STORYMIRROR

Nita Meshram

Children Stories Others

3  

Nita Meshram

Children Stories Others

आवडतं मला

आवडतं मला

1 min
255

आवडतं मला बालपणात रमायला

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला

आईच्या मागे खाऊसाठी रडायला

खाऊ मिळाल्याने आईला बिलगायला


आवडतं मला बालपणात रमायला

आजीच्या छान छान गोष्टी ऐकायला

स्वप्नांच्या दुनियेत जगायला

बाबांनी हाक मारली की

आजीच्या कुशीत शिरायला


आवडतं मला बालपणात रमायला

शाळेत मैत्रीणीसोबत वेळ घालवायला

कधी शाळेत मुद्दाम दांडी मारायला

कधी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला

कधी सवंगड्यासोबत शिक्षेचा आनंद घ्यायला


आवडतं मला बालपणात रमायला

आवडत्या खेळात रंगून जायला

एखाद्या विनोदाला पोटभर हसायला

जगण्याचा आनंद घ्यायला

आवडतं मला बालपणात रमायला


Rate this content
Log in