2) भाव गंधार : The Linkage
2) भाव गंधार : The Linkage
Aureole Infrastructure HQ
The Phoenix Heights, Mumbai
IST 4 PM :
"शुभ, it's 4 O' clock...! Let's go home ना...!!"
"Didn't you hear what sir said earlier? We've to finish all our work before leaving... " चष्मा जरासा वर सरकवत नि 'माऊस' ची 'वायर' सरळ करत झोयाने आठवण करून दिली.
"फिर तो तुम रिधान, अगले जनम में ही जा पाओगे शायद...!! "
"हे-हे-हे-हे...."
एक उसासा सोडत के. सुब्रमण्यम उर्फ शुभने आपल्या खास तमिळ शैलीत रिधानची चेष्टा केली, तसे एकामागून एक हास्यतुषार उडाले...!!
"But guys, it's Friday ना...! एक तो आज हाफ् डे भी नहीं मिला... सुबह से ऑफिस में ही है हम...!! "
"चिल आयेशा! कल तो विकेंड ही है ना...!"
"पर मेरे डिझाईन्स प्रिपेअर करने में तो सारी रात निकल जायेगी...!! और आज तो सना भी नहीं आयी, मैं तो बोर हो जाऊँगी...!"
'पेपरवेट'शी चाळा करत वैतागलेल्या आवाजात आयेशा परत तक्रारीच्या सुरात म्हणाली.
तेवढ्यात हळूच केबिनचे दार वाजून उघडल्याचा भास प्रत्येकाला झाला; नि पुढल्या दोनच क्षणांत त्यातून आपल्या 'श्रीयुत परिहार सरां'ना येताना पाहून मात्र तो भास नसून वस्तुस्थिती असल्याची जाणीव सर्वांना झाली....!!!
भगिनी आयेशाच्या हातून निसटून काचेचा द्वाड 'पेपरवेट' गोलाकार फिरत, घरंगळत जाऊन, मेजावरून पडून हजार तुकड्यांमध्ये विभागला जाईल, त्याआधीच स्वहस्ते त्यास थांबवत रिधानने पुढील सुनावणी थांबवली...! कारण मध्यान्हसमयी झालेल्या आपल्याच सहकर्मचारी 'मिस. जनरल मॅनेजर' यांच्या चुकीचा 'गौरव समारोह' कुणीच विसरले नव्हते...!!!
"You people seem to be quite tired...."
'टाय'ची 'नॉट' जरा सैलसर करत, आपल्या दमलेल्या 'आॅरिओलर्स'च्या क्षीणलेल्या मुखांकडे पाहत तो उद्गारला, तसा बिचाऱ्या सर्वांनी अधिकच कसे थकलेले दिसता येईल, यासाठी विचार सुरू केला.
"Okay, okay...!!! लगता है आज काफी 'टफ डे' था...!! So you guys can leave now....!!!
Except Miss. Singhania...!!! You can go only after you show me complete report file of 'MEHTA INDUSTRIES'....!!!
तिच्या क्यूबिकलकडे नजर टाकत तो बोलला, तसे बावरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत तिला फक्त "Yes Sir" एवढे दोन शब्दच बोलणे शक्य झाले...!!!
.
.
.
तो केबिनमध्ये परत आला, तसा कार्यपीठिकेवरील त्याचा भ्रमणध्वनि खणखणला...!
अन् 'Chiku' नाव बघून त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित नाही म्हटल्यापेक्षा अर्धा इंच मोठंच झालं...!!!
"हॅलो, भाई..."
"Hey, so you're back home...!"
"Yes...! आप को पता है आज क्या हुआ...?!"
"हाँ, घर जाते ही तुम्हें मॉम की तेज डाँट पडी क्योंकि तुम हमेशा की तरह सोने से पहले अपने गंदे 'शूज' उतारना भूल गई...!"
"भाई...! Exactly यही हुआ है....!! आप को कैसे पता...?!"
"Because Chiku, you're so predictable... और ये हमेशा होता है.... ना तुम सुधरती हो और ना ही वो सुधरती है...!!"
"Let it be ना... "
"Okay, तो तुम्हारा session कैसा रहा इस बार...?"
"Amazing..!!! It was very very fruitful... Trekking in South is much harder than I thought...!! But, you know what, this year, I got award for that 'fireflies at dawn' photograph.... "
"Oh... Glad to hear that...! Congratulations...!!"
"Thanks... आपका काम कैसा चल रहा है...? और घर कब आ रहे हो आप....?"
"Our company is in top 5 according to turnovers and market capital...! इस हिसाब से तो काम बेहद अच्छा चल रहा है...!! वैसे तुम क्यूँ पूँछ रही हो...? बिझनेस जॉईन करने का इरादा है क्या...?"
"मैं जॉईन कर लूँ, तो शायद कंपनी टॉप 100 में भी ना रहे ...!! अापने बताया नहीं घर कब आ रहे हो?"
"फिलहाल तो नहीं आ सकता...!"
"Okay, as you wish...! Take care then भाई! Waiting for you....!! जल्दी आना... बाय..."
"बाय...! Will meet you soon...!"
बालपणी धाकट्या बहिणीसोबत केलेल्या 'कारभारां'च्या आठवणीत हरवणार, त्याआधी दारावर झालेल्या टकटकीने त्याचे लक्ष वेधले.
