STORYMIRROR

Aarna 🖤

Others

3  

Aarna 🖤

Others

अनामिक नूपुरे

अनामिक नूपुरे

9 mins
420

"आई, आई, अहो ऐका तरी माझं...! इमर्जन्सी होती म्हणून उशीर झाला हो...!! डिपार्टमेंटला सर्जन अव्हेलेबल नव्हते, म्हणून मलाच घ्यावी लागली केस...!!" एका हातात वामकर्णाशी लावलेला फोन, दुसऱ्या हाती बॅग व श्वेत अॅप्रॉन, गळ्यात स्टेथ नि अवखळ उडणारी चंचल बर्गंडी केशकुंतलं सावरत ती रुग्णालयातून बाहेर पडली, तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता...!


"तुला बजावून सांगितलेलं मी काव्या, पूजेच्या तीन प्रहर आधीपासून बाळंतीणीला शिवायचं नाही म्हणून, तरीही तू तेच केलंस...! माहीत होतं मला, हे असंच होणारंय...! मीच मूर्ख, उगा लावून घेते सर्वांची काळजी...! एक तर कधीचा वाजून गेलाय, पहाटे तीनचा मुहूर्त होता....! आता कसला मुहूर्त नि कसलं काय....!!"


तीर्थरूप सासुबाईंचा रुसवा नि चिडचिड काही प्रथमतःच अनुभवत नव्हती ती; फक्त आज कारण निराळं होतं, एवढंच....!!


"आता लवकर घरी येणारेस की नाही, ते तरी सांगून दे, की उंडारत बसणारेस इकडेतिकडे मैत्रिणींसोबत इतक्या रात्री...??!"


"आई, त्या दिवशी सियाची बर्थडे पार्टी होती, म्हणून तिने फोर्स करून नेलेलं...! मी नाही म्हटलं असतं, तर तिला वाईट वाटलं असतं...!!" पाणावलेल्या टपोऱ्या सुनयनी दाटलेली अश्रूमौक्तिके थांबवत ती केविलवाणं उत्तरली.


"हो, तू मोठी व्हीआयपी लागून गेलेलीस ना.....!! तुझ्याशिवाय तर कोणाचं पानच हलत नसेल...! फक्त घरात लक्ष द्यायचं नाही, बाकी सगळीकडे पुढे-पुढे करायचं...! कधी स्वतःच्या जबाबदाऱ्या कळणार आहेत कुणास ठाऊक...!!"


"आई, त्या पेशंटची कंडिशन क्रिटीकल होती, बाळ गुदमरत होतं, म्हणून अर्जंट ऑपरेशन करावं लागलं, सांगितलं ना मी तुम्हाला...! मला काही हौस आहे का दोन-दोन वाजेपर्यंत घराबाहेर राहायची...?? माझं प्रोफेशन आहे हे...! आणि कुठली जबाबदारी पार पाडली नाही मी, आई...?!! मान्य आहे आज पुजा होती, पण त्यासाठी कुणाचा जीव धोक्यात घालणं मला नाही योग्य वाटत, कारण माझ्यासाठी माझं कामही तितकंच पूजनीय आहे...!!""एवढ्या काळजीने संसारात लक्ष घातलं असतंस ना, तर आता स्वतःचंही बाळ खेळतं असतं नि मग अशी कारणं द्यावी लागली नसती घरी येण्यासाठी अन् मलाही त्यासाठी असल्या पुजा घालत फिरावं लागलं नसतं...!!"

त्यांनी रागाने फोन कट् केला नि त्यांचे शब्द ऐकून ती सुन्न होऊन फक्त उभी राहिली, किती तरी वेळ, फोन तसाच कानाशी धरून...!!

काल रात्रीपासून अपुरी असलेली झोप, आजचा 'ओव्हर-टाईम' अन् सर्दीमुळे ठसठसणारं नाक, हे काय कमीच होतं की सासुबाईंनी आजचा कडक उपवास करवून घेतला होता तिजकडून...!!

दुखणाऱ्या सांध्यांकडे दुर्लक्ष करत ती जायला निघाली अन् पार्किंगकडे वळताच तिने भाळावर हात मारून घेतला...! कालच गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आणि ती परत आणायची आम्ही साफ विसरलोच हो...!!

मन नव्हतं, तरीही निरुपाय म्हणून परत घरी डायल केलेला नंबर तब्बल पाच रिंगनंतर उचलला गेला.

