STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Children

3  

Ashok Shivram Veer

Children

ये आई

ये आई

1 min
198

ये आई मला पाण्यात खेळू दे,

पाण्याचे थेंब थेंब पाहू दे.

लढविल मी थोडीशी शक्कल,

अन भिजविल अशी ही चप्पल.

ये ग ताई येना ग आई,

पाणी खेळायची मलाच घाई.

उडीच मारून पाणी उडविल,

असा मी तुलाच भिजविल.

दादाला बोलेल बाबांना सांगेन,

मीच पाण्याला उडवलं म्हणेन.

घरी गेल्यावर मिळू दे सजा,

पण तू येऊन बघ किती येते मजा,

बाबा चिडेल तुलाच मारेल,

आई माया माझीच करेल.

ये आई मला पाण्यात खेळू दे,

पाण्यात मला प्रतिबिंब पाहू दे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children