Aarna 🖤

Romance Classics

3.5  

Aarna 🖤

Romance Classics

1) भाव गंधार : A Mistake

1) भाव गंधार : A Mistake

6 mins
148


"This is office Miss. Singhania, not a damn poetry slam...!! If you hate to work seriously, then you're free to resign. But this kind of mistake will never be appreciated...!!"

          

                 हातातला फिकट गुलाबीवर्णी कागद चराचरा फाडून, चिटोऱ्यांमध्ये रुपांतरित करून त्यांना मेजस्थित कचरा पेटीत टाकत नि 'MEHTA INDUSTRIES' अक्षरे छापलेली संचिका तिच्यासमोर आदळत तिच्यावर एक सधार दृष्टिक्षेप त्याने टाकला, तशी ओलावलेली नयने तिने अधिकच घट्ट मिटून घेतली. तरी कमल पाकळ्यांसम नाजूक पापण्यांमधून एक खोडकर अश्रुबिंदू घरंगळून कृष्णवर्णी ब्लेझरच्या चमकदार धाग्यांत सामावलाच!

        

              "Do you have any idea, what would have happened if they had seen this!! It's freakin' 75 crore deal!!! Do you expect me to lose it over your silly mistakes? Is this what you're getting paid for?"

        

             हलकी सोनेरी झाक असलेल्या त्याच्या पिंगट काळ्या केसांमधून हात फिरवत नि एक खोल श्वास घेत तो म्हणाला, "Now, enough is enough! You always mess it up! From this moment, not even a single employee or manager, be it senior or junior, will take office files to home! You people have to complete those here only. No matter how much time it takes. Do overtime or stay here whole night, I don't care!"

"Sir, my sincere apologies for for not being helpful, I'm really" कातर स्वरात अधर पाकळ्या पुढले शब्द वदणार, त्या आधीच तो ताड्-ताड् पावले उचलत केबिनमध्ये निघून गेला नि ती बघत राहिली त्या पाठमोऱ्या आकृतीकडे, धूसर होत जाईपर्यंत.

                

                 मणा-मणांच्या बेड्या चढवल्यागत जड झालेली पावलं पुढे टाकत, स्वतःच्या क्युबिकलमध्ये येऊन हताशपणे ती खुर्चीत विसावली, तेव्हा तिथल्या प्रत्येक निर्जीव वस्तूला तिची कीव आली असावी

"Dude, she's out of her senses or what?"

        

"Leave it Zoya, she's used to this"

        

"हाँ ,जाने दो ना, उसे पसंद होगा परिहार सर से लेक्चर सुनना, तुम्हें क्या"

"But, she's General Manager!! How can somebody forget a "love letter" in an office file?"

"And I'm wondering, who wrote a 'love letter' to this Miss. Weirdo?"

"होगा कोई उसका Mr. Weirdo!"

"Guys, let's go for lunch na, ब्रेक खतम हो जायेगा ऐसे तो! आधा टाईम सर वेस्ट कर चुके है ॲालरेडी"

"Yeah! चलो चलो जल्दी"

"शुभु, मैंने तो तेरे टिफीन में ही खाना है आज."

"हां मेरी माँ, रख ले"

.

बाहेर चाललेली सहकर्मचाऱ्यांची कुजबूज तिच्या कानी येत नव्हती, असे मुळीच नव्हते; परंतु परिस्थितीने दिलेल्या जखमांच्या वेदनेने मृत झालेल्या तिच्या मनाला त्याची किंचितही पर्वा नव्हती.

काळ्याकुट्ट तिमिरवलयात ओळखीचा असलेला हातही सुटावा नि हरवलेलं मन दिशाहीन होऊन अधिकच भरकटून जावं, अशी काहीशी तिची अवस्था होती!


Palace Novelty, Gwalior

IST 3 PM :

मुख्य प्रवेशद्वारातून राजवाहन प्रवेशल्याचा ध्वनि कानी पडताच लगबगीने ग्रेटा दिवाणखान्याच्या द्वाराजवळ आली.

हलक्या राखाडीवर्णी Rolls Royce चे पार्श्वद्वार उघडले गेले, तसे वाम पाऊल पुढे टाकत शिवांतिका उतरली.

हातावर लोंबकळणारा गर्द नील लोहित रंगी कांजीवरम साडीचा, सोनेरी किनार असलेला भरजरी पदर सांभाळत तिने एक नजर निवासस्थानावर टाकली नि रुपेरी कोरलेल्या 'NOVELTY' अक्षरांना अधिकच झळाळी प्राप्त झाली!

एवढी का भोवताल भारावून टाकणारी ऊर्जा होती तिची?

कारण सभ्यता अन् शालीनतेचे दुसरे रूप, सबंध घराण्याचा भक्कम आधारस्तंभ, वयाची पाच दशके ओलांडून पाच संवते उलटली असली, तरीही प्रचंड आत्मविश्वास नि अचूक निर्णयक्षमता जिची भुषणे आहेत, अशी तीच तर होती परिहारांची ज्येष्ठ राजस्नुषा 'शिवांतिका रणजितसिंह परिहार'!

"Good afternoon, missis! How was the journey?" नुकत्याच प्रवेशलेल्या अधिकारीणीला अभिवादन करीत ग्रेटा उद्गारली.

"Quite exhausting!" निषद्यावर आसनस्थ होत तिने ग्रेटाच्या हातून जलपात्र घेतले.

सभोवार फिरणारी तिची दृष्टि एका ठिकाणी स्थिर जाहली.

"Greta, why is there a mud stain on the carpet? Wait! Is Chiku at home? When did she return? And why didn't she inform me? आप भी बता सकती थी ना!"

सबंध पाणी एकाच घोटात संपवत तिने घाईघाईने उभे होत ग्रेटाकडे पृच्छा केली, तसे तिच्या हातून जलपात्र परत घेत नि मान किंचित झुकवत ग्रेटा उत्तरली,

"Miss is, she returned by 1:30 PM. As she came to know you're out for business, she asked me not to disturb her. I think she's resting by now Missis!"

"Oh, okay, she might be feeling tired!! I will go n' check her"

वाक्य संपेपर्यंत ती पायऱ्यांपर्यंत पोहोचली होती. लगबगीने तिची पावले वरच्या कक्षाचा वेध घेऊ लागली.

"वह अभी भी वैसी ही है, बिल्कुल वैसी, जैसे चौंतीस सालों पहले थी!" मंद हसत ग्रेटा उद्गारली.

.

किती किती आतुरतेने तिने आपल्या लाडक्या सुपुत्रीच्या कक्षाची कवाडे उघडली नि "चिकू बेटा" प्रेमळ साद हवेतच विरली!

"O my God! What the!"

सारी शक्ति वापरून जिवाच्या आकांताने ओरडणारे 'म्युझिक सिस्टम'चे 'स्पीकर्स' कर्णेंद्रियांना सहन होण्यापलिकडचा ध्वनि उत्पन्न करत होते.

Hey DJ

Póngale la música que le gusta

Una para que se mueva y se luzca

Y baile conmigo, sólo conmigo, ¡hey!

कुठल्याश्या स्पॅनिश गीताच्या बोलांवर थिरकणारा त्या खोलीतला एकेक अणु-रेणु, कोपऱ्यात अर्धवट उघड्या अवस्थेत पडलेली 'ट्रॅव्हल बॅग', कपाटाशी अस्ताव्यस्त विखुरलेले कपडे, अठरा अंश सेल्सियसचे सेट केलेले गारठवणारे तापमान नि चिखलाने माखलेल्या 'शूज'सहित शय्यासनावरून लोंबकळलेल्या अवस्थेत निद्रिस्त झालेली

तिचीच लहानगी प्रतिकृती, एवढं पुरेसं होतं शिवांतिकाचा 'जमदग्नी' व्हायला!!

एवढ्या झोपेतही गीतावर नृत्य करणाऱ्या तिच्या अंगुलिका थांबत नव्हत्या!

I'll give you what you want, you want, you want

But you gon' fall in love, in love, in love

So tell me what you want, you want, you wan.

