STORYMIRROR

RUTUJA GAWAS

Others

3  

RUTUJA GAWAS

Others

क्षण आनंदाचा

क्षण आनंदाचा

1 min
206

क्षण आनंदाचा

तुझी आई झाली

मातृत्व दिधले

सुखाने मी न्हाली


क्षण आनंदाचा 

गोकुळ घरात

बाळलीलेत मी

आनंद मनात


क्षण आनंदाचा

तुझ्या कर्तृत्वाचा

यशाची शिखरे

मान सन्मानाचा 


क्षण आनंदाचा 

सुखात रमता

स्मरण आमचे

जीवन धन्यता


साहित्याला गुण द्या
लॉग इन