माणूसकी
माणूसकी
1 min
345
नका विचारू धर्म मजला
नका विचारू जात कोणती
माणूसकीचा धर्म माझा
माणूसकी हीच जात माझी!
भेद ना केला कधी निसर्गाने
ना सूर्य अन् कधी चंद्राने
मग आज कसले हे प्रश्न तुमचे
आणि का म्हणूनी हे पुसणे!
माणूस म्हणूनी जन्म मिळाला
अहो भाग्य समजा हे थोर हो
मिळवा अपार किती आता अन्
फेडा समाज-देशाचे थोडे ऋण हो!
एकमेका करू सहाय्य
तंटा असो वा आपत्ती
नशिबाचे सोडा नशिबावर
माणूसकी हीच आहे मोठी संपत्ती!
नका विचारू धर्म मजला
नका विचारू जात कोणती
माणूसकीचा धर्म माझा
माणूसकी हीच जात माझी!
