STORYMIRROR
कागदी...
कागदी विमान (सहाक्षरी)
कागदी विमान (सहाक्षरी)
कागदी विमान (सहाक्षरी)
लहानपणीचा
खेळ आवडता
कागदी विमान
छान बनवता
पैज लागायची
ती सवंगड्यात
कोण बनवले
विमान क्षणात ?
वाऱ्याचा तो वेध
अंदाज घेताना
विमान घासावे
वर सोडताना
विमान आकाशी
जोरात फेकले
ध्येय गाठण्यास
गगनी भिडले
More marathi poem from Kishor Zote
Download StoryMirror App