यात्रा
यात्रा
चाललो प्रवासी, एकलाच मी माझा.
सोबत आयुष्या जगण्या, वसा घेतला तुझा.
मैला मागूनी मैल संपती, तुडवीत आहे वाटा.
डोळ्यात साठली असंख्य चित्रे, आठवणींचा साठा.
येणारं सगळं समोर, अलगद मागं पडत आहे.
यात्रासमाप्ती आली जवळ, स्वप्न नवें मांडत आहे.
यात्रा विरामापेक्षा आता, प्रवासावर जास्त प्रेम जडलंय.
कधीच संपू नये प्रवास, या विचारांवर मन अडलंय.
प्रत्येक प्रवासामध्ये, विसावा विश्रांती असते एक मात्रा.
आयुष्य म्हणजे दुसरे काय, शेवट पर्यन्तची एक यात्रा.
