यजमान
यजमान
आणखीच सुंदर दिसतोस
त्या चेकवाल्या शर्टात
तुझी ती फ्रेन्च कटवाली दाढी
आणि त्या टाय बुट कोटात
दिवसभर बाहेर असा उन्हातान्हात
फिरते जसा गोल भिंगरीच्या ताला
मन वढतया मााघारी जीव थकला भागला
घरट्यात परत मागोवा घ्यायला
येताच आवाजाची टकटक दाराला
नजरेत पडे तो चेहेरा थकलेला
केविलवाणी पाही त्या टाय कोटाला
नाही उरे शक्ती त्याच्या शरीराला

