प्रेमा तुझा रंग कसा ?
प्रेमा तुझा रंग कसा ?
प्रेमा तुझा रंग कसा ?
अबोल प्रीतीचा रंग जसा
कृष्ण राधेचे निस्सिम प्रेम
तरीही मीराबाईच्य प्रेमाचा
भक्तिमय रंग जसा
प्रेमा तुझा रंग कसा ?
वादळवाटा आल्या तरी
संकटात अढळ राहून
विश्वास प्रीतीने संकट तारणारी
प्रेमा तुझा रंग कसा ?
लडिवाळ बाळाचे गोकुळ घरी
दुडक्या चालीत,बोबड्या बोला
कन्हैयाचे नंदनवन नांदते दारी
प्रेमा तुझा रंग कसा ?
कष्टाच्या झोपडीत सुखाची झोप
स्वप्न सुखी संसाराचे
स्वर्गसुखाला नाही मोजमाप
प्रेमा तुझा रंग कसा ?
हातातील मेहंदीचा रंग जसा
गालावरचा गुलाबी रंग जसा
रेशमी ऋणानुबंधाची ठेव जसा