"May I come in, Sir...?"
"Yes, you may...!!!"
"Sir, Report File is ready...!"
"Okay, let me just take a look...!!!"
"Here is it...!"
"Okay, you're gonna perform Monday's presentation...!"
"Yes Sir..."
"You should once again study this thoroughly so that... "
पण तिचं लक्ष तरी होतं का त्याकडे...?! ती तर सारं सारं चित्त एकवटून अतीव वेदनेने बघत होती त्या कोपऱ्यातल्या 'Trash Bin' लिहिलेल्या छोट्याशा पीत रंगी पेटीकेकडे....!!!
"Miss. Singhania..."
"Miss. Antara Singhania....!!! Are you even listening me....?!"
"Ye... Yes Sir... I... I will study it more properly...!!! I will try my best...!!"
"Fine, you may go now...!"
"Thank you, Sir...!"
हलक्या हलक्या पावलांनी ती पाठमोरी होत निघून गेली, तसा कसला तरी विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला...!!!
'Those stitches on her wrist...!? I think, I might have seen these before...!!! But, when...?!'
.
.
.
"राशीद चाचा, सुनिये जरा...."
"हाँ बेटा, बोलो..."
ऑफिस बंद करण्याआधी सर्व दारे तपासून त्यांना कुलूप घालताना त्यांनी अंतराची साद ऐकली...! मागल्या महिन्यात राशीद चाचांचा पगार व्हायचा होता, तेव्हा शमीम चाचींच्या उपचारांसाठी तिने मदत केल्यापासून त्यांच्यात एक वेगळे नाते जुळले होते, आपुलकीचे, मायेचे...!!!
"चाचा, वो अश्विन सर की केबिन में जो छोटी 'Dust-Bin' है ना, वो... वो मुझे चाहिये...!"
"वो पिली 'डस्ट बिन'?"
"हाँ, वही, उसने मेरी बेहद किमती चीज गिर गयी है...! लेकिन मैं सर को नहीं बता सकती...! आप प्लिज मेरी हेल्प कर दिजीये ना..."
खरंतर असं खोटं बोलणं तिच्या फार फार जिवावर येत होतं, पण दुसरा कुठला मार्गही नव्हता तिच्या पुढ्यात...!
"लेकिन सर जी तो अभी अंदर होंगे ना..."
"हाँ...!"
"ठीक है, मैं उसमें से सारा कचरा पॉलिथीन में निकालकर बडे 'डस्ट-बिन' में डालने के बहाने ले आता हूँ, वैसे भी तुम अब घर के लिए निकल रही हो, तो नीचे रूको, ऑफिस के पीछे वाले बडे कचरे के डिब्बे के पास...!"
"Thank you चाचा, thank you so much...!"
"इसमें क्या थँक्यू बेटा, तुमने ही तो कहा कि वो किमती चीज है...!"
....नि चाचा केबिनमध्ये निघूनही गेले!
.
.
.
अन् उत्सुकतेपायी ती पाच माळे धावतच उतरली, 'लिफ्ट'चा वापर न करता...!!! एव्हाना तिचा 'मेस्सी बन' सुटून तिचे रेशमी सोनेरी केस वाऱ्यावर हिंदोळे घेत होते...!! धापा टाकत टाकत ती त्या मोठ्याशा कचरा पेटीजवळ आली...!
लांबूनच तिला चाचा येताना दिसले, ते बहुधा 'लिफ्ट'ने आले असावे...!
"ये लो, और तुम्हारा सामान मिल जाये, तो ये कचरे में डाल देना... ठीक है?"
ती कार्यालयीन कचऱ्याची पिशवी तिच्याकडे देत ते म्हणाले...!
"जी चाचा, again thank you...!"
मुखभर हसत तिने त्यांना निरोप दिला...!
गुडघ्यांवर बसत तिने ती 'पॉलिथीन' उघडली नि त्यात शोधू लागली सरांनी दुपारी फाडून फेकलेली तिची 'बेहद किमती चीज'...!!!
...नि तिला दिसले ते वाऱ्याने उडू पाहणारे हलक्या गुलाबी रंगाचे चुरगाळलेले, विखुरलेले कागदाचे तुकडे, तिच्यासाठी मात्र ते सारी आसवं पुसणाऱ्या करवस्त्रापेक्षा कमी नव्हते...!
पहाटेच्या दवबिंदूंहूनही ताजी अन् कुमुदसमीराहूनही सुवासिक भासत होती नील शाईने त्यावर गोंदलेली अक्षर मौक्तिके, ज्यांची चमक तिच्यासाठी आजही अस्सल सुवर्णाहून तेजोमय अन् प्रकाशित होती....!!!
इवले इवले ते षष्ठ दश चिटोरे, ओंजळीत घेऊन, भरल्या डोळ्यांनी दोन क्षण न्याहाळून, त्यांना अलगद छोट्या 'वॉलेट'मध्ये ठेवत ती उठली...!
उरलेला कचरा 'डस्ट बिन' मध्ये टाकला नि निघाली....!!
.
.
.
पाचव्या माळ्याच्या केबिनमधल्या खिडकीच्या तावदानांमधून तिला बघून तो मंद हसत उद्गारला,
"Huh, crazy girl...!"
क्रमशः