"ह....हॅलो....! निहू....?!! मी माझी गाडी सर्व्हिसिंगवरून आणायची विसरले अरे...! फक्त आजच्या दिवस पिक करतोस का, प्लिज...?!! I'm so sorry, dear...! टॅक्सी स्टेशन पण दूर आहे आपल्या हॉस्पिटलपास्नं, नाहीतर मी तुला त्रास दिलाच नसता रे....!!"

"हां, रिकामाच असतो ना मी एनी टाईम, काऊ, दिवस असो, रात्र असो...! तू फक्त ऑर्डर सोडायची, कारण नवरा म्हणजे पर्सनल ड्रायव्हर आहे ना...!! दिवसभर ड्युटी करा आणि रात्रीची झोपही नशिबात नाही...!!! उलट यांची ऐका...!!" तो चिडून म्हणाला.

"एक मिनिट, ड्युटी मी ही केलीच ना....! वेट, तुला आई काही बोलल्या का...??!"

"ती काय बोलणार बिचारी...?! तू एवढं सुनावलंस तिला...!! तिने सर्वांची काळजी करायची नि तू उलट तिलाच ऐकवायचं...?! माहीत आहे, तुझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण आजचा दिवस फक्त तिच्या आनंदासाठी लवकर आली असतीस आणि बसली असतीस पूजेला तर आभाळ नसतं ना कोसळलं, काऊ....??! एक दिवस तिचं ऐकल्याने काय एवढं नुकसान झालं असतं गं तुझं....?! तसंही तिला हवं ते तर देऊच नाही शकत ना तू, निदान एवढं तरी.... सोड, तुझ्याकडून अपेक्षा करणं म्हणजे...." पुढचं ऐकल्या गेलंच नाही तिच्याकडून....!!

गळून पडलेल्या शिशिर पानझडीतल्या अंशुकाप्रमाणे म्लान मनोवस्थेत ती पार्किंगमधल्या बाकावर जाऊन बसली, तेव्हा तिला फक्त स्मरत होते ते त्याचा 'Severe Azoospermia' लपवून स्वतःच्या 'Incurable Fallopian Blockages'चे तयार करून आणलेले खोटे रिपोर्ट्स, त्याच्याही नकळत....!! फक्त त्याच्या पुरुषत्वाचा अपमान होऊ नये, म्हणून सारी सारी दूषणं झेलली होती तिच्या मृदुनवनीत काळजाने खड्गकठोर होऊन...!! नि त्याची परतफेड म्हणून तिला मिळाली त्याच्या शब्दकट्यारीने विछिन्न केलेली तिच्याच काळजाची लक्तरे....!!!

.

.

.

"डॉक्टर काव्या...., डॉक्टर काव्या....!!"

ती दचकून, खडबडून जागी झाली अन् आपण पार्किंगमधल्याच बाकावर मागे शिर टेकवून झोपलेलो, हे पाहून फार फार ओशाळली.

"डॉक्टर काव्या, are you alright...?!! आप अभी तक यहाँ क्या कर रही है....??! आप तो एक बजे ही जा चुकी थी ना....?!! अब तो ढाई बज रहे है और आप यही है...!"

तिला शब्दच सुचेनासे झाले....!

'अशी कशी मी वेडगळ वागू शकते...?'

"डॉक्टर काव्या, क्या हुआ...?! आप ठीक तो है ना....?!!" ती काहीच बोलत नाही बघून त्याने तिच्या माथ्यावर स्पर्शून विचारलं.

"No Sir...., I... I mean... yes, yes, I'm fine..... I'm... I'm alright....! It's just that, I... I forgot to bring my car..... from servicing center.....!!!" स्वतःच्या वेंधळेपणाची तिला भयंकर लाज वाटत होती.

"So, may I drop you off on your way home...??!"

"नाही नाही, नको....!!!" नाजूक मयूरग्रीवा एकदम दोलवून ती म्हणाली, "मतलब... अं... I'm thinking of going at a friend's place....!!"

"Friend's place...?? This late...??!" काहीसा चकित होऊन तो उद्गारला.

".....I don't wanna go through your personal, but is everything good between you and Dr. Nihal.....?!!"

"Yes, yes...! Nothing to worry about it...!!"

