STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

ये रे घना..

ये रे घना..

1 min
281


उंच उंच आकाशी

मेघ जमले एकत्र

चर्चा करू लागले

घन बरसुया सर्वत्र.....


बळीराजाचे हाल

पाहवत नाहीत काही

पेरणी केली राजाने

पाणी मात्र नाही......


जलविना होईल दुष्काळ

प्राण्यांचे होतील हाल

नको नुसतेल पहायला

वरून त्यांचे बेहाल.....


काळे काळे मेघ

जमून आले आकाशी

बरसात करू लागले जलाची

खुशी बाळगून उराशी.....


मेघातून आवाज आला

वीजांचा चमचमाट झाला

मेघांचा खेळ पाहुनी

बळीराजा आनंदला.....


बळीराजा खूप सुखावला

अंतरी हर्षाने वेडावला

ये रे घना ,ये रे घना

म्हणत उड्या मारु लागला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational