भाव गंधार : The Reminiscence
भाव गंधार : The Reminiscence
Palace Novelty, Gwalior
"क्या कमी रह गयी थी रणजित जी हमारे संस्कारों में..?! अगर आप हमारी जगह होते, तो क्या आप वह नहीं करते जो हमने किया...???! पच्चीस साल कम समय नहीं होता रणजित...!!! आपके जाने के बाद पच्चीस सालों से संभाल रहे हम इस घर को, इस परिवार को, हमारे बच्चों को...!!!
सब को जोडे रखने की कोशिश में आखिर हम ही टूट जाते है, क्यूँ...?! सब कुछ बिखर जाता है हमेशा...!! हम चाहकर भी कुछ नहीं कर पाते...! कभी कभी तो लगता है हम इस काबिल ही नहीं है...!
आपकी शिवा कमजोर नहीं है रणजित... मगर क्या हम थोडेसे सुकून के लायक नहीं...?!"
पालथ्या तळव्यांनी नेत्रीचे अश्रू टिपून घेत पुन्हा पुन्हा विचारत होती ती भित्तीकेवर स्थित त्या प्रतिमेस...!!!
"कुछ नहीं बिखरा है मॉम...! ना ही कुछ टुटा है...! आप हमेशा काबिल थी और हमेशा रहेगी...!"
लाडक्या लेकीचा आवाज ऐकून ती वळली...!
"You still believe in me चिकू?!"
"Mom, these family disputes don't have this much power that they will reduce my faith in you...! You're our strength, our idol, our everything...
I'm really sorry Mom, मुझे आप से इस तरह रुडली बात नहीं करनी चाहिये थी... I will keep this in mind and this won't happen again... I promise you...! Please don't cry..."
मातेची उभयही करतले स्वहस्तात घेऊन, तिला आश्वस्त करून धीर देत शिखाने हळूच पापण्यांची उघडझाप केली, तेव्हा मावळतीच्या सवितेपरी सौम्य पण नवपालवीसम प्रफुल्लित स्मित उमटले तिच्या अनुभवी आननावर...!
"I knew it Chiku, मुझे पता था, तुम हमें जरुर समझोगी..."
"चलिए, नीचे चलते है, शाम हो रही है...!"
"तुम चलो, हम आते है... "
.
.
.
एक-एक पायरी उतरत शिखा खाली येत होती...
'हम तो आप को समझ गये मॉम, पता नहीं आप हमें कब समझ पाओगी...'
कृष्णकुंज सोसायटी
नवव्या माळ्यावरच्या आपल्या फ्लॅट नंबर 251 चं कुलूप उघडताना तिच्या नामफलकाजवळ लावलेली छोटीशी गणेशमूर्ती पाहून अंतराला पप्पांची आठवण आली. किती आनंदाने त्यांनी ही नेमप्लेट पाठवलेली ना...!
"पप्पांना कॉल करावा लागेल, एवढ्यात बोलणं झालेलं नाही" ती स्वतःशीच म्हणत आत आली.
ब्लेझर काढत असताना अचानक किचनमधून आलेल्या ग्लास फुटण्याच्या आवाजाने ती दचकली.
'कोण असेल...? डोअर तर बाहेरून लॉक होता ना पण...' तिने दबकत किचनकडे जात, हातात फुलदाणी उचलली.
नि हळूच स्लायडिंग डोअर सरकवत अंदाज घेणार, तोच तिच्यावर झडप घातली गेली.
"अय्यो, ऑली! तू आहेस होय...! My furr ball...! असं घाबरवतं का कोणी पिल्ले?" सुटकेचा निःश्वास सोडत ती बोलली.
'स्कॉटिश फोल्ड' प्रजातीची ही 'ऑलिव्हिया' आमच्या वाढदिवसाची भेट आहे, बरं का...!
...आणि तिला 'मांजर' म्हटलेलं आम्ही अजिबात चालवून घेणार नाही...! तिला नावानेच हाक मारायची...!
अंतरा ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती तशी शेजारच्या फ्लॅटमधल्या विजू आंटीकडे रहायची, पण आज बहुधा ती मागल्या गॅलरीतून उडी मारून आत आली असावी.
"ऑली, भूक लागली का बाळा तुला?"
पायाशी लोळण घालणाऱ्या 'बाळा'ला तिने जवळ घेत विचारले. तिच्या हिरवट पिवळ्या रंगांच्या गोल गोल डोळ्यांनी तिने अंतराकडे रोखून पाहिले नि दोन क्षणांनी लडिवाळपणे गुरगुरत तिच्या गालाला गाल घासायला लागली...!
