STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

योग

योग

1 min
325


बळ देईन शरीर देईन

दूर करेन पीडा

संस्कारक्षम मनाला द्या

योगाची धूरा


आळसापायी तनूचे

करू नका हाल

यम बसल टपून

उघडल मृत्युच दार


हवेत भरपूर असते 

सकाळी प्राणवायू

उठत जाऊ लवकर थोडं

सुखी ठेवू आयू !


मरण तर येणारच

चिताही पेटल

जीवंतपणी जीवन मात्र

योगामुळे नटल


पहाटेची निर्मळ हवा 

ताजी असते छान

निरामय आयुष्य

योग देते दान


(योग गुरू रामदेवबाबा यांना समर्पित रचना )


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational