कुतुहल
कुतुहल
1 min
153
विचारा विचारा मुलांनो
तुम्ही प्रश्न विचारा
कोण, का, कोठे, कधी
मांडा सारा हा प्रश्नांचा पसारा
पळसाला पाने तीनच का?
एक आणि एक दोनच का?
आठवड्याचे वार सातच का?
आणि वर्षाचे महिने बाराच का?
पृथ्वी ही आपली गोलच का
अन् ऋतू अवघे तीनच का?
आपण सगळे चालतो तर सरळ
मग वटवाघळूच लटकते उलटे का?
हाताला बोटे पाचच का?
आणि डोक्याला मेंदू एकच का?
जग हे सारे जर रंगाची दुनिया
मग पाण्याला नाही रंगच का?
विचारा विचारा मुलांनो
तुम्ही प्रश्न विचारा
कोण, का, कोठे, कधी
मांडा हा सारा प्रश्नांचा पसारा
