मोबाईल
मोबाईल
1 min
224
एकदा जंगलात हरवला ससा
कोण जाणे कसा?
भित्रा ससा घाबरला
आई आई रडू लागला
खिशात होता मोबाईल
आईला केला फोन
मी ससूला बोलतोय
लवकर ये
आई आली पटकन
ससा हसला खुदकन
का रे ससूल्या?
Gps होते फोनमध्ये
ससा झाला कावराबावरा
नको Gps नको गेम्स
हवी फक्त तू आणि तूच
तूच माझे प्रेमळ नेटवर्क