....अन् तिने अवघडून चोरलेली नजर त्याच्या दृष्टीतून सुटली नाही...!! सांगणारही काय होती ती त्याला....?! आपल्या केबिनसमोरच्या 'Cardiac department'चे सर्जन डॉ. परितोष आहुजा हे नाव अन् दररोज सकाळी आल्यावर होणाऱ्या मधुस्मिताची देवाणघेवाण, याशिवाय ओळख तरी काय होती त्याची....?!!?

एकटा राहणारा, सर्वांशी फटकून वागणारा, कोणाकडे फार लक्ष न देता स्वकार्यात मग्न असणारा पस्तीशीतला एक उर्मट व अविनीत घटस्फोटित तो, तिला बघून मंद हास्य का द्यायचा हे मात्र सर्वांसाठी न उलगडलेलं कोडंच....!!!

.

.

.

करस्थ मोबाईल फोनने व्हायब्रेट होऊन तिच्यासह त्याचेही लक्ष वेधले.

"हॅलो...."

"काय हॅलो, किती वाजलेत, शुद्धीवर आहेस की नाही तू....??! मुळात आहेस तरी कुठे तू....?!!"

"मी शुद्धीवरच आहे, निहू....!! तू आहेस का, ते सांग....!!! आणि कुठे का असेना मी, तुला काय फरक पडतो...?! मी माझी येईल मला वाटेल तेव्हा...!! तू माझा ड्रायव्हर नाहीस ना, don't worry then.....!!" आता मात्र तिचाही पारा चांगलाच चढलेला....!

"Shut the hell up, काव्या.....!! तुला मोकळीक दिली आहे, त्याचा फायदा घेतेस तू....!!!"

"You shut the f*ck up, निहाल....!! मुळात तू आहेस कोण रे मला मोकळीक देणारा....!!! बायको आहे मी तुझी, गुलाम नाही...!! समजलं....?!!" फोन बंद करून ती रागाने फेकूनच देणार की......

'Oh no...., हे अजून इथेच आहेत का....? Means he listened that all.... Bullsh*t...'

जरा अंतर सोडून पाठमोरा असलेला तो तिथेच उभा होता, कसलासा विचार करत....!!!

"Excuse me, Sir....! आप को मेरी वजह से लेट हो रहा है....! I think you should go now...!! I'll wait in the hospital's restroom....!!"

"Wait for whom, डॉ. काव्या....?!!"

"सर.... आप जाईए...!! Don't worry about me...! Please leave me alone....!!!"

"I can't काव्या....!! इतनी रात गये मैं आपको अकेले नहीं छोड सकता....!!! You can trust me...! I'll drop you at home....!!"

"I don't wanna go home...!! Why don't you understand, Dr. Paritosh.....?!?!!"

काहीशी वैतागूनच ती म्हणाली. एव्हाना आमचा नित्याचा त्रास, आमच्या 'मायग्रेन'मित्राने साथ द्यायला सुरूवात केली होती.

पण तिचा वैताग दिसलाच कुठे त्याला....?!?! तिच्या मुखातून स्वतःचा नामोल्लेख ऐकूनच आमचं अश्महृदय फार वर्षांनी असं वेगळंच धडधडलं हो, न सांगता येण्यासारखं.....!!! सारंगाला कस्तुरी गवसावी किंवा शशांकाला रोहिणी, असंच काहीसं थरथरलं ते....!!!

"If you insist to stay in the restroom, then fine, I'll also stay thereby you...!! I don't wanna go either....!!"

......आणि दुखऱ्या ललाटावरील हलकेच दाब देणारा अंगठा अन् तर्जनी बाजूला घेत तिने न्याहाळली त्याच्या सुशांत वदनावरची चंद्रिका....! आतापर्यंत काळजात खोलवर दडवून ठेवलेल्या साऱ्या भावनांची पानं भराभरा उलगडत होते त्याचे अबोल नेत्र तिच्यासमोर.....!!

"अं.... okay...!! I'll... I'll take a lift to home from you...!!"

.

.

.

तिला सोडून तो घरी परतला तेव्हा त्याची झोपेची वेळ कधीच निघून गेली होती आणि त्याची झोप तर ती घेऊन गेली होती, तिच्यासोबत, त्याला "Thank you" म्हणताना....!!

.

.

"Thank you, Sir.....! Thank you so much....!!"

"Call me by name, काव्या....! Am I gonna drop you back to the hospital as a punishment....??!"

