शाळेत जायाची
शाळेत जायाची
1 min
265
चला उठा पहाट झाली,
शाळेत जायाची वेळ झाली
चला उठा अावरा सारे,
पाठीवर अडकुन दप्तर घ्या रे
चला उठा पहिला तास झाला,
पाहा तो मारका शिक्षक आला
चला उठा मध्यंतर झाला,
लागा रांगेला खाऊ आला
चला उठा दुपारची सुट्टी झाली,
परत वर्गात जायाची वेळ आली
चला उठा इंग्रजीचा तास आला,
पाहा तो खोडकर मुलगा पळून गेला
