बालपण
बालपण
.......वाटते कधी स्वछंद
जगणारे फुलपाखरु व्हावे
वाटते आज मी आईचे
लहान ,गोंडस लेकरु व्हावे .....
......वाटते पुन्हा पुन्हा
पडावे चालताना रस्त्यावरी
आईनी उचलुन घ्यावे
दोन्हि हातांनी खांद्यावरी.....
....वाटते पुन्हा व्हावे
तिच्यासाठी बाळ तान्हा
कधी "शक्तिमान " कधी
व्हावे मी वाटते द्वाड कान्हा ...
....वाटते पुन्हा लहान
लहान वस्तुंसाठी हट्ट करावा
कधी तिच्याशी थोडा बहुत
उग अबोला मी धरावा....
....वाटते पुन्हा चांदोबाची गोष्ट
ऐकायला शिरावी तिच्या कुशीत
पुन्हा पाण्यासोबत बिस्किटे
खावे टाकुनिया कपबशीत....
