STORYMIRROR

RUTUJA GAWAS

Others

3  

RUTUJA GAWAS

Others

पाढे

पाढे

1 min
309

बे एके बे

  बे दुणे चार

आईबाबा,शिक्षकांची

कौतुकाची थाप पाठीवर


 बे त्रिक सहा

 बे चोक आठ

 रोज सराव पाठांतर

 पाढे झाले तोंडपाठ


बे पंचे दहा

बे सक बारा

प्रार्थना, श्लोक 

मुले म्हणती भराभरा


बे साती चौदा

बे आठी सोळा

खेळासाठी जमा होई

सर्व मित्रपरिवार गोळा


बे नवे अठरा

बे दाहे वीस

लंगडी,लगोरी,आट्यापाट्या

शाळेतील रम्य ते दिवस


साहित्याला गुण द्या
लॉग इन