अनोखी मैत्री
अनोखी मैत्री
1 min
12.2K
आहे माझ्या घरी,
एक अनोखी जोडी,
मनीमाऊ आणि मोती,
यांच्यात आहे खूपच गोडी.
खेळतात मजेने एकमेकासोबत,
बसतात कधीकधी खोटंखोटं भांडत,
रंगतो कधीतरी पाठशिवणीचा खेळ,
दोघांचा बसलाय खूप छान मेळ.
मांजर आणि कुत्रा आहेत,
म्हणायला तर शत्रु खरे,
पण माझे हे दोन्ही सोबती,
राहतात प्रेमाने करतात खूप नखरे.
माणसातलं प्रेम असतं कधी स्वार्थी,
पण प्राण्यांच्या प्रेमाची भावना निस्वार्थी,
लावता यांना लळा तर ते पण लावतात,
इमानेइतबारे घरातल्यांची सोबत करतात.