खट्!!!

रागावून तो 'म्युझिक सिस्टम' बंद करून तिने आपला मोर्चा आपल्या लाडावलेल्या लेकीकडे वळवला.

"चिकू, get up at once, I said.

चिकू! "

"क्या है भैया? सो-ने दो ना! हमने नहीं चुराये है.आपके पैसे,सच में. हम मंगलवार को चोरी नहीं किया करते"

तिची असंबद्ध बडबड ऐकून शिवांतिकाच्या भाळावर आठ्यांचे जाळे विणले गेले अन् रागाचा पारा अजूनच वर सरकला

"चिकू!"

"अरे यार! किसको मौत आ गयी सुबह-सुबह, What? म्-माॅम, आप? आप क्-क्या कर रही है यहाँ? Hadn't you been to Delhi?"

डोळे किलकिले करून पाहताना शीतल चंद्राची अपेक्षा करावी नि प्रखर सूर्यबिंबच डोळ्यांवर पडावे; नव्हे रुतावे, असे तिचे झाले!

खोलीची आणि स्वतःची एकंदरित अवस्था पाहून तिला तीर्थरूप शिस्तप्रिय मातोश्रींच्या संतापाचा अंदाज आला तसा!

आता पुढच्या काही क्षणांनंतर होणाऱ्या महाखरडपट्टीसाठी तिने स्वतःला तयार करून घेतले व मनातल्या मनात सर्व इष्टदेवांपुढे लोटांगण घातले!

"सबसे पहले तो अब सुबह नहीं, दोपहर के साडे तीन बज रहे है, मिस शिखा!"

'Oh no, ये मॉम मेरा नाम ऐसे क्यों ले रही है? भगवान जी, आज बचा लो बस. I promise मैं कभी कुछ नहीं चुराऊँगी, पक्का promise, मैं एक बार ही प्रसाद लुंगी, दो बार प्रसाद के line में भी नहीं जाऊँगी.'

"शिखा! तुम से बात कर रहे है हम! ध्यान कहाँ रहता है तुम्हारा?"

"S, sorry Mom! I didn't mean to disrespect you!" ग्रीवा खाली झुकवत नि अतिशय बिचारेपणाचे भाव चेहऱ्यावर आणत लाडकी कन्या उत्तरली तशा मातोश्री कडाडल्या,

"Shut up हर बार का हो चुका है ये सब तुम्हारा! क्या हम तुम से थोडी-सी decency नहीं expect कर सकते चिकू? तुम्हें अपना passion follow करना था, हमने तुम्हें रोका नहीं! तुम घर के कोई तौर-तरीके नहीं अपनाना चाहती, हमने वह भी चला लिया लेकिन खबरदार, अगर इस घर के संस्कारों को अपमानित करने की कोशिश की तो, हम से बुरा कोई नहीं होगा"

मातेचा रुद्रावतार पाहून तर साक्षात इंद्रदेवही परततील तिथे बिचाऱ्या शिखाची काय बिशाद? 

निमूटपणे ऐकण्याखेरीज पर्याय तरी होता का तिजकडे?

"हालत देखी है तुमने अपने कमरे की? And how many times have we talked about no shoes on bed? और आने की खबर नहीं दे सकती थी तुम? मोबाईल कहाँ है तुम्हारा? दशहरे पर भी तुम नहीं थी कितनी कोशिश की तुमसे contact की पर तुम हो की और कितने ताने सुने हम तुम्हारे लिये? छोडो, हम बात भी क्यों कर रहे है तुमसे? जब तुम दोनो भाई-बहन के लिये हमारी कुछ अहमियत ही नहीं" डोळ्यांतलं पाणी कसंबसं परतवून लावत ती वळली नि निघून गेली. शिखा फक्त नि फक्त बघतच राहू शकली.

"Greta, don't disturb me unless it's an emergency!" धाड्दिशी तिच्या कक्षाचे द्वार बंद होत आवाज आला

"Yes. Missis." हताशपणे ग्रेटा म्हणाली!

क्रमश:


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance