बालपण
बालपण
1 min
270
व्हावे अजून एकदा लहान
आणि भागवावी राहिलेल्या इच्छापूर्तींची तहान
कराव्यात परत त्याच करामती
ज्यासाठी घ्यावी लागत नाही कोणाची संमती
स्वच्छंदपणे नाचू या, बागडूया
प्रत्येक क्षण नव्याने जगूया
असावी बाल मित्र-मैत्रिणींची जोड
लागली मना अशी एक अजब ओढ
