STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

3  

Kiran Ghatge

Others

आगमन

आगमन

1 min
11.7K

तुझं माझ्या आयुष्यात झालं आगमन

रोमांचित झाला जीवनाचा प्रत्येक क्षण न क्षण

गोबर्‍या गुलाबी गालांनी मनाचा घेतला ठाव

गोड या हसण्याने बदलून गेले जीवन भाव

नाजुक तुझ्या नखर्‍यांनी दिवस माझा सरे

आनंदाच्या अश्रुंनी डोळ्याच्या कडाही भरे

घास पहिला तू माझ्याकडूनच खात असे

धरून माझा हात पहिले पाऊल टाकत असे

कुशीत माझ्या झोपण्यासाठी तू अडून बसे

तुझ्यासोबत खेळण्याचा हट्ट मी कधी मोडत नसे

सारे तुझे हट्ट पुरवताना माझी तारांबळ उडत असे

हाक तुझी ऐकण्यासाठी मी अतुरतेने वाट पहात असे

नातं हे असे कसे निसर्गाला वाटते विचारावे

मायेचं प्रतिबिंब माझ्या मला का? तुझ्यात दिसावे


Rate this content
Log in