"Awww, I love you too baby...!" तिच्या गोबऱ्या मऊ-मऊ गालांना कुरवाळत अंतराने तिला खाली उतरवले नि तिच्या 'डिश'मध्ये 'वेट फुड' टाकले, तशी स्वारीने तिकडे धाव घेतली...! लब्बाड...!!!
बेडरुममध्ये जात चेंज करून घेत अंतरा बाहेर आली, तेव्हा आपलं 'Furr ball' मात्र पाय पसरून सोफ्यावर झोपण्याच्या तयारीत होतं, बरं का...!
अंतरा मागल्या गॅलरीत येऊन बसली...!
हळूच हातातलं छोटंसं तपकिरी 'वॉलेट' उघडून तिने त्यातून बाहेर काढलेत तिच्या स्वप्नांचे चुरगाळलेले तुकडे, ते स्वप्न जे कधीच सूर्यातपाने वितळलेल्या मक्षिकामलागत वितळून गेलं होतं, पण त्याचे भग्न अवशेष मात्र तिने अजूनही जपले होते हृदयाच्या मखमली कप्प्यात नि त्याचा सुवास अजूनही गंधाळून टाकत होता तिची श्वासकस्तुरी...!!!
सूर्यास्त होऊन अंधारून आलं होतं...
पण तो अंधार संपवण्यासाठी पुरेसे होते प्रखर पांढरा उजेड फेकणारे 'पीओपी'मधले 'एलईडी' विद्युद्दीप...
'किती छान झालं असतं ना आयुष्यातलाही काळोख असाच संपवता आला असता तर...' तिच्या मनात विचार डोकावला.
हळूच त्यातला एकेक चिटोरा उचलून तिने जोडायला सुरुवात केली.
'प्रिय अंतरा,
नि क्षणभर वाटलं त्यानेच साद घातली की काय...!!!
पुढले पाच-सहा चिटोरे आणखी जोडले गेले...
हो प्रियच! समोरासमोर सगळं बोलता आलं नसतं, ना फोनवर, ना मेसेजवर! म्हणून हे लिहितोय...
मला माहित आहे जे मला वाटतंय, तेच तुलाही जाणवतंय! मी बघितलंय तुझ्या बोलक्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी काहीतरी वेगळं... जे फक्त माझ्यासाठी आहे, फक्त माझ्यासाठीच!
थरथरत्या हातांनी ते कागदाचे चिमुकले तुकडे जोडत असताना त्याचाच हसरा चेहरा नाचत होता तिच्या डोळ्यांपुढे...
तुझी मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे नि आता तू मला एक व्यक्ती म्हणून आवडायला लागली आहेस...
....मी प्रेम करायला लागलोय तुझ्यावर! म्हणजे नकळतच झालं गं हे... हल्ली तू दिसलीस की पारिजातकाचा सडा बरसल्यासारखा वाटतो!
तुलाही वाटतं का गं माझ्यासाठी असं काही? की माझा गैरसमज होतोय आपल्याबद्दल?
तुझ्या मनात जर असं काही नसेल ना, तरीही आपली मैत्री कायम राहील, पूर्वीसारखीच!
आणि जर आपल्या भावना सारख्या असतील, तर मी आयुष्यभर प्रयत्न करेन तुझा विश्वास आणि तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू जपण्याचा!
तुझ्या आणि तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत...
फक्त तुझाच होऊन बसलेला
- उदय '
शेवटचाही तुकडा चिकटवून झाला नि दाबून ठेवलेला हुंदका उसळून बाहेर पडला. अन् तिने झोकून दिलं स्वतःला समोरच्या मेजावर...
हीरकमण्यांप्रमाणे वेचून वापरलेला एकेक शब्द, एकेका अक्षरातून झिरपत जाणारं प्रेम, त्याच्या प्रेमात ओतप्रोत भरलेली आठवणीतली सायंकाळ, त्याचं लक्षात राहणारं ते सुहास्य, सारं सारं वाहून जाऊ द्यायचं होतं तिला...
पण वेड्या मनाची पकड मात्र फारच घट्ट होती, कारण तिच्यासोबत हा प्रत्येक क्षण त्यानेही तर जगला होता...!
वाऱ्यावर हलणाऱ्या 'विंड चाईम'ची हलकी किणकिण सोडली तर वातावरणात भयाण शांतता होती...
नि तिचे अश्रूही आता मुक्यानेच ओघळत होते...!
क्रमशः

