अभिमान मराठी
अभिमान मराठी
1 min
307
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन
२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन
हृदयाचा हृदयाशी संवाद मराठी
शिवरायांचा अभिमान ,शान मराठी
म्हणी,सुविचार उखाणे
अलंकारांनी सजली नटली
भाषेचे सौंदर्य, माधुर्य
गावऱ्हान तडका ,लावणीने शृंगारली
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम
सुस्वर आळवित भजन ,कीर्तन
प्रभातसमयी जात्यावरच्या ओव्या
भूपाळी, पोवाडा किती करू गुणगान
कुसुमाग्रज, पाडगावकर, करंदीकर, बालकवी,बहिणाबाई,शांता शेळके
ज्येष्ठ श्रेष्ठ मराठी साहित्य
साता समुद्रापार महती झळके
मायमराठी अभिमान जागतो
वाचनसंस्कृती जोपासतो
नाते मातीशी जोडते
मनाची मनाशी साद घालत