तेव्हा खळाळत हसून नि कान पकडून "Okay, okay, I'm sorry Dr. Paritosh....!! And thanks too....!"

.

.

.

सगळ्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळणारे आम्ही, आज आम्हाला झोपच येईना....!! तिचं हसरं मुख कसंच विसरावं हो आम्ही....?!? तिच्यासोबत तर दिल्लीतील मार्गशीर्षातली ती बोचरी थंडीही आम्हास गुलाबी भासली होती....!! या अशा उंबराच्या फुलाला छळणं कसं जमत असेल डॉ. निहालला, हे गणित त्याचं त्याला सुटेना....!!

.

.

.

कोण कुठली ती....? ओळख तरी कितीशी...?!

पण मागच्या गोकुळाष्टमीला हॉस्पिटल ऑर्गनायझेशनने अनाथालयात आयोजलेल्या कार्यक्रमात मैत्रिणींनी आग्रह केला अन् तिने गायला सुरूवात केली, तेव्हा त्याला त्याची अरसिकता बाजूला ठेवणे भागच पडले....!! तिला या आधी कधी गाताना पाहिलं नव्हतं; कदाचित तिचं चारचौघांत गाणं निहालला आवडत नसावं....!! तिने सुर आळवला अन् एकदम 'माँ' आठवली...!! अशीच गायची ना तीही....!! तिचा तानपुरा झंकारायचा नि जग विसरायला व्हायचं.....!! साथीला अमोघ दादाचा तबला नसेल, तर ती बैठकच बेचव म्हणावी....!!!

'माँ' गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात उरलाच नाही कुठला जिव्हाळ्याचा झरा....!! आज इतक्या वर्षांनी तिची आठवण उचंबळून आली....!! त्याला खरं तर उठून जायचं होतं तिथून, पण त्याची पावलं निघेचना....!! आलाप गाताना तिच्या मणिबंधाची आणि करांगुलींची होणारी हालचाल त्यास खुणावत होती, तिज थांबवण्यास....!! बालपणी असेच करायचो ना आपण, आईने गायला सुरूवात केली की जाऊन तिचे हात घट्ट धरायचो....! तलम आठवणींनी नेत्र हलकेच भिजले नि तिचं नितळ रूप आठवून ओष्ठपात्रे रुंदावली....!!

"नैन तिहारे जादुगारे,

मोटे-मोटे कारे कारे....

मिलत नयन दिल हारी,

साँवरिया, जाऊँ मैं बलिहारी.....

साँवरिया, जाऊँ मैं बलिहारी.........."

.....अन् तिने डोळ्यांच्या कोनातून त्याच्याकडे बघितलं, नजरानजर झाली आणि तिची तान ऐकून त्याला खरंच एका क्षणासाठी व्हावं वाटलं, त्या राधिकेचा 'साँवरिया'.....!!!

.

.

.

त्यानंतर दररोज सकाळी दिसणारा तिचा चांद्रछवी असणारा चेहरा अन् पायऱ्या चढता-उतरताना होणारी तिच्या पदपैंजणाची मंजूळ छमछम, या दोनच गोष्टी, त्याच्या भावविश्वात रममाण करीत होत्या त्यास....!! एकदा घाईघाईने राउंड घ्यायला जाताना ओ.टी.जवळ निखळून पडलेलं तिचं एक रौप्यपैंजण कुणाच्याही नकळत अलगद उचलून त्याने शर्टच्या खिशात ठेवलेलं....!! अजुनही आहे ते जपून ड्राॅवरमधल्या त्या छोट्याशा वेलवेट डबीत, तसंच सुगंधी, सभोवार आनंदून टाकणारं....!!

"Whoa....!!! She doesn't even know my feelings...!! I can't convey either...! Alas...! My poor heart...!!" स्वतःशीच कुजबुजत तो उशी जवळ कवटाळून झोपायचा प्रयत्न करू लागला, तेव्हा पहाटेचे साडे-चार झाले होते....!!

.

.

.

अत्तरासारखे दिवस उडून जाताना त्यांचे मैत्रीरंग अधिकच गडद होत गेले. कधी त्याने हळूच पास केलेला विनोद नि त्यावर तिने दिलेली उत्स्फूर्त दाद, कधी सोबत न्याहाळलेल्या सांजछटा, कधी एकमेकांच्या भूतकाळातील जखमांवर घातलेली फुंकर.....!! कित्येकदा अधरी येऊनही त्याने परतवलेली मनोभावना बिनचूक हेरली होती तिने.....!!

