shubham gawade Jadhav

Thriller

3  

shubham gawade Jadhav

Thriller

२०५०... भविष्य

२०५०... भविष्य

2 mins
245


का? जीवन आणि जीवन जगणं आपल्यासाठी महत्वाचं असतं. या सुंदर जगात आपलं अस्तित्व टिकवणं का महत्वाचं असतं? लाखो वर्षांपासून या सुंदर पृथ्वीवरती करोडो वेगवेगळे प्राणी एकत्र राहतात. मोठ्या संकटांना सामोरे जाऊन स्वतःचं अस्तित्व टिकवतात.निसर्गाच्या वेगवेगळ्या बदलांना सामोरं जातात. त्यातलाच एक म्हणजे माणूस. लाखो वर्षे बदल सहन करून स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला एक विकसित प्राणी. इतर प्राण्यांपेक्षा हुशार आणि वातावरणाशी अनुकूल असा प्राणी म्हणजे माणूस.


आपल्याच हुशारीचा वापर करून निसर्गाला आव्हान द्यायला निघालेल्या माणसाला निसर्गानेच बेघर केलं आणि त्याला दाखवून दिलं की कितीही हुशार असला तरी निसर्गाला आव्हान देणं एवढं सोपं नसतं.


सन २०५० स्वतःच्या अतिहुशारपणामुळे मानव जातीने स्वतःबरोबर पूर्ण जगावर संकट ओढवून घेतलं आणि पूर्ण पृथ्वी एका परमाणूच्या धमाक्यात उद्ध्वस्त झाली.जिकडे तिकडे जाळ, राख,धुरांचे लोटच्या लोट,भयाण शांतता.ती शांतता होती स्वतःचं आयुष्य आणि अस्तित्व धोक्यात आणल्याची. ती शांतता होती पृथ्वी पूर्णपणे नष्ट झाल्याची. ती शांतता होती एक युग संपल्याची.


काही वाचलेली बोटांवरती मोजण्याइतकी लोकं एका स्पेस शिपमध्ये बसून दुसऱ्या अनुकूल ग्रहाच्या शोधात निघतात.त्या स्पेसशिपमध्ये अनेक प्रकारचे प्राणी,पक्षी,झाडाच्या बिया होत्या.दुसरी पृथ्वी तयार करण्यास आवश्यक असणारं सगळं त्यात होतं.


काही जिवंत मोजकी माणसं आणि हे स्पेसशिप स्वतःचं सौरमंडळ सोडून दुसरीकडे निघालं होतं आपण एकटे नाही आहोत याची कल्पना त्यांना होतीच. आशेच्या जीवावरती तो जीवघेणा प्रवास सुरु झाला होता.जाताना पृथ्वीच्या विध्वंसतेचं दृश्य डोळ्यात साठून निघाले होते.नकळत सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळलं होतं.आप्तगण या धुराच्या लोटात नष्ट झाले होते.कुटुंब वगैरे सगळ्यांना सोडून तो प्रवास चालू झाला.पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताच त्यांना सगळं विसरायचं होतं आणि एका नव्या वाटचालीला सुरुवात करायची होती.


आपणच आपल्या स्वकीयांच्या मृत्यूचं कारण बनलो याचं त्यांना खूप झालं होतं पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता.हा विचार त्यांनी वेळीच केला असता तर हा दिवस नक्कीच आला नसता. आता फक्त उरले होते धुरांचे लोट आणि भयानक शांतता जी एखाद्याच्या हृदयाला हात घालणारी होती.


सगळ्यांची मनं खचून गेलेली होती.आशेचा किरण कुठेच दिसत नव्हता.हळूहळू स्पेसशिपमधलं अन्नधान्य संपत आलेलं होतं पण अजून त्यांना अनुकूल असणारं ठिकाण दिसत नव्हतं. शिपमधले सगळेच स्वतःच्या क्रूरतेला दोष देत होते.काही लहान मुलं त्या स्पेसशिपमध्ये इकडून तिकडे पळत होती. आपण त्यांचं आयुष्यही बरबाद केलं याचं त्यांना दुःख छळत होतं.


एकामागोमाग अशी तीन स्पेसशिप चालू होती. त्यांच्याकडे आता काही दिवसांपुरतंच इंधन उरलं होतं. किती दिवस चालणार होतं? सतत ६ वर्षांचा प्रवास करून आता तेही थकलं होतं.त्याचा एक एक पार्ट आता निकामी व्हायला सुरुवात झाली होती.


सगळ्यांना स्पेसशिपच्या मधोमध असणाऱ्या हॉलमध्ये बोलवण्यात आलं आणि स्पेसशिपचा आणि या मोहिमेचा मेन कॅप्टन आणि गटप्रमुख समोर आले. सगळीकडे शंकेचं वातावरण होतं. सगळे एकमेकांशी चर्चा करत होते.तेवढ्यात कॅप्टन आणि गटप्रमुख आले आणि सगळे शांत झाले.


कॅप्टन - माझ्या मित्रमंडळींनो एक महत्वाची सूचना आहे.आपले गटप्रमुख आपल्याला काही सांगणार आहेत आपण शांततेत ते ऐकून घ्या.


गटप्रमुख- जे व्हायला नको होत तेच झालं.आपल्या प्रवासासाठीचा साठा संपत आलेला आहे.आजपासून एकवेळचे जेवण आपल्याला करायला लागणार आहे.

 

सगळ्यांची कुजबुज वाढली.ते शब्द एकदम गरम शिसे कानात ओतल्यासारखे वाटत होते.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller