STORYMIRROR

SHUBHAM BHAGAT

Children Stories

3  

SHUBHAM BHAGAT

Children Stories

खिचडी

खिचडी

1 min
11.8K

शाळेतून घरी येताना विचार मनात एक आला

दोन दिवस झाले खिचडीत पहिला नंबर नाही आला

असा कसा मी मागे पडलो ठाऊक जिवाशी ना झाला

रात्रभर मी विचार करून नवीन प्लॅन तयार केला


उद्या सकाळी लवकर उठून आपण शाळेत जायचं

कितीही पापड बेलले तरी दरवाज्यात शिट धरायचं

कसाबसा मी शाळेत पोहोचून पहिली शिट सापडवली

दोन जणांनी उचलून मला मागची शिट दाखविली


हताश बसून असतानी खिचडीचा वास आला

घड्याळात तास बघतात मात्र जीव निघून गेला

तळमळ तळमळ करताना एक विचार सुचला

मधली गुंडी खोलून मी प्लेट आत शिरवला...


अन्होनी को कोण टाले ऐसी घटना घडली

वेळेवर मॅडम बाई फाडे घेऊन पेटली

असा कसा तो दिवस निघाला 17 चा पाढा विचारला

सतरा त्रिक एक्क्याण्णव म्हणताच पाठीत बुक्का स्विकारला


त्याच क्षणी मॅडम बाई एवढ्या जोरात ओरडली

शर्टातली प्लेट काढून साऱ्यांना तिने दाखवली

प्रिन्सिपल आमचा जालिम मोठा विचार त्याने केला नाही

एक पाय वरती उचलून चांगली खिचडी त्याने भरवली बाई...


Rate this content
Log in