चिमुकल्या पावलांनी
चिमुकल्या पावलांनी
1 min
12.1K
चिमुकल्या हातांचा विळखा अंगाला
बोबड्या बोलांची पखरण जिभेला
निरागस डोळ्यांत धूर्तताही दिसते
लीला पाहूनी मन मोहरते
चिमुकल्या पावलांनी माझिया अंगणी
सडा प्राजक्ताचा गेला रंगुनी
चिमुकल्या प्रतिमेत सामावले सारे
विश्वाच्या अंगणातील चमकते तारे