.

.

.

आज सकाळपासूनची लागून राहिलेली रुखरुख नक्की कशामुळे, तिला कळेना.....!! 'तो आज आला नाही म्हणून की आज निहूने परत विनाकारण वाद घातला म्हणून....!! छे....! त्याच्यामुळे मला का इतका फरक पडावा.....!! पण तरीही काहीतरी वेगळं वाटतंय...!!'

एक ब्रेक म्हणून ती ओपीडीतून बाहेर आली आणि तिला तो येताना दिसला....!! चिमुकलं हृदय परत मोहरून गेलं....! पण आज तो हसला नाही नेहमीसारखा.... !! का...... ?!! शिफ्ट संपेपर्यंत ती विचार करत राहिली....! घरी निघताना मुद्दामच पार्किंगमध्ये थांबून प्रतिक्षा करत राहिली त्याची....!! 

तो येऊन सरळ त्याच्या कारकडे जाणार, तोच त्याला मृद्गंधाइतकी परिचित नि इच्छित चाहूल लागली...!! तो वळला नि आज त्याची धीरगंभीर मुद्रा बघून तिच्या सुमुखावर प्रश्नार्थक लकेर तरळली....!!

"What's up, Dr. Paritosh.....?!!" तरीही ती हसून वदली.

"I've something to tell you, काव्या.....!! I'm transferred to Bangalore.....!! And I'm gonna join from next week....!!! This was my last day here and...."

"A....., And....?"

"And this is our last meeting, I guess....!!"

त्याचं सगळं बोलून तो रिता झाला.

"You're joking ना....?!?!"

कसनुसं हसत ती खुळ्या मनाला खोटी आशा देत होती....!!

"Do I joke this bad usually, ह्म्म....?!"

तिच्या नेत्रकडांवर चमकलेला तो चुकार थेंब, त्याच्या नजरेने टिपू नये, म्हणून तिचा सारा खटाटोप....!! दिसत होतं त्यालाही, तिच्या नयनी, हृदयी ओतप्रोत भरलेलं, पण ते प्रेमच होतं का...?! जर प्रेम नव्हतं, तर कुठली ही अनोळखी संवेदना....?!! ......आणि ती आजच कशी जाणवतेय, विरहाच्या भयाने की वेदनेने....?!! जे मुळात कधी हक्काचं नव्हतंच, ते निसटून जाऊ नये, यासाठी उगा सारे यत्न....!!

"This is..... this is for you, काव्या.....!!"

धडधडत्या अंतःकरणाने त्याने तिच्या पुढ्यात धरलेली ती रक्तवर्णी मखमली लघु अलंकारपेटिका....!!

"मेरे लिये....?! But why....??!"

"I thought, you know...."

तिची झुकलेली पक्ष्मने सांगून गेलीत त्याच्या प्रश्नाचं उत्तर....!!

त्याच्या हातातून तो ज्वेलरी बॉक्स उचलून घेत तिच्या शनांगुलींनी उघडला.....

......अन् त्यात हीरकजडित नाजूक पैंजणाचा जोड बघून तिच्या मंद हसलेल्या अधरकळ्या अन् त्या चांदणरातीची सारी झळाळी लेऊन चमकलेली तिची मृगनयने, हे त्याच्यासाठीचं 'गिफ्ट' होतं, तिच्याही नकळत, तिने दिलेलं, ज्याच्यावरचा त्याचा अधिकार कोणीही वाटून घेऊ शकत नव्हतं....!!

"Is this as a friend....."

"श्श्....." तिच्या सुकुमार ओठांवर हलकेच उत्तर तर्जनी टेकवत तो उद्गारला....., "मत बाँधना किसी बंधन में इस रिश्ते को, काव्या.....!! कुछ रिश्ते बेनाम ही बेहद खूबसूरत होते है.....!!!"

......नि त्या क्षणी वाऱ्याची एक द्वाड झुळूक त्यांना स्पर्शून गेली, तेव्हा तिच्या हातात किणकिणलेल्या पैंजणांच्या नूपुरांची रुनझुन अशीच तर 'बेनाम' होती, जिला सोनप्रभेची अपेक्षा नव्हती, त्यांच्या नात्यासारखीच अनामिक.....!!!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