ्या वस्तू आपले स्वस्थासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे जर तब्येत बिघडली तर गोळ्या इंजेक्शन औषध औषधोपचार करावे लागतात त्या सर्व वस्तू गोष्टी तंत्रज्ञाना पासूनच बनलेल्या असतात.
असे काहीच नाही जगात की जे तंत्रज्ञानापासून दूर आहे जंगलात राहणारे आदिवासी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करीत असतात चुली मध्ये आग लावण्यापेक्षा पासून तर अस्त्र-शस्त्र,अवजारे सर्व कोणीतरी बनवूनच घेतलेले असतात. कोणतेच कार्य किंवा जडणघडण आपसूक होत नाही त्याला चलायमान करावे लागते त्यालाच आपण तंत्रज्ञान म्हणत असतो.
आज काल मृत्यू झाल्यानंतरही तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन आपली राखरांगोळी केल्या जाते. अन्यथा आपले काय झाले असते तंत्रज्ञान नसते तर पूर्ण सृष्टीवरच्या घडामोडी सर्व तंत्रज्ञानाच्या भरवशावरच होतात जर तंत्रज्ञांन नसलं तर खाणेपिणे,भाजीपाला, शेतीवाड़ी तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच केल्या जातात याशिवाय अन्नधान्य पिकत नाही.फळफळावळ,भाजीपाला हिरवा ताजा ठेवण्याकरीता तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतात.
जगाचा पाठीवर असा कोणताच देश नाही किंवा कुठलीच जागा नाही जिथे तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही. हे पृथ्वी वासियांसाठी अतुलनीय प्रज्ञा साकार रूपातली भेट आहे. लहान असो किंवा मोठा असो तंत्रज्ञानाचा फायदा घेतल्यास आपले भविष्य सुख सोयीने समृद्ध होईल.
आपण जर तंत्रज्ञानाचा उपयोग नाही केला तरी तो आपोआपच किंवा नकळतच घडत असतो. तंत्रज्ञान हे आपल्या पाठीशी सतत उभा आहे.तो बुद्धिला प्रेरक आहे. त्याच्या साथीने आपण एवढी प्रगती केली आहे की तंत्रज्ञानाचा जेवढे कौतुक केलं तेवढे कमीच आहे.तंत्रज्ञान चलायमान नसला तरी चलायमान आहे.
प्राचीनकाळापासून मानव तंत्रज्ञान जानतो व मानतो आहे. या तंत्रज्ञानाने सर्वांना आपलेसे केले आहे. त्याची संकल्पना, निर्मिती, उपाययोजना सर्वांसाठी पूरक आहे.
प्राचीनकाळापासून मानव तंत्रज्ञान जानतो व मानतो आहे. या तंत्रज्ञानाने सर्वांना आपलेसे केले आहे. त्याची संकल्पना, निर्मिती, उपाययोजना सर्वांसाठी पूरक आहे.
शैन शैन प्रगति होवून आज जगातील कोणत्याही ठिकानी नवनवीन शोध लावण्याचा ध्यास विद्यार्थी नागरिक घेतो आहे.